Christmas Puja Pune (India)

Christmas Puja – Stn Pavan Dam 25th December 1986 Date: Place Pune Type Puja आज मी मुद्दामून इंग्लिशमध्ये बोलले, पण तुम्हा सगळ्या पुणेकरांना इंग्लिश येतंय. तेव्हा जास्त काही त्याचा खुलासा करून सांगायला नको. पण ह्या लोकांना आज, ख्िसमसच्या दिवशी काहीतरी ख्रिस्ताबद्दल सांगावं म्हणून मी सांगितलेले आहे. आता आपल्या संस्कारांमुळे ख्रिस्तांची आपल्याला फारशी माहिती नाहीये. पण ते बरोबर नाही. आपण त्याची माहिती करून घेतली पाहिजे. ती माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण तो आज्ञा चक्रावर बसलेला आहे. आज्ञा चक्रावर बसलेल्या ख्रिस्ताला जर आपण जाणलं नाही, तर आपण गणेशाला जाणलं नाही. कारण गणेश हाच ख्रिस्त आहे. तेव्हा गणेशाने जगामध्ये येऊन काय कार्य केलं? त्याने अवतरण घेऊन काय काय कमाल केली? त्याने काय आपल्यासाठी केलंय? त्याचं जे काही कार्य आहे आणि त्याचा जो काही प्रादर्भाव आहे, तो आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनात मिळतो. नुसत गणपती, गणपती करून बसतो. गणपती बसला, गणपती हे, ते, पण गणपती म्हणजे काय, करतो तरी काय आपल्यामध्ये? त्याचे काय गुण शुभकारी आहे, अमूक आहे, तमूक आहे. त्याने कसं शुभ केलं! त्याचं जे काही कार्य होतं ते ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून सर्व लोकांनी ख्रिस्ताचं चरित्र वाचून काढलं पाहिजे आणि आहेत ? तो विचारणा केली पाहिजे. आता हे जे काही मागचे संस्कार आहेत त्याप्रमाणे वागून चालत नाही. जसे इकडे हे लोक ख्रिस्ती धर्मातून आलेले आहेत. त्यांनी आपल्याकडचे सर्व अवतार कोणते होते? त्यांनी काय काय कार्य केलं? ह्याबद्दल माहिती करून घेतली. आणि कधीतरी तर ते आपल्यापेक्षाही जास्त आहेत. तेव्हा आपणही खरिस्तांबद्दल, मोहम्मदांबद्दल, इतरही जे मोठमोठाले सद्गुरु झाले त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. ह्याला कारण असं आहे, की उद्या तुम्हाला गुरुपद मिळालं, तुम्ही ब्रह्मनिष्ठ असलात, Read More …