Public Program

Angapur (India)

1986-12-26 Public Program Marathi, Angapur India DP-RAW, 67'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Upload transcript or translation for this talk

Shri Mataji is welcomed by the sahajis at the public program. Bhajans are sung.

Shri Mataji’s speech starts at time 21.45आपणा सर्वांचा उत्साह आणि प्रेम बघून, एका आईचं हृदय किती गहिवरू शकतात हे समजण्याची क्षमता तुम्हा आयांना असू शकते मुलांना असू शकते. कारण हा देश आईंचा देश आहे. आईची थोरवी इथे  माणलेली  आहे आणि महाराष्ट्राची आई बहुतेक सुज्ञ बाई असते. आपल्या अंगापूरच्या योगभुमीत, आधी रामदास स्वामींनीच तपश्चर्येने पुष्कळ कार्य करून ठेवलेलं आहे. परवा तुकारामांच्या भजनात एक अभंग म्हणून दाखवला, तेव्हा ते म्हणाले मी तुम्हाला निरोप द्यायला आलोय. एक महत्त्वाचा निरोप – हा मार्ग, परमेश्वराचा मार्ग फार सहज सरळ आणि सुलभ होणार आहे. या सर्व साधू संतांनी आमच्यावर फार मेहरबानी केली, त्यामुळे लोकांना आज महाराष्ट्रात आज जाणीव आहे, की  आत्मसाक्षात्कार शिवाय जगात काहीही दुसरं मौल्यवान नाही.  पण ही जाणीव इथे दिसत नाही की, किंवा आपण असं म्हणूया, हिंदुस्थानात ही जाणीव कमी आहे. ही आपल्या महाराष्ट्रात संतांची फार मोठी देणगी आहे. आणी तो वारसा त्यांनी गीतेतुन, ज्ञानेश्वरी सारखी सुंदर कविता रचून,  अनेक ग्रंथ लिहून, लोकांना जाणीव दिली की आत्मसाक्षात्कार म्हणजेच परमेश्वराला मिळवणं आहे आणि त्यातच सगळं काही आहे. पण त्या संतांच्या सांगण्यावरून, आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, या दिवसाची वाट पाहणे, हे सुद्धा काहीतरी  विशेष पूर्वसर्वतामुळे  घडतं. म्हणून असं म्हटलं पाहिजे की अंगापूर आणि सातारा जिल्ह्यातले जी  लोक इथे आलेली आहेत, त्यांची काहीतरी पूर्व पुण्याई ही फार असली पाहिजे,  पूर्व सुखरूप काहीतरी असलं पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी इतके लोक मला सहज योगी दिसत आहेत.

सहज योगाचे लाभ किती आहेत हे तुम्हाला माहित आहे. ते तुम्हाला परत परत काय सांगावे. पण एक गोष्ट सांगावीशी वाटते, ही परमेश्वराने ही सर्व सृष्टी रचली, हे सगळं विश्व निर्माण केलं, आणि त्यात ही पृथ्वी एक विशेष स्वरूप तयार केली. त्याला कारण काय? असं परमेश्वराने का केलं? असा प्रश्न एखादा विचारू शकतो. तर त्याच उत्तर असं आहे की परमेश्वर काय आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा स्वभाव काय आहे, तो कोण आहे – ते पाहण्यासाठी त्याला एक आरसा पाहिजे होता. जसं सोन्याला कळत नाही की ते सोनं आहे, सूर्याला कळत नाही की त्याच्या प्रकाश काय आहे, चंद्राला दिसत नाही की त्याच्यावर डाग का आहे. म्हणून या सृष्टीची रचना झाली, की परमेश्वराने आपल्यासाठी एक सुंदरसा आरसा बनवला आहे. आणि तो आरसा परमेश्वराने बनवला, घडवला वाढवला, आणि उत्क्रांती करत करत तो मानवाच्या हृदयात आत्मा स्वरूप प्रकाशित आहे.

त्याच परमेश्वराचे दर्शन आपल्याला होणार आहेत. तेव्हा आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय परमेश्वराला चैन होणार नाही ही गोष्ट खरी. त्याची तळमळ आहे हे बरोबरच आहे, कारण त्याला त्याचं स्वतःचं दर्शन घ्यायचं आहे. पण जेव्हा तो स्वतःच दर्शन घ्यायला निघाला, तेव्हा मानवात एकाहून एक विचित्र लोक दिसायला लागले. विक्षिप्त लोक दिसू लागले. आपापसात भांडाभांडी, हे दुसऱ्यांचा गळा कापणे, पैशाच्या मागे धावणे, खोट्या गोष्टींकडे लक्ष देणे, म्हणजे जे काही परमेश्वराचं प्रेम तत्व आहे त्याच्या विरोधात वागणे. दुसऱ्यांना त्रास देणे, तापवणे, वाटेल ते प्रकारचे चिल्लर प्रकार, भास्काळपणा. ज्याचं की आम्ही वर्णन पण करू शकत नाही. जे तुम्ही रोजच ऐकता पेपर मध्ये वाचता, हिंसाचार,  देवाच्या नावावर वाटेल त्या गोष्टी लोकांनी सुरू केलेले आहेत. देवाच्या नावावर एक दुसऱ्याला मारायला सुरुवात केली, असं कसं होऊ शकतं? अहो जर आरशातले कण आणि कर आपापसात भांडू लागले, तर तो आरसा कसा बनवायचा? देवाच्या नावावर खोटेपणा भोळ्या भाबड्या लोकांना फसवून पैसे कमवायचे, मुर्खात काढायचं लोकांना. देवळात मंदिरात, मदजितीत, चर्च मध्ये सगळीकडे हा गोंधळ पाहिला की असं वाटतं की हा कोणाचा आरसा आहे बुवा? हा काही परमेश्वराचा आरसा असू शकत नाही. कारण परमेश्वर हा एकच आहे, जरी त्याचे अनेक नाव असले, तरी त्यातनं एकच तत्व वाहत असतं, आणि त्या तत्त्वावर वाढणारे लोक एक दुसऱ्याच्या विरोधात कसे बसले? आणि एक दुसऱ्याला ओळखत सुद्धा नाहीत,  म्हणजे मग हा आरसा आहे कुणाचा? हा आरसा परमेश्वराचा नव्हे तर हा राक्षसाचा आरसा आहे. त्याच्यामध्ये व्यसन आली, काहीही सौंदर्य नाही, काहीही शोभा नाही, आपापसात कोणत्याही प्रकारची समजूता नाही, हे परमेश्वराचं साम्राज्य असू शकत नाही, हे कोणत्यातरी राक्षसाचं असेल. पण आता अंगापूरला आल्यावर वाटतं की परमेश्वराचं साम्राज्य आलं बरं का. आणि एक प्रकारची तृप्ती वाटते की, सगळं गावचं गाव सहज योगात आलं – सगळ्या विश्वाचा एकच धर्म आहे आणि तो आहे परमेश्वराला प्राप्त करणे. आणि त्यानंतर त्या आत्म्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे. तुम्ही आत्मा आहात हाच धर्म खरा, बाकी सर्व धर्म खोटे. तुम्ही फक्त आत्मा आहात म्हणजे परमेश्वराचा आरसा आहात. बाकी त्या धर्माला तुम्ही कोणतेही नाव दिलं, हिंदू मुसलमान काही म्हणा, तरीसुद्धा त्याचं जे तत्व आहे ते हेच आहे, की असा  मनुष्य जो आपल्याला धार्मिक म्हणतो, तो परमेश्वराचा आरसा असायला पाहिजे. पण असं काही दिसत नाही.  आता नाशकाला गेलो होतो, तिथे सगळे, उपटसुभा  बसलेले आहेत गोदावरीवर, आणि मला म्हणतात की इथे  कसे इतके दुष्काळ पडतात, तीर्थक्षेत्र असून सुद्धा कसे दुष्काळ पडतात? त्याचं सरळ उदाहरण असं आहे की त्या ठिकाणी सगळ्यात जास्त तंबाखू – जी की राक्षस्नी आहे. परमेश्वराला तंबाखू चालेल का एक सरळ प्रश्न विचारायचा, आणि दारू. त्याशिवाय तरी इतके आणी प्रकार  बोकाळलेत त्या परिसरात  की परमेश्वर काय तिथे पाऊस पडणार आहे? सगळीकडे दुष्काळ अशा लोकांच्या मुळे होतो. घरात जर एकही माणूस जर वाईट असला, तर सगळ्या घराची राजढूस धासधूस 31.56

एका संत्र्याच्या पेटीत जर एक संत्र खराब असलं,तर सगळी  संत्री खराब होतात. चांगला व्हायला वेळ लागतो, मी असं कुठे बघितलं नाही की संत्राच्या पेटीमध्ये जर 100 संत्री चांगले असते आणि एक जर वाईट असेल, तर तो काय चांगला होत नाही. त्याला उचलून काढून फेकावं लागतं. जे लोकं आपल्या आत्म्याला प्राप्त होणार नाहीत,  ते समाज कंठक म्हणून राहतील. त्या लोकांच्यामुळे कधीही शुभ होणार नाही. तेव्हा अशुभ लोकांशी आपण संबंध दूर ठेवला पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही, तुम्ही स्वच्छ होऊन घ्या, तुम्ही  प्रेमाने सांगितलं पाहिजे समजवायला पाहिजे. जितकी मेहनत घेता येईल, ती आपण अत्यंत हळुवारपणे केली पाहिजे –  हे कबूल. पण त्यावरही कुणी जर करत नसला, तर अशा माणसाला आपण दूर ठेवलं पाहिजे. देवाच्या नावावर जो बोल थापा मारतो किंवा फक्त मनोरंजनासाठी आम्ही सप्ताह करतोय, सप्ताह म्हणजे बसलाय तिकडे पैसे खाणारा – आणि सप्ताह चालू. अहो तुम्ही गृहस्थातले लोक आहात, मेहनत करून पोरा बाळांना पोचत आहात, हे एक भलं मोठं यज्ञ आहे. त्यामुळे या उपटसुमानापाशी द्यायला आणि या सन्याश्यांना पैसे द्यायला कशाला आणायचं? यांनी जर संन्यास घेतला तर स्वतःच कमवून खावा. तुमच्या दमा वरती – गृहस्थांच्या दमा वरती का खायचं? अजूनही पुष्कळशे  लोक सहज योगात येऊनही  अशा उपटसम्बांना बळी पडतात आणि त्यांना त्रास होतो. परवा अशीच एक केस झाली, की एक सहज योगी आले आणि मला म्हणाले की ‘ माताजी माझी बायको फार आजारी आहे, काय करावे’. म्हटलं असं का – मग कुठे जातात त्या? मग कळल की त्यांचे एक गुरुजी आहेत, ते काही सुटत नाहीत.  तिचा मुलगा आजारी,  ती आजारी, आणि ते गुरुजी महाराज आहेत घाणेरडे – अत्यंत घाणेरडा माणूस आहे, त्याच्याबद्दल बरेच घाणेरड्या  गोष्टी बायकांनी मला सांगितले आहेत. पण ही बाई त्याच्या नादी लागली आणि तो मुलगाही आजारी. पण ती काही त्याला सोडायला तयार नाही, मी म्हटलं ‘आहो, या गुरुने तुम्हाला काय दिलं? काय नाही. मग? तुम्ही काय दिलं? पैसे दिले फक्त…. असं का? आणखीन काय द्यायचं त्यांना? ‘ अशा लोकांच्या नादी लागून, आमचा भोळेपणा एका अर्थाने मूर्खपणा ठरतो. तेव्हा सहज योगात जर आले तर सहज योगातच बसले पाहिजे. म्हणजे आत्म्यालाच मानला पाहिजे, बाकी सगळं मुर्खासारख मानायचं नाही. होडीत बसला आणि जर तुमचा एक पाय मगरीच्या तोंडात असेल, तर आम्ही कसा बचाव करणार? तो पाय काढायला नको का मगरीच्या तोंडातून? आणि ही मगर आहे हे तुम्हाला समजणार तरी कसं जोपर्यंत तुम्ही होडीत येणार नाही? मग आता थोडा वेळ खाऊ देत पाय, जा सगळेच्या सगळे. तेव्हा एक सुज्ञ बुद्धीने राहिला पाहिजे. जशी तुम्ही शेती करता, शेती करताना मनुष्याला खूप सुज्ञता येते. जे किडलेलं असतं ते काढून टाकतो आपण, जे चांगलं बी बियाणं असतं, खत घालून पाणी घालतो. तसंच सहज योगाच आहे, याच्यात जे काही आपल्यामध्ये किडलेलं आहे, ते काढून टाकायला पाहिजे व्यवस्थित, ते नको आम्हाला. जे चांगलं आहे जे व्यवस्थित आहे, तेच आम्ही रोपवू, त्याच्यातून मोठे वृक्ष तयार करू.

संतांची महिमा आणि त्यांनी वर्णलेली  आपले भविष्य ते आज दृष्टी पडशील येतंय. तुम्हाला फार आश्चर्य वाटलं की लंडनला, एक पुस्तक वाचत असताना, एक लुईस म्हणून मोठा भारी कवी, त्याने आपल्या मिरवणुकीच एवढं सुंदर वर्णन केलं आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल – तुम्हा सगळ्यांचा वर्णन केलेलं आहे त्याच्यात. की ही एक आई आहे आणि तिची ही मुलं आहेत, आणि ते आनंदाने बेहोष नाचत चाललेत, आणि त्याला आत्मसाक्षात्कार दिलाय. इतकं स्पष्ट रूपाने ते वर्णन दिलेला आहे, मी ते पुस्तक आणलेलं नाही आहे इथे, पण नंतर आम्ही तुम्हाला पाठवून देणार आहे. अगदी तंतोतंत मिरवणुकीचं वर्णन दिलेला आहे. आणखीन परत तो असं विचारतो, त्याच्यात एक प्रश्न करतो आणि एक उत्तर देतो – ही जी आई आहे,  ती मुलांना इतर आयान पासून हिसकावून तर घेत नाही? तर ते म्हणाले नाही, ते आया सुद्धा तिच्या मुली आहेत. आणि त्यांचे बाप सुद्धा तिचे मुलं आहेत. फार सुंदर वर्णन या मिरवणुकीचे केलेलं आहे. कुठल्या त्या इंग्लंडमध्ये एक 50 वर्षांपूर्वी एका माणसाने वर्णन केलेलं आहे. इतकं स्पष्ट रूपात आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेक कवींनी केलेल आहे, रवींद्र बाबूंनी एक सुंदर वर्णन केलेलं आहे  – म्हणजे आपल्या देशात तर आहेतच पण दुसऱ्याही देशात सुद्धा या गोष्टी या दृष्ट्यांनी पाहिल्या होत्या हे मोठे मोठे जुने दृष्टे त्यांनी लिहून ठेवले.  आपल्या मुलाबाळांसाठी, तीच मुले बाळ इथं बसली आहेत, आणि त्यांना हे दृष्टी पत्नीस येतंय, की आनंदी आनंद सगळीकडे प्रेमाच्या ओघात सगळे वाहून गेलेले. आता हे बिचारे जे बाहेरून आलेले, 14 देशातून लोक आलेली आहेत. काल रात्री आम्ही चार वाजता झोपलो, कारण काल रात्री ख्रिसमसची रात्र होती आणि सहा वाजता उठलो. सहा वाजता उठल्यानंतर, मग ह्यांनी आंघोळी करून, जेवून घेऊन तिथून निघाले. मग काहीतरी प्रश्न उभा राहिला म्हणून त्याला पुण्याला जावं लागलं, त्यांना यायला उशीर झाला, सबंध वेळ हे प्रवासात होते. आल्याबरोबर तसेच जसेच्या तसे, कुठून कुठून आलेत हजारो माईला वरून तुमच्या आईची महिमा गाण्यासाठी तुमच्या अंगापूरच्या मातीवर लोळून राहिलेत. काहीतरी विशेष या मातीचा पण असलं पाहिजे, आणि तुमचं ही महत्त्व असलं पाहिजे. तेव्हा या आनंदाच्या शुभप्रसंगी, मी सर्वांना आनंद आशीर्वाद देते. आणि सहज योग सबंध साताऱ्या जिल्ह्यात पसरला पाहिजे. सबंध साताऱ्या जिल्ह्यात नांदला पाहिजे कारण ही भूमी रामदासांची आहे. इथे फार मोठाले संत साधू झालेले आहेत, अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाथांची भूमी असल्यामुळे पुष्कळ  कार्य झालेलं आहे. तसंच साताऱ्या जिल्ह्यात सुद्धा व्हायला पाहिजे.  वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित सहज योगात लोक जमले पाहिजेत.  आणि जमल्यानंतर हे समजलं पाहिजे की सहज योगाचे तत्व काय आहेत? आणि ती तत्व आपल्यामध्ये आहेत का नाही हे तोलून  पाहायचं. हा विश्वधर्म आहे, हा कोणत्याही धर्माचा अपमान करत नाही. पण ते धर्म असायला पाहिजेत, अधार्मिक लोक जर आपल्याला धार्मिक म्हणतील  तर ते आम्ही मानत नाही. जे सत्य आहे तेच आम्ही मानणार. तसेच चे इथले गुरुजन आहेत, सहज योगात, त्यांनी पुष्कळ वाचन पठण करून ठेवायला पाहिजे, कारण उद्या तुमचा सामना अशा लोकांशी होणार आहे जी कर्मठ आहेत, त्यांनी भरपूर पुस्तके वाचली आहेत, आणि जे फार विद्वान आहेत स्वतःला खूप शहाणे समजतात. अर्थात तुमची आई तुमच्या पाठीशी आहेचच. पण तरीसुद्धा त्यांच्याशी बोलताना, तुमच्यामध्ये इतकी तल्लब बुद्धी आणि विश्वास असायला पाहिजे की कोणताही त्यांनी प्रश्न टाकला की त्याला बरोबर निरूपण करून आम्ही उभे करू शकतो. ही स्थिती असल्याशिवाय या कर्मट लोकांना जिंकण सोपं काम नाही. ज्यांच्यासमोर आदीशंकराचार्यांनी पण हात टेकले की या महामूर्खानशी आंधळ्यांशी कोण बोलत बसणार आणि शेवटी त्यांनी मग सौंदर्यलहरी म्हणून एक पुस्तक लिहून टाकलं. त्याच्यात नुसता आईचच वर्णन लिहीत बसले. तर लोकांनी म्हटलं अहो एवढे  मोठे  तुम्ही वेद शास्त्र निपुण गृहस्थ आहात ( गृहस्थ नव्हते म्हणा संन्यासी होते ) त्यातला त्यात, विवेक चुडामणी सारखी मोठी पुस्तके लिहिली, त्याच्यावर तुम्हाला हे आईचं वर्णन लिहिण्याची काय गरज पडली? सौंदर्य लहरी – आईचं वर्णन, नखशिकांत  त्यांनी सर्व आईचं वर्णन केलं. फक्त ते म्हणे एक बघा – बाकी सगळं एकीकडे राहिलं, ते सगळं बेकार आहे, जे खरं आहे ते हे आहे आणि तेच मी लोकांना सांगतो कारण ते बेकार ह्याच्यात पडलं तर नुसते वाद-विवाद सुरू होतात. तेव्हा तुम्ही सर्वांनी सुद्धा त्यांनी आईचं वर्णन केलेलं वाचावं ऐकावं, श्रवण करावं.

दुसरी गोष्ट अशी आहे की, सहज योगात आपली सुरुवातीला स्थिती असते ती खरोकर क्षणभंगुर असते. क्षणाला एक मिनिट दिसते, परत नाही. एक मिनिट दिसते परत नाही. लोकांना वाटतं की आमची कुंडलिनी जागृत झाली म्हणजे एकदम आम्ही योगी जण होतो. तसं होत नाही. थोडासा प्रकाश येतो तुमच्यात,  त्या प्रकाशात तुम्ही स्वतःचे दोष बघू शकता, पण एकदमच तुम्ही फार मोठे योगी होत नाही. ही क्षणभंगुर प्रवृत्ती जी आहे, त्या क्षणभंगुर प्रवृत्तीला ठीक करण्यासाठी, तुम्हाला तुमचं चित्त थारावर आणाव लागत आणि त्यासाठी बैठक पाहिजे. ती बैठक असल्याशिवाय सहजयोग जमत नाही. दोन गोष्टी सहज योगात आहेत, एक आहे बैठक – बैठक सहज योगात असते, ज्याला पाण्याची ट्रीटमेंट, किंवा ध्यान करणे फोटो वरती. आणि दुसरी म्हणजे फारच फारच महत्वाची म्हणजे हे कार्य सामूहिक आहे. कोणी जाऊन हिमालयावर बसून म्हणेल की माताजी मी तुमचा फोटो घेऊन गेलो आणि तुमचं फार ध्यान केलं – आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ही एक सामूहिक कार्यप्रणाली आहे म्हणजे काम करण्याची पद्धत आहे. एकुलती एक बाई कोणी बसून म्हणेल की इतकं माताजी तुमच्यासाठी केलं, त्यांनी काही होणार नाही. माझ्यासाठी काही करू नका, स्वतःसाठी करा – सगळ्यांच्या बरोबर मिळून हे कार्य झालं पाहिजे.

आता एक घरगुती उदाहरण आम्ही तुम्हाला सांगतो की याचा काय अर्थ आहे. आपल्या घरामध्ये आपण दही लावतो, आणि त्याच्यातून आपण लोणी काढण्यासाठी त्याला मथून. मथाना तुम्ही पाहिला असेल की मटक्यामध्ये पुष्कळशे असे लहान लहान कण असतात त्या लोण्याचे जे इकडे तिकडे चिटकून राहतात.  त्या वेळा आपण एक लहानसा गोळा पाण्यात त्या ताकात घालतो. आणि जेव्हा आपण मथू लागतो तेव्हा त्या गोळ्याला सबंध जे लहान लहान कण आहेत ते चिकटतात. पण जे चिकटत नाही, त्यांना आपण ताकच म्हणतो, लोण्याबरोबर उचलून घेत नाही. जे त्या सामूहिकतेला चिकटले, त्यांना आम्ही सहज योगी म्हणून ओळखतो आणि जे चिकटले नाही त्यांना आम्ही ओळखत नाही. ही सामूहिकता आपण साधली पाहिजे. त्यात वादविवाद, भाऊबंनकी किंवा भांडणं करणं हे सगळं योगात बिलकुल शोभत नाही. प्रेमाच्या साम्राज्यात आनंदाच्या सोहळ्यामध्ये कसली भांडणं आणि कसला काय वादविवाद? अहो, आनंद घ्यायला सुद्धा आता वेळ राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा भांडायला   कोणाला वेळ आहे?

असो! आज फार आनंदाची वेळ आहे. सगळे अगदी आनंदात आहेत. इतका उशीर यांना झाला तरी, यांना काय त्याची पर्वा नाही आहे. अगदी मजेत बसले आहेत तुमच्या बरोबर. आणि हे तुमची मजा उचलत आहेत आणि तुम्ही त्यांची. ते म्हणतात की हे लोक किती मजेत आहेत आणि तुम्ही म्हणत आहात ते लोक किती मजेत आहेत. त्यांना तुमची मजा येऊन राहिली आहे आणि तुम्हाला त्यांची मजा येऊन राहिली आहे. अशा तऱ्हेची आपापसा मधली जी जुगलबंदी म्हणतात किंवा आपापसात जे परस्पर प्रेम आहे, ते बघून एका आईच्या हृदयासाठी फार मोठं मोठं कार्य आहे. मला समजत नव्हतं की कसं आवरून धरावं, इतकं गहिवरून आलं होतं. तेव्हा परमेश्वर तुम्हा सगळ्यांना असंच प्रेम देऊ, आपापसात तुम्ही सगळे प्रेमाने राहा, आणि सुखाने राहा. आनंदाच्या सागरात पोहत रहा असाच माझा सगळ्यांना आशीर्वाद आहे.

At time 45.56, Shri Mataji starts with the en mass realization.

सगळ्यांनी जरा व्यवस्थित पालथी घालून बसा. आवाज नाही तोंडाने बोलायचं नाही एक अक्षर बोलायचं नाही. सगळ्या मुलांनी सुद्धा शांत राहिला पाहिजे. अगदी शांत.

बर आता, डावा हात माझ्याकडे करा, फार सोपा आहे आज आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा. या महाराष्ट्राच्या योग भूमीला आपण नमस्कार करतोय, तसंच गणपतीला नमस्कार करून ध्यानाला बसायचं. डावा हात माझ्याकडे, डोळे उघडेच ठेवा. मी बसलेली आहे समोर तर कशाला डोळे बंद करायचे? डावा हात माझ्याकडे. डावी साईड आपली ठीक नाही आहे, कारण आपल्यामध्ये जुने कुसंस्कार इतके आहेत, कुजलेले आहेत की ते डोक्यातून निघत नाही. नाही निघत. फार विपश्चित  आहेत. एका बाईच्या दोन मुली, एकीचं लग्न परदेशात झालं, फॉरेन चा मनुष्य होता, तिला त्याच्यात काही हरकत नव्हती. पण तिच जर  मुलगी कुठल्या खालच्या जातीच्या मुलाशी लग्न करत असेल, तर तिला असं वाटलं की तिच्यावर आकाश कोसळून पडलं. मुलींच्या लग्नासाठी माताजींना  सांगतात की  मुलीचं लग्न लागत नाही म्हणून पण मुलांचं लग्न मात्र आपल्या जातीत करतात, कारण हुंडा आहे ना. हे सगळे  कुसंस्कार आपल्यामध्ये आहेत. तऱ्हे तऱ्हेचे कुसंस्कार आहेत, ब्राह्मणाला बोलवायचं सत्यनारायण करायचा, कशाला पाहिजे? सत्य म्हणजे नारायण आणि नारायण म्हणजे सत्य. दोन कशाला पाहिजे? सत्यनारायण म्हणून काय चीजच नाही आहे. नुसता नारायण आहे. संतोषी माता तिची पूजा, तशी कोणी देवीचं नाही आहे. तिची पूजा करत बसायचं, नाहीतर उपास. उपास सोडणं आपल्याकडे खूप कठीण आहे आपल्याकडे. उपास आम्ही धरले, उपास आम्ही सोडले तर आमचं काय होणार? काही होणार नाही, तुम्ही देवाच्या नावावर कृपा करून नका करू, करायचा असेल तर करा. जन्मभर पुष्कळ लोक करतच आहेत,  त्यांना खायलाच नाही. आपोआप ते स्वर्गात जाणार आहे असं  दिसत आहेत, जातच आहेत. उपाशी तापाशी. जो पोटी उपवाशी,  त्यासी काईचा भगवंत, असं म्हटलं आहे.

हा… बर आहे. तर असले काय काय कुसंस्कार आपल्या डोक्यात आहेत. ते काढले पाहिजेत, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. जरी जुनं असलं, तरी वाईट असलं ते सोडलं पाहिजे, आणि जे ठीक आहे ते घेतलं पाहिजे. कारण आपण सत्याला जागतो, खोटं डोक्याशी बाळगायचं नाही. गणपतीचा जन्म झाला त्या दिवशी उपवास करायचा, हमखास तुम्हाला घाणेरडे रोग होणार. गुरुवारी उपवास करायचा – कोणताही  मनुष्य जो गुरुवारी उपवास करतो, त्याच पोट हमखास खराब असलं पाहिजे . असलंच पाहिजे. आणि ते गुरुचे स्थान आहे, म्हणजे गुरूच रागवले आहेत, की माझ्या जन्माच्या दिवशी तू सुतक का रे पाळतोस? अहो डोकं आहे का नाही आपल्याला? भलत्या वेळेला भलतं कामं करायची, नको ते करायचं. आणि त्याचंही व्यसन आहे लोकांना. आता बसले हातात वीणा  घेऊन – पांडुरंग पांडुरंग, त्याने घसा ही खराब व्हायचा. पांडुरंग तर कधीच पळून गेला असेल. त्याच्या कानाला ओरडून ओरडून – अरे तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे पांडुरंगाला बोलवण्याचा? तसं एकदा बोलवलं तर येऊन उभा राहील, पण तसं पाहिजे ना तुमचं – स्थान ते आहे का? तोंडात तंबाखू घातले आणि निघाले टाळ कुटत. अरे ते तंबाखू तर त्या कृष्णाची म्हणजे पूतना आहे ती. तेच तोंडात घालून आणि तुम्ही टाळ कुटत निघाले तर काय होणार आहे तुमचं? सगळं उलट उलट काम डोक्यात बसवलं आहे. इकडे देवाचं नाव घ्यायचं आणि तिकडे शैतानाची पूजा करायची. आता या सगळ्या भ्रमकपणातून आपण निघायला पाहिजे नाहीतर आपली कशी प्रगती होणार सहज योगात?

डावा हात बरा आहे आता पुष्कळ बरा आहे.

( Shri Mataji clearing the left side as she speaks the above and below )

सगळ्या सगळ्या सवयी तुमच्या सुटतील. तुमची इच्छा झाली की माझं नाव घ्या सगळ्या सवयी सुटून पडतील. तुम्हाला मी शक्ती द्यायला बसलेली आहे इथे.

दुसरं अंगात येणे. परवा आमच्या लेक्चर मध्ये एका बाईच्या अंगात आलं. अंगात आला म्हणजे काय भूत आहे ते. भुतं आहेत! अहो देवी अंगात घ्यायला काय सोपं काम आहे का? कोणाच्या अंगात आलं की लागले त्याला कुंकू लावायला. म्हणजे तुमच्या अंगात यायला सुरुवात होईल. आणि मग झिम्मा पोरी झिम. अहो दिसत नाही का वेड सरासारखं? आणि या मोलकर्णी, यांच्या अंगात देवी येते. अरे देवीला काय अक्कल आहे की नाही? कोणीही सहज योगात अशा बाईच्या अंगाला हात लावायचा नाही, त्या बाईला बाहेर काढा. तिच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही. ती भूत आहेत. भूतांना देवीचं नाव द्यायचं, भूत आली म्हणजे देवी – वाह रे वाह! म्हणजे देव गेला कुठला कुठे आणि देवी गेली कुठल्या कुठे.

आणि ते दुसरे –  पुरुष सुद्धा काही कमी नाहीत. ते गालामध्ये टोचून, आगीतून चालती, आणि काय काय प्रकार करतील. अहो चांगदेवाचा तोच प्रकार होता, त्याच्यावर केवढं लिहिला आहे ज्ञानदेवाने, कोण वाचतं ते? आणि असे एखादा मनुष्य बघितला तर फार समजतात. त्याला म्हणाव थोडा मलखांब कर म्हणजे कळेल. एक सुद्धा पैत्र घेऊ शकत नाही, अनुमान असं ठिकाणावर लावेल त्याला. ही सगळी भुताची लक्षणे आहेत. आणि या भुताटकी कडे जाणारे लोक कृपा करून सहज योगात येऊ नका. तुम्हाला हेच पाहिजे असेल तर हेच करा, आणि काय भोगायचं असेल ते भोगा. आणि एकदा काय जर भूत घरात आली, तर लक्ष्मी तुमच्या घरातून उठून गेली म्हणून समजा. म्हणून हे सगळे कुसंस्कार आपण टाकलेच पाहिजेत. पूर्ण मनाचा निश्चय करून या सर्व गोष्टी आम्ही सोडल्याच पाहिजेत.  मग बघा तुमची कशी प्रगती होते.

बघा आता डावा हात सुटला.

हे सगळे कुसंस्कार डाव्या हातात बसलेले आहेत. आता तुमच्या कुलदेवता आहेत,  त्यांच्यामुळेच आम्ही पुष्कळ कामे करून घेतो. पण त्यांच्यासमोर एक भूत बसलेल आहे,  पैसे व्यवस्थित घ्यायचे. कुलदेवता ला कधी ते पैसे जातात? दिसत नाही का तुम्हाला – डोक्याने विचार करा. हा मनुष्य  मध्ये सगळं घेतोय कुलदेवतेच्या नावाने, आणि हा काय देवता आहे का कोण आहे? आणि तुमच्या कपाळाला लावलं त्यांनी कुंकू, आज्ञा चक्रावर बसवलं त्यांनी एक भूत. आले तिथनं झिंगत,  मग कोण? आमच्या अंगात आली म्हणे देवी कोल्हापूरची. असं काय सोपं काम आहे कोल्हापूरच्या देवीला अंगात आणायला? हा वेडेपणा आणि ब्राह्मकपणा सोडलाच पाहिजे. आणि मी स्पष्ट रूपाने सांगणार आहे तुम्हाला , त्यात वाईट नाही वाटून घ्यायचं, मी तुमची आई आहे. आणी आईला जे सांगायचे ते खरं स्पष्ट सांगितलं पाहिजे. आणि मुलांना जर ते सांगितलं नाही तर आमचं चुकेल. हे आमचं कर्तव्य आहे की जे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार, हे सगळं तुमच्या हितासाठी आहे.

सहज योग हा तुमचा हिताचा मार्ग आहे. तुमच्या हितासाठी, तुमच्या मुलांच्या हितासाठी, सर्व देशाच्या हितासाठी, सर्व , देश देशांच्या हितासाठी, सर्व विश्वाच्या हितासाठी, असं सहज योग आम्ही स्थापन केलं आहे.

हा आता सुरू झालं. हा येते ना आता डाव्या हातात? सुरू झालं ना? येतंय की नाही? बोला…. जोरात बोला ना. कोणा कोणाला खाली येतंय, म्हणजे अजून  उलट डोक आहे. इकडून इकडे आणा, ज्यांना खालून येत असेल त्यांनी इकडून इकडे आणायचं.  म्हणजे डोकं अजून उलट आहे कुठे कुठे चाललेल. असं वर घ्या. आता हा उजवा हात, या उजव्या हाताला असं ठेवायचं माझ्याकडे,  आणि डावा असा ठेवा . आता हा उजवा हात माणसाचा तेव्हा धरतो जेव्हा तो मानसिक, शारीरिक फार जास्त काम करतो. त्याला वाटतं की मी हे केलं मी ते केलं, परमेश्वरावर टाकून करत नाही. परमेश्वर करतो असं म्हणत नाही. जर तो असं म्हणेल तर त्याच्यामध्ये अहंकार येणार नाही. अहंकार ही भावना खोटी आहे, अशी खोटी आहे की एखाद्या विमानातून लोक चाललेत, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही विमान जास्त सामान घेऊ नका, बोजा कमी ठेवलेला बरा . तर ते विमानात बसले आणि डोक्यावरती सर्व बोजा ठेवला. त्यांना विचारलं की अहो डोक्यावर का ठेवलं तुम्ही? म्हणे असं आहे ना विमानाला खूप बोजा होतो, म्हणून आमच्या डोक्यावर ठेवलं आम्ही.  तर जे लोक असं समजतात की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, अशा अहंकारी लोकांचा उजवा हात धरला जातो. किंवा फार शारीरिक श्रम केले, उगीचच्या उगीचच, कारण असले तर ठीक आहे, पण उगीचच केले तर त्यांनी सुद्धा हात धरतो. आणि हा जर का धरला गेला, तर मनुष्यामध्ये फार अहंकार येतो. उजव्या हातामध्ये चैतन्य लहरी येत नाहीत,  म्हणून उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात आकाशाकडे, कारण आकाश तत्वाकडे गेलं पाहिजे. पहिलं पृथ्वीतत्वाकडे गेला पाहिजे, आणि दुसरं आकाशत्वाकडे, म्हणून हा हात डावा सारखा. अशी माणसे अत्यंत तापट, शिस्तीखोर, सारखं लोकांना झाडत राहायचं, बोलायचं. या लोकांना स्वतःला त्रास होत नाही, दुसऱ्यांना त्रास देतात. आणि जे कुसंस्कार असतात, ते स्वतःला त्रास देतात, दुसऱ्यांना देत नाहीत. दोन्ही एकच,  स्वतःलाही त्रास नाही दिला पाहिजे आणि दुसऱ्यालाही त्रास दिला नाही पाहिजे. पण अहंकारा मध्ये इतकी खोटी भावना आहे,  ही आम्ही करतो, तुम्ही करता काय?  मेलेला झाडाचा फर्निचर करतो – काय जिवंत कार्य केलं आहे का तुम्ही ? फक्त आत्मसाक्षातकारानंतरच तुम्ही कुंडलिनी उचलून दाखवता, की आम्ही जिवंत कार्य केलंय. म्हणून आधी जे काय झालं, ते काय कर्म नव्हतं, पण नंतर जे काय झालंय, तुम्ही म्हणता ‘माताजी कुंडली उठत नाही, वर येत नाही अजून होत नाही’. अरे वा! तू करतोस ना? नाही मी नाही करत, ही  कुंडलिनी उठत नाही. तुमच्यातला पुरुष बोलू लागतो, त्यांनी हे सुटतं, अहंकार! अहंकाराच्या बळी जायचं नाही.

बरं! दोन्ही हातात येऊ लागलं का? आता दोन्ही हात आकाशाकडे करून, मान अशी मागे करून ‘ श्री माताजी, ही परमेश्वरी शक्ती आहे का? ही ब्रह्म शक्ती आहे का? हे परमेश्वराचे प्रेम आहे का? ‘ असा प्रश्न विचारा. आता हात खाली करा. दोन्ही हात माझ्याकडे करा. निर्विचार होऊन,  हसायचं नाही. हसायचं नाही,  जेव्हा हसायचं तेव्हा हसायचं. नको तिथे नाही हसलं पाहिजे. वेड्यांचे लक्षण आहे ते. तुम्ही हात असे करा,  आता ज्या लोकांच्या दोन्ही हातात गार गार येतय त्यांनी हात वरती करायचे दोन्ही. ज्यांच्या ज्यांच्या डोक्यातून गार येतय, त्यांनी हात वर करायचे . वर करा दोन्ही मला दिसत नाही. सगळेच्या सगळेच तुम्ही झाले पार.  खूप व्यवस्थित येऊन राहिलय, तेव्हा, बोलता बोलताच, तुम्ही सगळे पार झालात. म्हणजे फार पुण्यवान लोक आहात. तुम्हालाच आम्ही नमस्कार करतो. आमचं नशीब थोर म्हणून असे पुण्यवान लोक आम्हाला लाभले. ( Time 1.00.30)

Shri Mataji requests everyone to bow down collectively and not come for individual darshan.

Speech ends here.

आलं ना सगळ्यांना? ‘ आलं आलं ‘ ठीक ठीक, आता भांडायचं नाही.

अंगापूरच्या सर्व लोकांना, गणपतीपुळेच आमंत्रण आहे. आणि सर्वांनी यावं, जवळच आहे दूर नाही. बरं का.

असं उभ्याने दर्शन घ्यावा आता. आमची गाडी आणली? मध्ये तुम्ही रस्ता करा नाहीतर सगळे माझे पाय धरतील.