Public Program Satara (India)

Shri Mataji arrives and is welcomed by the local sahajis. A Bhajan is sung. Then on a foreign sahaji gives a brief introduction about sahaja yoga.  Shri Mataji’s speech starts at time 22.06 आपलीच महती आपण जाणत नाही ही गोष्ट खरी आहे. जसं सूर्याला कळत नाही की तो प्रकाशमय आहे, तसंच महाराष्ट्राच्या लोकांना कळत नाही की त्यांच्यामध्ये परमेश्वराने किती आशीर्वाद दिले आहेत. म्हणून तो भ्रमिषष्ठासारखा इकडे तिकडे भटकत आहे. सारा समाज आज पश्चिम संस्कृतीने भारावून गेला आहे. आणि पश्चिमेचे लोक आता थकून भारताकडे बघत आहेत. आणि त्यांची दृष्टी लागली आहे की आम्हाला त्यांच्यापासून काय शिकायचा आहे? आपण स्वतःला फार पश्चिम मार्क  समजून खूप शिष्टासारखं वागतोय आणि त्यापासून आपल्याला काय लाभ होणार आहे किंवा नाही त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. साहेबांची बदली लंडनला झाली म्हणून आम्ही इंग्लंडला गेलो, आणि तिथे आम्ही आमच्या कार्याला सुरुवात केली. त्यावेळी असं लक्षात आलं की पश्चिम देशांमध्ये  जी काही प्रगती झाली आहे ती एखाद्या झाडाची प्रगती व्हावी अशी झाली आहे. पण त्याची मूळ या भारतात आहेत. आणि जोपर्यंत ही मूळ जोपासली जाणार नाहीत तोपर्यंत  ते झाड उलथून पडणार आणि त्या स्थितीला आल आहे ते. पण आपण जे या मुळात बसलेला आहोत, ते मात्र पूर्णपणे आधीभिज्ञ आहोत. आपलं काय कर्तव्य आहे आणि आपली  काय जबाबदारी आहे. कोणतीही गोष्ट त्या लोकांपासून आली ती विशेष असं समजून आपण अंधानुकरण चालवलं आहे. त्यातल्या त्यात आपल्याकडे दिशाभूल करणारे धर्मगुरू, मंदिरात बसलेले भटची बुआ. अशे  अनेक प्रकार असल्या मुळे पुष्कळ लोकांची अशी धारणा झाली आहे की परमेश्वरी ही गोष्ट अशी नाहीच. परमेश्वर आहे किंवा नाही हे आम्ही सिद्ध करू शकतो. पण तुम्ही कशावरून सिद्ध Read More …