Public Program

Satara (India)

1986-12-28 Public Program Marathi, Satara India DP-RAW, 76'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Shri Mataji arrives and is welcomed by the local sahajis. A Bhajan is sung. Then on a foreign sahaji gives a brief introduction about sahaja yoga. 

Shri Mataji’s speech starts at time 22.06

आपलीच महती आपण जाणत नाही ही गोष्ट खरी आहे. जसं सूर्याला कळत नाही की तो प्रकाशमय आहे, तसंच महाराष्ट्राच्या लोकांना कळत नाही की त्यांच्यामध्ये परमेश्वराने किती आशीर्वाद दिले आहेत. म्हणून तो भ्रमिषष्ठासारखा इकडे तिकडे भटकत आहे. सारा समाज आज पश्चिम संस्कृतीने भारावून गेला आहे. आणि पश्चिमेचे लोक आता थकून भारताकडे बघत आहेत. आणि त्यांची दृष्टी लागली आहे की आम्हाला त्यांच्यापासून काय शिकायचा आहे? आपण स्वतःला फार पश्चिम मार्क  समजून खूप शिष्टासारखं वागतोय आणि त्यापासून आपल्याला काय लाभ होणार आहे किंवा नाही त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. साहेबांची बदली लंडनला झाली म्हणून आम्ही इंग्लंडला गेलो, आणि तिथे आम्ही आमच्या कार्याला सुरुवात केली. त्यावेळी असं लक्षात आलं की पश्चिम देशांमध्ये  जी काही प्रगती झाली आहे ती एखाद्या झाडाची प्रगती व्हावी अशी झाली आहे. पण त्याची मूळ या भारतात आहेत. आणि जोपर्यंत ही मूळ जोपासली जाणार नाहीत तोपर्यंत  ते झाड उलथून पडणार आणि त्या स्थितीला आल आहे ते. पण आपण जे या मुळात बसलेला आहोत, ते मात्र पूर्णपणे आधीभिज्ञ आहोत. आपलं काय कर्तव्य आहे आणि आपली  काय जबाबदारी आहे. कोणतीही गोष्ट त्या लोकांपासून आली ती विशेष असं समजून आपण अंधानुकरण चालवलं आहे. त्यातल्या त्यात आपल्याकडे दिशाभूल करणारे धर्मगुरू, मंदिरात बसलेले भटची बुआ. अशे  अनेक प्रकार असल्या मुळे पुष्कळ लोकांची अशी धारणा झाली आहे की परमेश्वरी ही गोष्ट अशी नाहीच. परमेश्वर आहे किंवा नाही हे आम्ही सिद्ध करू शकतो. पण तुम्ही कशावरून सिद्ध केलं आहे की परमेश्वर नाही? परमेश्वर आहे किंवा नाही हे जाणल्या शिवाय तुम्ही अशा सिद्धतेला कसे पोचलात की परमेश्वर नाही ? पहिल्यांदाच असा एक विचार धरला किंवा एक धारणा धरली जी सपशेर चुकीची असेल असं समजा तर मग तुम्ही अंधकारात चालले की नाही. निदान असं म्हटलं पाहीजे की आम्हाला माहित नाही की परमेश्वर आहे की नाही हे बघितलं पाहिजे. आहे किंवा नाही ते बघितल्याशिवाय आम्ही असं काही निर्णय घेत नाही. बरं या महाराष्ट्रातल्या लोकांनी असा विचार ठेवायचा कोणच्याही वादाला धरून की परमेश्वर नाही आहे ते कशावरून? म्हणजे मार्कंड्यापासून हजारो वर्षांपासून आजपर्यंत साईनाथापर्यंत, रामदास स्वामी तुकाराम, नामदेव, जनाबाई, ज्ञानेश्वर सुद्धा सगळेच खोटं बोलत होते असं दिसतं. आजकाल जे  चार शब्द शिकून किंवा पुस्तक वाचून देव नाही असं म्हणतात त्यांनी हा विचार का केला नाही की आमच्यात आणि यांच्यात किती तफावत आहे. ती तफावत का आहे? जे लोक देव नाही असं म्हणतात, ते सबशेल दारू पितात, भांडण करतात, खूण करतात, मारामारी करतात आणि देव आहे म्हणतात तेही तेच करतात. हे म्हणजे दोघांची गोळा बेरीज एकच झाली. म्हणजे हेही अति शहाणे आणि तेही अति शहाणे. स्वतःला असे अति शहाणे समजून आपण कुठल्या गड्ड्यात  जातोय हे बघत नाही. जर समजा परमेश्वर आहे आणि आपण नुसता विश्वासावर किंवा अविश्वासावर बसलो तर जे एवढ मोठ आहे ते आपल्याला मिळालेलं नाही.

आता सांगायचं म्हणजे तुम्ही तुकारामांचे उदाहरण घ्या. किंवा चोखामेळाचे उदाहरण घ्या, नामदेवांनी उदाहरण घ्या. सर्वसाधारण जीवनातले लोक हे त्यांनी कोणतेही वाईट काम केलं का? करू शकत  होते का? कधीतरी इच्छा केली का? असं त्यांचं व्यक्तित्व इतकं निर्मल  आणि चांगलं कसं झालं? त्यांच्यात काही विशेष असल्याशिवाय झाला असतं का? श्री रामदास स्वामींची भूमी ही पण इतकी हालाखीची स्थिती की इथे  चार माणसं  भाषणाला उभी नाहीत. श्री रामदास स्वामींनी  सांगितलं होतं की स्वधर्म ओळखावा. तू स्व धर्म शिकवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. पण तो शिकणारे कुठे आहेत? सगळे विलायती फॅशन कडे निघाले आहेत. किंवा देव नाही असं ओरडत बसलेत. त्यांनी जो  स्वधर्म ओळखा असं म्हटलं आहे तो स्व म्हणजे तुमचा आत्मा, आणि तुम्ही तो धर्म ओळखला पाहिजे हे स्पष्ट सांगितलं आहे. पण आता आम्ही सायन्स शिकायला लागलो ना, हे सगळं सायंटिस्ट आहेत इथे सगळे बसलेले. त्यांचं डोकं खरोखर उघडं आहे सायंटिस्ट सारखं. तुमचं काहीतरी डोकं बंद झालेला आहे. सायन्स च्या नावावर गेले कुठवर तुम्ही? आटम बॉम्ब उभा केला – काय मिळालं सायन्सच्यामुळे? सौख्य मिळालं आनंद मिळाला? परमेश्वराला सोडून काहीही तुम्हाला ठीक मिळणार नाही. परमेश्वराला धरल्याशिवाय तुम्हाला कशाचाही लाभ मिळणार नाही. पण परमेश्वर म्हणजे हे भटजी बुवा सांगतात तो परमेश्वर नव्हे. देवळात जाऊन भटजीबुवा तुमच्याकडून पैसे घेतात तो परमेश्वर नव्हे. जो आपल्यामध्ये आहे – स्वधर्मात आहे तो परमेश्वर ओळखला पाहिजे. त्यासाठी पैसे देता येत नाहीत, सद्गुरूंची लक्षणे स्वतः रामदास स्वामींनी सांगितले आहेत. तरी सगळे उपटसुंब इकडे साताऱ्यात बसलेले आहेत. पैसे उकळणारे दिशाभूल करणारे अनेक  गुरू आपल्या देशात हो बोकाळलेले आहेत.  ते आता परदेशात जाऊन सुद्धा बरेच पैसे उकळायला लागलेत. देवाच्या नावावर धर्माच्या नावावर मारहाण चाललेली आहे लूट  मार चाललेली आहे. म्हणून परमेश्वर नाही आहे असं म्हणणं चुकीचं आहे.

परमेश्वर हा आहे पण ते जाणण्यासाठी आधी आत्म्याचा साक्षात्कार करून घ्या. आणि जरी तुमच्या मध्ये थोडसं तरी सायन्स डोकं असलं, तर सायन्स मध्ये एक हैपोठेसिस  म्हणून हे धारणा असते, ती धारणा मांडली जाते. ती धारणा मांडल्यानंतर ती जेव्हा सिद्ध होते त्याला कायदा law असं म्हणतात. तर सायन्स मध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं, आम्ही जर एक धारणा बांधली आणि ती जर आम्ही सिद्ध करून दिली तर तुम्ही मानायला पाहिजे. पण लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वर तुमच्या पायावर येणार नाही आहे त्यासाठी. थोडी तरी नम्रता पाहिजे. दोन पुस्तक वाचून लोकांचं डोकं खराब झालाय महाराष्ट्रात. आपण काय जाणतो? काहीही जाणत नाही. एक अमृतानुभव  ज्ञानेश्वरांचं पुस्तक तुम्ही वाचा. लक्षात येईल की केवढ्या मोठ्या सूर्यासमोर काजवे आहोत आपण. पण तिकडे वेळ कुठे आहे? हे आयुष्य व्यर्थ घालवण्यासाठी नाही, विशेषतः महाराष्ट्रात. हा महाराष्ट्र आहे – अनादी काळापासून याचं नाव महाराष्ट्र ठेवलं आहे. आणि तुम्ही मोठे महाराष्ट्रीयन म्हणता स्वतःला मराठे  म्हणतात स्वतःला. आणि अशा घाणेरड्या गोष्टींमध्ये आपलं आयुष्य घालवायचं हे काही शोभत नाही.

आज तुमच्या दर्शनाला हे लोक 14 देशातून आलेले आहेत. हे निवडक लोक आम्ही घेतो, सगळ्या देशांमध्ये वाढत आहेत. आपल्याकडे सुद्धा खेडेगावात लोकांना अक्कल आहे, कारण जमिनीशी संबंध आहे रोजचा. पण शहरातली लोकं मात्र अतिशहाणे त्यांचे बैल रिकामे…..31.27

त्यामुळे समजून घेतलं पाहिजे की आपल्यामध्ये ही शक्ती कुंडलिनी ती आम्ही सिद्ध करून दाखवतो. पण तुम्ही शिष्टपणा केला तर काहीही होणार नाही. नम्रत्वे यायला पाहिजे. तुमच्यामध्ये ही शक्ती आहे, सगळ्यांच्या मध्ये ही शक्ती आहे. तुकारामांनी एवढंच सोज्वळपणे सांगितलं आहे ‘तुझं आहे तुझा पाशी ‘. नानकसाहेबांनी सांगितलं कबीरदासांनी सांगितलं – सगळ्यांनी सांगितलं आहे ते काय खोटे होते? आणि त्यांनी एवढं आपलं रक्त ओतलं एवढी मेहनत केली, ते मात्र आपण ठिकाणावर लावलेलं आहे.  आणि हे दोन चार दिवसांसाठी आलेले अंग्रेजी लोकांचे शिकून आपण कुठे जाणार आहोत मला समजत नाही.

ही कुंडलिनी नावाची शक्ती आपला त्रिकोणाकर अस्थीत  आहे. ती तुम्ही बघू शकता तिचं स्पंदन बघू शकता. आणि तिचं उत्थान होतं. आणि तिच्या उत्थानाणं तुमची पुढची पायरी – अति मानवाची. या मानव स्थितीतून उच्च स्थितीत जाण्याची जी पायरी आहे ती या कुंडलिनी जागरणानेच होऊ शकते दुसऱ्या कशाने नाही. असं ज्ञानेश्वरांनी सहाव्या अध्यात स्पष्ट सांगितलं आहे. पण लगेच ब्राह्मणांनी सांगितलं की – नाही सहावा अध्या वाचायचा नाही! का? त्यांना काही यातलं गम्य नाही आहे म्हणून, बाकी सर्व वाचत रहा. ही कुंडलिनी जागृत करून, स्वतःचा आत्मसाक्षात्कार घ्यावा हे आता नव्याने सांगावं लागतं याचं मला आश्चर्य वाटतं. श्री छत्रपती शिवाजी महाराज, हे स्वतः आत्मसाक्षात्कारी  होते. जे  आज शिवाजींचे नाव घेतात त्यांना मी म्हणते ‘काय तुम्ही शिवाजींचे नाव घेता? तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्या!’ कुठल्या सुटल्या ‘ही श्रींची इच्छा’ असं म्हणत ते. हे श्री कोण? नुसते शिवाजींचे हातात झेंडे घेऊन फिरून काय शिवाजी होत नाही तुम्ही. त्यांच्या शक्तीला आराध्य केलं पाहिजेत तुम्ही. ही मराठ्यांना ग्लानी आणायची गोष्ट अशी की त्या  इंग्लिश लोकांनी आपली  भुतं तुमच्या  डोक्यावर बसवलेली दिसतात. म्हणून आपली संस्कृती आपलं जे काही विशेष सोडून नसत्या गोष्टींच्या मागे लागणं हे आपलं परम धन झालेलं आहे.

आता मुलांना तुमच्या ते ड्रग्स घेऊ द्या आणि ते लोक जसे हिप्पी झाले तसे आपले मुलं हीप्पी झाले म्हणजे मघ तुम्ही सहज योगात येणार आहात काय? सहज! सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्म घेतलेला योग. हा तुमचा जन्मसिद्ध योग आहे आणि हा तुम्ही साक्षात्कार करून घ्यायचा आणि त्याच्यात जमलं पाहिजे. बैठक पाहिजे त्याला, अहो सांगितला सुद्धा बैठक लागते, मग परमेश्वरांच्या कामाला नको? पण इथं वेळ कुणाला आहे. लक्ष्मी सुद्धा वरदान सहज योगाने लाभतं. शक्तीचं लाभतं, ते सुद्धा. आता दिल्लीमध्ये, तिथे काय रामदास स्वामी नव्हते, तुकाराम नव्हते. त्या दिल्लीमध्ये सुद्धा डॉक्टरांनी काढलं की तुम्ही सहज योगा वरती जर  रिसर्च केलात की तुम्हाला डॉक्टरेट इन मेडिसिन मिळेल. त्यांना सुद्धा अक्कल आली त्या पंजाबी यांना. पण आपल्या मराठ्यांच्या डोक्यात कधी जाणार आहे ते मला विचार. शिक्षण संस्था आपण काढल्या, शिक्षण संस्थेला काहीही अर्थ लागणार नाही जोपर्यंत तुम्हाला खरी परमेश्वरी विद्या येणार नाही. सबंध सूरदासजींनी जो आपला ग्रंथ लिहिला – सुर सागर, ते लिहिल्यावर शेवटी त्यांनी म्हटलं – ‘सूरदास की सभी अविद्या दूर करू नंदलाल’. या अविद्येला विद्येचे रूप तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार येईल, त्याच्या आधी येणार नाही.

डॉक्टर लोक स्वतःच म्हणतात आम्ही मोठे डॉक्टर झालो. आम्ही लोकांना हात लावून ठीक करतो, कॅन्सर ठीक केला. केला! कसा करतो आम्ही? त्याच्यामध्ये जी पॅरा सिमफाथेटिक नेर्वोस सिस्टम आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांचा हाच जाऊ शकत नाही त्याच्या तुमचा हात बसतो. असे तुम्ही सर्व समर्थ होता. नुसता म्हणायचं ‘मना सज्जनाचे’ पुढे करायचं काय? नुसती ती तोंडाची बडबड, चर्पटपंजरी. कधी जाग येणार आहे आपल्या लोकांना? हे बाहेरचे लोक येऊन तुम्हाला धडे द्यावेत की तुम्ही त्यांना जाऊन धडे द्यावेत? आज त्या श्री रामदासांच्याच नावाने विचारते मी  कुठे गेले ते? ज्यांच्यासाठी आपण इथं मोठं साम्राज्य स्थापन केलं होतं, सगळी भाऊबंदकी, नसत्या गोष्टींमध्ये सगळा वेळ घालवला. आज कुंडलिनीच्या जागृतीला उभे व्हा, पार व्हा, सहज योगात या,  तुमचं  काहीतरी वैशिष्ट जाणून घ्या, तुमच्यात किती शक्त्या आहेत ते तरी जाणून घ्या. आश्चर्य वाटतं याचं, की सगळं आपल्याकडे असून सुद्धा, सगळं धन असून सुद्धा, नागोबा सारखं वरती बसलेत. स्वतःलाही उपयोग करून घ्यायचा नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. ही शक्ती आपल्यामध्ये सात चक्रातून जेव्हा वाहू लागते तेव्हा त्या सात  चक्रांवर आधारित मानसिक, बौद्धिक, शारीरिक, संसारिक किंवा ज्याला आपण म्हणू आत्मिक हे बळ चौफेर वाहू लागत. आणि मग जे म्हणतात की चराचरा तुन  सगळीकडे परमेश्वराचा प्रेम चैतन्याच्या स्वरूपात पसरलेला आहे, जे आदी  शंकराचार्यांनी सांगितला आहे, ते सिद्ध होतं. अमुक वाद तमुक वाद, कोम्मुनिसम, सोसिऍलिसम, कॅपिटलीसम….. हे सगळे नुसते इसम्स आहेत, वाद आहेत. भांडणाचं कारण, तथ्य  काय आहे त्याच्यात? ते सगळं सिद्ध होतं सहज योगात, म्हणजे असं की आम्ही आहोत…आम्ही फार मोठे भांडवलशाही म्हंटलो पाहिजे, कारण आमच्याकडे फार मोठे भांडवल आहे, सगळ्या शक्त्या आमच्यात आहेत. आणि आम्ही म्हणजे सगळ्यात मोठे समाजवादी आणि कम्युनिस्ट, कारण दिल्याशिवाय बरं वाटत नाही म्हणून खेडोपाडी वाटत फिरतो – मजा येत नाही त्याशिवाय. जो आनंद आमच्या मध्ये आहे, जो आम्हाला मिळाला आहे  तो जर वाटला नाही, तर त्याची मजा येत नाही. म्हणजे  आमच्यापेक्षा कोणी मोठा कम्युनिस्ट तुम्ही दाखवा. आणि जे तुमचं आहे ते तुम्हाला द्यायचा आहे, तुमचे किल्ल्या तुम्हाला द्यायचेत. पण तुम्ही घ्यायला तयार नाहीत याला सुद्धा तयार नाहीत. उद्या मग ओरडत बसाल की माताजी आम्हाला का नाही सांगितलं?… आधी कळलं असतं तर बरं झालं असतं. उद्या एखादा जर सिनेमा ॲक्टर आला, तर सगळं सातारा त्याच्यावर लोटेल. तो काय तुम्हाला आशीर्वाद देणार आहे? त्याचं स्वतःच ते चरित्र बघा, तो तुम्हाला काय देणार आहे? इतक्या हलक्या प्रवृत्ती  आणि शूद्रतेची आपली वागणूक आहे, या शूद्रतेला सोडायलाच पाहिजे कारण आपल्या मध्ये ची भव्यता आणि मोठेपणा आहे ते लपलेलं आहे.  ते समोर यायला पाहिजे आणि दिसलं पाहिजे. थोड्याश्या शिक्षणाने फुषारकी मारून  चालत नाही. त्या शिक्षणाला आत्म्याची जोड पाहिजे, त्याशिवाय तुम्ही काय मिळवलं हे तुम्हाला माहित नाही. एकाने सांगावं आणि दुसऱ्याने ऐकावं हे शिक्षण नसतं, आतून जाणलं ते शिक्षण. जे तुम्ही तुमच्या नसानसांवर बोटांवर जाणार ते खरं शिक्षण, ती शुद्ध विद्या आहे ती परमेश्वराची विद्या आहे, ती शिकून घ्या. आम्ही वारंवार साताऱ्याला येतो, आणि असंच वारंवार लेक्चर द्यावं लागतं. पण अजून काय साताराच्या लोकांच्या डोक्यात काय प्रकाश पडत नाही. ते अजिंक्यतारा जोपर्यंत कोसळणार नाही, असा काहीतरी फटका बसल्याशिवाय तुमची डोकी उघडणार नाही असे दिसतंय. तेव्हा ज्या लोकांनी कोणताही मार्ग स्वीकारला असेल, त्यांनी हा विचार करावा की जो दुसरा या मार्गात उभा आहे त्यांनी काय मिळवलं?  मी तुम्हाला विचारते – तुम्ही हा जो मार्ग निवडला आहे आणि त्याने जो  निवडला आहे,  तुम्हाला काय मिळालं आहे आणि त्याला काय मिळालं आहे? त्यांच्या तब्येती सुधारल्या. सगळी व्यसन सुटली , निरमुक्त झाले, पूर्णपणे. कुठल्याही तऱ्हेची गुलामी नाही राहिली. चारित्र  इतकं उज्वल आणि सुंदर झालं. जे लोक भाषण देत नव्हते ते भाषण देऊ लागते, लहित नव्हते ते लिहायला लागले. ज्यांना कविता येत नव्हत्या ते कविता करू लागले. ज्यांना कधी घर कसं बांधायचं माहित नव्हतं ते आर्किटेक्ट झाले. आमच्या सहज युवकाची सर्व पोरं फर्स्ट क्लास फर्स्ट येतात. तो मुलगा ढं म्हणून येतो सहज योगात तो उद्या फर्स्ट क्लास फर्स्ट येतो. सगळ्यांच सहजच कल्याण होतय, म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात आलात तुम्ही.

भ्रष्टाचार वगैरे नाही आहे परमेश्वराच्या राज्यात तेव्हा हे असले धंदे नाही आहेत तिथे. सगळं काही तुम्हाला इथे मिळतं आणी  फुकटच मिळतं सगळं काही. कारण परमेश्वरालाच आतुरता आहे, आणि आंतरिक तळमळ आहे. तीच तळमळ तुम्ही माझ्यात बघता. ही तळमळ आहे की कुठे चालला तुम्ही? हे घ्या! कारण परमेश्वराने ही सृष्टी स्वतःला जाण्यासाठी एक आरसा म्हणून निर्मिली आहे आणि तो आरसा म्हणजे आपण आहोत. त्या आरशात त्याला स्वतःचे महत्त्व बघायचं आहे, स्वतःला बघायचं आहे, स्वतःला जाणायच आहे. तो आरसा आपण आहोत आणि ते आरसे हे अशे! तेव्हा त्याला तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त आतुरता आणि कळवळ आहे. तो आहे किंवा नाही हे आधीपासूनच ठाम मत करून घ्यायला थोडा तरी विचार करायला पाहिजे.

आजच्या या सहज योगाच्या कार्यक्रमात, काय काय आहे आपल्या मध्ये कोणत्या शक्त्या आहेत, ते कसं आहे, याची पुस्तके आहेत तुम्ही घ्यावीत.  त्याची काय विशेष किंमत नाही, एक किंवा दोन रुपये असावी आणि ती वाचावीत. याबद्दल थोडा गंभीरपणे विचार करायला पाहिजे, की परमेश्वराने आम्हाला अमिबाच्या स्थितीतून मानवी स्थितीवर का आणलं? हे असं मूर्खासारखं व्यर्थ घालवण्यासाठी का? किंवा अशी विले वाट लावण्यासाठी परमेश्वराने आणलं जन्माला घातलं का? एवढी परमेश्वराने मेहनत का घेतली? कशाला आम्हाला मनुष्य केलं? असा एकदा तरी विचार डोक्यात आला पाहिजे. हा विचार डोक्यात आल्या  बरोबरच मनुष्याला महालक्ष्मीचं वरदान मिळतं. म्हणजे त्याच्यामध्ये ती शक्ती जागृत होते जी परमेश्वराला शोधते. खरं काय ते शोधते, हे सगळं वृत्तवैकल्य त्याला काही अर्थ नाही. अहो मी काय सांगते,  तुकारामबुवांनी सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे, सगळ्यांनी सांगितलं आहे की हे सगळे नसते धर्माचार काही कामाचे नाहीत. पण त्यांच्याच नावावर लोक करतात, ज्यांनी पायात चपला नाही घातल्या, त्यांच्या नावाने पालख्या काढतात. पैसे काढण्याचे धंदे. आपल्या देशामध्ये पैसे कमावण्याचे इतके लोकांना धंदे येतात, की थोडसं पुण्य कमावण्याची पण धंदे शिकले तर बरं होईल. तुमच्याच भाषेत तुमच्याच स्वरात मी बोलत आहे. एक आईला  तिच्या मुलांची नितांत काळजी वाटते. आणि म्हणून वारंवार या साताऱ्याला येते मी आणि तुम्हाला समजून सांगते. पण अजून साताऱ्याचा सेंटर काही जमत नाही असं लोकांचं सांगणं आहे. म्हणजे रामदास स्वामींनी उगीचच इथे मेहनत केलेली दिसते आहे. कशाला तो अजिंक्यतारा येथे ठेवला त्यांनी? आणि कशाला सज्जनगडाचं एवढं मोठं छत्र तुमच्यावर आणलेलं आहे?

तेव्हा, सगळ्यांनी सहज योग घ्यावा, स्वतःची कुंडलिनी जागृत करून घ्यावी आणि नसत्या उठा ठेवी सोडून एक  परमेश्वराला मिळवून घेतलं की सर्व कार्य होतात का नाही हे बघाव. अशी मी सगळ्यांना परत हात जोडून विनंती करते.

आता प्रश्न असले तर विचारून घ्या.

(Shri Mataji waiting for questions from seekers.)

आता सगळी मंडळी इथं जमिनीवर येऊन बसा बरं व्यवस्थित. जमिनीचा जो फायदा आहे तो बघा, ही महाराष्ट्राची किमया आहे. चला येऊन बसा व्यवस्थित, पार होऊन घ्या. समोर बसा असं व्यवस्थित. या तुमच्या महाराष्ट्राच्या योग भूमीवर, जी कमाल होणार आहे, ती तुम्हाला माहीत सुद्धा नाही. साऱ्या जगातले लोक येऊन तुमच्या पायावर येणार. सारे जगातले लोक येऊन विचारणार आहेत ‘ अहो कुंडलिनी म्हणजे काय ‘? मग काय सांगणार तुम्ही. अहो पण तुम्हाला ज्ञानेश्वरांनी सांगितलं की मग सांगा की. तुम्हाला माहित नाही असं कसं? तुम्ही महाराष्ट्रातलेच का? या लोकांना गणपती काय आहे हे माहित आहे, की उदय उदय आंबे असे का म्हणतात महालक्ष्मीच्या देवळात. तुम्हाला माहित आहे का? तुमच्याबद्दल ह्यांनी माहिती सांगावी, त्याच्यापेक्षा तुम्हीच त्यांना माहिती सांगितलेली बरी नाही का? आता एक आहे मात्र, पार आम्ही करतो तुम्हाला जागृत आम्ही करतो तुम्हाला, ती आमची जबाबदारी. पण जरी बी ला अंकुर फुटले, तरीसुद्धा त्याची नंतर जोपासना करावी लागते. झोपावसं लागतं सांभाळाव लागतं. तसंच आपला आत्मसाक्षात्कार सांभाळून वापरावा लागेल. त्याच्याशी खेळखंडोबा करून चालणार नाही, थोडासा तरी वेळ द्यावा लागेल. पैसे नको तुमचे आम्हाला, दुसरं काही नको, पण शिस्तीत याला लागेल आणि तो वाढवला पाहिजे वृक्षासारखा. मग बघा कोणत्या परिस्थितीत तुम्ही पोहोचता. या डोक्यामध्ये जो मेंदू आहे, तो तुम्हाला थोडासाच माहिते, थोडासाच भाग वापरता तुम्ही. पण जेव्हा साक्षात्कार होतो, तेव्हा प्रचंड प्रकाश डोक्यात पडतो, की  आश्चर्य वाटतं. मी काय उगचच खोटं सांगत नाही, मला तुमच्याकडून काय घ्यायचं नाही आहे.

आता फक्त तुमच्या टोप्या बिप्या असतील तर ते उतरून ठेवा कारण हे ब्रम्हरंद्र  छेदायच असत. आणि वाटलं तर चष्मे काढून ठेवले तरी चालेल कारण डोळे मिटून बसावं लागतं. आता माझ्याकडे डावा हात करायचा, ही इच्छा आहे इच्छाशक्ती, डावा हात म्हणजे इच्छाशक्ती. आणि उजवा हात या पृथ्वीला नमन करून ठेवायचा. पृथ्वी म्हणजे ही महाराष्ट्राची भूमी, असा बाजूला ठेवा उजवा हात बाजूला ठेवा आरामात. उजवा हात जमिनीकडे आणि डावा हात माझ्याकडे. आरामात बसायचं, सरळ बसा आरामात बसा. आता गणेशाला नमन करून डावा हात माझ्याकडे ठेवला आहे तुम्ही, हातात बघा थंड असे येते का? हातात गार गार वाटेल. येतंय? माझ्याकडे बघताना विचार नाही करायचा.

Please put your left hand towards me and right hand on mother earth. And please watch me without thinking.

उजावा हात जमिनीवर आणि दावा हात माझ्याकडे.  आता डोळे मिटून घ्या. आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात आकाशाकडे असा ठेवायचा, उजवा हात माझ्याकडे. आता मनामध्ये असं म्हणायचं ‘ श्री माताजी, आम्हाला आत्मसाक्षात्कार हवा ‘, आम्ही जबरदस्ती करू शकत नाही तुम्ही स्वतंत्र आहात, अजून स्वच तंत्र  जाणलं नाही, पण तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्हाला पूर्णपणे स्वतंत्र करण्यासाठी, तुम्ही आधी आपल्या स्वतंत्र्यत म्हटलं पाहिजे. आम्ही जबरदस्ती करू शकत नाही. ‘तेव्हा श्री माताजी, आपण कृपा करून आम्हाला आत्मसाक्षात्कार द्यावा ‘ असं म्हणा. आता उगीचच काही लोक असं विचार करतात की मी एवढा वाईट आहे मला कसं मिळणार? किंवा माझ्यात काय आहे मी असा आहे तसा आहे, मी पतीत आहे , असा काही विचार करायचा नाही. तुम्ही आईच्या दरबारात आलात, आई समोर कोण वाईट? परमेश्वर हा साक्षात प्रेमाचा सागर आहे. पण त्याहून मोठा तो क्षमेचा सागर आहे. तुम्ही कोणचच असं कार्य करू शकत नाही ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकाल की  परमेश्वर तुम्हाला क्षमा करणार नाही, कारण तो क्षमेचा सागर आहे. हाथ असा मागे घ्या, अजून आहे पकड आहे – तंबाखूंनी येते म्हणा पण तरीसुद्धा. आता मी काय म्हटलं असेल ते विसरून जायचं सगळं, आणखीन स्वतःकडे जरा प्रेमाने बघायचं. प्रसन्न चित्त बसलं पाहिजे, अगदी प्रसन्न चिता, तुम्ही भक्त आहात, परमेश्वराला जाणायला चाललात, तेव्हा स्वतःवर रागावून कसं चालेल? आता दोन्ही हात वर करा आकाशाकडे, आणि प्रश्न विचारायचा मनामध्ये की ही ब्रह्मशक्ती आहे का? हीच चराचरातून पसरलेली परमेश्वराची प्रेम शक्ती आहे का? असा प्रश्न तीनदा विचारा. आता हात खाली करा. आता डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात या टाळूवर असा आधांतरी ठेवून बघा – काही थंड असं येतंय का बघा. याचं वर्णन केलं आहे, थोडी मान अशी खाली करून बघा, येताय का? डोक्यातून येईल तुमच्या गार गार – ही कुंडलिनी वर आली ब्रह्मरंध्र छेदून. इतक्या क्षणात आली ही पुण्याई आहे तुमची, महाराष्ट्रीयन आहात ना. सगळी पुण्याई घेऊन आलात. फक्त त्याला कॅश केलं पाहिजे आता. आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डावा हात डोक्यावर ठेवून बघा, थोडासा आधांतरी ठेवा , कोणा कोणाची खूप वरपर्यंत येते. खरोखर, तुम्ही पुण्यवान लोक आहात. तुम्हाला माहित नाही किती पुण्यवान आहात तुम्ही. हे एवढं कार्य करायला मला,  इंग्लंडला वगैरे तासन तास लागतात.  तुम्हाला क्षणात होतं, तुम्हाला जाणीवच नाही केवढी पुण्याई घेऊन तुम्ही जन्माला आलात ते. हा! आता आला का? आलं का? बोला….. Hmm….. येतंय? दुसऱ्या हाताने बघा, वरती वरती धरा. आता दोन्ही हात धरून बघा, दोन्ही हातात येतंय का नाही? असं काहीतरी हळूहळू हातात येतंय. डोळे मिटून ठेवा, आणि विचार करायचा नाही. आता ज्या लोकांच्या हातातून आणि डोक्यातून थंड थंड वारा आल्यासारखं वाटलं त्यांनी हात वर करायचं. सगळं सातारा तुमचं पार झालं! आणखीन काय पाहिजे? एक सुद्धा हात खाली दिसत नाही सगळे लोक पार झाले आहेत. मागे मात्र काही बघण्यासाठी लोक उभे असतील, त्यांचं काय आम्ही सांगू शकत नाही, ते बघतच राहतील आयुष्यभर. सगळेजण पार झाले, उत्तम अति उत्तम! परमेश्वर तुम्हा सगळ्यांवर आशीर्वाद पाठोव!

आता कोणत्याही राजकारणात पडायचं नाही. काही धंद्यात पडायचं नाही आत खाली घ्या. सहज योगाचे इथे सेंटर आहे, त्या सेंटरवर जायचं स्वतःची प्रगती करून घ्यायची. नीट बसवून घ्यायचा सहज योग आपल्यामध्ये. प्रत्येक जण  मोठा मोठा गुरु होऊ शकतो. कळलं का? बर…..

आता सेंटरची माहिती सांगा कोण आहे तिकडे…?

आणि ही सामूहिक चळवळ आहे, तेव्हा श्री माताजी मी फोटो घेऊन जातो घरी माझ्या असं नाही. सेंटरवर आलंच पाहिजे, तरच आम्ही तुमची हामी घेतो नाहीतर घेत नाही.

सांगा कुठे सेंटर आहे ते….sahaji sharing the centre address.

पुस्तक आहेत ना? ते पुस्तक घ्या आणि पुस्तकांमध्ये सुद्धा ऍड्रेस आहे ते बघा. आता काहीतरी तुमच्यामध्ये विशेष कॉलिटी असली पाहिजे, आज बरेच जण लवकर पार झाले. हे सहज योगी लोक आहेत, तुम्ही सगळे सहज योगी आहात का पुढे बसलेले? नाही, काही नवीन लोक आलेत ना? किती लोक नवीन आहेत बघूया. बरेच लोक आलेत,  चला. तुम्ही या तुम्हाला पुस्तक दिले जाईल आणि मग तुम्ही तिकडे सेन्टर वर जावा. माझे लेक्चर्स वगैरे आहेत, तुम्हाला दाखवतील,  व्हिडिओ टेप्स आहेत. त्याच्यानंतर जेव्हा आणखीन वाढत जाल पुढच्या वर्षी, मग तुम्हाला सगळ्यांना गणपतीपुळ्याला बघूया, इतर पुष्कळ लोकांना भेटाल. ही खूप मोठी जागतिक चळवळ आहे. परमेश्वरी कार्याची आहे,  तेव्हा, तुमचं येणं म्हणजे परम आवश्यकता आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काही नाहीच आहे आत्ता.

Shri Mataji asking seekers to come to come to stage for darshan, if they wish to.                 ( time1.02.08)

तुमच्यासाठी पोस्टर आणली आहेत, हळूच थांबा आणि घ्या ती. फोटो आहेत, फोटोमध्ये चैतन्य असतं. 

( The photos got were different than the regular photo that we give to new seekers. So Shri Mataji is discussing with sahaji if it appropriate to give this photo. As it is Adi Shakti’s photo and must be handled carefully. Eventually, she says to give them at the centre. There are also badges for the children which were at the event. ) 

Seekers keep coming and talk about their personal problems.