Public Program Satara (India)

Public Program Until the Time 11.50 mins – Flowers offering at the Lotus Feet of Shri Mataji by various local centre representatives from Satara district of Maharashtra  15.30 mins – Shri Mataji’s speech starts  सातारा जिल्ह्यातील सहजयोगींचे कार्य बघून आत्य आनंद होतोय. तुम्ही गुलाल उडवत मिरवणूकित आपला आनंद प्रदर्शित केला, हा आनंद सातारा जिल्ह्यात पसरून 15 सेंटर उभी केली गेली हे फार मोठं काम आहे. श्री रामदासांची भूमी ही, स्वतः ते हनुमानांचे अवतरण होते. त्यांच्या कार्याची सुरुवात कधीच झाली होती, पण त्याची फल स्तुती मात्र आज दिसते की सातारा जिल्ह्यामध्ये 15 केंद्र उघडण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत साधू होऊन गेले आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या सर्व आपण सहज योगात बघू शकतो. सर्वप्रथम त्यांनी असं सांगितलं, की सद्गुरु तो जो तुम्हाला परमेश्वराशी ओळख करून देतो, ब्रह्मनिष्ठ बनवतो. जो तुमच्याकडून पैसे घेतो तुमची दिशाभूल करतो, तुम्हाला चूक मार्गात घालतो तो गुरु नव्हे. एकच लक्ष मानवाकडे असलं पाहिजे आणि ते म्हणजे आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय, आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, त्यापेक्षा मुकच राहिलेलं बरं.असं सुद्धा ज्ञानेश्वरांनी शेवटी म्हटलं. कारण आत्मसाक्षात्कार झाला नाही डोळे बंद आहेत आणि डोळे बंद असताना जी तुमची श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेला काही अर्थ नाही. आज  मी असं ऐकलं आहे की इथे एक अंधश्रद्धा निर्मूलन संस्था काढली आहे, हे बरं झालं म्हणा, हे आम्ही बरेच वर्षापासून म्हणत होतो. पण जे लोक अंधश्रद्धा काढतात त्यांची अंधता गेली आहे का नाही हे आधी बघायला पाहिजे. अंधश्रद्धा कोणात आहे आणि कुणात नाही हे जाणण्यासाठी डोळस व्हायला पाहिजे. जी मंडळी डोळस झालेली नाही, ती दुसऱ्यांना आंधळे झाले आहात हे Read More …