Shri Mahalakshmi Puja Sangli (India)

Shri Mahalakshmi Puja Date 31st December 1986: Place Sangli Puja Type सांगली जिल्ह्यामध्ये सहजयोग हळूहळू पसरत आहे. पण जी गोष्ट हळूहळू पसरते, ती जम चांगला धरते. आणि कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेऊ नये. प्लॅस्टिकची जर आपल्याला फुलं काढायची असली तर त्यासाठी एक मशिन घातलं की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो. मशागत करावी लागते. मेहनत करावी लागते. सहजयोगाबद्दल अजून पुष्कळशा लोकांना काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. पैकी आपल्याकडे पुष्कळसे असे पंथ आहेत, संप्रदाय आहेत, जे आधीपासूनच कार्यान्वित आहेत. पण हे पंथ आणि संप्रदाय ह्यांचा आपल्याला काही फायदा झालेला नाही.       ‘इतके दिवस आम्ही पंढरीला गेलो, इतके दिवस आम्ही तुळजापूरच्या भवानीची सेवा केली, इतके दिवस आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जात होतो, सगळं काही केलं आम्ही. व्रत- वैकल्य केली. सगळं करून माताजी, आम्हाला काही मिळालं नाही.’ त्यातून तुमची मुलं उद्या मोठी होतील आणि ती तुम्हाला म्हणतील ‘इतका तुम्ही वेळ घालवला, पैसे घालवले, मेहनत केली आणि शेवटी तुमच्या हाती काही आलेलं नाही. म्हणजे परमेश्वरच नाहीये.’ जर तुम्हाला सांगलीला यायचं आहे, तर  सांगलीच्या रस्त्यावर यायला पाहिजे. जर तुम्ही उलट मार्गाने गेलात तर तुम्ही सांगलीला पोहोचणार नाही. तेव्हा इतक्या वर्षानंतरही तुम्हाला सांगली मिळाली नाही,  याचा अर्थ असा आहे, की कोणत्यातरी चुकीच्या रस्त्यावर आपण चाललो होतो.  त्याच रस्त्यावर आपण भटकत आहोत.  त्यातून अजून आपल्याला मार्ग मिळालेला नाही. हा सुज्ञपणाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण आपल्याला अजून काही मार्ग मिळालेला नाही. काही साध्य झालेलं नाही. तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे, असा एक  वेळ तरी  विचार करून सहजयोग काय आहे ते समजून लोकांना सांगितलं Read More …