Makar Sankranti Puja Rahuri (India)

Makar Sankranti Puja 14th January 1987 Date: Place Rahuri Type Puja आजचा हा शुभदिवस आहे, आणि या दिवशी आपण लोकांना तिळगूळ देऊन गोड, गोड बोलायला सांगतो. आपण दुसर्यांना बोलायला सांगतो पण स्वत:लाही सांगितलेलं बरं! कारण दुसर्यांना सांगणं फार सोपं आहे. तुम्ही गोड, गोड बोला आणि आम्ही अद्वातद्वा बोलू. या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तींनी आज कुणीच गोड, गोड बोलत नाही असं दिसतं. जिथे जा तिथे लोकं ओरडायला उभे राहतात. समजत नाही, ओरडायला काही कारण नसलं तरी आरडाओरडा केल्याशिवाय लोकांना बोलताच येत नाही. त्याला कारण असं आहे की आपण स्वत:बद्दल काही कल्पना करून घेतलेल्या आहेत. आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची मुळीच कल्पना नाही. परमेश्वराने आपल्याला केवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे या देशामध्ये. बघा, की या देशामध्ये तऱ्हेतऱ्हेचे पॅरासाइट्स स्वच्छतेचा एवढा विचार नाही. या देशामध्ये त्हेतऱ्हेचे किटाणू, आहेत. मी तर म्हणते की साऱ्या जगाचे पॅरासाइट्स आपल्या देशात आहेत. जे कुठेही सापडणार नाहीत ते या देशात आहेत. इतर देशांमध्ये इथून जर काही पॅरासाइट्स गेलेत तर ते मरूनच जातात. तिथल्या थंडीमुळे राहूच शकत नाही. सूर्याच्या कृपेमुळे इथे इतके पॅरासाइट्स राहतात या देशामध्ये आणि त्यांच्यावरती मात करून आपण कसे जिवंत आहोत ! एका शास्त्रज्ञाने विचारले होते मला की ‘तुमच्या इंडियामध्ये लोकं जिवंत तरी कसे राहतात?’ ‘अहो, म्हटलं जिवंतच राहत नाही, हसत-खेळत राहतात. आनंदात राहतात. सुखात राहतात.’ त्याला कारण हा सूर्य. या सूर्याने आपल्याला आपली घरं उघडी करायला शिकवलेली आहेत. आपलं हृदय उघडं करायला शिकवले आहे. इंग्लंडला जर तुम्हाला कुठे बाहेर जायचे असले तर पंधरा मिनीट तुम्हाला कपडे बदलायला लागतात. सगळंे काही घालून, जामानिमा, शिरस्त्राण वगैरे घालून बाहेर निघावे लागते. नाहीतर तिथली सर्दी तुमच्या डोक्यात घुसून तुमचं डोकचं खाऊन टाकते. Read More …