Public Program

(India)

1987-10-01 Public Program Marathi, Paithan India DP-RAW, 65'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Public Program Marathi Maheshwari Dharamshala India

आपण सर्वानी थोडी वाट पाहिली . मला क्षमा करा मला माहित नव्हतं आज प्रोग्रॅम आहे म्हणून . आत्ता कळलं कि इथे प्रोग्रॅम आहे म्हणून . तेव्हा येन झालय तरी सर्वानी क्षमा करावी . सर्वप्रथम पैठण मध्ये आम्ही अलोत . आमचे पूर्वज ह्याच गावी रहात असत असे म्हणतात . ह्या गावाचं नाव पूर्वी प्रतिष्टान होत . आणि देवीला फार मानत असत असा हा देश विशेष आहे . त्यातल्या त्यात इथे बरेच वर्ष देवीची आराधना वैगेरे होत असे . आणि देवी बद्दल पुष्कळ माहिती लोकाना  होती . ज्ञानेश्वरांची सुद्धा कृपा झालेली आहे . सर्वानीच ह्या जागी फार कृपा केलेली आहे . आणि पैठण हे गाव सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . पण मला इथे इतके दिवस येता आलं नाही . इतकी इच्छा 

असताना सुद्धा आणि आज आपण सर्वानी बोलावलं हि मी आपली कृपा समजते . आज जो विषय मी आपल्या समोर मांडणार आहे तो आपण कदाचित ऐकला असेल . 

हा जो कि  ज्ञानेश्वरी मध्ये सहावा अध्याय जो ज्ञानेश्वरांनी वर्णिला आहे . आणि तो वाचू नये असं सांगण्यात आलं होत . आणि त्या मुळे पुष्कळांना ह्या गोष्टीची माहिती नव्हती . कि आपल्या मध्ये एक अशी सुप्तावस्थेत बसलेली अशी शक्ती आहे ज्या शक्तीने आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळतो . हे वाचू नये असं का सांगितलं हे मला सांगता येणार नाही . कारण हि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे . सर्व आपण पूजा पाठ परमेश्वराबद्दल श्रवन ,ध्यानधारणा वैगेरे सर्व करतो पण तरीसुद्धा परमेश्वर मिळत नाही . त्या शिवाय पुष्कळशा लोकांनी ज्यांचा देवावर विश्वास नाही मला असा प्रश्न टाकलेला आहे कि जे देव देव म्हणतात त्यांच्या तरी आयुष्यात देव आलेला दिसत नाही . त्यांच्या वागण्या मध्ये देवाची आभा सुद्धा दिसत नाही . याला कारण काय ?याला कारण असं कि अजून देवाशी संबंध झालेला नाही . त्याच्याशी योग घटीत झालेला नाही . तेव्हा तो योग घटीत झाल्या शिवाय त्याच्या मध्ये फक्त आपली मानसिकच क्रिया होत असते . या साठी आवश्यक आहे कि आपण आधी समजून घेतलं पाहिजे कि आपल्या मध्ये हि कोणती शक्ती आहे . आणि त्या शक्तीने आपली काय काय कार्य होऊ शकतात . त्या साठी काही मोठं शिक्षण नको , युनिव्हर्सिटीची पदवी नको ,किंवा काही प्रयत्न करायला त्रास घ्यायला नको . अगदी सहजच ते आपल्याला मिळू शकत . कारण हि एक जिवंत क्रिया आपल्या मध्ये आहे . आणि ती जिवंत क्रिया घडून येण्या साठी कोणत्याच प्रकारचे प्रयत्न करण्याची काही गरज नाही . जस ह्या पृथ्वीवर तुम्हाला एखाद बी उगवायच असलं तर ते तुम्ही नुसतं रोपल्या बरोबर त्या मातीला ती क्षमता आहे कि ती त्याच्यातून बरोबर रोप फोडून काढते . त्या प्रमाणे हि कुंडलिनी आपल्या मध्ये जी सुप्त अवस्थे मध्ये आहे ती आपोआप जागृत होईल आणि तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळेल . त्याला काहीही करावं लागत नाही . त्याला पैसे वैगेरे देण्याचा काही प्रश्नच उभा रहात नाही . कारण जर तुम्ही म्हंटल कि भूमातेला मी एव्हडे पैसे देतो तुला आणि तू माझं रोप काढून दे . ती हसेल तिला काही समजणार आहे का . कि हा पैसा काय आहे . त्या प्रमाणे हि जी शक्ती तुमच्या मध्ये सुप्त अवस्थेत आहे ती जागृत होण्या साठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रयन्त किंवा पैसा अशा गोष्टी कराव्या लागत नाहीत . तेव्हा जी गोष्ट आपल्याला सजलेली नाही कि परमेश्वराने आपल्याला आज मनुष्य स्तीतील पोहोचवले आहे ते कशासाठी ?त्याच्या पुढे काहीतरी व्हायला पाहिजे . समजा आम्ही एखाद यंत्र तयार केलं आणि याचा या माईकचा संबंध आम्ही मेन पॉवर शी लावला नाही तर हे चालू होणार नाही . किंवा कुठलंच यंत्र चालू होणार नाही . त्या प्रमाणे आपला संबंध त्या ब्रम्हाशी जी सगळीकडे वावरत आहे ,त्या परमेश्वराच्या प्रेमाशी आपला संबंध झाला नाही तो पर्यंत आपण ह्या संसारात कशाला आलो ,आपलं काय कार्य आहे आणि आपल्या काय शक्त्या आहेत ते आपण जणू शकणार नाही . 

सहजयोग साधना जसा अगदी शब्द आहे तशीच सोपी आहे . सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला . हि सहज अशी जी शक्ती आहे तुमच्या मध्ये तिच्यामुळे तुम्हाला तुमच्या बरोबर जन्मसिध्द हक्क प्राप्त झालेला आहे कि तुम्ही आत्मसाक्षात्कारी व्हावे . आणि ब्रम्हाला जाणावे . हा तुमचा जन्मसिध्द अधिकार आहे तो कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही . आणि तो तुम्हाला सहजच लाभतो . सहज याला दोन अर्थ आहेत एक म्हणजे सहजच असलेला आणि दुसरा म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला हा योगाचा अधिकार तो तुम्हाला मिळाला पाहिजे . 

हि कुंडलिनी साडेतीन वेटोळे घालून आपल्या त्रिकोणाकार अस्थी मध्ये सुप्त अवस्थेत असते . आणि हि आपली शुध्द इच्छा आहे . बाकी जेव्हढ्या इच्छा आहेत त्या अशुध्द इच्छा आहेत . कारण आपण कोणती इच्छा करतो कि समजा अशी इच्छा केली कि एक घर बांधूया . किंवा अशी इच्छा केली कि आपण एक मोटर घ्यावी . ह्या इच्छा पूर्ण झाल्यावर मग दुसरं काहीतरी सुचत . माणूस तृप्त होत नाही . समाधान मिळत नाही . कारण त्या शुध्द इच्छा नव्हत्या . पण हि जी शुध्द इच्छा आहे जी कि परमेश्वराशी एकाकारिता स्थापन करणे , ज्याने आपण परमेश्वराला भेटतो ,ज्यांनी आपण ब्रम्हाला जाणतो आपल्या बोटांच्या अग्रावर आपण देवाला जणू शकतो तेव्हा मग दुसरी कोणतीही इच्छा रहात नाही . म्हणजे असा अर्थ असा नाही कि माणूस निष्क्रिय होतो काही कार्य करत नाही . उलट तो अत्यंत धाडसी ,करारी आणि कर्तबगार होतो . ह्या सर्व शक्त्या आपल्या मध्ये असून सुध्दा आपण आज पर्यंत त्या जागृत करून घेतल्या नाहीत . त्या आपण केल्या पाहिजेत . आज मी सतत जवळ जवळ सोळा वर्षे सहजयोगाच कार्य करते आहे . पण पैठणला येन मात्र सोळा वर्षा नंतर झालं आहे . आणि त्या मुळे अजून इथे नुसती सुरवात झाली आहे . तरी राहुरी वरून मंडळी इथे आलेली आहेत . ती पुष्कळ दिवसा पासून सहजयोग करत आहेत आणि त्याना सहजयोगाचे अनेक लाभ झाले आहेत तरी आपण सर्वानी सहजयोग साधून घ्यावा . आणि हि साधना साधून घ्यावी आणि त्या साधनेतून जे काय मिळायचं असेल ते मिळवून घ्यावं . 

साध्य काय झालं . आज पर्यंत आम्ही इतकी सगळी कर्मकांड केली . मिळालं काय आम्हाला ?काही मिळालं नाही . तब्बेती आमच्या खराब झाल्या आम्हाला काही समाधान नाही . आम्हाला जे काही सांगितलं आहे कि तुम्हाला हे मिळेल ते मिळेल ते कधी मिळणार आहे . ज्ञानेश्वरांनी सांगितलं कि पसायदान मध्ये जो जे वांच्छिल ते तो लाहो . अशारितीने जे जो मागेल ते त्याला मिळणार आहे . ते कधी मिळणार . हि गोष्ट त्यांनी सांगितली ती काही खोटी सांगितली नाही . तेव्हा ती गोष्ट होण्याची वेळ आज आलेली आहे . आणि ती तुम्ही साध्य करून घ्यावी . आणि त्या साठीच आम्ही इथे आपल्याकडे आलेलो आहोत . 

जर काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत . 

सहजयोग करण्यासाठी काही गुरु वैगेरे करावे लागतात का ?

नाही काही गुरु वैगेरे करावे लागत नाहीत ,तुम्हीच तुमचे गुरु होऊन जाता . आईच तुमची गुरु आहे खर म्हणजे . आई पेक्षा मोठी गुरु कोण असणार . पण आईत आणि गुरुत फार अंतर असत . आईच्या डोक्यावर बसलं तरी चालत तिला कोणाच्याच गोष्टीच वावगं वाटत नाही . जे काय आहे ते ठीकच आहे . तेव्हा तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या . तुम्हाला स्वतःचच गुरुत्व मिळून जाईल . म्हणजे सहजयोग असा आहे समजा पूर्वीच्या काळी योगसाठी लोक खूप मेहनत करून घ्यायचे . स्वच्छता करून घेणे . चक्र स्वच्छ कर . हे मेहनत कर ,ती मेहनत कर . अनेक तऱ्हेचे असे धडे लोकांना दयायचे . आणि रोजचे यमनियमन आदी सगळं काही काही करत असत . पण मी असा विचार केला कि हे सगळं करायला आज वेळ कुठे आहे . ह्या धकाधकीच्या काळामध्ये आज हि वेळ आलेली आहे सगळ्यांना पार करण्याची आणि आता वेळ नाही लोकांना काही असलं हे करण्यासाठी . तर काय करावं ?आणि तेव्हा जर सामूहिक लोकांची जागृती झाली तर त्यांनी पुष्कळ लाभ होऊ शकतो . थोडावेळ जरी ती जागृती टिकली आणि लोकांना आपल्या त्या थोड्याश्या प्रकाशात जरी दिसलं कि आपलं काय चुकलं आहे ,आपल्या चक्रांमध्ये कोणचा दोष आहे . आम्ही कुठे आहोत ?हे जरा सुद्धा लक्षात आलं तरी ते लगेच स्वतःचे गुरु होतील आणि स्वतःला बरे करून घेतील . म्हणजे जर तुमच्या हातात एक साप असला आणि तुम्हाला किती म्हंटल कि तुझ्या हातात साप आहे तू सोड आणि तुम्ही अंधारात उभे आहात तुम्हाला दिसत नाही आहे तर तुम्ही म्हणाल कशावरून साप आहे आम्ही दोरी धरूनच उभे आहोत . पण जेव्हा का थोडासा जरी प्रकाश आला तर तुम्हाला दिसेल कि हि दोरी नसून साप आहे . आणि तुम्ही लगेच सोडणार . 

तेव्हा आधी कळस मग पाया ह्या पद्धती वरती हा सहजयोग बसवलेला आहे . आधी तुम्हाला जागृती देऊन टाकायची मग स्वतःला बघत रहायच आणि स्वतःला ठीक करत रहायच . ते कस ठीक करायचं ते आम्ही तुम्हाला सांगू . आणि एका महिन्यात लोक तरबेज झाले आणि दुसऱ्यांना जागृती देऊ लागले . आणि दुसऱ्याचं भल करू लागले . तेव्हा एक दीप पेटवल्या नंतर दुसरा दीप पेटवला जातो . दुसरा झाल्यावर तिसरा पेटवला जातो . आणि हा अमृतानुभव आहे . हाच अमृतानुभव ज्ञानेश्वरांनी वर्णन केला आहे . तुकारामांनी वर्णित केला आहे . नामदेवांनी सांगितलं आहे कि मी बोधाची परडी भरीन म्हणून त्यांनी जोगवा गायलेला आहे . आता बोध म्हणजे काय कि आपल्या बोटांच्या अग्रावर आपल्याला बोध झाला पाहिजे ह्या परमेश्वराचा म्हणजे ह्या ब्रम्हाचा . तर त्याच्या बद्दल आपले आदी शंकराचार्य यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सलीलामसलीलाम म्हणजे थंडथंङ असा हातामध्ये गार वारा येतो . याला जातपात देश काहीही लागत नाही . जर मानव आहात तर हि क्रिया सहज घटीत होते . पण मी आधीच म्हंटल आहे कि महाराष्ट्र म्हणजे विशेष आहे आणि त्यात हे पैठण म्हणजे पण विशेष आहे . त्यामुळे इथे सगळ्यांना हा सुगम सहज योग सर्वाना मिळेल . अशी मला पूर्ण आशा  आहे . 

काही प्रश्न असतील तर विचारा . प्रश्न    –  सर्वसामान्य माणसाची कल्पना आहे कि कुंडलिनी सहजासहजी जागृत करता येणार नाही . आणि म्हणूनच ऋषीमुनींना खूप वेळ लागला ,तपश्चर्या करावी लागली पण आपला हा सहजयोग सर्वसामान्य माणसाला कुंडलिनी जागृती करून देऊ शकतो . यावर थोडा प्रकाश टाकणार का ?

उत्तर – तुमचं म्हणणं बरोबर आहे कि हे कठीण काम आहे . फार कठीण काम आहे . त्या बद्दल काही शंकाच नाही . आणि त्या साठी फार मेहनत करावी लागत असे त्या बद्दल पण काही शंका नाही . पण दोन गोष्टी आजच्या काळात झालेल्या आहेत पहिली म्हणजे अशी कि आता तुम्ही शेतकरी आहात तर शेती मध्ये सुरवातीला एकदोन फुल यायला सुद्धा वेळ लागतो . त्याला मशागत करावी लागते आणि त्या मेहनती नंतर जेव्हा बहर येतो तेव्हा मग कितीतरी फळ त्या बागेत लागतात . तसच आज झालेलं आहे . हि सगळी संतांची सेवा ,ऋषीमुनींनी केलेली मेहनत हि आज फळाला यायला आज पुष्कळ लोक तयार आहेत त्या साठी . पहिली गोष्ट हि आणि दुसरी गोष्ट अशी कि जर आमच्या हातून हे कार्य होतंय तर काहीतरी आम्ही असलंच पाहिजे . काहीतरी गोष्ट आमच्यात सुद्धा असलीच पाहिजे . नाहीतरी हे कार्य कस होईल . तेव्हा दोन्ही गोष्टी अशा रीतीने बघितल्या पाहिजेत कि माताजीन मध्ये काहीतरी विशेष गोष्ट असलीच पाहिजे . कदाचित आमच्यात प्रेम ह्या ऋषीमुनीं पेक्षा जास्तच आहे तुमच्यासाठी. सर्वसामान्यान साठी म्हणूनच हे कार्य होत असेल . कारण परमेश्वराचं प्रेम हे च ब्रम्ह आहे तर ह्या प्रेमाचीच थोडी याना वाट पडली असेल . कदाचित आईच हृदय नसेल त्याच्यात त्या वेळेला आणि हे कार्य आईच्याच हातून व्हायचं असेल . म्हणूनच हे कार्य होतंय . आणि कोणताही शोध जो पर्यंत सर्वसामान्यान पर्यंत येत नाही तो पर्यंत त्याला काही अर्थ नाही . ज्ञानेश्वर जेव्हा होते त्यांना कुणी ओळखलं सुद्धा नाही .ते अनवाणी चालत असत . त्यांच्या जवळ चपला सुध्दा नव्हत्या . आज आपण त्यांच्या पालख्या काढतो त्याला काही अर्थ नाही . सगळ्यांनी इतकं सहन केलं आहे त्यांना इतका  त्रास दिला . कोण अशे संत झाले नाहीत ज्यांना त्रास झाला नाही . बुद्धाला सुद्धा किती त्रास दिलेला आहे . तेव्हा आता अशी वेळ आलेली आहे कि तुम्हाला संत करून टाकते म्हणजे कोण कुणाला त्रास देणार नाही . अशा द्रीष्टीने हा सहजयोग बसवलेला आहे . 

प्रश्न – सहजयोग आणि अद्वैत तत्वज्ञान एकच आहे का ?

उत्तर – काहीच भेद नाही ,फरक नाही . पण अद्वैत तत्वज्ञान तुमच्या समजण्यात येणार नाही . अद्वैताच्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या पार झाल्याशिवाय समजणार नाहीत . गीता सुध्दा पार झाल्याशिवाय समजणार नाही तुम्हाला . काहीही समजणार नाही तुम्हाला . कारण ती द्रीष्टी आल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही . सगळं एकच  आहे . अद्वैत म्हणजे तुम्ही परमेश्वरबरोबर एकाकारिता साधने . यात काही फरक नाही पण डोळे आल्याशिवाय कोणता रंग आहे हे कस कळणार . म्हणून आधी डोळे आले पाहिजेत . हि आईची इच्छा आहे . आणि श्रद्धा डोळस असायला पाहिजे . असं सगळ्यांनी सांगितलं पण डोळस म्हणजे काय ?म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर ती स्तिती आपली झाल्या नंतर मग परमेश्वराला जाणलं पाहिजे . 

खळांची व्यंकटी सांडो ज्ञानेश्वर म्हणतात ना तेच सत्य करायला आम्ही आलो आहोत . आणि खळांची व्यंकटी सांडण्या साठी आपण सत्पुरुष व्हायला पाहिजे ना . आपल्यातला सत्पुरुष जागृत झाल्याशिवाय खळांची व्यंकटी कशी सांडणार आहे . आता ते करून दाखवलं पाहिजे . 

प्रश्न -पुनरपि जननं आणि पुनरपि मरणं हे थांबण्यासाठी काय करायला पाहिजे . ?

सर्वप्रथम हे जाणलं पाहिजे कि माणसाला ह्या जन्माचा ,जगाचा कंटाळा येतो . कारण तो आंधळा आहे ,अज्ञानात बसलेला आहे म्हणून कंटाळा येतो ह्या जगाचा . त्याच सौन्दर्य दिसत नाही त्याला . त्याच महत्व दिसत नाही . म्हणून माणसाला वाटत कि कसा जगू ,कसा मरु . आणि परत नकोरे बाबा हा जन्म असं होत . पण एकदा पार झाल्यावरती लोक अनेकदा जन्म घेतात . म्हणूनच कितीतरी अवतरणानी जगात जन्म घेतला . आणि आता हे झाल्यानंतर तुमच्या इच्छेवर आहे कि तुम्ही जन्म घ्या नाहीतर घेऊ नका . पण तुम्ही घेणार . कारण अजून जगाच भल झालेलं नाही आहे . 

अवघाचि संसार सुखाचा करिन असं म्हणतात तेच करण्यासाठी मी आलेली आहे . जे संतांनी सांगितलं आहे ते खोट नाही ते कार्य सिद्धीस न्यायला पाहिजे ना . अवघाचि संसार सुखाचा करणारच आहे मी . ते सिद्ध करण्यासाठीच आम्ही आलो आहोत . सर्व संतांना सिद्ध करण्यासाठीच आम्ही आलो आहोत . आता जे लोक पार झालेले आहेत ते मला पत्र लिहितात कि आम्ही आनंदाच्या सागरात पोहत आहोत . सगळे प्रश्न सुटतात . परमेश्वर हा सर्व समर्थ आहे . त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेऊ त्याची प्रचिती घेऊन बघावी . आधी त्याच्या साम्राज्यात आलं पाहिजे ना . तुम्ही कोणाच्या साम्राज्यात बसलेला आहात ?तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात बसल्यावर तो तुमच्याकडे लक्ष देणार नाही ,बघणार नाही असं कस होईल . त्यांनी जी जी भविष्यवाणी केली ती सगळी सिध्द करायची आहे . पण आम्ही म्हणू ते ऐकायला पाहिजे . काही काही गोष्टी आपल्यामध्ये धर्मभोळेपणा मुळे आलेल्या आहेत . आणि आपण चुका केलेल्या आहेत . जे चुकलेले आहे ते नीट करावं लागेल . आम्ही इतक्या दिवसापासून हेच करत आलो म्हणून तेच करत रहायच नाही . त्यातकाहीतरी चुकलेले आहे . त्यामुळे आम्ही जे सांगितलं ते ऐकलं पाहिजे . त्यात आमचं देणंघेणं काही लागत नाही . मी आधीच सांगितलं याला काही पैसे लागत नाहीत का काही नाही . पण जे आई सांगते ते ऐकायला पाहिजे . कारण आपल्या भल्यासाठी आणि हिता साठी ती बोलते आहे . मग ते करायला काय हरकत आहे . कबुल आहे ना . ?पुष्कळ चुकीच्या मार्गावरती आपल्याला घातले आहे . आणि ते चुकीचे मार्ग चुकलेले आहेत . धर्मभोळे लोकांनी ते मान्य केले आणि त्यात सगळे वहावत गेलो . आता एक लहानशी गोष्ट आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती एक काळ लागलेलं आहे आणि काळा ठिपका लावलेला आहे . हे चुकीचं आहे . काय आहे कि हे सूर्याचे स्थान आहे . त्याच्यावर काळ लावल ,आता तुम्ही म्हणाल कि काळ लावायला सांगितलं कुणी आम्हाला . तर पंढरपूरला जाताना आपण काळ लावतो . पण तिथले ब्राम्हण लावतात का ?विचार करा नुसता . ते ब्राम्हण लोक लावतात का कपाळाला ?कोणीतरी लावत का ?मग आपण का लावायचं . सांगितलं म्हणून लावायचं हे चुकीचं आहे . सहावा अध्याय वाचायचा नाही म्हणून सांगितला म्हणून वाचायचाच नाही हे चुकीचं आहे . का वाचायचा नाही हो ?का विचारून बघायचा नाही ?आम्हाला अधिकार आहे . नाहीतर लिहिला कशाला त्यांनी . जर वाचायचा नव्हता तर सांगितलं कशाला त्यांनी . आणि सांगितलं त्यांनी आम्ही उघडे नागडे सगळे केले ते सत्य सगळे हे सांगितलेलं आहे . ते सांगितल्यावर वाचायचा का नाही . अशा रीतीने आपल्याला पुष्कळशा गोष्टी आपल्याला मना केलेल्या आहेत कि हे करायचं नाही . आता च मी मोटारीत सांगत होते कि ज्या दिवशी कोणच्याही देवाचा आपल्या इथे जन्म झाला त्या दिवशी उपास करायचा नाही . कारण सुतक होत ते . आपल्या कडे मुलगा जन्माला आला तर त्या दिवशी आपण उपास करू का ?नाही करणार . मग ज्या दिवशी तुमच्या कडे गणपती जन्माला आला त्या संकष्टीच्या दिवशी उपास का करता ?विचार केला पाहिजे . तुम्ही उपास करा आणि पैसे मला द्या हि पद्धत असल्या मुळे सगळे लोक उपास करतात आणि पैसे तिकडे भरत असतात . आई तुमच्या हिता साठी बसलेली आहे इथे . असलं काही भलतं सलत उपटसुम्भ पैसे तुमच्याकडून काढणार असेल तर ते मला चालणार नाही . आणि तुम्ही द्यायचे पण नाही . नंतर काही काही सुरु करतात . नंतर सप्ताह सुरु केला . हे करा ते करा सगळं ठीक आहे . सगळ्यांनी भेटलं पाहिजे ,बोललं पाहिजे . पण देवाच्या नावावरती सप्ताह सुरु करायचा आणि देवाच्या नावावरती एखाद्या कुणाला तरी पैसे द्यायचे हे चुकीचे आहे . आता आणखीन तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्हाला फार आश्चर्य वाटेल आपण नेहमी म्हणतो सत्यनारायणाची पूजा . अहो नारायण स्वतः सत्य आहेत . साक्षात जो सत्य आहे त्याला आणखीन सत्य करायला चालले . खनिजे तो खोटा आहे कि काय ?जर एखादा माणूस खोटा असला तर त्याला आपण म्हणू कि हा सत्य आहे पण तो साक्षात सत्यनारायण आहे . समजा माझं नाव आता निर्मला आहे तुम्ही म्हणाल सत्यनिर्मला बाई . म्हणजे असत्य कोण ?तेव्हा नारायणाची पूजा करणे हे बरोबर आहे पण सत्य नारायची पूजा मला समजत नाही . याचा काही अर्थ मला लागत नाही . तो हि तुम्ही कधी विचारत नाही . मी हि तुमच्या कडूनच आहे ,तुमच्या तर्फेच आहे ,तुमच्या साठीच आहे . आणि जे आहे तुमच्या हिताचं तेच तुम्हाला सांगणार आहे . मला काही मत नकोत किंवा काही नको . फक्त तुमचं कल्याण पाहिजे . आणि ते कल्याण मिळवण्यासाठी ज्या गोष्टी तुमच्या समोर आहेत त्या भ्रामक आहेत . ज्या तुम्ही आज पर्यंत करत आला आहेत त्या चुकीच्या आहेत त्या सोडून द्यायच्या . आता एक साधी गोष्ट आहे कि काशीचे गंडे येतात ते गळ्यात बांधतो आपण . आता हे सगळे गंडे येतात ते सगळे ते मंत्रून पाठवतात . ते मंतरलेले म्हणजे वाईट द्रीष्टीने मंतरलेले असतात . आणि ते गळ्यात घातलं कि त्यांनी वाईटच होत ,नुकसान च होत . आणि हे लोक एक पैशाचा तो गंडा एल रुपयाला किंवा दोन रुपयाला विकतात . आणि पैसे काढतात . त्या काशीच्या गंडयांमध्ये काहीच नाही कारण ते स्वतःच काही नाही . ज्या लोकांनी गंडे बनवले त्यांचं जाऊन आयुष्य बघा . किती बायकांना मारून टाकलं आहे आणि त्यांचे दागिने हिरावून घेतले आहेत . ह्या लोकांन पासून कशाला गंडे घ्यायचे आपण . कबीर दासांनी सांगितलं आहे ‘कर का मनका छाडीदे मनका मनका कर दे ‘. बाह्यतलं सगळं सोडून दे आतलं मिळवून घे . बाह्यतलं मिळवून काही उपयोगाचं नाही . मग उपटसुम्भ तुमच्या डोक्यावर बसतात . आज काय आहे त्याचे पैसे द्या ,शनी महाराजांचे पैसे द्या ,अमक्या महाराजांचे पैसे द्या . नुसते पैसे द्या . अहो देवाला पैसे कसले समजणार आहेत . पैशाची अक्कल नाही आहे देवाला . पैसा हा माणसाने बनवलेला आहे . दुसरं असं कि मंडळी आमच्या पायावर येतात ,दर्शन पाहिजे पण आल्यावरती अहो माताजी पैसे घेत नाहीत . बर मग . मग पाच नाहीतर दहा पैसे घ्या . माताजींना समजत का ते पैसे काय आहेत ते . ह्या ज्या भ्रामक कल्पना आहेत आपल्या कि पैसे देऊन आपण देवाला खुश करू शकतो तस काही नाही आहे . फार तर देवाला फुल वहावीत . याच्या पलीकडे काही नको देवाला . पुष्कळ झालं . तेही त्याच्याच बागेतील आहेत ना . तो द्यायला बसलेला आहे तर आपण काय देणार आणि तो काय घेणार ?पण आपलं मन वाटत ना कि त्याला फुल वहावीत . आपल्या मनात येतंय परमेश्वराने आपल्याला सगळं दिल आहे चल बाबा तुला फुल दिली . तर असा अगदी सहज गत्या तो समजेल असा हा सहजयोग आहे . तो प्रत्येकाला मिळू शकतो पण आपण सहज असलं पाहिजे . असहज नको . पुष्कळ लोकांना वाटत कि आम्ही आता मारुतीची आराधना करतो . करा ,काही हरकत नाही . मारुतीची केली फार चांगलं आहे पण स्वतः मारुती होऊ नका . सगळ्यांना मारायचं झोडपायच ,रागराग करायचा आणि म्हणे आम्ही मारुतीची आराधना करतो . मग तो मारुती धरून झोडपायचा एक दिवस . तेव्हा आहे जे सत्य ते आतून आलं पाहिजे बाहेरून येत नाही . जस एखाद्या झाडाला कीड लागली तर आपण त्याला आतून औषध देतो .. आतून औषध दिल म्हणजे बाहेर त्याचा गुण  येतो . तसाच हा सगळा आतला उपचार आहे . आतून उपचार झाला पाहिजे . बाह्यतला नाही . बाह्यतलं काहीही करायचं नाही . आतूनच सगळं मिळणार आहे . तुझं आहे तुझं पाशी सांगितलेलं आहे . तेव्हडंच पाहिजे . तेच मिळवलं पाहिजे . तेव्हा जराशी नवीन गोष्ट आहे हि ,कलाटणी  आहे . तेव्हा मी काही बुवाजीन सारखी कीर्तन करायला किंवा तुम्हाला काही गोष्टी सांगायला आलेली नाही . जे सत्य आहे ते सांगायला आलेली आहे . तेव्हा सत्यावरती उभ राहायला पाहिजे . जे आपल्याला माहित आहे ते आपण सत्यावरती जाणलं पाहिजे . त्यासाठी तुमच्या हातातून चैतन्याच्या लहरी वहायला पाहिजेत . चैतन्याच्या लहरींनी तुम्ही जाणून जाल कि हे आहे काय . माताजी काय बोलतात हे ब्रम्ह म्हणजे काय . ?

प्रश्न -कलियुगामध्ये भूत आहेत का ?आणि ती स्त्री पुरुषांमध्ये कशी सापडतात ?

सहजयोगात भूत नाहीत पण जगामध्ये आहेत . त्या बद्दल शन्का नाही . जगामध्ये जे मेलेलं आहे ते आहे . आणि ते आपल्याला झपाटतात . हि गोष्ट खरी आहे . त्यांनी वेडेपण येत त्रास होतो लोकांच्या अंगात येत . पुष्कळदा लोक म्हणतात कि हि देवी अली . देवी बीवी काही येत नाही . हि सगळी भूत आहेत . देवी येन हि अगदी साफ चूक गोष्ट आहे . पण देवी यायला कुणाच्या अंगामध्ये देवीला काय वेड लागलाय ?. ते आमच्या मुंबईला तर मोलकरणीं च्या अंगामध्ये पण देव्या येतात . आणि देव्या येऊन घोडयाचे नंबर सांगतात . देवीला काही दुसरं काम आहे कि नाही . सहजयोगामध्ये हे मान्य केलं आहे कि भूत आहेत आणि ती काढता येतात . अनेक विकार आहेत त्या प्रमाणे भुतांचा हि विकार असतो . जसा कँसर चा रोग आहे तशीच भूत सुद्धा आहेत . म्हणजे याचा अर्थ असा नाही कि भूतांचं अधिपत्य आहे . भूत आपण काढून टाकू शकतो . भूत निघून जाऊ शकतात . आणि आपण स्वच्छ होऊ शकतो . पण एक तऱ्हेचा तो सुद्धा एक रोग आहे . हे जाणलं पाहिजे आणि ते तुम्हाला दिसेल . आणि घरात एकदा का भूत अली कि लक्ष्मी घरातून निघून जाणार . सर्व तऱ्हेचे त्रास होणार . तेव्हा ते सोडलंच पाहिजे . कँसर चा रोग सुद्धा त्यांनीच होतो . 

प्रश्न – माणसाने सगुण भक्ती करून निर्गुणात जावं कि निर्गुणातच आधी उतरलं पाहिजे . ?

प्रश्न असा आहे कि सुरवातीला जेव्हा सगुणाच्या गोष्टी केल्या आणि देवदेवता आहेत गणपती आहे ,सगळ्या देवता आहेत . तुमचे जे कुलस्वामिनी आहेत ते आहेत . त्या बद्दल काही शन्का नाही . पण त्याच्या बद्दल बोलल्या बरोबर लोकांनी तो छंद घेतला आणि त्यातलं मर्म ओळखलं नाही . कारण हि जी चक्र आहेत त्या चक्रांवर ह्या देवता बसलेल्या आहेत . त्या देवता बघून त्यांनी त्या देवतांचं वर्णन सांगितलं किंवा जे स्वयंभू आहेत त्याच्या मागे लागले . पण त्यांनी लाभलं काही नाही . तर त्यांनी सांगितलं कि जर तुम्ही फुलाच्या गोष्टी केल्या तर काही फायदा नाही मधाच्या गोष्टी केल्या तरच मध मिळू शकतो . मधाच्या गोष्टी केल्या पाहिजेत . मग निराकाराच्या ,निर्गुणाच्या गोष्टी सुरु केल्या . निर्गुणाच्या गोष्टी करून सुद्धा तसच झालं . कि जेव्हा तुम्ही मधाच्या गोष्टी केल्या तरी त्या गोष्टी गोष्टीच राहिल्या . बोलाचाच भात बोलाचीच कढी . आता तिसरी गोष्ट म्हणजे विशेष सांगायची म्हणजे नामदेवांची . नामदेव गोरा कुंभाराला भेटायला गेले तेव्हा त्यांनी उदगार असे काढले कि “निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी . “निर्गुणाची भेट घ्यायला मी आलो होतो पण सगुण माझ्यासमोर उभं आहे . म्हणजे केव्हडी मोठी गोष्ट आहे आणि समज केव्हडा मोठा आहे . पण होत काय सहजयोगामध्ये ,हाताशी पहिल्यांदा लागत काय तर हे ब्रम्ह . त्याचा बोध होतो आपल्या हाताच्या बोटांच्या अग्रावर . आणि त्या ब्रम्हानी आपण जाणतो खरं काय आणि खोट काय ते . हे स्पंदन आहे आत्म्याचं आणि ते जेव्हा आपल्या हातात येत ,कारण आत्मा हे केवल आहे . याला पर्याय नाही . तेव्हा होत काय कि जेव्हा तुम्ही या चैतन्यला जाणता तेव्हा तुम्ही ह्या चैतन्या वरूनच जाणता कि हे बरोबर आहे कि चूक आहे . आता मी म्हंटल कि समजा गणपती स्वयंभू आहे या ठिकाणचा . पण खरंच आहे कि नाही हे कशावरून जाणणार तुम्ही ?, कुणी सांगितलं म्हणून मानायचं का ?असं होत नाही . ते जाणण्यासाठी ती जी जाणीव आहे ती जाणीव यायला पाहिजे . ती जाणीव पहिल्यांदा तुमच्या बोटांवर येते म्हणून निर्गुण पहिल्यांदा पाहिजे . निर्गुणात तुम्ही जाणता सगळं . आता तुम्ही प्रश्न विचारा कि श्री माताजी आमची हि कुलस्वामिनी खरी आहे कि खोटी आहे . एकदम तुम्हाला चैतन्याने कळेल कि खर काय आहे ते . सगळ्या कुलस्वामिनी खऱ्या आहेत पण त्यांच्यातून चैतन्य येत हे आपल्याला कळायला पाहिजे . आता उदाहरण अर्थ आम्ही गेलो होतो मुसळवाडी म्हणून एक गाव आहे . त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं तिथे एक बांध बांधला . तो बांध एके ठिकाणी जाऊन असा गोल बांधण्यात आला . कारण त्या ठिकाणी काही बांधण्यात आलं कि ते पडायचं . 

तर तिथल्या कलेक्टर नि सांगितलं कि या ठिकाणी काहीतरी गडबड आहे तिथल्या इंजिनिअर ने सांगितलं कि इथे काही बांधता येत नाही . तर तिथे एक फकीर आला आणि त्याने सांगितलं कि इथे जागृत स्थान आहे आणि इथे काही बांधता येणार नाही . असा गोल बांध बांधा तुम्ही . आता तुम्ही कधी पहिला आहे का असा गोल बांध बांधलेला . पण त्या ठिकाणी आहे . तर आम्ही बघायला गेलो तर ते साक्षात स्थान आहे आणि तिथून चैतन्य येत होत . हे सगळे आले मग तिथे सांगितलं कि देऊळ बांधून टाका . आणि ते बांधायला खूप सारे पैसे दिले . आणि सांगितलं कि इथे देऊळ बांधा हे चैतन्याचे स्थान आहे . पण तिथे मुसलवाडीचे लोक भजन बीजन म्हणायचे पण त्यांना इतके दिवस ते जाणवलं नाही . तसाच तिथे अजून एक गाव आहे मियाकी टाकळी म्हणून त्या गावी जातानाच मी म्हंटल कि या गावात कुनीतरी मोठे होऊन गेले आहेत . हो म्हणे इथे फार मोठे फकीर झाले . त्यांचं नाव मिया होत . आता तो मुसलमान असो किंवा हिंदू असो एकदा तो देवाशी एकाकारिता झाला कि मग सगळं धर्मातीत होऊन जात . आणि मी बसलेले असताना माझ्या डोक्यावर त्याने झोत च्या झोत लाईट चे टाकले . मला वाटलं कि मला दिसतंय लोकांना काय दिसणार पण फोटो मध्ये आलं सगळं . तेव्हा हे कस झालं ?त्या फोटोनी ते लाईट धरले . आता मला तर त्या माणसाची माहिती नव्हती काही . पण गेल्या बरोबर एकदम चैतन्याच्या झोत चे झोत आल्याबरोबर वाटलं कि इथे कोणीतरी असणारच बहुतेक . मग हि सगळी मंडळी गेली त्याच्या दर्शनाला . म्हणजे खरं काय किंवा खोट काय किंवा देव काय आहे हे जाणण्यासाठी म्हणून बोध हा झाला पाहिजे . आणि बोध म्हणजे तुमच्या बोटांवरती परमेश्वर हा जाणला गेला पाहिजे . म्हणून आधी निर्गुण जाणलं पाहिजे . मग निर्गुण जाणल्यावरच तुम्हाला कळेल कि सगुणामध्ये खरा सगुण कोण आणि खोटा सगुण ते . आता समजा मी येऊन आपल्या समोर उभी राहिले आणि मी काहीही म्हंटल मी चांगली आहे ,सत्य आहे किंवा अजून काही म्हंटल तर कशावरून ओळखणार तुम्ही . ओळखायला सुध्दा त्याला पण डोळस पणा पाहिजे . तो डोळस पणा नाही मग काय करणार . पण जर का तुम्ही पार असले तर आम्हाला एकदम ओळखणार तुम्ही . जस गोरा कुंभाराला नामदेवांनी ओळखल . तो निर्गुण तुम्ही सगुणात बघणार आणि ओळखणार ह्या कोण . पण तस सांगून उपयोगाचं नाही कारण अजून मानवाला त्या स्तीतीला पोचायला पाहिजे . तिथे तो केवल मात्र सत्य जाणतो दुसरं असत्य तो मानत नाही . आता म्हणे आम्ही याच्या बरोबर जेवत नाही त्याच्या बरोबर जेवत नाही . म्हंटल का ?का जेवत नाही ?साक्षात देव जरी बसला असला तरी आम्ही त्याच्या बरोबर जेवत नाही . म्हणजे काय ?काहीतरी चुकलेलं दिसतंय . पण जर राक्षस असेल तर त्याच्या बरोबर जेवायला बसतील . तुम्ही ओळखलं का ओळखायला अजून डोळे पाहिजेत . म्हणून निर्गुण आणि सगुणाचा जो काही खेळ आहे तो सगळा संपून जातो . निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी . एका शब्दात तोडून सांगितलं त्यांनी . पण ते नामदेव च ओळखू शकत होते गोरा कुंभाराला . त्याला नामदेवच पाहोजेत न ओळखायला . आणि तुम्ही सगळ्यांनी नामदेवा  न सारखं व्हावं हीच माझी इच्छा आहे . तर सगुण आणि निर्गुण सगळं संपून जात . कळलं का ?हा प्रश्न तेव्हा उभा राहतो जेव्हा आपण अज्ञानात असतो . सांगून काय आणि निर्गुण काय एखादा पंखा आहे आणि त्यातून हवा पण येत असते तर  पंखा हि आहे आणि हवा हि आहे  . दोन्ही गोष्टी आहेत . फक्त डोळे पाहिजेत कळायला . सुंदर प्रश्न होता . बर वाटलं . म्हणजे देव त्यांच्या विचारात तरी आहे हे बघून बर वाटलं . आणि हा वारसा आहे आपला जाणलं पाहिजे . आज महाराष्ट्राच्या चरणावर संबंध जग येऊ शकत हि स्तिती आहे तुमची . हे पूर्वीच सुकृत आहे कि तुम्ही ह्या भूमीवर जन्माला आलात . अजून तुम्हाला त्याची जाणीव नाही आहे . तेव्हा आपण थोडासा आता आत्मसाक्षात्कार घेऊया . फार सोपं आहे . 

फक्त सगळ्यांनी टोप्या काढून घ्या . कारण ब्रम्हरंध्र भेदायच असत आणि आई समोर टोप्या घालायची काही गरज नाही . त्यामुळॆ आई समोर वागतो तस अगदी सहज वागायचं .  मांडी घालून बसलात तर बर आहे जमिनीवर बसलात तर त्या हुन बर आहे . चैतन्य म्हणजे हळूहळू झुळूक अशी हातात येते . दोन्ही हात माझ्याकडे करून अशे बसा . आता डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर असा ठेवा . गळ्यात जर काळे दोरे असतील तर ते काढून ठेवा . मी आधीच सांगितलं आहे कि काळ्या दोऱ्यांचा त्रास होईल . विशुध्दीवर थांबेल कुंडलिनी . आता गणपतीला नमस्कार करून ह्या भूमातेला जी कि महाराष्ट्राची विशेष भूमी आहे त्या भूमीवर आपण हात ठेवत आहोत . आता उजवा हात माझ्याकडे आणि डावाहात असा आकाशाकडे करायचा . आता परत डावाहात माझ्याकडे आणि उजवाहत जमिनीवर ठेवायचा . आता डावाहात म्हणजे आपली इच्छाशक्ती आहे . आणि म्हणून तुम्ही हि इच्छाशक्ती माझ्याकडे केली आणि त्याच्यातलं जे काही वैगुण्य असेल ते संबंध पृथ्वीतत्वात जाईल . कारण हि जडशक्ती आहे . हि शक्ती महाकालीची शक्ती आहे . आता परत उजवा हात माझ्याकडे आणि डावाहात असा आकाशाकडे . आता डावाहात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर . आता उजव्या हाताने तुमच्या डोक्यावर टाळूवर तिथे हात ठेऊन बघा थंडथंङ येतंय का ते . आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डाव्याहाताने बघा थंडथंङ येतंय का . मान थोडी वाकवून घ्या . आता दोन्ही हात असे डोक्यावर आकाशाकडे धरायचे आणि असं म्हणायचं कि श्री माताजी हि ब्राम्हशक्ती आहे का . हीच परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का . असा प्रश्न विचारायचा . 

आता हात खाली करून बघा काहो हातातून थंडथंड येतंय का . कदाचित लक्षात येणार नाही पण माझ्याकडे बघताना निर्विचार व्हायला होईल . आणि हातात असं वाटेल काहीतरी सरकल्यासारखं . लक्ष घाला हळूहळू काहीतरी बाहेर पडतंय हातातून असं वाटेल . आणि निर्विचरिता येईल हि पहिली पायरी . त्याच्यानंतर निर्विकल्पता स्थापन करण्यासाठी इथे सेंटर आहे आमचं पैठणला तिथे लोकांनी भेटावं . कस करायचं ते साधून घ्यावं . फार सोपं काम आहे . टाळूवर थोडं दाबून गोल फिरवा तरी बर वाटेल . आता किती लोकांच्या हातातून आणि डोक्यातून गार आल त्यांनी हात वर करायचे . सगळं पैठणच पार झाल्या सारखं दिसतंय . ज्या लोकांच्या नाही आलं ते तुम्हाला हे लोक पार करून देतील . डोळे मिटून आरामात बसा . जनम जनम कि पुंजी पायो हरी में सभी गवायो असं म्हंटल आहे . आणखीन कबीर दासांनी असं म्हंटल आहे जब मस्त हुए तो क्या बोले . 

सगळ्यांना माझा नमस्कार .