Puja, Attention on Quality Rahuri (India)

Become Beautiful Wands Of Vibrations Date 21st December 1987: Place Rahuri Type Puja हे नरकात होते. त्या नरकातून निघून स्वगात बसलेत आणि तुम्ही पृथ्वीतलावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजयोगी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तांनी सांगितले आहे, की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वत:चं महत्त्व स्वत:च मिरवायचं सगळीकडे आणि स्वत:ला फार मोठ समजायचं, की आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. त्याला काही अर्थ नाही. स्वत:चा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. जे आता हा मंडपच उभारला. तो सहजयोग्यांनी उभारला पाहिजे. मला चालतच नाही दूसर्यांनी उभारलेला, सहजयोगी नाहीत. माझ्या डोक्यावर छत्र धरलं आहे तुम्ही. माझ्या डोक्यावरती गंगासुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलं आहे मी. गंगेला तुम्ही माझ्या डोक्यावर चढवलं तर तुम्ही गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेले म्हणून. तर तुम्हाला मी डोक्यावर बसून वाट्टेल त्याने माझ्या डोक्यावरती छत्र बांधायचं की काय! वाट्टेल त्याने मेहनत करायची का? हे सगळं ठेवलेले आहे, म्हणून सहजयोग्यांनीच केलेल्या मेहनतीलाच मी पावणार आहे आणि मला हे असलं नको. त्याने माझं डोकं जड होऊन जातं. हे सगळे मंडप वरगैरे तुम्ही स्वत: बांधायला पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहात. त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो, इथे अजंठ्याची लेणी बघा, दहा पिढ्यांमध्ये बांधली आहेत. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. दहा पिढ्यांमध्ये एका पिढीनंतर दूसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कशी दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल! तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठेपण. सगळी हाताने मेहनत केली. तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं! त्यांच्यासमोर बुद्ध Read More …