Public Program

Sangamner (India)

1987-12-22 Public Program, Marathi Sangamner India DP-RAW, 122'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

1987-12-22 Sangamner Public Program (Marathi)

१९८७-१२-२२, मराठी सार्वजणिक कार्यक्रम, सगंमणेर – १/३ (मराठी भाषणाचे लिखीत रूपातंर)

पर्मेश्वरी शक्तीला शोधंणार्‍या सर्व साधकांना, भाविकांना {मोठा विलबं (Big pause)….} आमचा प्रणिपात. एवढ्या थोड्या वेळातचं सगंमणेरला सहजयोगाची जी प्रगती पाहिली ते म्हंणजे एक फारचं मोठं समाधान आहे. कुंडंलीनी शास्त्र आणि चक्रे हे एक गुप्त शास्त्र होत. जनक राजाने एका नचिकेताला फक्त आत्मसाक्षातकांर दिला, इंद्राला सुद्धा आत्मसाक्षातकांर घ्यावा लागला अशी एक दोन उदाहरणे आपल्याला पुर्व काळात मिळतात. इतिहास सुद्धा असचं सांगतो की फारच कमी लोकनां आत्मसाक्षातकांर झाला होता. पण संत साधू हे वारंवार आपल्या कार्यासाठी भारतात आले, विशेष़तः महारा्ष्ट्रात आणि त्यांनी अनेकोपरी समजवून सांगितंल की आत्मानुभंवाशिवाय तुम्हाला काहीही मिळालेल नाही.
आधंळ्याला जशी दृष्टी नसते तसीचं मानवला जोपर्यतं तो आत्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यतं त्याला सत्य कळु शकत नाही, केवळ सत्य कळू शकत नाही. धर्मानी फारतरं फार मनुष्य सदाचरणी बनू शकतो. पण कोणत्याही धर्मातला मणूष्य मग कोणत्याही तो जातीचा असेना कां? कोणच्याही वर्णाचा असेना कां? कोणतेही पाप करु शकतो, त्याला कोणी रोकू शकत नाही कारण त्याला रोकणारी जी शक्ती ती आत्म्यामध्ये स्थित आहे आणि तो आत्मा अजून आपल्या चित्तात प्रकाशित झाला नाही म्हंणून सामर्थ्थ माणसांमध्ये नाही की त्या पापाच्या प्रलोभनातंन तो मुक्त होईल.

सहजयोगाचे अनेक फायदे आहेत, पण सर्वात मुख्य म्हंणजे असे की, सदाचंरणानी मणूष्याला पुर्नत्व येऊ नाही. आत्मानुभंवातनं त्याला पुर्नत्व येतं. जो पर्यतं आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात पडत नाही तो पर्यतं आपल्याला खरं आणि खोटं याचा पुर्ण अदांज, सपुंर्ण कल्पना येऊ शकत नाही, त्याशिवाय आत्मानुभंव म्हंणजे जिवा शिवाची भेट, म्हंणजे पर्मेश्वराशी संबंध, म्हंणजे पर्मेश्वरी शक्तिचा आपल्यामध्ये आलेला सबंधं प्रवाह. जशी आज आपण सगळीकडे वीज बघतो आणि तिचा प्रवाह वाहत आहे आणी त्या सर्व प्रकाशाला आपण सह्जच एका बटणनी दाबून प्रकाशात आणू शकतो, तसचं माणवांमध्ये सुद्धा पर्मेश्वरानी सर्वसुदंर व्यवस्था करुन ठेवलेली आहे “कुंडंलीनीची”, त्याला काही शिक्षण नको, त्याला काही डिग्री नको, त्याला काही फार मोठी पदवी नको, राजकारणं नको, काहिही नको, माणव असला म्हणंजे झालं. प्रत्येक माणवांला हा जन्मसिद्ध: हक्क आहे की तो या पर्मेश्वरी शक्तीला प्राप्त होतो. त्यानीचं मणूष्य समर्थ होतो, म्हंणजे सम अर्थ लागतो, त्याचा अर्थ लागतो, त्याशिवाय मानसाला काहिही किमंत नाही.

आज मोठ्या खुर्चिवर बसला तर उद्या त्याला लोक लाथाडून टाकतील, पण संताचं तस नाही, संतांना लोकांनी कीतीही त्रास दिला, कीतीही छळलं तरी आज सुद्धा लोकं त्यांच्या नावचं स्मरण करुण स्वत:ला धन्य समजतात. पण संतांना मानुनचं कार्य होणारं नाही. आम्ही या संतांना मानतो, त्या संतांना मानतो अशी मी पुष्कळ मंडळी पाहीली, पण बघते काय की, जे लोक संतांना मानतात त्याच्यांमध्ये संतांचे कोणचेच गुणं आलेले नाही. नुसतं मानुन आम्ही समजा कुणाला मानलं की हे फार मोठे आहेत, त्यांनी आम्हाला संतांचे अधिकार येत नाहीत. समजा जरं आम्ही म्हटंल की आम्ही इग्लंडच्या राणीला फाऱं मानंतो, म्हंणुन आम्ही काही इग्लंडच्या राणी होऊ शकत नाही, उलट जर आम्ही तिला भेटायला गेलो तर ती आम्हाला भेटणार सुद्धा नाही. तेव्हा आ‌मच्या मध्ये काहिही, त्या भावनेचा, त्या विचाराचा, त्या भक्तीचा परिणाम येत नाही, तेव्हा हे काय गौडबगांल आहे? असं लोकांना समजंत, की हे काय चाललेलं आहे? त्यांच्या विचारात हा काही तरी प्रकार, समजून येत नाही. पर्मेश्वर जर आहे आणि जर पर्मेश्वरी शक्ती आहे तर आम्ही पर्मेश्वराचा धावा केला तो पर्मेश्वरांनी आमच्या सेवेला हजर राहीलं पाहीजे अशी कल्पना लोकांची आहे. मग त्या दिशाभूल करणारे बरेच लोक आहेत, तुम्ही इतके गुरुवार करा, इतके शनिवार करा आणि वाचतील ते पैसे मला द्या. नाहीतर तुम्ही सप्ताह माडां, अखंड सप्ताह करा, अमुक करा, तमुक करा, अरे तुमचा योग झाला नाही, तुमचा सबंधं झाला नाही, तुमचं कनेक्शन (connection) झालं नाही? तुम्ही टेलीफोन (Telephone) कुणाला करता?

आत्मानुभंव हा माणसला मिळविला पाहिजे आणि तो मिळविता येतो, आणी तो मिळविल्या शिवाय माणूस हा अर्धवट राहुन जातो, त्याची पुर्ण स्थिती येणार नाही, ह्याचे अनेक फायदे आहेत. आता मी महारा्ष्ट्रामध्ये दुष्काळ फार आहे, त्याच्यावर मी विचार केला या दुष्काळचा काय इलाज केला पाहिजे, दुष्काळाचा इलाज आहे, झाडे असायला पाहीजे, झाडेच नसतील तर पर्मेश्वर कशाला इथे पाऊस घालेल, हे एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळामध्ये जर इथे झाडे नसतील तर इथे पाणी येणार नाही, ते वर्तुळ पुर्ण होत नाही. जर तुम्ही इथे झाडे लावली तर पाणी येइल, पण झाडे लावण्याची सोय नाही, झाडे लावली तर लोकं कापून नेतात कारण त्यांना सरपनं नाही, तेव्हा त्यांच्या साठी काय करता येण्यासारखे सहजयोगामध्ये, सहजयोगाची किमया इतकी जबरदस्त आहे, की ऑस्ट्रीया मध्ये अशी परिस्थिती आली की तिथे ‘ऍसीड रेन’ (acid rain) म्हणूंन आता आपल्याकडे फार कमी आहेत इडंस्ट्रीज (Industires), तिकडे पुष्कळ आहेत आणी त्याच्यामुळे त्याचे जे धुर आकाशात गेले, त्याच्यामुळे ‌‍ऍसीड रेन (acid rain) म्हणूंन पाऊस तयार झाला, म्हणजे पावसांमध्ये ऍसीड आलं, त्यामुळे ही झाडं मरु लागली, मरु लागल्यावरती, त्यांनी अस सांगीतले की आता ह्याला ह्या झाडांना जर कोणी वाचवून दाखवेल तर त्यांना आम्ही फार मोठी पदवी देऊ. ऎक आपले सहजयोगी ते यु. एन. (U.N.) मध्ये ऍग्रीकल्चरचे ऍडव्यायझर (adviser for agriculture) आहेत, फार मोठया पदवीवर आहेत, तर ते चैत्यनमय माझ्यापासनं पाणी घेऊन गेले आणी त्यांनी चार थेबं पाणी प्रत्येक झाडावंर टाकले, सगळी झाडं मरत होती, साठ वर्षाच्यावरची झाडं तर तगली नाही पण बाकी सगळी तगली आणी सगळी व्यवस्थित आहे. जर ही झाडं ऍसीड रेनंला (acid rain) बचाऊन राहतात तर मी असा विचार केला की जर महारा्ष्ट्रात आपण ही एवरग्रीनची झाडं लावली तर ती सदा सर्वदा हिरवी असतात आणी त्यानां पाणी कमी लागतं तर त्यां झाडांमुळे इथे पाऊस खुप पडेल. तसच ही झाडं मणूष्य तोडू शकत नाही, कारण त्याची बाधंनी असती की त्याला बुध्यांना मणूष्य पोहचू शकत नाही, दुसरं हे झाड जाळायच्या उपयोगच नाही, भुरकनं जळून जाईल़, तीसरं म्हंणजे या झाडाला जे कोन्स असतात, ते दगडी असतं, अगदी दगडांसारखे असतात पण खरोखर असतं ते लाकुड, ते लाकुड जर तुम्ही जाळलं तर तुम्हाला सरपनाला सुद्धा व्यवस्था होइल, पाऊसही येईल, त्यानी शेती पीकं होइल आणखी त्यानी तुम्हाला जे सरपन पाहिजे तेही व्यवस्थित होइल असा विचार मी केल्यावर, ती झाडे इथे मागविली आणि आमचे सर्व जगातले जेवढे सहजयोगी आहेत त्यांनी सढळ हाताने ती झाडे इथे आणून दिलेली आहे, त्याच्यावर आता माझा प्रयोग चाललेला आहे पण मला माहीत आहे हा प्रयोग अत्यंत यशस्वी होणार आहे, कारण याच्याआधी आम्ही सुर्यफुलांवरती प्रयोग केला तर सुर्यफुल एवढं मोठं आलं की दोन मानसांना उचलेना त्यातले एवढ्या मोठमोठ्या बिया बघून कुणाला वाटणार नाही, सुर्यफुलांच्या बियां आहेत, नतंर त्यांनी सागीतंले की आमच्या त्या जागेमध्ये तुम्ही तादूंळ लावू शकत नाही, तेव्हा म्हटंल आम्ही लावणार तादूंळ, हमखास आणि तेही आम्ही बासंमतीचे लावले, साठ किलो तादूंळ लावले तर त्याच्यात सत्तर पोती निघाली आम्हची. जर त्याचे आम्ही नुसते बीजं तुम्हाला वाटले तर अनेक प्रकारे आपण आपली शेती वाढवू शकतो. पाण्याची व्यवस्था होऊं शकते आणखीन आपल्याला शेतीही वाढू शकते. ज्या ठिकाणी सहजयोग वाढतो आरडगावला पाण्याचा एक थेबं नसायचा, अगदी सुकलेले गाव होतं तिथे त्या एड्या बाभळ्या होत्या फक्त आणि कांहीही नव्ह्तं तिथे सहजयोग जमल्याबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल की दगड फोडून लोकांनी पाणी काढलं, तीथे इतक्या विहीरी झाल्या, तसचं आमचं नादंगाव माझ्या आईचं माहेरघर होत तीथे मी गेली तर माझ्या डोळ्याला पाणी आलं तिथली स्थिती बघुन, त्या ठिकाणी सहजयोग जमल्याबरोबर तिथे मुळा नदीतनः दगड फोडून पाणी आलं आणी तीथे सगळं हिरवीगार झालं. सगळीकंडे दुष्काळ असतांना त्या आरडगावी मात्र दुष्काळ नाही, ही पर्मेश्वरी शक्ती आहे आणी तिला बरोबऱ समजतं कुठं जायचं.

जे सतांना छळलं, जी सतांनी मेहनत केली, त्यावेळेला अशी सामाजिक परिस्थिती खराब होती की त्यांनी जे जे म्हंटल् त्याच्याबद्दल लोकं त्यांना छळतं होत. जाती पाती विरुद्ध, धर्माधंतेः विरुद्ध त्या सतांनी एकंटे उभे राहून झेंडे उभारले. (बृहद?) सरस्वतीचं असं म्हणंतात की रस्त्यात जर एखादा कुठे शेदुंर फासुन एखादा मणुष्य बसला असेल तरं ते जाऊन त्या दगडांवरती आणि थूकंत असतं आणि त्या ब्राम्हणाला केव्हा जो कोणी तो पैशे खाणारा असेल तर त्याला झोडंपुनं काढ़त असत. रामदास स्वा्मिनी कितीतरी शिव्या घातल्या असेल, तुकारामांनी कितीतरी त्यांना सांगीतलेल आहे की जात पातं सोडा. ह्या सर्व धर्माधःतेला एकदाचः तुम्ही सोडून जर दिलं, नानांतर्‍हेच्या आपल्यामध्ये कुरिती आहेत, त्या कुरितीमुळे लोकांना किती त्रास होता, तर त्यावेळेला एकटा एक उभा राहीला, ज्ञानेश्वराला तू संन्याश्याचा पोरगा म्हणुन एवढं छळलं, तेविस वर्षाच्या वयात काय ती ज्ञानेश्वरी आणि त्याच्यानतंर लिहीलेल अम्रुतानुभव पुस्तंक वाचलं की असं वाटत की वा.. वा.. वा… पर्मेश्वराच्या साम्राजातचं रमंण होऊ राहिलं, अस सुदंर पुस्तक तेविस वर्षाच्या वयात ज्या विभुतीनं लिहील त्याला तु संन्याश्याचा पोरगा म्हणुन हिनवणारे हे महामुर्ख आजही समाजात आहेत. आता सतांना छळू शकत नाही, आता जर का सतांनवर कोणी हात उगारला किवां त्याच्यांकडे डोळे केले तर मात्र त्यांची दुर्गत होइल. कारण ते दिवस आता सपंले, सतांनी केले तेवढे प्रयत्न केले, त्याचां छळ केला, त्यांची दुर्गती झाल्याशिवाय राहणार नाही. त्या सतांनी आता दुसरी कार्य करायची आहेत. सामाजिक जी घाण आपल्यामध्ये आहे, प्रत्येक तर्‍हेची घाणं आपल्यामध्ये आहे, मुलीनां आपण ज्या तर्‍हेनी वागवतो, त्याच्यांसाठी हुडां दे, त्याच्यांसाठी वाटेल तसं त्याच्यांतील जबरदस्ती कर, जुलूम करं, त्यामुळे ह्या देशात गरीबी आहे. “जंत्र ना-या पुजंतेः तंत्र रंमंतेः देवतः”. ज्या ठिकाणी स्त्रीला पुजले जाते, ती पूजनीय असायला पाहीजे आणि तिला पुजलं पण पाहीजे तिथे देवतांचे रमणं होते. आणि ज्या देशामंध्ये बायकांना अशा रीतीने वागवण्यात येत म्हणजे मुसलमानांपेक्षा आपण बदतर आहोत कांही कांही गोष्टीत म्हणजे मुसलमानांपेक्षा आपण बदतर आहोत, निदान मुसलमानामध्ये जात पात नाही आणि या जातीतले जे कर्मठ लोक आहेत आणि मोठे धर्ममार्तडं म्हणतात, ते जेव्हा मुलीला काही त्रास होतो तेव्हा कुठे जातात, तेव्हा कोण उभ राह्त. ज्या घरामंध्ये मुलींचा, सुनेचा, आईचा अपमान होतो, त्या घरात लक्ष्मी थांबु शकत नाही. हा एक प्रकार सामजीकतेत झाला, दुसरा म्हणजे व्यसनीपणा, व्यसन सहजयोगात आल्याबरोबर सुटून जात. कालच मला फार आनंद झाला, काही मुलं आली ती नीश्चित कॉलेजमध्ये शिकतात, त्यांना हे ड्रग्सचं (Drugs) व्यसन लागल होतं आणि ते म्हंणाले माताजी सहजयोगामुळे आमचं सगळ व्यसन सुटून आम्ही निर्मुक्त झालो. निसंगाने………………………………………

[१४ मिनिटे आणि ५६ सेकंद]