Public Program (India)

1987-12-23_Sarvajanik Karyakram- Atmyache Darshan_Akole-MARATHI अकोल्या गावामध्ये जी आत्मानुभावाची प्रगती झालेली आहे त्याला अगस्त्य मुनिंचे आर्शीवाद तसेच लव आणि कुश यांचे गेलेले बालपण आणि श्री सितेची शुभेच्छा सर्वच कारणीभुत आहेत. ह्या महाराष्ट्रात संत साधुंनी फार मेहनत घेतली आहे. ते जिवंत असतांना लोकांनी त्यांना मान्यता दिली नाही. जे धर्ममार्तंड होते त्यांनी त्यांचा छळ केला. आणि जनसाधारणा मध्ये एव्हढी शक्ती नव्ह्ती की त्यांना या छ्ळवाद्यां पासन संरक्षण द्यावे. ती गोष्ट कधी-कधी जिवाला लागुन राहते. ऋषिमुनींच्या वेळेला असला प्रकार नव्हता. पण ह्या कलीयुगामध्ये मोठ-मोठ्या संत साधुंनी फार छळ सहन केला. कारण मानवाला त्यांच्या शक्तीची जाणीव नव्हती, त्यांच्या व्याक्तीत्वाची कल्पना नव्हती. ते केव्हढ मोठ कार्य करत होते त्या बद्धल जाणीव नव्हती, आज त्यांच्याच कार्यावर आम्ही हा सामुहिक सहाजयोग उभारलेला आहे, त्यांच्याच मदतीनी, त्यानींच पेरलेली बिये आज फुलली आहेत आणि त्यावरच आमच काम चालु आहे, तेव्हा त्यांना अनेकदा नमस्कार करुन, माझी आपल्याला अशी विनंती आहे की जे झाल–गेल ते विसरुन जावं आज वर्तमान काळात हया वेळेला ह्या कलीयुगामध्ये जेव्हा सगळी कडे आपल्याला अंधकार दिसतो आहे. राक्षसांचे जसे काही थैमान चालले आहे. कुठे जाव – काय कराव काही कळत नाही, कश्या रितीने या संकटातुन मुक्त व्हाव, सर्व देश त्राही-त्राही करत असतांना, हा सहजयोग आपल्या समोर उभा राहीलेला आहे, एकदा नळाला(नल राजा) कली सपडला, कली सापड्ल्या वर नळानी त्याला असा जाब विचारला कि तु महाद्रुष्ट आहेस, तुझ्यामुळे जगामध्ये परमेश्वरी तत्व नष्ट होतेय, तुझ्यामुळे लोकांची द्रुष्टी भलत्या गोष्टींकडे जाते, त्यांच्या चित्तामध्ये अनेक तऱ्हेचे विकल्प येतात तसेच अनाचार आणि अत्याचार याचा सुळसुळाट होतो. तेव्हा अश्या तुला मी नष्ट का करु नये?, तु सुध्दा माझा आणि माझ्या पत्निचा विरह घडवुन आणलास Read More …