Christmas Puja, Reach Completion of Your Realization Pune (India)

Christmas Puja Talk IS 25th December 1987 Date: Place Pune Type Puja आज मी इंग्लिशमध्ये बोलले. कारण हा त्यांचा विषय आहे. पण आपणसुद्धा पुष्कळ ख्रिस्ताबद्दल जाणत नाही आणि जे काही जाणतो ते इतकं थोडं आहे, की त्यावरून जो काही आपण अंदाज लावतो तो ह्या ख्रिस्ती लोकांना बघून कळतं चुकीचा आहे. तसं म्हणाल, तर कोणत्याच जातीत मी तसे शहाणे लोक पाहिले नाहीत. मग ते हिंदू धर्माचे असेनात का किंवा ख्रिस्ती धर्माचे असेनात का. कोणत्याही धर्मात वेड्यांचाच भरणा जास्त आहे. तेव्हा ह्या वेड्या लोकांमधून आपण काही शिकायचं नसतं, पण कोणतही अवतरण ह्या जगात आलं त्यांचं फार वैशिष्ट्य असतं. त्यातल्या त्यात ख्रिस्तांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आयुष्य अगदी सोनं जसं तावून सुलाखून निघावं तसं आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल कोणीही एका अक्षराने अस म्हणू शकत नाही, की ख्रिस्तांनी ही गोष्ट थोडी चुकीची केली किंवा असं कसं केलं? काही प्रश्न उभे राहू शकत नाही. इतकं थोडसं आयुष्य असतांनासुद्धा त्यांनी जी कमाल केलेली आहे, आणि ते ज्यांनी एकंदर आपल्या सर्व कार्याला जी सार्थकता आणली, व्यवस्थितपणे, एकानंतर एक, ती अगदी कमालीचीच आहे आणि तेच आज मला आपल्याला सांगायचं आहे. जसा ख्रिस्ताचा जन्म वडिलांशिवाय फक्त पवित्र आत्म्यामुळे म्हणजे होली घोस्टमुळे झाला, तसाच तुमचाही जन्म झालेला आहे. तेव्हा तुम्ही त्याच पावित्र्यात आलं पाहिजे आणि त्याच पावित्र्यात राहून ख्रिस्तासारखं जीवन दाखवलं पाहिजे जगाला. तर लोक म्हणतील ख्रिस्ताचा जो आदर्श तुमच्यासमोर आहे त्याचं हे फळ आहे. अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ. स्फटिकासारखं चमकणारं त्यांचं जे आयुष्य होतं ते तुम्हाला नेहमी प्रकाशित करत राहील. ते प्रकाश आहेत. त्या प्रकाशाला आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या प्रकाशातच आपलं पाऊल टाकलं पाहिजे. जपून जर आपण समजून उमजून ह्या Read More …