Christmas Puja, Reach Completion of Your Realization

Pune (India)

Feedback
Share

Christmas Puja Talk IS 25th December 1987 Date: Place Pune Type Puja

आज मी इंग्लिशमध्ये बोलले. कारण हा त्यांचा विषय आहे. पण आपणसुद्धा पुष्कळ ख्रिस्ताबद्दल जाणत नाही आणि जे काही जाणतो ते इतकं थोडं आहे, की त्यावरून जो काही आपण अंदाज लावतो तो ह्या ख्रिस्ती लोकांना बघून कळतं चुकीचा आहे. तसं म्हणाल, तर कोणत्याच जातीत मी तसे शहाणे लोक पाहिले नाहीत. मग ते हिंदू धर्माचे असेनात का किंवा ख्रिस्ती धर्माचे असेनात का. कोणत्याही धर्मात वेड्यांचाच भरणा जास्त आहे. तेव्हा ह्या वेड्या लोकांमधून आपण काही शिकायचं नसतं, पण कोणतही अवतरण ह्या जगात आलं त्यांचं फार वैशिष्ट्य असतं. त्यातल्या त्यात ख्रिस्तांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आयुष्य अगदी सोनं जसं तावून सुलाखून निघावं तसं आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल कोणीही एका अक्षराने अस म्हणू शकत नाही, की ख्रिस्तांनी ही गोष्ट थोडी चुकीची केली किंवा असं कसं केलं? काही प्रश्न उभे राहू शकत नाही. इतकं थोडसं आयुष्य असतांनासुद्धा त्यांनी जी कमाल केलेली आहे, आणि ते ज्यांनी एकंदर आपल्या सर्व कार्याला जी सार्थकता आणली, व्यवस्थितपणे, एकानंतर एक, ती अगदी कमालीचीच आहे आणि तेच आज मला आपल्याला सांगायचं आहे. जसा ख्रिस्ताचा जन्म वडिलांशिवाय फक्त पवित्र आत्म्यामुळे म्हणजे होली घोस्टमुळे झाला, तसाच तुमचाही जन्म झालेला आहे. तेव्हा तुम्ही त्याच पावित्र्यात आलं पाहिजे आणि त्याच पावित्र्यात राहून ख्रिस्तासारखं जीवन दाखवलं पाहिजे जगाला. तर लोक म्हणतील ख्रिस्ताचा जो आदर्श तुमच्यासमोर आहे त्याचं हे फळ आहे. अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ. स्फटिकासारखं चमकणारं त्यांचं जे आयुष्य होतं ते तुम्हाला नेहमी प्रकाशित करत राहील. ते प्रकाश आहेत. त्या प्रकाशाला आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या प्रकाशातच आपलं पाऊल टाकलं पाहिजे. जपून जर आपण समजून उमजून ह्या गोष्टी केल्या तर आपलं सहजयोग्यांचं आयुष्य एक विशेष तऱहेचं होऊन जाईल. प्रत्येक ठिकाणी, मग ते हिंदुस्थानात असे ना का, की बाहेर, प्रत्येक ठिकाणी बरेच दोष आहेत, पण आमच्या 6. पुण्याला कोणते दोष नाहीत असं विचारलं, तर मला काही सांगता येणार नाहीत. सहजयोग्यांमध्ये इथून तिथून सगळे दोष आहेत. त्यातून भांडणं पण आहेत. एकाच माणसाच्या डोक्यावरती सगळा बोजा येतो आणि त्याला फार झगडावं लागतं. तेव्हा ह्याच्यापुढे पुणेकरांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा जो सहजयोगाचा आहे आणि सहजयोगाची जी विशेष म्हणजे संस्कृती आहे, ती अत्यंत शुद्ध आचरणाची आहे. भांडणं, क्षुद्रता, दुसरं म्हणजे कंजुषी हे सगळे गुण पुणेकरांनी सोडले पाहिजेत. ह्याने त्यांचं नाव कधीही उज्वल होणार नाही. विशेषकरून मी आता पुण्यात माझ स्थान मांडलेले आहे. इथे आल्यावर माझ्या लक्षात आलं, की थोडीबहुत इथे काहीतरी गडबडच आहे. ही गडबड आता कशी ठीक करायची ? म्हणजे माताजींच्या दर्शनाला सगळे आले. स्वार्थ फार आहे. पण माताजींच्या कार्याला हात लावणारे फार कमी आणि म्हणून एक आग्रहाची विनंती आहे, की सगळ्यांनी धर्माच्या बाबतीमध्ये एक सूक्ष्म दृष्टी आणली पाहिजे. ন

आमच्या धार्मिकतेमध्ये ती सूक्ष्मता आहे किंवा नाही? आम्ही धर्मामध्ये उतरलो तो धर्म आमच्या सहजयोग संस्कृतीला धरून आहे किंवा नाही? जर सहजयोग संस्कृतीला यायचे आहे तर सर्वात मुख्य म्हणजे मनुष्याला दानी असलं पाहिजे. ज्याला दानत नाही तो सहजयोगी असू शकत नाही. तुमच्या आईची किती दानत आहे ! ह्या सगळ्या लोकांनी मनाने तुमच्यासाठी बक्षिसं आणली. पण इथं जर तुम्हाला एक रुपया द्या म्हटलं तर इकडे तिकडे डोळे फिरवू लागतात पटापट. पैशाचं नाव घेतलं रे घेतलं की सगळ्यांचे डोळे फिरायला लागतात. दूसरं काही ठेवलं तरी हरकत नाही. बाँब फुटला तरी नाही, पण पैशाची गोष्ट काढली नां माताजींनी, डोळे इकडे तिकडे फिरायला लागतात. इतकी निम्न स्थिती आहे ह्या बाबतीत आपली. इतकी निम्न स्थिती आहे, की कधी कधी आश्चर्य वाटतं की आपण कसे सहजयोगी होतो. परत एक दार नाही उघडलं तर दुसऱ्या दाराने काही येणार नाही. त्यामुळे स्थिती तीच. जैसे थे. ख्रिस्तासारख्या माणसाने, ज्याने सबंध जिवाचं रान करून, मेहनत करून, कष्ट करून इतक्या लहान वयामध्ये एवढा मोठा त्याग केला. अशा त्या ख्रिस्ताला, जर तुम्ही कोणाला उभे करू शकाल तर ज्ञानेश्वर तुमच्यासमोर आहेत. त्या ज्ञानेश्वरांना छळण्याची कमालच केली होती. पण आज त्यांच्या नावाने तरी, त्यांच्या आयुष्याचा धडा आपण गिरवावा असा विचार आपण केला पाहिजे. तेव्हा आजच्या शुभप्रसंगी प्रत्येकाने प्रतिज्ञा केली पाहिजे, की आमच्या आचरणात आम्ही शुद्धता बाळगू. आमच्या वागण्यात, आमच्या बोलण्यात आम्ही शुद्धता बाळगू. इतकच नव्हे तर आमचं जे सहजयोगाचं सांस्कृतिक जीवन आहे, ते सांस्कृतिक जीवनसुद्धा आम्ही अत्यंत ह्याकडे लक्ष देऊ आणि आपापसामध्ये फार प्रेम करू. इतकी सुंदर फुलं तुम्ही माझ्यासाठी आंथरली , इतकी माझी सुदर बनवू. आपल्या परीने पूर्णपणे आम्ही तुम्ही सेवा करता, मला आनंद झाला हे बघून, मला तुम्ही खुश करता, पण मी सगळ्यात जास्त खुश होते, जेव्हा आपापसात भांडणं होत नाही. म्हणजे दिल्ली आणि पुणे. ह्याच्यामध्ये मुकाबला आहे म्हटलं तरी चालेल. पण तुमची भांडणं म्हणजे इतकी क्षुल्लक आहेत, की मला त्याच्यात काहीच अर्थ वाटत नाही आणि त्यात मला इतकं दु:ख होतं, इतकं वाईट वाटतं, की असं वाटतं की माझ्यापासून सगळं काही हिरावून घेतलेले आहे. ख्रिस्तांनी म्हटलेले आहे आपल्या शिष्यांना, की तुम्ही आपापसात प्रेम करा. हे एकच मला दान द्या. आणि तेच मी तुम्हाला सांगते. तुम्ही आपापसात प्रेम करा. हे एकच मला दान द्या. आपापसात प्रेम करा. एकदुसऱ्यांचे दोष बघू नका. फक्त एकमेकांचे गुण बघून स्वत:चे गुण वाढवा आणि शांत होऊन एकमेकांवर प्रेम करा. आज ख्रिसमसचा दिवस आहे. आपण सगळ्यांनाच काहीतरी बक्षिस देत असतो ख्रिसमसच्या दिवशी. तेव्हा तुम्ही तर काही आणलं नसेल बक्षिस कोणासाठी. पण आणायला पाहिजे. काही नाही, फुल न फुलाची पाकळी, म्हणजे अगदीच पाकळी घेऊन येऊ नका. पण असच काहीतरी आणलं तर हे आलेत इतक्या दुरून, आपण त्यांना एक एक बक्षिस, कोणीही छोटाश्या, लहानशा वस्तू घेऊन यायचं. ते धुमाळ साहेब मात्र ह्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी चॉकलेट्स घेऊन आले. आता त्यांना एवढं सुचलंय, मला मोठं आश्चर्य वाटलं. बघा ह्यांच्या कसं डोक्यात आलं, ‘ख्रिसमसला मी सगळ्यांना चॉकलेट वाटेन. ‘ एक एक लहान चॉकलेट घेऊन आले. तुम्ही पण प्रेम काहीतरी घेऊन यायचं. आम्ही घेऊन आलोत ह्यांच्यासाठी. म्हणजे एकत-हेचा आपल्यामध्ये मैत्री भाव, आणि ते दर्शवण्यासाठी वस्तू वाटण्यात काही शक्ती नाही. फक्त एवढीच शक्ती आहे, की आपण ह्याद्वारे आपला ल

प्रेमभाव दुसर्यांना दर्शवू शकतो. तेव्हा तुम्ही जर असा विचार केला असता, की आज ख्रिसमस आहे. सगळेजण येणार. इतक्या दुरून दुरून लोक आले. त्याच्यासाठी काही नाही, पुण्यातर्फे आपण काही नाही तर फुलं इथे किती सुंदर असतात. एक एक गुलाबाचंच फूल घेऊन जाऊ त्यांच्यासाठी. तर एवढी सगळी फुलं सजली त्यापेक्षा मला जास्त आनंद झाला असता. आता ही सगळी पायाखाली आलेली फुलं आहेत, तीसुद्धा तुम्ही ह्यांना द्या. म्हणजे बरं वाटेल त्यांना. आनंद होईल. त्यांच्याबरोबर पाठवून द्या. पण अशी माझी एक इच्छा आहे, की आपापसात खूप प्रेम झालं पाहिजे आणि सबंध विश्व एकाच आईच्या प्रेमात न्हाऊन निघालं. त्याचा आनंद एक आगळा असतो. तो तुम्ही सर्वांनी मिळवावा. हीच माझी इच्छा आहे. दुसरं काय? बाकी मला काहीही नको. फक्त एवढंच पाहिजे आणि ते आज मी तुमच्यासमोर उघड करून सांगितलं आहे. तेव्हा कृपा करून आपापसात भांडू नये. आपापसात प्रेमाने रहावं. आपापसात एक छोटीशी वस्तू जरी इकडून तिकडे दिली तर काय हरकत आहे. त्याच्यात काही आपण गरीब होत नाही. त्याच्यात काही आपण मरत नाही. एक वस्तू जरी आपण एकदसर्याला दिली, तर किती बरं वाटतं. मला तर फारच आनंद होतो. तो आनंद तुम्ही घ्यावा. तुम्ही त्याचा उपभोग पूर्णपणे, मनसोक्त घ्यावा, म्हणून मी तुम्हाला एक अशी सूचना केलेली आहे. इकडे आपण लक्ष द्यावं. आजची पूजा म्हणजे फार लहान असते. आजच्या पूजेला काही फार वेळ लागत नाही. फक्त आधी आपण श्रीगणेशाचं स्तोत्र येशूच्या ह्याच्याने करू. ती दहा मिनिटाची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीचं स्तोत्र करून पाय धुवून टाकायचे. एवढीच काय ती आजची पूजा असते. जास्त पूजेला वेळ लागत नाही. पण तरीसुद्धा जितके पूजन असेल त्यावेळेला आपण सबंध लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे आणि लक्षपूर्वक ते आपण अचीव्ह केलं पाहिजे. त्यावेळेला इकडे तिकडे लक्ष घालायचं नाही. पूजेच्या वेळेला लक्ष सबंध इकडे असलं, म्हणजे जे प्राप्त व्हायचं ते होतं. आता आज मागून घ्यायचं आहे, तर ते की आम्हाला माताजी, तुम्ही ख़्रिस्तासारखं आयुष्य द्या. ख्रिस्तासारखं निर्मळ आणि तपस्वी आयुष्य आम्हाला द्या. आम्हाला ते पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्रास देण्याची गोष्ट नाही खिस्तासारखी. पण ती शक्ती, त्या तपस्वितेची शक्ती आम्हाला द्या.