Talk on Marriage and Nirvikalpa

Kolhapur (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type

आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. त्यांनी जात-पात पाहिली नाही, की शहाणवच कुळी असलं पाहिजे, की अमुकच असलं पाहिजे. असं काही पाहिलं नाही. त्यावेळेला जेव्हा इतके वर्षापूर्वी गागाभट्टांना इथे येऊन त्यांना राज्याभिषेक द्यावा लागला, जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवलं , की तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा नाही. तेव्हा तुमची तेव्हा ह्या कोणतीही जात असेना का, तुम्ही आज सहजयोगी झालात, तुमची जात बदलली. तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म ‘विश्व निर्मल धर्म’ आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे, त्यामुळे तुमच्या वाईट सवयी गेल्या, सगळं काही गेलं. पण हे भूत अजून काही गेलेलं नाही. तुमच्या जातीच्या लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहिजे. कारण ही जमात जी तुमची आहे, ती भुतं आहेत सगळी . दारू पिणं, मारणं, मग ते दारू पिओ, नाहीतर काही करो. हंडा घेवो नाहीतर काही करो. मग ते आमच्या जातीतलंच असलं पाहिजे. मग तुम्ही सहजयोगी कसे ? मग सहजयोग सोडा तुम्ही. तुम्ही दोन धर्मात उभे राहू शकता का ? नाही राहू शकत. त्याच्यामुळेच काल ह्यांना मार खावा लागला. हे लोक ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला, आणखीन आम्ही काहीच असं करत नाही असे उभे राहिले. त्यांनी काल मार दिला. त्याला कारण थोडसं तरी मला असं वाटतं, की आमच्यामधील जी कमजोरी आहे त्यांनी ती ओळखली आहे. आणि त्यांच्या मते आपण अंधश्रद्धेला पूर्ण झालोत. पण जर तुम्ही बोलत सुटलात की, ‘आम्ही सहजयोगी आहोत. आम्हाला कोणतीच अंधश्रद्धा नाही. आम्ही कोणत्याच असल्या गोष्टी मानत नाही. आम्ही ह्याच्या पलीकडे आहोत. आम्ही करून दाखवू तुम्हाला.’ तेव्हा ह्या लोकांच्या लक्षात येईल, की काहीतरी विशेष मंडळी आहेत. आम्ही आमच्या वडिलांना पाहिलं. आमच्या वडिलांना गांधीजींनी सांगितलं की सगळ्या मुलांची लग्न तुम्ही बाहेर करा. आता आम्हीसुद्धा शहाण्णवकुळीच आहोत. त्यामुळे फार विचार करून लग्न होत असत पूर्वी. वडिलांनी लगेच सांगितलं , काही हरकत नाही. कुठेही लग्न करा. सगळ्यांची अशीच लग्न लावून दिली आमची. काय आमचं वाईट झालं ? त्यांनी सांगितलं की मी काँग्रेसचा मनुष्य आहे. मला काय? मला दुसरं काही नाही. माझी जात नाही, धर्म नाही, काही नाही. माझा हाच धर्म आहे. गांधीधर्मी आहे. तेव्हा धर्म घ्यायचा तर पूर्णपणे घेतला पाहिजे.