Talk to yogis, Dhyana Madhe Nirvicharita Aurangabad (India)

Dhyanamadhe Nirvicharita “VIC 8th December 1988 Date : Place Aurangabad Seminar & Meeting Type मी मराठवाड्याची महती सांगितली आहे. आजसुद्धा पेपरात आलेले आहे की सुवर्णयुग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे. सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला जे दिसतं आहे ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहजयोग्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोमरोमात पोहोचवण्यासाठी सहजयोग्यांची फार जोरात तयारी पाहिजे. त्यात मुख्य म्हणजे सहजयोग्यांनी ध्यान- धारणा करणे. आपली चक्रे स्वच्छ करणे. खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजे. निदान दोनदा तरी ध्यान केलेच पाहिजे. ध्यानामध्ये निर्विचारिता स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते. आणि हे आत्म्याचं जे फळ मिळालं आहे त्याचं खरं स्वरूप आपल्याला मिळू शकतं. पण जर आपण ध्यान-धारणा केली नाही, तर आपल्याला निर्विचारिता स्थापन करता येणार नाही आणि निर्विचारितेशिवाय आपल्या आतली जी आंतरिक स्थिती आहे ती सुधारणार नाही. त्यासाठी ध्यान-धारणा करायलाच पाहिजे. आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. ते काढण्याचा प्रयत्न करायला नको, फक्त त्यांच्याकडे बघितलं तरी ते निघून जातील. तेव्हा जसं काल भारूडामध्ये सांगितलं की या संसारातून वेगळं निघा आणि मग या संसाराकडे बघितलं. कारण जोपर्यंत तुम्ही या संसाराच्या उलाढालीमध्ये गुरफटलेले असाल तोपर्यंत तुम्हाला याच्यातले प्रश्न सोडवता येणार नाही. तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असले, तर तुम्ही बाहेर कसे येणार ? तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे. जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटांगळ्या जाऊन त्याच्याऐवजी तुम्हाला आनंद लुटता येईल. त्यानंतर तुम्ही इतर लोकांनासुद्धा पोहण्याचं शिकवू शकता. तसंच अध्यात्माचं आहे. Read More …