Adi Shakti Puja, Detachment Rahuri (India)

Adi Shakti Puja, “Detachment”, Rahuri (India), 11 December 1988. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळींपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे. आपली मुलंबाळे सांभाळली पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदार चरितानां वसुधैव कुट्म्बकम्, म्हटलेले आहे. ते उदार चरित्र कुठे आहे? आता सगळ्यांचं इथे असं म्हणणं आहे, की माताजी, आश्रमाला तुम्ही इथे जागा द्या. आश्रम घ्या. अहो, पण त्याच्यात राहणार कोण? ते आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा देते. तर म्हणे माताजी, तुम्ही रहाल. म्हणजे मी तिथे आश्रमात राहणार आहे ? मला आश्रमात घालता का तुम्ही? माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे? मला काय गरज आहे सहजयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे ? मला तर सगळं मिळालेच आहे. मी आहेच ती. तेव्हा म्हणे तुमच्या राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करतोय. म्हटलं मुळीच करू नका. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देईन. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला.. त्यासाठी पैसे दिले, सगळे काही झालं. तिथे रहायलाच कोणी तयार नाही. पैसे देऊन कोणी रहायला तयार नाही. हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण, की आपल्याला काही सवयी झालेल्या आहेत. त्यातली Read More …