Adi Shakti Puja, Detachment

Rahuri (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Adi Shakti Puja, “Detachment”, Rahuri (India), 11 December 1988.

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळींपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे. आपली मुलंबाळे सांभाळली पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदार चरितानां वसुधैव कुट्म्बकम्, म्हटलेले आहे. ते उदार चरित्र कुठे आहे? आता सगळ्यांचं इथे असं म्हणणं आहे, की माताजी, आश्रमाला तुम्ही इथे जागा द्या. आश्रम घ्या. अहो, पण त्याच्यात राहणार कोण? ते आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा देते. तर म्हणे माताजी, तुम्ही रहाल. म्हणजे मी तिथे आश्रमात राहणार आहे ? मला आश्रमात घालता का तुम्ही? माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे? मला काय गरज आहे सहजयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे ? मला तर सगळं मिळालेच आहे. मी आहेच ती. तेव्हा म्हणे तुमच्या राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करतोय. म्हटलं मुळीच करू नका. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देईन. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला.. त्यासाठी पैसे दिले, सगळे काही झालं. तिथे रहायलाच कोणी तयार नाही. पैसे देऊन कोणी रहायला तयार नाही. हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण, की आपल्याला काही सवयी झालेल्या आहेत. त्यातली एक सवय अशी आहे, की आपलं एक घर असलं पाहिजे. मग त्यात पुष्कळ फायदे असतात. बायकोवर ओरडता येतं. जेवणाचं असं पाहिजे. मला हीच भाजी पाहिजे. मला ते नाही पसंत. मग नवऱ्याची पसंत बायको बघत बसते. आता आश्रमात काय ? सगळ्यांच्यासाठी स्वयंपाक केला तो खायला लागतो. सगळं काही असलं, तरी प्रत्येकाला वेगवेगळं काही मिळत नाही. तिथे नवऱ्याची मिजास कशी चालणार? बरं बायकोचंसुद्धा, मला ही खोली आवडते. मला हेच आवडतं. माझच घर असलेलं बरं. माझी मुलं आली म्हणजे त्यांना मी लाडू देणार. दूसरी मुलं आली तर त्यांना मी बोरं देणार. हे कसं चालणार! त्यामुळे होतं काय की आपल्यामध्ये अजून एकत्र कुटूंब पद्धती जी आपली विश्वाची आहे, त्याची अजून कल्पना आलेली नाही आणि ह्या लोकांचं बरं झालेलं आहे एका अर्थाने की ह्यांचे आई -वडीलच सुटले नशीबाने. त्यामुळे आता जो नवीनच आपण संसार थाटलेला आहे, हेच आपलं घर, हीच आपली आई , हेच आपले वडील, असं समजून हे सगळे मिळून मिसळून राहतात. इतक्या देशातले लोक आहेत ते मिळून मिसळून राहतात. त्यामुळे बघा किती कमाल आहे! कलेक्टिव्हची किती कमाल आहे. एक गाणं आता इथं गुरूजींनी म्हटलं, की ते तुम्ही एका वर्षानंतर ऐकून घ्या ह्यंचं. सगळ्या गावातून, सगळ्या देशातून, सगळ्यांच्या तोंडून ते गाणं येईल. पण तसं आपल्याकडे होत नाही. एकही गाणं. आरतीचं पुस्तक घेऊन लोक आरती म्हणतात म्हणजे काय म्हणावं महाराष्ट्राला, एकसुद्धा गाण सगळ्यांना बरोबर म्हणता येत नाही. परत सगळ्यांनी एकत्र रहाणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. सगळ्यांनी एकत्र रहायचं म्हणजे अगदी अशक्य गोष्ट आहे. कारण प्रत्येकाला आपलं घर पाहिजे, आपली 2

Original Transcript : Marathi बायको पाहिजे, मुलं पाहिजे आणि त्यांचं सगळं आपापसात ठीक आहे. त्यात आता फक्त असं झालं पाहिजे, की मुलांनीच पळून निघायचं घरातून. म्हणजे मग ठीक होईल. त्याशिवाय काही मला मार्ग दिसत नाही आणि म्हणून आपली जी मुलं बाहेर लग्न करून पाठवलेली आहेत, त्यांच्याबद्दलही तक्रार आहे, की ह्यांना काही घरातलं काम येत नाही. हे राहूच शकत नाही. आश्रमात पळून जातात. आता इतक्या दिवसापासून घरात रहायची सवय झाल्यामुळे आश्रमाच्या त्या अफाट ह्याच्यात रहाणं त्यांना कठीण जातं. त्या सीमित गोष्टींनी रहाणाऱ्यांना ते कठीण जातं. पण आपल्याला जर सहजयोग करायचा आहे, तर आपल्याला आश्रमातच रहावं लागेल. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर मी आता त्यातून मध्यमार्ग काढला आहे शोधून. ते म्हणजे असं, इंडियन लोकांसाठी, तसं तर ते काही राहूच शकत नाही. म्हणून जिथे आश्रम असेल तिथे शनिवार, रविवार जाऊन रहायचं. फक्त. त्यात म्हणे, महाभारत सकाळी लागतं. मग आमचं कसं होणार माताजी? म्हटलं, अहो, एक टेलिव्हिजनही ठेवा आणि महाभारतही बघा. मग आणखीन काय करणार? अशा रीतीने एवढं मोठं का कार्य होणार आहे ? अशा ‘येर्यागबाळ्यांचे काम नोहे, त्याला पाहिजेत जातीचे,’ म्हणतात. अहो, आम्ही आमच्या वडिलांना, आईला पाहिलं. वर्षानुवर्षे जेलमध्ये खितपत पडले. आम्ही अकरा त्यांची मुलं आहोत. त्या गांधीजींमध्ये अशी कोणती ते करामत होती, की त्यांनी असं लोकांना देशोधडीला लावून एवढं कार्य करून घेतलं आणि आमच्यामध्ये असं काय कमी आहे, की तुम्ही लोक आमचं काही करत नाही. अशी कोणती गोष्ट आहे ? एकच चुकलंय, गांधीजींनी सुरुवातीपासूनच त्यांना क्लेष उचलायला सांगितला. ….. पाणी उचलायचं. संडास स्वच्छ करायचा. नोकर ठेवायचा नाही. मग ते अंगवळणी पडलं त्यांच्या आणि जर तुम्हाला राष्ट्रकार्याला यायचंच असलं, त्याच्यामध्ये सगळा त्याग केला पाहिजे. त्यागमूर्ती असले पाहिजे. त्यामुळे काय झालं की प्रत्येकाची त्याच्यात चढाओढ. सहजयोगात उलटं आहे, सहजयोगात सगळा आशीर्वाद आहे. आता माताजी, सगळं ठीक आहे, पण आमच्याकडे कोंबडी नाही. ती कशी मेली? ती नाही मेली पाहिजे. तेही माताजींनी बघितलं पाहिजे. असं कसं तर झालं? आम्ही सहजयोग करतो, आमच्याकडे कोंबडी कशी नाही? आणि त्याचा माझ्यावर आरोप. तेव्हा सांगायचं असं आहे, की सहजयोगात सगळे आशीर्वाद असल्यामुळे जरासुद्धा कुठे खोच लागूच दिली नाही पाहिजे. खोच तर फार मोठी झाली. जराशी इजा नाही होऊ दिली पाहिजे. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, माताजी. मग हे असं झालं पाहिजे. हे मूल झालं पाहिजे. मुलगीच झाली, मुलगा झाला पाहिजे. म्हणजे मला इतकं काही धरलंय त्यांनी वेठीवर, म्हणजे तुम्ही सहजयोग करता नां, मग द्या. देता की नाही. तशीच मराठी भाषा आपली आहेच परखड! परखडपणे मलाच म्हणायचं, की तुम्ही आमचं हे भलं नाही केलं, तुम्ही आमचं ते भलं नाही केलं. ते भलं करा, हे भलं करा. अहो, पण कशाला? मला सहजयोग पाहिजे का तुम्हाला पाहिजे? पूर्वीच्या काळी लोक जात असत हिमालयात त्या थंडीत आणि तिथे कुडकुडत आणि त्यांचे गुरूजी लोक त्यांचे कपडे उतरवून टाकायचे आणि तसे बसा तिथे बर्फावर. एक बसायचे. बसा. त्यात त्यांची परीक्षा घ्यायचे. त्यात नाही काही जमलं तर द्यायचे दणादण्. तसला काही प्रकार लंगोट घालून आपण केलेला नाही. सगळ्यांना आसनावर बसवलं. हे दिलं , ते दिलं. झालं. पण आम्ही काही दिलं की नाही सहजयोगाला ? विचार करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण अजून एकही पैसा सहजयोगाला दिलेला नाही. फक्त जेवणाचेसुद्धा पैसे 3

Original Transcript : Marathi द्यायचे लोकांच्या जीवावर येतं. आता पुण्याला मी म्हटलं, की बरं मी हिशेब बघते. कसं काय ते ? का मिळत नाही पैसे? मागच्या वेळेला ७५ माणसं फुकट जेवली. फु..क..ट..! सात दिवस. तर ह्यावेळेला मी असा नियम काढला, की मी सगळे पैसे इथे बँकेत जमा करते . बघते. तर ‘७५० रुपयाने ठरवलंय माताजी, मागच्या वेळेला खूप तोटा आला. तुम्हाला पैसे द्यावे लागले.’ म्हटलं, ‘बरं, ठीक आहे. ‘ तुमचेच पैसे कमी होतात. म्हटलं, ‘सगळ्यांच्या ह्याच्यातले शंभर मी देते बाकीचे तर घ्या. ‘ तरी वाट बघत बसले, अणखीन ५० रू. कमी झाले तर बरं! इतक्या स्वस्तात स्वस्त करतोय आम्ही तरीसुद्धा ‘त्यात पैसे थोडेसे वाचवता आले तर बरच होईल.’ त्यातून एक पैसासुद्धा आपण कुठेही, कशालाही खर्च करत नाही. थोडी फार तुम्ही वर्गणी देत असाल ती, मला त्याचं काही माहिती नाही. पण सांगायचं म्हणजे असं, की आपल्याला एवढ मिळालेलं आहे. आपण काय सहजयोगाला देणार? काय मेहनत केली सहजयोगासाठी ? आपण परमेश्वरासाठी काय केलंय? मला काही नको. मला उगीचच तुम्ही साड्या वगैरे देता. काही त्याची गरज नाही. माझ्याकडे पुष्कळ आहे. कितीही डोकं फोडून सांगितलं तरी ऐकतच नाही कोणी. मला काहीही नको तुमच्याकडून. अगदी साडी देतात ती ही नको आणि जे काही तुम्ही पूजेचे पैसे देता त्याचीसुद्धा चांदीची भांडी घेऊन देते तुम्हाला. मला काहीही नको. पण सहजयोगासाठी तुम्ही मेहनत करा. स्वत:ची मेहनत करा. चार ठिकाणी भेटत जा आपापसात. बायकांना सांगितलं, दुसर्या बायकांना हळदी-कुंकवाला बोलवा. त्यांना सहजयोगाच्या गोष्टी सांगा. अहो, जर कोणाचा एखादा गुरू असला नां, तर तो भरमसाठ सांगत बसतो. मी एरोप्लेनने आले. एका गृहस्थाचा कोणी गुरू होता. तो आपला झेंडा घेऊन तिथे उभा. त्याने लेक्चरच द्यायला सुरू केलं, फर्स्ट क्लासमध्ये. ‘माझे गुरू असे नी माझे गुरू तसे.’ रस्त्यावर उभं रहायचं आणि गुरूचं व्याख्यान सांगत बसायचं. म्हणून सहजयोग पसरत नाही. त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. आशीर्वाद आहेत ! पण जबाबदारी घेता का तुम्ही काही सहजयोगाची! का माझ्यावरच सारी जबाबदारी आहे ? आज इथे बसलेत ध्यानाला तर माताजी, आम्हाला शक्ती द्या, जबाबदारी घेणार. असं सगळ्या भारतीय सहजयोग्यांनी आपल्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे. निर्धार केला की आम्ही पाहिजे. अहो, ते शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला निघाले होते मराठे. आता करताहेत काय म्हटलं? तर बस्त्याला जाऊन बसलेत म्हणे. गेले कुठे ते? का सगळे बाजारबुणगेच आहेत आपल्याकडे? तर तेवढा सैनिकपणा पण नाहीये. काही तुम्हाला सिंहगड चढायला म्हणत नाही. फक्त थोडसं लक्षात घेतलं पाहिजे, की आमची जबाबदारी आहे, सहजयोग वाढवण्याची. जसं एक दारूडा असं म्हणतो की, मी दारू पितो, तर इतरांनाही वाटलीच पाहिजे. तर तसेच आता तुम्ही आनंदाचा एवढा उपभोग घेता तो दुसऱ्यांना दिला पाहिजे, एवढी जबाबदारी तुम्हाला वाटली पाहिजे. तसेच बायकांनाही सांगायचं आहे, बायकांना बोलवा. त्यांचं अस म्हणणं आहे, की इकडे सगळे बुद्धिजीवी आहेत. बायका तर बुद्धिजीवी नाहीत. बायकांच्या थ्रू काम करा. ते बरं काम होतं. हळदी-कुंकवाला बोलवायचं. हळदी-कुंकू द्यायचं. त्या बायकांना सांगायचं आहे, हे असे असे आहे. आम्हाला हा फायदा झाला. हा चमत्कार झाला. चमत्काराचे फोटो दाखवा, की त्या बायका आपल्या पुरुषांना ठीक करणार. बायकांच्या थ्रू गांधीजींनीही कामे करवली. गांधीजींनी सांगितलं, की मला हरिजन उद्धार करायचा आहे, तुमच्या बांगड्या उतरवून द्या. सगळ्यांनी आपल्या बांगड्या सरळ सरळ त्यांना दिल्या. मी तसं काही म्हणत नाही हं ! तसं काही नाही. पण हळदी-कुंकवाला बायकांना बोलवायचं, सगळ्यांनी मिळून. हळदी-कुंकवाला या आणि तिथे हे करा. 4