Puja

Brahmapuri (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Sahajayogini Atyant Premal Asle Pahije Date : 20th December 1988 Place Brahmapuri Туре Seminar & Meeting Speech Language Marathi

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता साताऱ्याच्या आणि ब्रह्मपुरीच्या, अंगापूरच्या सर्व सहजयोग्यांना असं सांगायचं आहे, की दोन वेळेला असं झालं की आम्ही अंगापूरच्या प्रोग्रॅमला येऊ शकलो नाही. फार वाईट गोष्ट आहे. मला बरं नाही वाटलं ते. असं कसं झालं एकदम! असं का झालं? असं होत नाही. मागच्या वेळेला बँकेने एवढा त्रास दिला मला. पैसे द्यायला तयार नव्हते. पैशाशिवाय हलायचं कसं! त्यामुळे इकडे येऊ शकले नाही. दूसरं ह्यावेळेला आमच्या ड्रायव्हरमध्येच कोणतंतरी भूत बसलं होतं मला वाटतं. आणि आता परवासुद्धा असाच स्वयंपाकाचा वरगैरे विचार होता तो इतक्या सगळ्या उशिराने सामान आलं. म्हणजे कसलीतरी निगेटिव्हिटी कार्य करीत आहे. तेव्हा सहजयोग्यांना एवढेच सांगायचे आहे, की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी नसली पाहिजे. आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग मानला नाही पाहिजे. इतक्या लांब इतक्या आतमध्ये येऊन सहजयोग आपण वाढवतो आहे, तेव्हा आपल्यामध्ये एक तऱ्हेचे समाधान असायला पाहिजे आणि एक तऱ्हेचा आशीर्वाद मानला पाहिजे, की माताजी अंगापूरलाच का येतात! आणखीन पुष्कळ ठिकाणी जाऊ शकतात. नवीन नवीन ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथे जास्त कार्य होऊ शकतं. पण तरीसुद्धा अंगापूरला आणि जसं त्यांनी काल सांगितलं की वारी सुरू झाली, तर हे काही विठ्ठलाचं स्थान नाही, पण तरी येतं , त्याला कारण काय? पण काहीतरी निगेटिव्हिटी आहे. असं मला वाटतं. आणि ती निगेटिव्हिटी कदाचित अहंकाराची असू शकते. कदाचित अहंकार माणसाला असेल आणि तो इतरांशी बोलतांना किंवा सहजयोगाबद्दल कार्य करतांना ती सहिष्णूता किंवा ते प्रेम किंवा ती माणुसकी दाखवत नसेल. तेव्हा विचार केला पाहिजे. असं का होतय ? दोन वेळा हे झालेले आहे. तेव्हा काहीतरी कारण असायला पाहिजे. तसे पुण्याहून आम्ही दोनदा गेलो आहे बाहेर पूर्वीसुद्धा. मग असं काही व्हायला नको होतं. पण अशा रीतीने येतात, की त्याला काही मार्गच मिळत नाही. त्यातून मार्गच मिळत नाही. मीसुद्धा मग असा विचार करते, की सोडून टाकावं. पण एकदा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, की आमच्यात माणुसकी पूर्णपणे आहे का? आम्ही सर्व सहजयोग्यांना प्रेमाने वागवतो का? आमचा आम्ही मान ठेवतो का ? की आम्ही आपलेच आपल्याबद्दल, आपल्याच फॅमिलीबद्दल, आपल्याच घराबद्दल विचार करत राहतो. असं जर केलं तर तुमचं तर नुकसान होईलच, पण इतरांचेही फार होईल आणि ती तुमची जबाबदारी आहे. तेव्हा सर्व इथल्या सहजयोग्यांना माझी हात जोडून विनंती आहे, की आपापसामध्ये कोणी उच्च नाही, नीच नाही, सहजयोगामध्ये कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. सगळे एकसारखे आहेत. कुठेही आपलं जंगलात राहतात हे लोक. कुठल्या कुठल्या देशातले काही काही लोक फारच श्रीमंत आहेत. काही इतके श्रीमंत नाहीत. पण सगळे कसे प्रेमाने, आपापसात मिळून मिसळून राहतात. तशी कलेक्टिव्हिटी नसली तर प्रोग्रॅम होत नाही हे मी पाहिलेलं आहे. तेव्हा हे फक्त अंगापूरला किंवा सातार्यालाच का होतं ? काल मी त्यांना सांगितलं नाही, पण मला तरी असं वाटतं, की इथले जे सहजयोगी आहेत त्यांनी ध्यान करायला पाहिजे आणि अहंकाराला आतून काढलं पाहिजे. अहंकारामुळे असं होतं. अहंकार जिथे जास्त झाला 2

Original Transcript : Marathi की हनुमानच हे कार्य करतो. ते होऊच देत नाही. काही ना काही तरी घोटाळे करून ठेवेल आणि मला पुढे येऊच देत नाही. तेव्हा परवाचा आणि कालचा प्रोग्रॅम जो झाला, त्यात मला वाईट वाटत होतं म्हणा. पण मीसुद्धा असमर्थ होते या गोष्टीत. मला समजत नव्हतं, की असं कसं झालं. तेव्हा माझी खरोखर आपल्याला विनंती आहे, की सामूहिकता वाढवली पाहिजे. आपापसातलं प्रेम वाढवलं पाहिजे. सामूहिकता यायला पाहिजे. अधिकतर महाराष्ट्रात लोकांचं आपलं असं आहे, की ह्याचा गळा काप, त्याचा गळा काप. सहजयोगातसुद्धा हे चाललं आहे. हा इकडे तर तो तिकडे, ह्याला येऊ नको देऊ, त्याचा काही ठिकाणा नाही. अशा रीतीने वागून ह्या भाऊबंदकीने सहजयोग कधी वाढणार नाही. तुमच्यावर अनेक आशीर्वाद आहेत परमेश्वराचे आणि अनेक गोष्टी घडल्या आहेत, तेव्हा सारखं परमेश्वराने आम्हाला किती दिलं, किती आम्हाला आनंद दिला, किती आम्हाला सौख्य दिलं किती आमच्यावरती कृपा केली, ही कृष्णासुद्धा सारखी देवाचेच गुणगान गाते आहे असं मला दिसलं, मग आपण तरी त्याचं किती म्हटलं पाहिजे! आता इथे तीस देशातले लोक आहेत आणि प्रत्येक देशातल्या लोकांनी आपली गाणी कशी म्हणून घेतली! त्यांच्यासाठी सहजयोग हाच जीवन आहे. तसे आपल्याकडे नाही. एक गाणं कोणी म्हटलं तर दुसरा त्याच्या वरचढ गाणं म्हणेल. पण असं नाही की सगळ्यांनी मिळून ते गाणं आधी शिकावं, मग दुसर गाणं. इतकी कॉम्पिटिशन आपल्यामध्ये चालली आहे, ती गेली पाहिजे. आपण काही आता सर्वसाधारण लोक नाही. आता आपण योगीजन आहोत. योगीजन म्हणजे अगदी कसे नम्र असायला पाहिजे. सहजयोगी अत्यंत प्रेमळ असायला पाहिजे. सगळ्यांना या, बसा! कोणी श्रीमंत असो, कोणी गरीब असो, तरी त्याला म्हणायचं, की तुम्ही येऊन बसा. त्याला व्यवस्थित बघायचं, त्याला प्रेमाने वागवायचं. माझं घर, माझी फॅमिली असे जो मनुष्य बघतो तो सहजयोगात राहणार नाही, टिकणार नाही आणि तो निघून जाणार. म्हणून माझी सगळ्यांना अशी विनंती आहे, की असा अप्पलपोटेपणा करायचा नाही किंवा अशा सीमित ह्याच्यात राहायचे नाही. आपल्याला विशाल व्हायचे आहे. मग आपली नाव दिगंताला पोहोचणार. कोण कोणाला ओळखत होते बघा! राहरीचे आमचे धुमाळ आहेत. त्यांना कोण ओळखत होतं ? कुलकर्णी आहेत पुण्याला त्यांना कोण ओळखत होतं ? मुंबईला मगदूम साहेब आहेत त्यांना कोण ओळखत होतं ? कोणी नाही. पण सगळ्या जगात त्यांची नावं आहेत, त्यांच्या मोठेपणामुळे, त्यांच्या विशालतेमुळे. हे लोक आल्यावर त्यांच्या गळ्याला मिठ्या घालतात. माझ्यावर नाही, की तुम्हीच या, तुम्हीच करा. असं नाही. ह्यांच्याशी ओळख करायची, ह्यांच्याशी बोलायचं. हा कोण? हा कुठून आला आहे? ह्याचं लग्न कोणाशी आहे ? असं आहे, तसं आहे. स्वत:ला वेगळं, अलिप्त नाही ठेवलं पाहिजे आणि ते जर आलं नां, तर ह्यांच्यामध्ये सरमिसळ होईल, तुमची नावं होणार. सबंध देशादेशातून तुमचे नाव होणार. आता ह्यांना विचारलं की साताच्याचे कोण ऑर्गनायझर आहेत ? तर कोणाला माहिती नाही. तुम्ही करता त्यांचं ऑर्गनायझेशन? एकाचेही नाव कोणाला माहीत नाही. काय म्हणावं ह्याला. कबूल आहे नां! ही गोष्ट कबूल आहे. तेव्हा सगळ्यांना भेटायचं, बोलायचं, सगळ्यांना नावं सांगायची, ओळखी करून घ्यायच्या! कोणत्या गावचे, कोणत्या देशाचे. लगेच वाईट नाही वाटून घ्यायचं. आई जे म्हणते आहे, ते हितासाठी म्हणते आहे तुमच्या. तेव्हा सगळ्यांना भेटून घ्यायचं, बोलायचं. आता काल जी मंडळी आली होती, जी पार झाली, त्यांची नावं नोंदवली की नाही माहिती नाही. मी सगळं 3

Original Transcript : Marathi बघत होते, पण काही बोलले नाही. प्रत्येक वेळेला असच होतं, प्रत्येक वेळेला काळजी घ्यावी लागते. हे आपले पाहुणे नाही, हे आपले अंगप्रत्यंग आहेत. आपलं शरीर आहेत. आपल्या शरीरातले भाग आहेत हे समजून घेतलं पाहिजे. आता इतक्या विशाल शरीरात तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि त्या शरीराचे आपण अंगप्रत्यंग आहोत. जसं ह्या बोटाला लागलं की ह्या बोटाला कळतं, आणि सगळे शरीर हादरून निघतं. तसेच आपले आहे. तेव्हा ती एकांतातली एकात्मता जोपर्यंत आपल्यामध्ये येणार नाही, त्यांच्या ओळखी पटणार नाही. तोपर्यंत सहजयोगामध्ये अजून आपण उतरलो नाही. आपल्याला सहजयोग समजलेला नाही. ज्यांना सहजयोग समजलेला आहे, ते हे समजतात, की हे युगायुगातलं एक फार मोठं सुवर्ण आहे आणि ते मिळालेलं आहे. लहानसहान गोष्टींमध्येसुद्धा आपण बघतो, की अजून जातीपाती, अमकंतमकं सुटलेलं नाही. हे आपल्याला तोडलेच पाहिजे. ह्या जातीपाती धरून नुसत्या बायकांचाच त्रास आहे. एखादं चांगलं लग्न झालं त्याचा अर्थ असा नाही की सगळी लग्न चांगली होणार आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही की जातीत लग्न करायचेच नाही. पण सहजयोग्याशिवाय करायचं नाही. पण तो जातीतलाच असला पाहिजे असा अट्टाहास करायचा नाही. आपल्याला सर्व विश्वात पसरायचं आहे. ही हिम्मत असायला पाहिजे. जर ही आम्ही समर्थतता तुम्हाला दिली नाही, तर तुम्ही कसले सहजयोगी ! जर तुम्ही समर्थ असाल, तरच होऊ शकतं. तर ‘येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, त्याला पाहिजे जातीचे’ असं म्हटलेले आहे. आणि ‘मराठा तितुका मेळवावा’ असं का म्हटलं? रामदास स्वामी ब्राह्मण असतांना, त्यांना माहिती होतं , की मराठा म्हणजे काहीतरी विशेष, विरश्रीपूर्ण. पण तसं काही दिसत नाही. मराठ्यांचा मला भयंकर अनुभव आलेला आहे. परवा पुण्याला भाषण झालं असतांना सांगितलं होतं , की मी साडीच्या एका दुकानात गेले. आणि प्रत्येक मजल्यावरती बघते तर २५-३० माणसं फेटे घालून बसलेली. म्हटलं ‘हे करताहेत काय इथे ?’ म्हणे, हे बस्त्याला बसलेत. असे बसत होते का शिवाजी महाराजांच्या वेळेला. वेळ तरी होता का बस्त्याला बसायला? तिथे बसून मुलीच्या साड्या घ्यायच्या, गप्पाष्टकं करायची. किती खालच्या दर्जाचे झाले आहेत हे मराठे, असं मला वाटलं. बसून साड्या निवडायच्या. उद्या बांगड्या भरायला येतील. दुसरं काही मला समजत नाही. पुरुषांनी अशा गोष्टीत ढवळाढवळ करायची आणि अशा गोष्टी बघायच्या म्हणजे अगदी लाजिरवाणी स्थिती आहे. शिवाजी महाराज असते, तर काय म्हणाले असते ह्या सगळ्याला! अहो, हातामध्ये तलवारी घेऊन फिरणारे लोक, बस्त्याला बसून साड्या बघतात, काय म्हणावं ह्या लोकांना! म्हणजे कोणते मराठे सांगितले आहेत ते मला समजत नाही. परत पुष्कळसे लोक शिवाजी महाराजांचे नाव घेऊन धंदे हेच करतात. दारू प्यायची. त्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला इथेच तुमच्या समोरच अटकेत ठेवलं होतं. कारण तो दारू प्यायचा. आहे की नाही गोष्ट खरी. अटकेत ठेवलं होतं की नाही. मग जे लोक दारू पितात ते शिवाजी महाराजांचे नाव कसे घेऊ शकतात ? सरळ गोष्ट आहे. त्यांना अटकेत ठेवायला पाहिजे शिवाजी महाराजांच्या हिशेबाने. कळलं की नाही! जर तुम्ही त्यांना अटकेत ठेऊ शकत नाही, तर निदान त्यांच्याजवळ तरी जाऊ नये. त्यांच्याशी संबंध ठेऊ नये. कारण त्यांचा जो घाणेरडेपणा आहे त्याचा परिणाम तुमच्यावर होतो. अशा समाजाला काय म्हणायचं, ह्या मराठा समाजाला ! आम्हीसुद्धा त्याच समाजातले आहोत, असं म्हणतात लोक! आणखीन काय ते तुमचे शहाण्णवकुळी वगैरे ते सुद्धा आहे म्हणतात. त्याला काय चाटायचंय, काय त्याच्यात अर्थ आहे ! शहाण्णवकुळी म्हणायचं आणि बायकोला 4

Original Transcript : Marathi मारायचं. अहो, धोबिणीसुद्धा इतक्या मारल्या जात नाही इतक्या मराठ्याच्या बायकांना लोक मारतात, नि त्रास देतात. हे काय मोठे शहाण्णवकुळी झाले! ह्या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण सहजयोगी आहोत. ही एक क्रांती आहे फार मोठी! जे कोणी क्रांतिकारी असतील त्यांनीच सहजयोगात यावं नाहीतर येऊ नये आणि ही क्रांती फार मोठी आहे. ह्या क्रांतीमध्ये आपण सगळे बदलून टाकणार आहोत हळूहळू. वर्षामध्ये आपण एकतऱ्हेचं आनंदमय जीवन, आतमध्ये आणि बाहेर, सबंध व्यवस्थित अगदी, असं बसलेलं रामराज्य पाहिजे. त्याची मी कल्पना केलेली आहे. त्या रामराज्याला तुमची तयारी असली तर माझ्याबरोबर उभं रहायचं, नाहीतर उभं रहायचं नाही. उपटसुंभांचं काम नाही सहजयोगामध्ये. काम ज्या लोकांचं आहे जे त्याच्यासाठी समर्पण करतील. मेहनत करतील आणि वेळ घालवतील. पंढरीच्या वाऱ्या करायला लोक तयार आहेत. पंढरीच्या वाऱ्या करायला लोक पोहोचतील, तिथे जाऊन एक एक महिना घालवतील, डोकी फोड़ून घेतील. पण जे सहज, सरळ आहे, ते मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण किती वेळ घालवला, आपल्या वाडवडिलांनी वेळ घालवला आहे, त्यांच्या वाडवडिलांनी घालवला आहे, आणि आज आपण कुठे आलो आहोत ! पूर्वी होतं बरोबर शिवाजींच्या वेळेला, की मुसलमानांना पळवायचं, पण आता ते सगळे आपल्या आतमध्ये आलेलं आहे. सगळे आपले षडरिपू आपल्या आतमध्ये आलेले आहेत. ते आपण काढून टाकले पाहिजेत. सहजयोगामध्ये बोलायचं एक आणि करायचं दूसरं असं नाही. जसं तुमची आई करीत नाही, तसं तुम्ही करायचं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या असं लक्षात आलं इकडे, मी नागपूरची राहणारी, नागपूरला लोक भयंकर श्रीमंत आहेत. कारण तिथली जमीन चांगली आहे. श्रीमंत लोक आहेत आणि दिलदार लोक आहेत. आणि तुम्ही जर तिकडे, नागपूरकडे संबंध कराल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, सकाळपासून तुमची कशी सेवा करायची, सकाळपासून तुम्हाला काय द्यायचं? तुम्ही अगदी म्हणाल, ‘कमाल आहे! अशी सरबराई आम्ही कुठे पाहिली नाही.’ त्याला कारण असं, की श्रीमंत लोक आहेत ते. शेतीवाडी चांगली आहे, हवा वगैरे चांगली आहे. सगळं चांगलं आहे. तरीसुद्धा त्यांच्यामध्ये अप्पलपोटेपणा नाही. एकवेळेला स्वत: उपाशी राहतील, पण पाहण्यांचं फार करणार . पण इकडच्या बाजूला मी बघते, की भयंकर लोक कंजूष आहेत. भयंकरच. सहजयोगातसुद्धा पैसे तर देतच नाही काही आता सगळे पैसे बहतेक ह्या लोकांनी दिलेले आहेत. ते तर सोडा. पण आता जर तुम्हाला गणपतीपुळ्याला जायचं असलं, तरी त्यांना असं वाटतं , की माताजींनी आमच्या खाण्या-पिण्याचे, राहण्याचे सगळे पैसे द्यायचे. म्हणजे हा काय भिकारीपणा! तेच आमच्या नागपूरच्या कोणाला जर म्हटलं ना की आम्ही तुमचे खाण्यापिण्याचे पैसे देतो, तर म्हणतील, ‘वा, कशाला? आम्ही आमचे देणार. तुम्ही द्यायचे नाहीत.’ आमच्याकडून जास्तीचे घ्या म्हणतील. आता हे सगळे गाणे म्हणणारे, गाणं करणारे, ते म्हणे, ‘माताजी, बघा, आम्ही फुकटात येणार नाही. इथे येऊन आम्ही पैसे देणार.’ विशाल हृदय झालं पाहिजे आणि त्या विशाल हृदयाला आपण घेतलं पाहिजे. आईने सांगितलं त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं. आई आपल्या हितासाठीच सांगते आहे. ती विशालता असायला पाहिजे. तेव्हा सहजयोगाचा कोणी ठेका 5

Original Transcript : Marathi घेतलेला नाही. सहजयोग कोणा एका माणसाचा नाही. सर्वांचा आहे. सर्वांशी माणुसकीने, प्रेमाने वागायला पाहिजे. सगळे आपले अंगप्रत्यंग आहेत असा विचार केला पाहिजे. आणि तसं प्रेम केलं पाहिजे. ह्या सातारा जिल्ह्याचं फार माहात्म्य आहे. इथे कृष्णाच वहात नाही, पण इथे इतक्या साधुसंतांनी कार्य केलेले आहे, की मला आश्चर्य वाटतं की ह्या सातारा जिल्ह्यात सहजयोग का बसू नये! पण त्याला कारण जे असेल ते शोधून काढलं पाहिजे. त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे आणि ते का होत नाही. तुम्ही हिय्या केला तर का होणार नाही! राजकारणी लोकांनी किती प्रकार करून ठेवलेले आहेत. मग हे अध्यात्म आहे. त्याचा कोणाशी संघर्ष का आहे ? त्याचे कोणाशी भांडण का आहे ? आणि लगेचच कोणी सहजयोगात आल्याबरोबरच त्याला फायदा होतो.. आता हे …. साहेब बघा. त्यांची काय परिस्थिती होती! आज त्यांची परिस्थिती किती चांगली आहे. कालच एक गृहस्थ भेटले. म्हणाले, ‘माताजी, मी आलो इंटरव्हयूला. मला मोठी नोकरी मिळाली.’ म्हणजे पैशाच्या दृष्टीने म्हणत नाही. पण मनाला स्वास्थ्य. अहंकारादि, राग येणं, दुसऱ्यांवरती राग राग दाखवणं हे सगळं सुटतं. मनुष्य शांत चित्त होतो. त्याच्या चेहऱ्यावरच इतकी शांती येते की वाटतच नाही की हा मनुष्य तोच आहे. असं वाटतं की हा कोण देवपुरुष आला ! ‘अहो, मी तो.’ ‘असं कां! तुमचे ते चढलेले डोळे वगैरे काही दिसत नाही.’ ‘नाही. ते उतरलं सगळं.’ तसे व्हायला पाहिजे. तसेच बायकांचंसुद्धा आहे. बायकांनीसुद्धा अत्यंत प्रेमाने आईसारखं वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये. आपल्यामध्ये एक गुण फार चांगला आहे, की पावित्र्याची आपल्याला कल्पना आहे. पण इतर गुण फार कमी आहेत. एकतर बोलताना आपण फार उद्धटपणाने बोलतो. मुलांना सुद्धा, ‘चल, उठ, नीघ’ असं बोलायचं. सरळ म्हणायचं, ‘चला, उठा.’ आमच्यातिकडे नागपूरला, मुलांना कोणी असं बोलत नाही, ‘चल, उठ, नीघ,’ असं नाही बोलत. ‘ चला, उठा,’ मानाने त्यांना वागवलं, म्हणजे ते सुद्धा तुमचा मान करायला शिकतील. पण पटकन हातातील एखादी वस्तू उचलून घ्यायची. मग त्याला ढकलून टाकायचं. त्याला तिकडे बसवायचं. मुलांचा जर मान नाही केला तर ती मुलं तशीच होणार पुढे जाऊन. तर ही फार मोठी तफावत मी पाहिली. आमच्या तिकडे, खानदेशाला, नागपूरला लोक आहेत, खानदेश म्हणा इतके नाही, पण नागपूरकडची, वऱ्हाडची लोक आहेत, त्यांचं वागणं त्यांचं बोलणं, मुलांच्या बरोबर एक त-्हेची पद्धत आणि शिवाजी महाराज झाले ते इकडे. तिकडे कोणते महाराज आले. ते भोसले झाले होते. बसू. पण तिथे एवढा राजेशाहीपणा कसा आला आणि इथे इतका क्षुद्रपणा कसा? तर मुलांशीसुद्धा इज्जतीने बोललं पाहिजे. आपणसुद्धा सहजयोगी आले तर मानपान केला पाहिजे. आता पुष्कळदा मी आमच्या प्रतिष्ठानमध्येही बघते , की काही भेटायला आले, तर आम्हाला सांगावं लागतं, ‘अहो, ह्यांना काही खायला द्या की.’ असं नाही, की आल्याबरोबर काहीतरी खायला द्यायचं, त्यांना पाणी द्यायचं, त्यांना बघायचं. तशी इकडे पुण्याला तर मुळीच पद्धत नाही. तिथे तर एक पेरू दहा माणसांना वाटून खातील. अशातले भयंकर कंजुष लोक आहेत पुण्याला. पण साताऱ्याला तसं नको. तुमच्या इथे शाहू महाराजांसारखे लोक झालेले आहेत. किती तरी गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा एक तऱ्हेचा दातृत्वपणा असला पाहिजे. मोठेपणा असला पाहिजे. लोकांना तोडायचं फार लवकर येतं. आपल्या मराठी भाषेमध्ये इतका गोडवा आहे, इतका चांगुलपणा आहे, पण हे तोडण्याचं जे प्रस्थ आहे, ते कसं वाढलं हे मला समजत नाही. अपमान करायचा लोकांचा. फटकन काहीतरी बोलून टाकायचं. ते तसं सहजयोगात नसलं पाहिजे. कोणी गरीब-श्रीमंत 6.

Original Transcript : Marathi असला तर तो आहे तिथे आहे. परमेश्वराने ते केलेले नाही, समाजाने ते केलेले आहे, म्हणून त्याची काही मान्यता घ्यायची नाही. आणि सरळ मनाने, अत्यंत उदार हृदयाने प्रत्येकाला आपल्या हृदयात बसवले पाहिजे. कारण तुम्ही संत-साधू आहात. तुम्ही सगुणामध्ये आलेले निर्गुण आहात. तेव्हां तुमचं वागणं कसं सुंदर असायला पाहिजे! त्याच्यामध्ये गर्विष्ठपणा नको, जुन्या कल्पना नकोत, काही नको. जर ते झालं नाही तर तुमची सहजयोगाची प्रगती खुंटेल . म्हणून आज मी उघडपणे सांगते आहे, की फार जरुरी आहे, की सहजयोग्यांनी, साताऱ्याच्या विशेष करून, एक फार मोठी प्रगती करायला पाहिजे. आपापसात मैत्री पाहिजे. ग्रुपबाजी नको, गटबाजी नको आणि आपापसात बोलणं नम्रतेचं असलं पाहिजे. फारच नम्रतेचं! प्रत्येकाचा मान केला पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. आणि हा इकडचा, तो तिकडचा असं नाही करायला पाहिजे. सगळे आपल्या हृदयातले आहेत असं समजून वागलं पाहिजे. ह्याबद्दल तुम्ही क्षमा करावी. कारण मला स्वत:लाच समजलं नाही की दोनदा असे प्रोग्रॅम का झाले नाहीत. आणि त्या गोष्टीसाठी मी फार घाबरले होते. दुसरं काही नाही, पण सहजयोगाला सोडून तरी जाणार कुठे? सहजयोगाशिवाय मार्ग काय आहे ? आणि त्यानंतर मग किती त्रास होणार? त्याचं किती झेलावं लागणार आहे ? म्हणून व्यवस्थित चालावं. नदी तुमच्या घरापर्यंत आलेली आहे. आता गंगेचं जे काही आहे पुण्य ते उचलायचं आहे. आणि त्यासाठी इतका विचार करायचा नाही. फक्त एक समर्पित असून, ‘माताजी, तुम्हाला आमचे सगळे जेवढे काही कुसंस्कार आहेत, आणखीन जेवढा काही आमचा अहंकार आहे, तो सगळा आम्ही समर्पण केला.’ अशी मनामध्ये प्रार्थना करून माणसाने सहजयोगाच्या वाढीला लागलं पाहिजे. त्यात नवरा असं म्हणतो किंवा बायको अशी म्हणते असं म्हणायचं नाही. सहजयोगी प्रत्येक ठिकाणी आपला व्यक्तिगत सहजयोग वाढवू शकतो. इतकेच नव्हे तर हळूहळू सगळ्यांना जिंकूनही घेऊ शकतो. अशा रीतीने एक सशक्त, समर्थ समाज आपल्याला तयार करायचा आहे. तो केल्याशिवाय आपल्या राजकीय ज्या काही व्यवस्था आहे त्या टिकू शकत नाहीत. तर मानवाचेच परिवर्तन पूर्णपणे झालं पाहिजे. सहजयोग म्हणून कोणीतरी मक्तेदारी घ्यायची आणि आम्ही काय ते मोठे सहजयोगी म्हणून मिरवायचं, असा सहजयोग नाही. सहजयोगामध्ये तुमची प्रगती काय झाली ? तुम्ही कुठून आलात? तुम्ही किती लोकांना जागृती दिली? किती लोकांना प्रेम दिलंत? किती लोकांची दोस्ती झाली? ते पाहिलं पाहिजे. तेव्हां आता ही मंडळी जाणारच आहेत. आता जाणारच आहेत पुढे तरीसुद्धा त्यांच्यामध्ये बसून तुम्ही कोण? काय? कुठले? त्यांचे पत्ते घेणं, त्यांच्याशी बोलणं , सगळ्यांनी प्रेमाने बोलून घ्यायचं. म्हणजे बरं वाटेल. नाहीतर इथे येतात पाहण्यासारखे आणि जातात. पाहुण्यांची तरी व्यवस्था झाली पाहिजे. हे पाहूणे कोण आहेत ? त्यांना तुमची ओळखसुद्धा नाही. विचारतात, कोणाकडे जायचं? कोणाला भेटायचं? काय करायचं? कसं करू ? इतक्यांदा ते इथे आलेले आहेत तेव्हा तुम्ही सगळ्यांनी दोस्ती करून घ्यायची, त्याच्याबद्दल सांगायचं, की आम्ही सहजयोगी आहोत, असं, तसं, पुष्कळ बोलायला आहे आपापसात तुम्हाला. मजा येते त्याची. एक तऱहेचा अलिप्तपणा फार आहे, तो अलिप्तपणा काढून टाकला पाहिजे. तसेच कुठेही गेलं तरी साताऱ्याच्या लोकांनी वेगळं रहायचं, मुंबईच्या लोकांनी वेगळं रहायचं हे चुकीचं आहे. सगळ्यांनी सरमिसळ करून रहायचं. आणि सगळ्यांनी जाणलं पाहिजे. इतकेच नाही तर हिंदुस्थानातसुद्धा लोक साताऱ्याच्या लोकांना ओळखत नाही. मला 7

Original Transcript : Marathi आश्चर्य वाटलं. आता परवाच कोणी तरी येणार होते, म्हणे ‘कोणाकडे यायचं, काय करायचं?’ म्हटलं, ‘तुम्हाला माहिती नाही साताऱ्याला कोण आहेत?’ ते म्हणाले, ‘आम्हाला काही माहिती नाही.’ सांगलीचं माहिती आहे. सांगलीला तर सेंटरच नाही, मग साताऱ्याचं का माहिती असू नये ? तर सगळीकडे एकतऱहेचं पसरलं पाहिजे आपलं प्रेम, सगळ्यांना आपण जाणलं पाहिजे. सगळ्यांशी दोस्ती केली पाहिजे. सगळ्या विश्वात आपलं नाव झालं पाहिजे. लोकांनी सातारा काय हे ओळखलं पाहिजे. ब्रह्मपुरी माहिती आहे त्यांना आणि ब्रह्मपुरीची नदी माहिती आहे. तिचे कितीतरी फोटो काढले आहेत त्यांनी. पण साताच्याचे संचालक कोण आहेत ? तिथे कोणते सहजयोगी आहेत ? काही त्यांना माहिती नाही. तेव्हा असं अलिप्त रहायचं नाही. ‘आम्ही सेवा करतो.’ कसली सेवा करायची! सेवा काहीच नाही, प्रेम करायचं आहे. प्रेम करतांना त्यांचं नाव, गाव सगळे माहिती पाहिजे. प्रेमाने बघा भारावून गेलं आहे सगळं. आणि असेच माझे हृदय भारावून जाते कधी कधी विचार करून, की आता प्रेम करायला कसं शिकवायचं तुम्हा लोकांना. तेव्हा आता रागावणं रूसणं, फुगणं वेगळं होणं वैगरे गोष्टी सोडून नुसतं प्रेमाच्या सागरात डुंबून जायचं आणि आनंदाने रहायचं. म्हणजे सगळं व्यवस्थित होणार आहे आणि एक दिवस असा येईल की साताऱ्यालाच फार मोठं सेंटर होणार आहे. त्यासाठी आधी तुमचं वागणं असं असायला पाहिजे जसं साधु-संतांचं असतं. नाहीतर पहिल्यावेळेस मी आले होते तर किती लोक आले होते! हजारो लोक आले होते, तुम्हाला आठवत असेल तर. ते सगळे पळूनच गेले. ते टिकतच नाही. तेव्हा तुम्हीसुद्धा थोडी तसदी घेऊन शहरामध्ये एखादी शाळा बघावी. त्या शाळेमध्ये प्रोग्रॅम करावा. मग सगळं कार्य व्यवस्थित चालू होईल. पण तुमचं सेंटरच जर फार दूर असेल तर कसं होणार? तेव्हा सेंटर तिथून काढून शाळेमध्ये सेंटर सुरू केलं पाहिजे. लहान लहान ठिकाणी सुद्धा लोक सुरू करतात, मग इथेच करायला काय झालेलं आहे? सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे. मी जे म्हटलं ते लक्षात घ्यावं, त्याबद्दल मनन करावं आणि ‘माताजी, आमच्यामध्ये हे सगळे प्रेम वाह देत. आमच्या हातून हे कार्य होऊ देत,’ अशीच मागणी करावी. 8.