Mataji’s Updesh (India)

सहजयोग्यांना केलेला उपदेश नागपूर, ५ मार्च १९८९

आईच्या गावाचं एक विशेष स्थान आहे. येथील जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या रहातात. नागपूर शहरात सहजयोगाचा प्रसार व्हावा असे मला नेहमी वाटे. स्वत:च्याच घरात लोक आईपासून दूर रहातात. आजूबाजूला काय आहेत ते पहातच नाहीत. दूरच्या गोष्टीकडे माणसाचे सहज लक्ष जाते. पण ज्या ठिकाणी आपण रहातो, जिथे आपले बराच काळ वास्तव्य झाले असते तेथील लोक इतके जवळ असतात की त्यांना आपल्यातील गहनता लक्षातच येत नाही आणि म्हणूनच नागपूरमध्ये सहजयोगाचे कार्य उशीरा सुरु झाले. […]