Mataji’s Updesh

(India)

Upload transcript or translation for this talk

सहजयोग्यांना केलेला उपदेश नागपूर, ५ मार्च १९८९

आईच्या गावाचं एक विशेष स्थान आहे. येथील जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या रहातात. नागपूर शहरात सहजयोगाचा प्रसार व्हावा असे मला नेहमी वाटे. स्वत:च्याच घरात लोक आईपासून दूर रहातात. आजूबाजूला काय आहेत ते पहातच नाहीत. दूरच्या गोष्टीकडे माणसाचे सहज लक्ष जाते. पण ज्या ठिकाणी आपण रहातो, जिथे आपले बराच काळ वास्तव्य झाले असते तेथील लोक इतके जवळ असतात की त्यांना आपल्यातील गहनता लक्षातच येत नाही आणि म्हणूनच नागपूरमध्ये सहजयोगाचे कार्य उशीरा सुरु झाले. माझ्या लहानपणाच्या वास्तव्याने या भूमीवर आधीच माझ्या चैतन्य लहरी पसरलेल्या होत्या व सुक्ष्मात बरेच कार्य पूर्वीच घटित झाले होते. एके दिवशी हे सर्व वृद्धिंगत होणार हे मी जाणले होते. माझे वडील ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याच्या निमित्ताने जायचे व अनेक लोकांना भेटायचे त्या ठिकाणी मी अनेक लोकांना भेटले. मी त्यावेळी ९ वर्षाच असेन. गांधीजी मला प्रेमाने नेपाळी या नावाने पुकारत. मी ज्या कल्पना व योजना त्यांच्या समोर ठेवीत असे त्याचा ते आदराने विचार करीत. त्यांच्या आश्रमात प्रार्थनेत भजनावली गायली जाई. त्यात एकेक चक्राचे वर्णन कुंडलिनी विषयावर आधारीत असे. मूळ आदितत्त्वापासून ख्रिस्तापर्यंत (आशा) क्रमवार घेण्याविषयी मी त्यांना पूर्ण माहिती दिली. ‘अल्ला हो अकबर’ इ. यात सर्व काही होते. ते नेहमी माझ्याशी विचार विनिमय करीत. जे लोक माझ्याशी लहानपणापासून संबंधित होते त्यांच्या मी अजून लक्षात आहे. कालच्या कार्यक्रमास माझ्या शाळेतील एक शिक्षकही आले होते. कदाचित त्यांच्यातील काही अंतरज्ञान व शक्तिने असेल की ज्याच्यामुळे ते माझ्याशी जोडले गेले व त्यामुळेच ते आजही मला ओळखू शकतात. १९४२ च्या चले जाव या स्वातंत्र्य चळवळीत मी भाग घेतला. त्यावेळी मी सायन्स कॉलेजमध्ये शिकत होते. आम्हाला दहशत दाखविण्यासाठी अनेक पोलिस हातात लाठ्या व बंदुक घेऊन आले होते. पण मी न डगमगता गेटवर एकटी थांबले. याचाच निर्देश गेल्या वर्षी पुणे येथील कार्यक्रमात आपचे प्रिन्सिपल साहेब श्री कृष्णमूर्ति जेव्हा माझ्या दर्शनार्थ आले तेंव्हा केला गेला. पहा तुम्ही एक शक्ति आहात हे मी जाणले होते. साक्षात शक्ति असल्याशिवाय एक १७ वर्षांची मुलगी पोलिसांना न भिता सामोरी जाण्याचे धैर्य दाखवू शकणार नाही व आज ती माझ्यासमोर प्रकट झाली आहे असे त्यांनी गहिवरून सांगितले. निव्व्याज्य प्रेमाची महती माझ्या लहान वयापासून जे जे माझ्या संपर्कात आले ते मला आजसुद्धा ओळखतात. त्याचे एकच कारण होते ते म्हणजे प्रेम. कारण माझे प्रेम निव्याज व निरपेक्ष आहे. त्यामागे कोणत्याही अपेक्षा नाहीत. या निव्याज प्रेमामुळेच आजही लोक मला ओळखतात. त्या कठीण काळशतही आमची आई म्हणायची की, “आम्हाला स्वत:ला वेगळे असे कोणी ओळखतच नाही. निर्मलाची आई किंवा वडिल म्हणूनच आम्हाला ओळखतात. हे केवळ लहान असूनही तू दाखविलेल्या निष्पाप प्रेमामुळेच.” ११

दुसरे जे मागतील ते देण्याचा माझा स्वभाव लहानपणापासूनच आहे. मला लोकांबद्दल नेहमी दया व प्रेम वाटत असे. त्यामुळे त्यांच्या अंतर्यामी मला स्थान आहे. त्यावेळी लोकांतील दुर्गुण मला दिसत होते पण मला माहीत होते की त्यांना आपण जर आज निव्व्याज प्रेम दिले तर ते एक दिवस सहजयोगात उतरतील व परमेश्वराला प्राप्त करतील. म्हणून तुमच्यातही अशा निव्व्याज प्रेमाचा उगम व्हावा. त्यामध्ये कोणी कसली अपेक्षा ठेवत नाही. तुम्हाला कोणी काही देईल अथवा देणार नाही याची कशाला तमा बाळगायची? कारण ते सर्व विनाशी आहे. माझ्या लहान वयात मी सहजयोगाबद्दल कधीच बोलत नसे. तथापि माझ्या वडिलांना माहीत होते. दुसर्या कोणाला नव्हते. माझ्या वडिलांनी नंतर आईला सांगितले कारण तिला माझ्याविषयी एक स्वप्न दिसले होते. माझ्या जन्माच्या आधी तिला वाघ पहाण्याची इच्छा झाली होती व अशी बरीच स्वप्ने तिने पाहिली होती. या निव्व्याज प्रेमाची मी एक मुख्य गोष्ट पाहिली. शाळेत, कॉलेजात, शेजारी, प्रत्येकाला माझ्याबद्दल माहिती होती. मला आश्चर्य वाटायचे. ते इतरांना ओळखत नसत. भाऊसुद्धा आश्चर्याने म्हणायचा, “निर्मला दीदीला सगळे लोक कसे ओळखतात ?” तुर्क त्याला म्हणायच्या, “तू निर्मलाचा भाऊ आहेत आम्हाला माहीत आहे?” तो म्हणायचा,”मला स्वत:चे व्यक्तित्त्व आहे की नाही ?” अशा निव्र्याज प्रेमातूनच तुम्ही अनेकांशी जुळवू शकता. माझ्या मैत्रिणी मला इतक्या पत्र लिहायच्या की कॉलेज, ऑफिसमध्ये लोकांना आश्चर्य वाटायचे की या मुलीला इतकी पत्रे कशी येतात? मैत्री त्यानंतर माझे लग्न जुन्या विचारसरणीच्या कुटुंबात झाले. सतत डोक्यावर पदर घेऊन चेहरा झाकावा लागे. कोणाशी फारसे बोलायचे नाही. प्रत्येक वयस्कर व्यक्तीच्या पायाला स्पर्श करायचा. त्यावेळी मी काय केलं? प्रत्येकाला निव्व्याज प्रेम दिलं. त्यांच्या काही अडचणी असल्या तर सोडवायच्या. त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की मी एक दिवस जरी लखनौला गेले तरी सर्व कुटुंब माझ्याभोवती जमते व मला लोक सोडतच नाहीत. तर अशा तऱ्हेने मी वागले. अशा प्रकारे सर्व काही मधूर आहे. सर्व वातावरण अगदी प्रेममय बनते. लोकांशी बोलताना प्रत्येकाने प्रेमाने व नम्रपणे बोलले पाहिजे. त्यांना कमीपणा वाटेल किंवा अपमान वाटेल असे बोलणे केव्हाही उचित ठरत नाही. प्रेमाने व नम्रतेने बोला. सर्व काही निव््याज प्रेमाने करा. याचा भविष्यकाळात किती उपयोग होईल याची तुम्हास कल्पना नाही. माझ्या भावांचे मित्र मला आपल्या बहिणीप्रमाणेच आदराने मानतात. मी त्यांना काही सांगायचा अवकाश इकडचे जग तिकडे करतील. मी काही कल्पनाच करू शकत नाही की मी त्यांच्यासाठी एवढे काय केले? मी एकच केले ‘सगळ्यांवर सदोदित प्रेम केले’ प्रेमात एकाने दुसऱ्यासाठी काही करावे लागते असे नाही. मी जे केले ते माझ्या स्वत:च्या समाधानासाठीच आणि यातून मी जे समाधान मिळविले ते इतके महान आहे की कितीही खर्च केला तरी ते मिळणार नाही. निव्र्याज प्रेम म्हणजे कोणताही अथवा अपेक्षा न ठेवता केलेले प्रेम. त्याला स्वार्थ शिवू सुद्धा नये. मी अमक्याकरिता हे केले असा विचारही मनाला शिवायला नको. असा स्वभाव असू नये. अर्थातच तो चुकीचा आहे. फोड़ा अहंकाराचा फुगा / ‘मी’ चे अस्तित्व सहजयोगात काही जुने सहजयोगी आहेत ज्यांच्याबद्दल मला फार विचित्र अनुभव आलेत. सुरुवात करणारे तुम्हीच आहात त्याचा पाया रचणारे पण तुम्हीच. ज्या पायावर (फाऊंडेशन) मुळाशी सहजयोगी आहेत तोच जर अस्थिर झाला तर वरची इमारतच कोलमडून पडेल. तुम्ही लोकांना पार करता याचा अर्थ काय ? तुम्ही

ते घडवत नाही. तेव्हा प्रत्येकाने असे मानले पाहिजे की मी स्वत: काही करत नाही ( मी अकर्मी आहे) ही (कुंडलिनीचे) जागृति श्री माताजींनी दिली किंवा हा माणूस पार झाला. मी हे केले, ते केले असल्या भ्रामक कल्पना करून घेऊ नये. आम्ही जुने सहजयोगी आहोत. आम्ही सुरुवातीच्या काही थोड्या सहजयोग्यांपैकी एक आहोत. अशा तऱ्हेच्या भ्रामक कल्पना काही सहजयोगी करून घेतात असे माझे मनुष्याविषयी एक अनुमान काढले. ज्या प्रमाणात हा सहजयोग वाढतो त्या प्रमाणात या भ्रामक कल्पनाही वाढीस लागतात जसे ‘माझ्यामुळे अनेक सहजयोगी या मायेचा सागर पार करून गेले.’ या त्यांच्या खोट्या आढ्यतेमुळे अशा प्रकारचे जवळजवळ सर्व सहजयोगी बाहेर फेकले गेले. ज्यांनी हा खोटा गर्व वाढविला ते भूतबाधेने पछाडले जातात असे मी पहात आले. त्यांचा अहंकाराचा फुगा एवढा फुगतो की त्यांना सहजयोगात अस्वस्थ वाटू लागते. नंतर त्यांचा राग येतो. स्वतःला ते स्वयंघोषित नेता समजू लागतात व इथपर्यंत ते स्वत:ची समजूत करून ठेवतात की हे सर्व आपणच घडवीत आहोत, आपल्यामुळेच सर्व काही व्यवस्थित चालू आहे. हा सर्व डोला आम्हीच सांभाळतो. ते सर्व सुरळित ठेवण्यासाठी त्यामागे आम्हीच आहोत. या सर्वांचा परिपाक म्हणजे त्यांची नम्रता जाते, प्रेम संपते आणि ते अधिकाधिक चुका करण्यात गढून जातात. जुन्या सहजयोग्यांमध्ये काही कमतरता आहेत असे माझ्या नजरेस आले. नवीन मंत्र, कल्पना व पद्धती पुढे आणून त्या माझ्या नावावर खपवितात. सहजयोग निर्माण करू नका. काही तरी नवे करावे असे विचार पाश्चिमात्त्यांच्या मनात येतात. सहजयोगाला परंपरा आहे. तुम्हाला त्याची फळे मिळाली आहेत. एकदा फळ हाता आल्यावर पुढे काय करायचे रहाते ? कसे करावे? काय करावे हे मी नेमके तुम्हाला सांगत आलेय. सहजयोगात गटबाजी करायची नसते. या सवयी राजकारणामुळे लागतात. काही नवे शोध लावू नका अथवा श्री माताजींनी सांगितलेच आहे तर तुम्ही असेच करा असेही सांगू नका. नवीन काहीतरी निर्माण करून माझ्या नावावर लपविल्याने तुम्ही भ्रमातून निर्माण केलेल्या जाळ्यात अडकता. ह्या गोष्टीचा तुम्ही धिक्कार केला पाहिजे. जे माताजी आम्हाला करावयास सांगतात ते आम्ही करीत राहू. कुठल्याही खोट्या कल्पनांची जाहिरात करणार नाही. समजा तुम्हाला काही विचार किंवा कल्पना सुचल्या तर त्याविषयी मला लिहा. त्यावर मी विचार करुन जरूर तेथे दुरुस्ती करून हे असे पाहिजे, ते तसे करा इत्यादी. मी तुम्हाला समजावून सांगेन. जेथे ‘मी’ चा निर्देश होतो तेथे सहजयोगाचे अस्तित्व संपते. तो मी नाही हे सतत मनावर बिंबले पाहिजे. जेथे ‘मी’ साकार होतो तेथे सर्व संपते. तुमचा स्वभाव जर रागीट असेल तर राग कमी करण्याचा प्रयत्न करा. जे क्रोधिष्ठ लोक सहजयोगात होते ते सर्व बाहेर फेकले गेले. आपल्यातील ह्या क्रोधाचा उगम कोठून होतो ह्याचा सर्वांनी अभ्यास करावा. जर त्याचा संबंध लिव्हरशी असेल तर लिव्हर ठिक केले पाहिजे. पण तुम्ही शांत व्हायला पाहिजे. पूजेच्या वेळी प्रत्येकजण शांत असतो. आपल्या भोवताली घडणाऱ्या शुल्लक घटनेवरूनही रागवण्याची प्रवृत्ती मोडून काढून त्यावर मात केली पाहिजे. त्याशिवाय प्रगती होणार नाही. एवढेच नाही तर त्याचे आपल्यातून पूर्ण उच्चाटन होण्यासाठी झटले पाहिजे. सहजयोगात त्यासाठी मार्ग आहेत. ते कसे घडवावेत याचा प्रत्येकाने अभ्यास करून समजून घेणे आवश्यक आहे.

विश्व निर्मल धर्म सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने मधोमध राहणे आवश्यक आहे. मी ते माझ्या प्रयत्नाने स्वतः घडवू शकेल असा कोणाचा समज असेल तर तो निरूपयोगी आहे. तुम्ही मधोमध आला नाही तर तुम्ही काही मिळवू शकणार नाही. त्या गहनतेत तुम्ही उतरले पाहिजे. या गहनतेतून मधोमध राहून तुम्ही दुसऱ्याशी मैत्री केली पाहिजे. ह्या मैत्रीच्या भावनेतूनच ‘विश्व निर्मल धर्मा’ च्या नियमांचे ज्ञान तुम्ही जाणू शकाल व तुमच्यात आत्मसात करून घ्याल. धार्मिक रूढी ज्या आंधळेपणाने वाढल्या जातात, उच्चनीचता किंवा जातपात वगैरे आम्ही मानत नाही. खरा धर्म आम्ही मानतो. बाह्यातून दिसणारे विधी कर्मकांड ह्याला आमची मान्यता नाही. वैधव्यास मान्यता नाही. कारण ती चुकीची कल्पना आहे. पुरुषांनी स्त्रियांवर लादलेला हा अन्याय आहे. कोणत्याही पंथातील टिकाकारांना घाबरू नका. आमच्या आईने आम्हाला कपाळावर कुंकू लावण्याची आज्ञा केली आहे असे सांगा. पांढर्या कपाळाने फिरण्यास आम्हाला परवानगी नाही. वैधव्य हे फक्त स्त्रियांनाच लागू आहे हा विचार मुळात चुकीचा आहे. वैधव्य बरोबर आहे असे मानले तर पुरुषांनाही ते लागू झाले पाहिजे. पुरुष जर विधुर होऊ शकत नाही तर स्त्रियांनी वैधव्य का मानावे? पुरुषांनी हे वैधव्य लादून स्त्रियांवर यातना मात्र वाढविल्या. ह्यातून वेगळे असे काय मिळणार आहे ? आणखी एका प्रकारामुळे सहजयोग्यांना पकड येते तो म्हणजे ते खोट्या गुरुंच्या नादी लागतात. हे अतिशय धोक्याचे आहे. केव्हाही ते तमुच्या अंतरंगात प्रवेश करतील. अशा लोकांनी आपले अंतरंग पूर्ण स्वच्छ केले पाहिजे. स्वत:ला स्वच्छ केले पाहिजे. ह्यात कोणी हरकत घेऊ नये अथवा ह्याबाबत नाउमेद होऊ नये. असल्या भ्रामक कल्पनांना खतपाणी घालू नये. सुरुवातीला शुल्लक म्हणून आपण दुर्लक्ष करतो. परंतू ती गोष्ट हळूहळू वाढत जाते व आपल्या हाताबाहेर जाते. मोठ्या वृक्षाचे रूप धारण करते. त्यातला थोडा अंश जर तुमच्यात राहिला तर तुमच्यातील चैतन्य लहरी नष्ट होतील. जर तुमच्या गुरूतत्त्वावर पकड असेल तर ती जोडपट्टीने दूर करावी. सूक्ष्मातूनही तुमच्या आत्मतत्त्वावर आघात होतात. ह्याबाबत सर्वांनी सतत जागृत राहिले पाहिजे. भारताबाहेरील जे सहजयोगी आहेत त्यांच्यातही अनेक प्रकार पहावयास मिळतात. काही सूक्ष्मतेत उतरतात व गाभ्यापर्यंत पोचतात. काही अर्धवट परिपक्व राहतात तर काही कामातून गेलेले असतात. अशा लोकांशी आपण योग्य रितीने व नम्रपणाने वागले पाहिजे. यथावकाश तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांना मूळातूनच (आंतरिक) ओढ नाही ते स्वत:हुन बाहेर फेकले जातात. ज्यांना अजून सहजयोग व्यवस्थितपणे समजला नसेल अशांना तुम्ही मदत करत जा. त्यांना तुम्ही संपर्कात ठेवून ठीक करा. ते आल्याबरोबरच त्यांना भूतबाधेने पछाडले आहे असे जाहीर करू नका. महाराष्ट्रात आम्ही जरा कठोरपणे सत्य सांगतो ‘अहो, भूतबाधेनी पछाडले’ कधीकधी तुम्ही दुखावण्याच्या सवयींनी पछाडले जाता. मी जेव्हा एखाद्याला विचारते की तुम्हाला तुम्ही सहजयोग का सोडला तर ते मला सांगतात की माताजी, आम्हाला सांगण्यात आले की आमच्या घरातच १ वाईट शक्तीचे (मृतात्म्याचे) वास्तव्य आहे आणि तुम्हीपण त्या भूताने पछाडलेले आहात. ह्याबद्दल मी सहजयोग्यांना विचारले तर लगेच उत्तर मिळाले की आम्ही खरे काय ते सांगितले. वस्तुस्थिती सांगतानासुद्धा त्यांना जे उपकारक ठरेल तेवढेच भाग सांगा. तुमच्या सांगण्याने त्यांना काय फायदा झाला? उलट सहजयोगात येण्याची त्यांची संधी मात्र गेली. तुम्ही ज्यावेळी खरे सांगता त्यावेळी अगदी गोड शब्दात बोलले पाहिजे असे नाही. पण जे सांगाल ते हितकारक असे सांगा. दुूसऱ्यांना पोषक ठरेल अशा रितीने सांगा.

त्यांची जी काही अडचण असेल ती समजावून घेऊन आम्ही ती मुळासकट दूर करू असा त्यांना विश्वास द्या. तुम्हाला भूतबाधा आहे असे सांगू नका. तुम्ही जर म्हणाल की तुम्हाला भूतबाधा आहे तर ते लगेच म्हणतील की आम्हाला असे डॉक्टरांनी कधीच सांगितले नाही. तुम्ही असे कसे म्हणता ह्या गोष्टीबद्दल मी जे सांगितले एकंदरीतच ठीकच झाले. आजच्या दिवसापर्यंत नवीन सहजयोग्यांचे काय प्रश्न आहेत त्याबद्दल मी कधीच बोलले नाही. जे लोक नुकतेच सहजयोगात आले त्यांना आपण निव्याज प्रेमाने वागविले पाहिजे. ह्याबाबत जुन्या सहजयोग्यांनी नीट समजून घेतले पाहिजे. ह्याउलट ते स्वत: पुढे पुढे करीत असतात. अशा रितीने नेहमी पहिल्या रांगेत बसणारे, स्वत:ला जुने समजणारे सहजयोगी स्वत:ला आम्ही पुढेच बसणार कारण आम्ही खास आहोत. आम्हाला खास पातळी आहे असे समजतात असे दाखविता येईल. असो, माणूस निरूपयोगी आहे. त्यांना एखादे कार्य करण्यास सांगितले तर ते दुसर्यांच्या अंगावर टाकणार तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असे दुसऱ्यांना सांगून स्वत: इतस्ततः फिरत रहाणार व इतरांना कामात अडकविणार म्हणजेच उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा हा प्रकार. अशी ही परिस्थिती. त्यांना जर मी सहजयोगातून निघून जा म्हणाले तर ते माझ्या पायावर येतात व सांगतात माताजी आम्ही तर जुने सहजयोगी आहोत. हो का? तुम्ही तर आहातच पण जीर्ण आहात तर आम्हाला सोडणे हेच चांगले. खरा सहजयोगी सगळ्यांना मी विनंती करते की नम्र होऊन व पूज्य भावनेने शपथ घेतली पाहिजे की ‘मी अजून काहीच मिळवले नाही. मला बरीच उन्नती करायची आहे. मी जेव्हा दूसर्यांना प्रकाश देतो तेव्हा हे करताना मीच अधिक प्रकाश मिळवतो.’ गेलेत आणि काही दुसर्यांना तुम्ही प्रकाश दिला पाहिजे. काही जुने सहजयोगी कामातून नवीन आलेत ते उन्नत झालेत. अनेक प्रसंगी आलेल्या अनुभवातून व जुन्या सहजयोग्यांच्या वागण्यातून जे दिसले त्यांना सांगण्याचे मी ठरविले की त्यांनी स्वतःच्याच भूतबाधेने पछाडले आहे का? याची त्यांनी तपासणी करावी. ही भूते म्हणजे त्यांचा अहंकारच. या अहंकाराच्या बाधेने आपण गथित आहोत हे पाहिले पाहिजे. ज्या कारणाने तुमची हानीच होणार. काही वेळा आपण खुष होतो की आम्हाला सत्ता मिळाली आणि आमचा सर्व लोक आदर करतात. पण सहजयोगात येऊन आपण सत्ता गाजवू असे कोण समजत असेल त्यांनी सहजयोग करू नये. आले लक्षात? पैशाची अफरातफर करण्यास सहजयोगात पूर्ण बंदी आहे. हे धर्माच्या विरूद्ध आहे. पैशाच्या बाबतीत तुम्ही काळजी घ्या. सहगयोगाचा उपयोग अर्थार्जनासाठी करू नका. फायदा मिळवायचा असेल तर तो सहजयोगाच्या बाहेर राहून. मुळातच नेकीने राहणे महत्त्वाचे आहे. याचे वाईट परिणाम होतात. एका गृहस्थाने पैशाचा छोटा घोळ केला तर त्याचा मुलगा गेला. नुकताच एकाला हार्टोॅटॅक आला. त्यानेही असाच पैशाचा घोळ केला. मी काही गोष्टींचा जाब विचारला असता त्यांना राग आला. आठ दिवसांच्या आत त्यांचे निधन झाले. कोणीही मला खोटे सांगू नये. एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि एका मुलीबद्दल मला खोटे सांगू लागले. त्यांना पक्षाघात होऊन त्यांची वाचा गेली. एकमेकांशी खोटे बोलू नये. प्रेम वाढवा. स्पर्धा नको.

एकमेकांच्या कागाळ्या करू नका. एकमेकांचे पाय ओढू नका कारण तुम्ही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश केला आहे आणि तेथील कायदे काय आहेत याची जाणीव तुम्ही ठेवा. तेथे तुम्ही खोटे सांगूच शकत नाही. पैशाचे घोळ करू शकत नाही. आपल्या अधिकारात दुसर्यावर हकूमत करू शकत नाही. या तीन दुष्ट प्रवृत्ती टाळल्या तर सहजयोगाचे सर्व आशीर्वाद तुम्हास प्राप्त होतील. असंस्कृत विचारातून स्त्री- पुसरुष झालेल्या गैरसमजुती दूर होतात. हे सर्व घटीत होत नसेल तर तो सहजयोगी नाही. वाईट सवयी सहज जातात पण वरील तीन गोष्टींमुळे कमकुवतपणा येतो. सगळ्यात भयंकर म्हणजे सत्तेची अभिलाषा दुसऱ्यावर हकूमत गाजवण्याची आकांक्षा. असे अधिकाराची हाव असणारे सहजयोगी कोठेही असतील तर निश्चित समजा की ते संबंधाील निर्माण बाहेर फेकले जातील. अशा एका घटनेत ते अडकले जातात की स्वत:लाच बाहेर ओढून घेतात. सहजयोगात असे सतत पुढे पुढे करणारे अनेक आहेत. अनावश्यकपणे पुढे पुढे करू नये. मलाच नेहमी श्री माताजींच्या चरणावर जाऊ द्या असा आग्रह धरू नये. जर माझ्या चरणांना तुमच्या हृदयात स्थान आहे तर माझ्या पायावर येऊन काय मोठा लाभ तुम्हास होणार आहे असा विचार सतत बाळगा. अशी सतत पुढे पुढे करणारी व्यक्ती पुढील वर्षात गायब होणार हे निश्चितच. श्री भैरवनाथ त्यांना कायदा शिकवतीलच. सतत पुढे पुढे करणे म्हणजे नुसती डोकेफोडी. त्यांना मी शांत रहा म्हणून सांगितलं तर ते ऐकायला तयार नसतात. असे दिसून येईल की दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात. एक आहे बाहेर टाकणारी (सेंट्रिपेटल) व दुसरी आत ओढणारी (सेंट्रीफ्युजल). एक तुम्हाला मधोमध आणते तर दुसरी केन्द्रापासून बाहेर फेकते याचे कारण म्हणजे परमेश्वरी राज्यात सगळ्यांना पुरेल एवढी जागा कोठून असणार? आता प्रत्येकजण माझ्याशी पत्राने परस्पर संपर्क साधायचे पहातात. काही २५ पानांची पत्रे असतात. अशा प्रत्येक पत्राची दखल घेण्यास मला एवढा वेळ आहे का आणि पत्रे वाचली तर त्यात माझी आई अशी आहे किंवा माझ्या आईचा काका, भाऊ इत्यादि विषयी शुल्लक गोष्टींनी ते भरलेले असते. मला त्यांच्याशी काय कर्तव्य आहे ? सर्व सहजयोगी नात्यात आहेत. तुमचे इतर नातेवाईकांशी मला काही कर्तव्य नाही. जोपर्यंत तुमचे नातेवाईक सहजयोगात येत नाही त्यांच्याविषयी मला काही करायचे नाही किंवा तुम्हालाही काही करायचे नाही. देवही त्यांच्या विषयी काही करू शकत नाही. अशा लोकांबद्दल मला कधीही सांगू नका. त्यांनी सहजयोगात यावे. तुमच्या परिचयाच्या एखाद्या व्यक्तिबद्दल माझ्याकडे तरफदारी करून माझ्याकडे बिलकूल आणू नका. कारण मला त्याच्याशी काय कर्तव्य ? फार तर त्याला माझा फोटो देऊन त्यावर मेहनत करायला सांगा. एकदम कोणाला बरे करण्याच्या भानगडीत पड़ू नका. त्याला फोटोपुढे बसवा. डावीकडचा रोग, उजवीकडचा रोग व तिसरा मध्यवर्ती संस्थेवरील अशा तीन प्रकारचे आजार असू शकतात. डावीकडील जे त्रास असतात ते मानसिक प्रकारचे, उजव्या बाजूचे शारीरिक किंवा बौद्धिक व मधल्या संस्थेवरील म्हणजे चुकीच्या गुरूंचे अथवा अनाधिकाराने वापरलेल्या ज्ञानातून निर्माण होतात. या तिन्हीत तुम्ही तरबेज झाला तर फोटोवरून सुद्धा दुसऱ्याला काय त्रास आहे हे सांगू शकाल. लवकरच या रोगाविषयी आम्ही एक पुस्तक प्रकाशित करणार आहोत. म्हणजे मला श्री माताजींनी असे सांगितले, हे आणि ते असे कोणालाही सांगू नये. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तासन्तास ध्यान करण्याची जरूरी नाही. फक्त दहा मिनिटे

पुरे. ध्यान लागण्यास एवढा वेळ लागता तर ते मूर्खपणाचे म्हणावे लागेल. असला वेडेपणा टाळा. तुम्हाला एखाद्या स्थळी जायचे आहे व त्याला एखादे फाटक आहे तर त्यातून आत प्रवेश करण्यास किती अवधी लागतो. पण तुम्ही जर निश्चय केला तर निश्चितअधिक वेळ लागेल. डोंगर चढायचाच निश्चय केला तर निश्चित अधिक वेळ लागेल. डोंगर चढायची जरूर आहे का? साधी गोष्ट बिकट करण्याचा हा प्रकार म्हणजे सहजयोग नव्हे. तर आजचे हे भाषण अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचे भाषांतर करून सर्व केंद्रांना पाठवावे.