Christmas Puja: You Have Christ Before You Pune (India)

आजचा दिवस आपण ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस म्हणून मानतो आहे .पुष्कळ लोकांनी मला विचारलं की तुम्ही ख्रिस्ती धर्मात का जन्म घेतला . तर त्याला कारण दोन एकतर माझे आई वडील अत्यंत विशेष लोक होते .काहीतरी विशेष ,अत्यंत धार्मिक आणि फार उच्च प्रतीचे लोक होते ,असे आजकाल मिळणं कठीण आहे .आणि माझ्या आईने फर्ग्युसन कॉलेज मधून हॉनॉर्स गणितात केलं होत ,आणि रँग्लर परांजपेची शिष्या होती, आणि वडील संस्कृतचे पंडित होते ,त्यांना चौदा भाषा येत असत ,आणि या अशा दोन पुण्यवान लोकांच्या घरी आम्ही जन्माला यावं असा आम्ही बेत केला ,त्यात आणि ख्रिश्चन होते ते बर ,ख्रिचन लोकांची आपल्या हिंदुस्तानात अशी वाईट स्थिती आहे  की त्यांना अस वाटत की ख्रिस्त हा इंग्लंड ला जन्माला आणि इंग्लिश लोकांचं अनुकरण करायचं ,त्यांच्या सारखं वागायचं ,त्यांच्या सारखे कपडे घालायचे , तस हुडदा यच ,हे सगळ काही म्हंजे ख्रिश्चन धर्माचं लक्षण ही पहिली गोष्ट आणि दुसरी म्हंजे आमचे प्रॉटेस्टंट ख्रिश्चन जे आहेत ते म्हंजे बुद्धिवादी  त्यामुळे त्यांनी ख्रिस्ताला आपल्या बुध्दी त बसवले आहे, त्या चाकोरीत बसवले आहे ,आणि त्यानं च्य पेक्षा जास्त धर्ममार्तंड मी बघितले नाही इतकं अत्यंत अंधश्रधा ने भरलेली लोक आहेत ,अत्यंत,त्यांना काहीही कोणच कसलही चालत नाही ,रविवारी उठायच तयार बियार व्हायचं काहीतरी चर्च ला जायचं घरी यायचं झाल काम संप ल , सगळा धर्म तिथे आला कामाला आणि बाकीच्या वेळेला उखळ्या पाखाळ्या काढत बसायचय म्हंजे त्या बाबतीत महाराष्ट्रीयन  तेव्हडा भाग जर सरला तर बिलकुल आपल्या महाराष्ट्रीयन बायका पुरुष असतात ना त्याच काढ याच काढ ,आणि ख्रिश्चन झाल्यावर सुद्धा जातीयता त्यांच्यात , म्हणजे आम्ही लोक आता शालिवाहन चे वंशज आणि शालिवाहन यांचं आता हे फार मोठे राजपूत Read More …