Public Program Brahmapuri (India)

पब्लिक प्रोग्राम ब्रम्हपुरी, (भारत),  ३१/१२/१९८९            या शाळेचे आद्यप्रवर्तक जिजाबा मोहिते यांनी हृदयाला पिळवटून टाकणारं असं भाषण केलेयं आणि मला खरोखर माझे अश्रू सुद्धा आवरता आले नाहीत. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतो आहे आणि बेचाळीस (१९४२) सालामध्ये आम्हीसुद्धा त्या लहानपणी स्वातंत्र्ययुद्धात होतो. माझे वडील आणि आई ह्यांनी गांधीजींना आपलं सर्वस्व वाहिलं होतं. आणि मी सुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणापासून राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळविण्याची होती.             कॉलेजमध्ये असताना तेव्हा भारत छोडो चा नारा लागला. ९ ऑगस्ट च्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं राहून मी, प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदुका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळचे जे कॉलेजचे मुख्य प्रिन्सिपल होते, त्यांनी या सहजयोग्यांना सांगितलं, की मला तेव्हाच वाटलं, की ही काहीतरी मोठी शक्ती असेल. की अठरा वर्षाच्या वयामध्ये या बंदुका आणि ह्यांच्यासमोर कशी उभी राहिली. एकटी मी उभी होते. मं ते कॉलेज आम्ही बंद पाडलं.            त्यानंतर बेचाळीस (१९४२) सालात मी, आध्यात्माचा विचार केला नाही. फक्त देशाला स्वातंत्र्य करण्याचा आणि त्यावेळेला आम्हाला त्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले, बर्फावर घातलं. आई माझी तिला वाटायचं अठरा वर्षाची मुलगी आहे, हिचे प्राण जाणार आणि जवळ-जवळ नऊ महिने मला भूमिगत व्हाव लागलं.            अशा प्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वाहवत गेले आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं होतं, की आपल्या देशातली गरीबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये स्वच्छता आली पाहिजे, हे जे गांधीजींच सगळं काही देशाबद्दलच प्रेम होतं, ते कुठेतरी वार्‍यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आलीये मला, की हे कसलं स्वातंत्र्य मिळवलंय? ह्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे आपल्याला. अशा रीतीने हे लोक स्वार्थी, स्वतःचे पैशे Read More …