Birthday Puja, Sahaja Yoga me pragati ki Teen Yuktiyaan New Delhi (India)

Janm Diwas Puja Date 30th March 1990 : Place Delhi : Type Puja आज नवरात्रीची चतुर्थी आहे आणि नवरात्रीमध्ये रात्री पूजा झाली पाहिजे. अंधकार दूर करण्यासाठी रात्रीत प्रकाशाला आणणे अत्यावश्यक आहे. आजच्या दिवसाचा एक आणखी संयोग आहे, की आपण लोक आमचा जन्मदिवस साजरा करीत आहात. आजच्या दिवशी गौरीजींनी आपल्या विवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्र्याचे स्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवली गेली. ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मानव या विश्वात आले ते पावित्र्यामुळे सुरक्षित रहावे आणि अपवित्र गोष्टींपासून दूर रहावे, यासाठी साऱ्या सृष्टीला गौरीजींनी पवित्रतेने न्हाऊन काढले आणि त्यानंतरच साऱ्या सृष्टीची रचना झाली. तर, जीवनामध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण कार्य हे आहे, की आपण आपल्यामधील पावित्र्याला सर्वात उच्च गोष्ट समजणे, पण पवित्र याचा अर्थ असा नव्हे, की आंघोळ करून शूचिर्भूत होऊन, सफाई करून आपल्या शरीराला ठीक करणे, तर आपल्या हृदयाला स्वच्छ केले पाहिजे. हृदयाचा सर्वात मोठा विकार आहे क्रोध आणि मनुष्य जेव्हा क्रोधित होतो तेव्हा जे पवित्र आहे ते नष्ट होऊन जाते कारण पावित्र्याचे दुसरे नाव आहे निव्व्याज्य प्रेम. ते प्रेम जे सतत वाहत असते आणि कशाचीही इच्छा करीत नाही. त्याची तृप्ती यातच आहे, की ते सतत वाहत आहे आणि ज्यावेळी ते वाहत नाही त्यावेळी ते चिंतीत (अस्वस्थ) होते, तर पवित्र याचा अर्थ असा की आपण आपल्या हृदयाला प्रेमाने भरून टाका. क्रोधाने नव्हे. क्रोध आपला शत्रू आहे, पण तो विश्वासाचा शत्रू आहे. जगात जेवढी युद्धे झाली, जेवढी हानी झाली, ती सर्व सामूहिक क्रोधाची कारणे आहेत. क्रोधासाठी कारणे अनेक असतात, ‘मी अशासाठी नाराज झालो कारण असे होते.’ प्रत्येक क्रोध कोणते तरी कारण शोधू शकतो. युद्धासारख्या भयानक गोष्टीसुद्धा क्रोधापासून उपजतात. Read More …