Birthday Puja, Sahaja Yoga me pragati ki Teen Yuktiyaan

New Delhi (India)

1990-03-30 Birthday Puja Talk Hindi 42min and Music Delhi, 62' Download subtitles: CS,EN,PTView subtitles:
Download video (standard quality): Watch on Youtube: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share

Janm Diwas Puja Date 30th March 1990 : Place Delhi : Type Puja

आज नवरात्रीची चतुर्थी आहे आणि नवरात्रीमध्ये रात्री पूजा झाली पाहिजे. अंधकार दूर करण्यासाठी रात्रीत प्रकाशाला आणणे अत्यावश्यक आहे. आजच्या दिवसाचा एक आणखी संयोग आहे, की आपण लोक आमचा जन्मदिवस साजरा करीत आहात. आजच्या दिवशी गौरीजींनी आपल्या विवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्र्याचे स्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवली गेली. ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मानव या विश्वात आले ते पावित्र्यामुळे सुरक्षित रहावे आणि अपवित्र गोष्टींपासून दूर रहावे, यासाठी साऱ्या सृष्टीला गौरीजींनी पवित्रतेने न्हाऊन काढले आणि त्यानंतरच साऱ्या सृष्टीची रचना झाली. तर, जीवनामध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण कार्य हे आहे, की आपण आपल्यामधील पावित्र्याला सर्वात उच्च गोष्ट समजणे, पण पवित्र याचा अर्थ असा नव्हे, की आंघोळ करून शूचिर्भूत होऊन, सफाई करून आपल्या शरीराला ठीक करणे, तर आपल्या हृदयाला स्वच्छ केले पाहिजे. हृदयाचा सर्वात मोठा विकार आहे क्रोध आणि मनुष्य जेव्हा क्रोधित होतो तेव्हा जे पवित्र आहे ते नष्ट होऊन जाते कारण पावित्र्याचे दुसरे नाव आहे निव्व्याज्य प्रेम. ते प्रेम जे सतत वाहत असते आणि कशाचीही इच्छा करीत नाही. त्याची तृप्ती यातच आहे, की ते सतत वाहत आहे आणि ज्यावेळी ते वाहत नाही त्यावेळी ते चिंतीत (अस्वस्थ) होते, तर पवित्र याचा अर्थ असा की आपण आपल्या हृदयाला प्रेमाने भरून टाका. क्रोधाने नव्हे. क्रोध आपला शत्रू आहे, पण तो विश्वासाचा शत्रू आहे. जगात जेवढी युद्धे झाली, जेवढी हानी झाली, ती सर्व सामूहिक क्रोधाची कारणे आहेत. क्रोधासाठी कारणे अनेक असतात, ‘मी अशासाठी नाराज झालो कारण असे होते.’ प्रत्येक क्रोध कोणते तरी कारण शोधू शकतो. युद्धासारख्या भयानक गोष्टीसुद्धा क्रोधापासून उपजतात. त्यांच्या मुळामध्ये हा क्रोधच असतो. जर हृदयामध्ये प्रेम असेल तर क्रोध येऊ शकत नाही आणि क्रोधाचा देखावा असेल, तर तो प्रेमासाठीच. एखाद्या दुष्ट राक्षसाचा जेव्हा संहार केला जातो, तो सुद्धा त्याच्यावर प्रेम केल्यामुळेच होतो कारण तो या योग्यतेचाच असतो, की त्याचा संहार झाला पाहिजे, ज्यायोगे तो आणखी पापकर्म करणार नाही, पण हे कार्य मानवासाठी नाही. हे तर देवीचे कार्य आहे, जे त्यांनी ह्या नवरात्रामध्ये केले. तर, हृदयाला विशाल करून हृदयात असा विचार करा की आम्ही कोणावर असे प्रेम करतो जे निव्यज्य, निर्मम आहे, ज्याबद्दल आमच्यामध्ये असे नाही की हा माझा मुलगा, माझी बहीण आहे, माझे घर, माझी वस्तू, मनुष्याची जी स्थिती आहे त्यापेक्षा आपण खूप उच्च स्थितीला आला आहात कारण आपण सहजयोगी आहात. आपला योग परमेश्वराच्या या प्रेमाच्या सूक्ष्म शक्तीशी झाला आहे. ही शक्ती आपल्या आतमध्ये अविरत वाहत आहे. आपल्याला प्लावित करीत आहे. आपल्याला सांभाळते आहे. आपल्याला तर उठवते आहे. वारंवार आपल्याला प्रेरित करते आहे. आपल्याला आल्हाददायी मधूमय प्रेमाने भरून देत आहे. अशा सुंदर शक्तीशी

आपला योग झाला, परंतु आता आमच्या हृदयात त्याच्यासाठी कितीसे स्थान आहे हे पाहिले पाहिजे. आपल्या हृदयात आईसाठी तर प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी आपण लोक खूप आनंदात आहात, पण अजूनही दोन प्रकारचे प्रेम असले पाहिजे, तरच आईचे पूर्णप्रेम असू शकते. एक प्रेम स्वत: विषयी, की आम्ही सहजयोगी आहोत. आम्ही सहजयोगामध्ये शक्ती प्राप्त केली, पण आम्ही याला कशाप्रकारे वाढविले पाहिजे. अनेक लोक सहजयोगाच्या प्रसारासाठी पुष्कळ कार्य करतात. (हॉरीझॉन्टल मूव्हमेंट) समांतर चलन, पृथ्वीप्रमाणे चारही बाजूला पसरणारे. ते लोक स्वत:कडे दृष्टी फिरवत नाहीत, तर जे उर्ध्वगामी चलन आहे, त्याला उत्थानाची गती मिळत नाही. बाह्यामध्ये ते पुष्कळ काही करू शकतात. बाह्यामध्ये ते थांबतील, काम करतील, सर्वांना भेटतील, पण आतल्या शक्तीला वाढवू शकत नाहीत. असेही अनेक लोक आहेत जे आतल्या शक्तीकडे खूप लक्ष देतात आणि बाहेरच्या शक्तीकडे नाही, तर त्यांच्यामध्ये संतुलन येत नाही आणि ज्यावेळी लोक बाह्याच्या अंगामध्ये जास्त वाढू लागतात तेव्हा त्यांच्या आतील शक्ती क्षीण होऊ लागते आणि असे होत होत अशा कडेला पोहोचते की लगेच अहंकारामध्ये बुडू लागतात, की आम्ही सहजयोगाचे एवढे कार्य केले आहे, इतकी मेहनत घेतली आहे, नंतर अशा लोकांचे एक नवीन जीवन सुरू होते, जे सहजयोगासाठी अजिबात उपयुक्त नाही. ते स्वत: बद्दल विचार करतात, की आमचे खूप महत्त्व असले पाहिजे, सेल्फ इंपॉर्टन्स. प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वत:चे महत्त्व दाखवतील. आपले विशेषत्व दाखवतील. स्वत:ला पुढे करतील, पण आतून खिळखिळीतपणा आला आहे, मग त्यांना काही आजार झाला , वेडेपणाची लहर आली, काही मोठे संकट आले, की मग असे म्हणतात की, ‘माताजी, आम्ही तर आपल्यावर स्वत:ला पूर्णपणे समर्पित केले होते, मग असे कसे झाले ? ‘ याची जबाबदारी आपल्यावरच आहे की आपणच बहकलात. मग असा माणूस एकतर्फी होऊन जातो. तो दुसऱ्याशी संबंध प्रस्थापित करू शकत नाही. त्याचा संबंध फक्त लोकांवर रूबाब पाडण्यात असतो आणि स्वत:ला उच्च दाखवणे, सर्वात पुढे आले पाहिजे, सगळ्यात त्यांचं महत्त्व असले पाहिजे, तर मग असेही होऊ शकते, की ते विसरून जाऊ शकतात, की श्री काही करावयाचे आहे. त्यांना काही दान द्यावयाचे आहे. मी पाहिले की, राहरी, माताजींना सुद्धा सुद्धा मुंबईतसुद्धा कशा प्रकारचे असे लोक एकदम उठून वर आले आणि ते स्वत:ला खूप महत्त्वपूर्ण समजू लागले, मग तिथे आरती होत नव्हती, फोटो पुसला जात नव्हता, तरी बरं फोटो नाही लावले. आपलेच घोडे पुढे दामटत. कोणाला काही विचारायचे नाही. आपण करणार. मग भांडणे सुरू झाली. ग्रुप्स तयार झाले कारण ज्या सूत्रामध्ये तुम्ही बांधले गेले आहात ते तुमच्या आईचे सूत्र आहे आणि त्याच सूत्रामध्ये आपण बांधून रहा आणि पूर्ण वेळ हे समजून घ्या की आपण एकाच आईची लेकरे आहोत. आमच्यामध्ये ना कोणी उच्च ना कोणी नीच, ना आपण काही कार्य करत असतो. हे चैतन्यच सर्व कार्य करते. आम्ही काही करतच नाही. ही भावना जेव्हा येते, की ‘आम्ही मोठे आहोत, आम्ही हे केले, आम्ही ते करू, हे करू,’ तेव्हा परम चैतन्य म्हणते, ‘तुला जे करायचे आहे ते कर, जेथे जावयाचे आहे तिथे जा हवे तर नरकात जा, हवे तर स्वत:ला नष्ट कर, स्वत:चा सर्वनाश कर.’ ते आपल्याला थांबवणार नाहीत कारण स्वातंत्र्याला ते मानतात. आपल्याला स्वर्गात जायचे असेल तर त्याचीही व्यवस्था आहे.

पण सहजयोगामध्ये आणखी एक मोठा दोष आहे, आपण एक सामूहिक विराट शक्ती आहोत. आपण एकच आहोत. सर्व एकाच शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत. त्यामध्ये जर कोणी एक असा झाला किंवा दोनचार असे झाले की आपला ग्रुप तयार करतील, तर ज्याप्रमाणे कॅन्सरची मॅलिग्न्सी असते, की एकच पेशी वाढू लागते, वेगळ्या प्रकारे, त्याप्रमाणेच एक व्यक्ती वाढून साऱ्या सहजयोगाला ग्रासू शकते आणि आपली सारी मेहनत व्यर्थ जाते. आपल्याला तर सागरापासून शिकले पाहिजे, जो सर्वात खाली असतो, सर्व नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो आणि स्वत:ला तापवून घेऊन वाफ तयार करून साऱ्या दुनियेवर पावसाचे वरदान पाठवितो. त्याची जी नम्रता आहे तीच त्याच्या गहनतेचे लक्षण आहे. परत तीच वर्षा नद्यांमधून धावत जावून त्याच समुद्राकडे जाते. जेव्हा आपल्यामध्ये नम्रता व प्रेम येईल तेव्हाच आपण या समुद्राप्रमाणे विशाल होऊ, पण आपलेच महत्त्व करायचे, स्वत:लाच विशेष समजायचे, यामुळे सर्वात वाईट गोष्ट ही, की परमचैतन्य आपल्याला सांगून टाकेल की ‘जा. मग आपण एका बाजूला फेकले जाल. ती माझ्यासाठी दुःखकारक गोष्ट असते. असे लोक जे विचार करतात की ‘आम्ही हे कार्य केले, ते कार्य केले’ त्यांनी पटकन मागे होऊन पाहिले पाहिजे, की आम्ही ध्यान करतो का ? आमचे ध्यान लागते का? आम्ही किती गहनतेमध्ये आहोत ? आम्ही कशाकशावर प्रेम करतो, किती जणांवर प्रेम करतो आणि किती जणांशी दुश्मनी करतो. सहजयोगामध्ये काही लोक खूप गहनतेत आहेत. काही अजून किनार्यावरच डोलताहेत. ते कधी फेकले जातील ते सांगू शकत नाही. मी आपल्याला आधीच सांगितले आहे, की १९९० नंतर एक नवीन दालन उघडणार आहे आणि एक नवीन उडी आपल्याला मारायची आहे. ज्याने आपण या नवीन मोहोळात उतरून त्या नव्या गोष्टीला पकडू शकू. सहजयोगाची प्रगती वीस वर्षांची होणार आहे आणि यात टिकून राहण्यासाठी पहिली गोष्ट आपल्यामध्ये पावित्र्य आले पाहिजे. जे नम्रतेने भरले आहे. जर आपण एकदम स्वच्छ आणि पवित्र असाल तर आपल्याला कोणालाही शिवून, कोणाशीही बोलून अपवित्रता येणार नाही कारण आपण प्रत्येक गोष्टीला शुद्ध करतो. आपला स्वभावच शुद्ध करण्याचा आहे. आपण ज्याला भेटाल त्याला शुद्ध करीत जाल. त्यात घाबरण्याची काय गोष्ट आहे? त्यात दुसर्याला धिक्कारण्याची काय गोष्ट आहे? तर मग आपली पवित्रता कमी आहे. जर आपली पवित्रता संपूर्ण आहे तर, त्या पवित्रतेमध्येसुद्धा शक्ती व तेज आहे. ती इतकी शक्तिशाली आहे, की कोणत्याही अपवित्रतेला खेचून घेऊ शकता. जशी प्रत्येक प्रकारची गोष्ट समुद्रामध्ये एकाकार होऊन जाते. आता दुसरे लोक आहेत जे फक्त स्वत:च्या प्रगतीचा विचार करतात. ते असा विचार करतात, की ‘आम्हाला दुसर्यांशी काय करायचे आहे? आम्ही आमच्या खोलीत बसून श्री माताजींची पूजा करतो आम्ही त्यांना मानतो, आमचा जगाशी काही संबंध नाही’ आणि दूसर्यापासून वेगळे राहतात. आपण एका शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत. मग आपण म्हणाल, ‘माताजी, मी इतकी पूजा करतो, इतके मंत्र म्हणतो, इतके काम करतो मग माझी अशी स्थिती का?’ कारण आपण त्या सामूहिक शक्तीपासून दूर गेलात. सहजयोग सामूहिक शक्ती आहे तेव्हा दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे की आपण आपली शक्ती सांभाळणे आणि सामूहिकता घडवत जाणे तरच आपल्यामध्ये पूर्ण संतुलन येईल. मी असे लोक पाहिले आहेत, ज्यांनी सहजयोगासाठी खूप कार्य केले, बरेच चांगले बोलत होते, भाषण देत

होते आणि आपल्या भाषणाची टेप तयार केली. मग लोकांना सांगू लागले, आपण माझी टेप ऐका. मग लोक आमची टेप सोडून त्यांची टेप ऐकू लागले. त्यांची अशी स्थिती झाली, की ते आमच्या फोटोला तर नमस्कार करायचे पण आम्हाला नाही कारण त्यांना फोटोची सवय झाली होती. मग त्यांनी स्वत:चे फोटो छापले. ते फोटो सर्वांना दाखवू लागले. अशाप्रकारे आपलेच महत्त्व वाढवू लागले. करता करता अशा खड्ड्यात पडले आणि मग सुटून गेले सहजयोगातून, असे लोक का निघाले? कारण संतुलन नाही आणि संतुलन नसल्यावर माणूस उजवीकडे किंवा डावीकडे जातो. दोन प्रकारच्या शक्त्या आपल्या आतमध्ये आहेत. ज्यायोगे आपण सहजयोगाकडे खेचलेही जातो आणि दूसरी शक्ती ज्यामुळे आपण बाहेर फेकले जातो. बरं, परत लोक कमी झाले, तर यामध्ये सहजयोगाचे नुकसान तर झाले नाही. यामध्ये त्यांचेच नुकसान झाले. जर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, तर या गोष्टीला समजून घ्या की सहजयोगाला आपली गरज नाही. आपल्याला सहजयोगाची गरज आहे. ‘योग’ याचा दुसरा अर्थ होतो युक्ती. एक अर्थ आहे, की संबंध जोडला जाणे, दुसरा आहे की युक्ती. पहिली तर युक्ती ही की आम्हाला याचे ज्ञान झाले पाहिजे. ज्ञानाचा अर्थ बुद्धी नव्हे. युक्ती म्हणजे आमच्या बोटांमध्ये, हातामध्ये, आतमध्ये कुंडलिनीचे पूर्णपणे जागरण होणे हे ज्ञान आहे. मग आणखीसुद्धा ज्ञान होऊ लागते. ज्ञानामुळे आपण लोकांची कुंडलिनी जागृत करू शकतो. त्यांना समजावू शकतो. त्यांच्याशी पूर्णपणे आपण एकाग्र होऊ शकतो. त्यांच्याशी आपण वार्तालाप करू शकतो. तर आपल्याला यामुळे बौद्धिक ज्ञानसुद्धा येते. आपल्याला सहजयोग समजतो. नाही तर आधी कोण समजू शकत होते ? कबीर , नानकरजींच्या गोष्टी कोणी आधी या समजू शकत होते का? आपले बुद्धिचातुर्य वाढते. अगम्य गोष्ट गम्य होते. दुसरी युक्ती काय आहे? ती ही की आपण आमच्यावर भक्ती करतां. ती भक्तीसुद्धा जेव्हां तुम्ही करता तेव्हा अनन्य भक्ती करता. तादात्म्यामध्ये आपण आमच्याशी जोडले जाता. जसे आम्हाला वाटले तसेच आपल्याला वाटू लागते. आज उशीर झाला तर आम्हीसुद्धा असे सांगू शकतो, की आम्ही खूप थकलो. आमच्याने होणार नाही. पण आम्ही असा विचार केला नवरात्री आहे, रात्रीत करावे आणि तोच मुहर्त आम्हाला मिळावयाचा होता. तर आम्हाला करायचेही आहे आणि अत्यंत आनंदात आम्ही करीत आहोत. आम्ही थकलो आहोत, आरामही केला नाही असा विचारही आम्ही करीत नाही आणि आपल्यालासुद्धा असा विचार केला पाहिजे की हीच वेळ श्री माताजींनी ठरविली आहे कारण हीच वेळ आमच्यासाठी उचित आहे, पूजेसाठी. पण अर्धेअधिक लोक उलट्या गोष्टींचा विचार करतील. आम्ही सकाळपासून बसलो आहोत. आम्हाला भूक लागली, मुले झोपली असतील. तर ती अनन्य भक्ती नाही कारण माझा जो विचार आहे, तो आपल्या विचारामध्येच आहे, कोणासाठी मी विचार करते ? जर ‘श्री माताजी, हे इतके खराब आहे, असे आहे.’ मी म्हणते, ‘नाही हो, एकदम चांगले आहे . ‘ मी विचार करते, मी जे बघू शकते ते हे का बघू शकत नाहीत, तर मग अनन्य नाही झाले, अन्य झाले, दुसरे झाले. अशातऱ्हेने जसे तुमच्याबद्दल आमचे प्रेम आहे, आपणही सर्वांबद्दल तसेच प्रेम जोपासा. जर ही गोष्ट आपल्यामध्ये नाही तर ते अन्य आहे, अनन्य नाही. जर आमच्याच शरीराचे अंग-प्रत्यंग आहे तर जसे आम्ही 18

आहोत तसेच त्यांना झाले पाहिजे. जसा आम्ही विचार करतो तसाच विचार आपल्याला केला पाहिजे. तर हे वेगळा विचार का करतात? उलट्या गोष्टीचा विचार का करतात? जे विहिरीत आहे तेच घड्यामध्ये यायला पाहिजे हेच प्रेमाचे स्रोत आहे. दूसरी गोष्ट कशी येऊ शकेल? आणि जेव्हा दसरी गोष्ट येते तेव्हा मी विचार करते की त्यांनी आणि कोणत्या दुसर्या विहिरीतले पाणी भरले आहे. हा घडा माझा नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे ‘श्री माताजी आम्ही आपल्याला शरणागत आहोत.’ जर तुम्ही शरणागत आहात तर आम्ही तुम्हाला काही सांगितले किंवा कोणतीही गोष्ट समजाविली किंवा आपल्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला, काही ठेवले, तर त्याला नाकारण्याचा प्रश्नच कसा उद्भवेल? पण आपण आणि आम्ही एक झालो तर त्यांचा प्रश्नच कसा उद्भवेल ? श्री माताजींनी सांगितले ते सांगितले, आम्ही ‘श्री माताजी’च झालो तर आम्ही नाही कसे म्हणू शकणार? तर आपल्यामध्ये हे तादात्म्य नाही आले तर ही दुसरी युक्ती आहे, की ‘श्री माताजी, माझ्या हृदयात आपण या. माझ्या बुद्धीमध्ये आपण या. माझ्या विचारांमध्ये आपण या. माझ्या जीवनाच्या प्रत्येक कणामध्ये आपण या. आपण जिथे सांगाल तिथे आम्ही हजर आहोत, हात जोडून.’ पण आपल्याला सांगावं तर लागेल ना! आणि पूर्ण हृदयासह, कुठल्या मतलबाने, कारणाने नाही. तिसरी गोष्ट, आम्ही हे काम करतो आहोत. आम्ही सहजयोगाचे हे काम केले. आम्ही ही सजावट केली, ठीक-ठाक केले. मी केलं, तर सहजयोगी आले नाहीत. सहजयोगामध्ये आपले सर्व कर्म ‘अकर्म’ झाले पाहिजे. जेव्हा आपण सूक्ष्मस्तरामध्ये पहाल, तर आपण पहाल की ‘काय, मी असा विचार करतो कां की मी केलं.’ अशी गोष्ट माझ्या मेंदूत येतेच कशी? याचा अर्थ माझा योग पुरा झाला नाही. जेव्हा योग पूर्ण होतो तेव्हा तुम्ही अकर्मात जसे हे घडते आहे, ते घडते आहे, अशा तऱ्हेने आपण बोलू लागता. तेव्हा आपल्याला पूर्णपणे तादात्म्य उतरता. प्राप्त झाले. तिसरी युक्ती जी शिकली पाहिजे ती अशी की जिथे मी काही करीत आहे, मी काय करीत आहे, जो पर्यंत आपण आपले कार्य शोधित होता तोपर्यंत आपण काही करत होता कारण आपल्यामध्ये अहंभाव होता. जेव्हा आपण सामुदायिकतेमध्ये आलात तेव्हा आपण काही करीत नसता. आपण अंग-प्रत्यंग आहात आणि ते कार्य होत आहे. या युक्त्या मी यासाठी सांगते आहे कारण की झेप घ्यायची आहे. याप्रकारे नेहमी आपण आपले विवेचन करावे आणि स्वत:कडे दृष्टी टाकून पहावी की ‘मी काय विचार करतो आहे, मी दसऱ्यांसाठी काय विचार करतो आहे. ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांच्याकडून मला शिकले पाहिजे. त्यांचे चांगले गुण दिसतात की फक्त वाईटच दिसत असतील आणि स्वत:चे वाईट गुण, तर फार चांगली गोष्ट आहे. ही दिसतात.’ दुसर्यांचे चांगले गुण गुण युक्ती समजून घेतली पाहिजे, की यात जर आम्ही डामडौलात आहोत तर ते स्वत:मुळेच आहोत. सहजयोग तर खूपच महान गोष्ट आहे, पण आमच्यामध्ये जो वाईटपणा येत आहे किंवा याची मजा पूर्णपणे आम्ही लुटू शकत नाही याचे कारण आमच्यामध्ये काही ना काही दोष आहेत या युक्तीला जर आपण व्यवस्थितपणे केले तर फक्त आनंद मिळेल, निरानंद. आणि काही नाही. आणि मग पाहिजे तरी काय ? आपले रूपच बदलून जाईल.

आणि आज या जन्मदिनी मी इच्छा करते की, आपले जन्मदिवससुद्धा साजरे व्हावे. आजपासून आपण या युक्त्या समजून घ्याव्या आणि स्वत:ला अशा पावित्र्याने ओतप्रोत करा जसे काही श्री गणेश. पवित्रतेमुळे माणसामध्ये सुबुद्धी येते कारण पवित्रता प्रेमाचेच नाव आहे. सुबुद्धीचा अर्थ प्रेमच आहे. सर्व गोष्टींचा अर्थ प्रेम आहे आणि जर आपण सुबुद्धी प्राप्त करू शकत नाही आणि प्रेमाला आपलेसे करू शकत नाही तर सहजयोगात येऊन आपला वेळ व्यर्थ घालवणे आहे. या वेळी अशी काही वेळ घटीत होते आहे की सर्वांना यामध्ये सामावले गेले पाहिजे. आणि स्वत:ला परिवर्तनामध्ये घातलेच पाहिजे. परिवर्तित आपल्याला झालेच पाहिजे. वाईट गोष्टी आमच्यामध्ये आहेत. आम्हाला स्वत:ला पूर्णपणे पवित्र करावयाचे आहे. या परिवर्तनाचे फलस्वरूप आशीर्वाद आहे- ते जीवन, ज्याचे वर्णन केले जाणे अशक्य-जे कबीरांनी सांगितले – ‘अब मस्त हुए, फिर क्या बोले।’ तर आपण त्या आनंदामध्ये या. त्याला प्राप्त करा. त्या आनंदामध्ये आनंदित व्हा. हा माझा आशीर्वाद!