Puja

Pune (India)

1990-12-03 Puja Talk, Pune, India, DP (English, Marathi), 91' Chapters: Arrival, English Talk, Marathi TalkDownload subtitles: EN,TRView subtitles:
Download video (standard quality): View and download on Vimeo: View on Youku: Transcribe/Translate oTranscribe

Feedback
Share

Puja Date 3rd December 1990: Place Pune

[Original transcript Marathi talk, scanned from Chaitanya Lahari]

काल मी आपल्याला सांगितलंच आहे की, आपल्याला अध्यात्माची एवंढी संपदा मिळाली आहे त्याची आपल्याला कदर असायला हुवीं. आपल्याला आपलीच कदर नाही तिथे अध्यात्माची कार्य असणार ! भारतातला, त्यांतला त्यांत महाराष्ट्रतला प्रत्येक मनुष्य परमेश्वराच्या अत्यंत प्रमाचा पुतळा आहे असं समजलं पाहिजे. आपल्याला फार आस आहे, आपण जर खेंडयांत राहातो तर आपल्याला वाटत मी काय क: पदार्थ आहे. आपला उपयोग फार होणार आहे, फक्त कांही काही गोष्टीना लक्षांत चेतले पाहिजे. प्रथम म्हणजे धर्माबद्दल आपण फार जागरूक असलं पाहिजे प्रत्येक घर्माचं इथे दिवा दुस-या देशात म्हणा, यंत्रीकरण करून टाकलं आहे. म्हणजे एक पैसे कमवण्याची किमया करून टाकली आहे. असं असूं शकत नाही. जे पैशाने लोक तुम्हाला लुटतात इे देवाच्या नांवावर त्यांना एकेक कवडी देणे हे अगदी चुकीचं आहे पहिली गोष्ट. आणि कोणी मनुष्य भगवे वस्त्र घालून आला, की लागले त्याच्यामुळे लोटांगण चालायला । खेडयांतले लोक इतके साधे सरळ. मग त्याने संगितलं, की तुम्ही इतके पैसे दिले की तुमचं इतक भलं होइल, लागले त्याला पैसे द्यायला हे सगळे आपल्या डोळयातनं काढलं पाहिजे. जो मनुष्य तुमच्याकडून पैसे मागतो तो, तो परमेश्वराच्या खचित जवळही नाही. हे खेडेगांवच्या लोकांना सगळ्यांनीं समजावून सांगितल पाहिजे. आपल्याकडे साधे भोळे लोक फार , त्यामुळे कुठेही एक तुम्ही दगड माडला, शेंदूर फासला, बसले जाऊन तिथे एक गृहस्थ. येतां जाता सगळे त्याला लोटांगण घालतात दोन पैसे त्याला देतात. संतांनी, त्यांत नृसिंह सरस्वती म्हणून एक ब्राम्हण होते ते जाऊन झोडपून काहायचे, त्या माणसीना, त्याचा दगड उचलून जाऊन फेकून द्यायचे. एकनाथांना किती लोकांनी त्रास दिला. कारण ते जाऊन महारवाडयांत जेवले अहो साधूसंतांना जात असते का ? कोणचा महार नी काय आणि आपल्या शास्त्रांत जरासं जरी ढुंकुन पाहीलं तर लक्षांत येइल की श्रीरामाचे चरित्र लिहीलं कोणी ? त्या कोळयाने त्याचं नांव वाल्मिकी, कोणी ब्राम्हणाने लिहीलं नाही. तेव्हां आपल्यामध्ये हे जे जातीपातीचें वेड आलंय त्याला काढलंच पाहिजे. त्याला काही अर्थ नाही.

देवीबद्दल म्हणतात, “या देवी सर्व भूतेषु जातिरूपेण संस्थिता’ । ही जात म्हणजे काय ? जात म्हणजे तुमच्यामध्ये जी एक आवड आहे किंवा उपजतच तुमची जी बुध्दी आहे, ती जात. जो मनुष्य परमेश्वराला शोधतो तर तो ब्राम्हणच आहे. सहजयोगात आम्ही जातपात कांही मानत नाही. आम्ही वैधव्य मानीत नाही, पहिली गोष्ट बायका तेवढया विधवा. आणि पुरूष ? ते नेहमीच सघवा असतात. अर्स करून आपण बायकांवर अनेक अत्याचार केले आहेत, हा कधीही धर्म असूं शकत नाही. कोणताही अत्याचार हा अधर्मच आहे. कोणच्याईी प्रकारचा अन्याय हा अधर्मच आहे तेव्हां तुम्ही सहजयोगांत येता तेव्हां लक्षात ठेवलं पाहिजे. की या ज्या नुसत्या उलाढालीच्या गोष्टी आहेत, त्यांनी नरकच आपल्या देशांत उभा झाला आहे, त्या आम्ही मानत नाही. ाा आणि दुसरी तर आपल्याला कर्तबगारी राहीली नाही, सिंहगडावर जायचंच नाही आहे. बसल्या बसल्या आणखी करता काय, तर मुलामुलींची लग्नं मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आमचा जन्म झाला तेव्हां आम्हांला यानी शहाण्णव कुळामध्ये घातलं. तिथे सगळे दारूडे लोक. आणि बायकाना इतकं छळतात, आणि लग्न म्हणजे ते शहाण्णव कुळाचं शहाण्णव कुळांतच झालं पाहिजे, आणि सगळे बेकार लोक – कोण सुशिक्षीत जर चांगला मुलगा असला तर वर म्हटलं कशाला शहाण्णव कुळामध्ये आणि त्याला मुलगी जर दिली तर झालं । त्या मुलीना झोडपून काढतात. हे शहाणणव कुळी काय देवाने घडवलं आहे कां ? सगळयांचे नाकतोंड एकसारखे असतात, एकसारखे हसतात, एकसारखे बोलतात असं असतांना, असं कसं म्हणायचं की याचं त्याच्याशी लग्न होऊं शकत नाही, त्याचं त्याच्याशी लग्न होऊ शकत नाही. या आपल्या जातीतल्या सर्व घाणरेडया गोष्टी आहेत त्या निर्मल करायला, सगळ स्वच्छ करायला आलेला आहे. याने किती ताप होतो बघा. आज तुमची हा कुठला प्रकार आहे. मुलगी आहे तुम्हांला ताप होतोय. उद्या तुमचा मुलगा झाल्यावर तुम्ही तोच ताप दुस-याला देणार. तर सहजयोग जरी साधुसंतांचा असला तरी संन्याशांचा नाही. समाजातं राहून, समाजांत प्रगति करून, लोकांच्या विचारांची प्रगति करून समाजाला मदत करणारा असा सहजयोग पोषक आहे. तुमच्या जीवनांत जर ते स्वतःला सहजयोगी म्हणतात, संकुचित असतात त्यांना सांगायचं की तुम्हांला अजून सहजयोग समजलेला नाही. निघालो. तर है विश्वाचं कार्य आहे. सर्व विश्वाला एक करायला आम्ही साधूसंताच्या भूमीत राहातां ना, मग त्यांच्यासारखं वागायला पाहिजे. त्यांचे अभंग बधा, त्यांनी काय म्हटलंय, तुकारामानी काय म्हटलंय विठ्ठलाला, तूं महार झालास, हे बरं झालं. विठ्ठल कांही त्याला मारायला आले नाही त्यासांठी ‘झाला महार पंढरीनाथ’ केवढी मोठी गोष्ट म्हटली. डोक्यांत येतं का कोणाच्या ? अहो, पंढरीनाथ जर महार होतो तर तुम्ही कोण ? साधूसंतांची नुसती भजरनं म्हणायची आणि टाळ कुटायचे, पण त्यांतलं काही स्वारस्य आंतमध्ये यायला पाहिजे. आणि अंधश्रध्देवर, अंधते वर सगळयांनी मेहनत केली “नको रे बाबा’ आणि समाधी घेतली. हे महामूर्ख कसले ऐकणार । कधीतरी असं होइल तर ते मग ज्ञानेश्वरानी वरच्या पाय-या सोंगितल्या, सगळ सांगितलं आणि म्हणाले कात वाचत बसतील.

आतां, है सगळे बाचतात, त्यांची पुस्तक, तेव्हां महाराष्ट्रात आतां यांची टूर झालेली आहे.है लोक तुम्हांला अगदी भगवंताच्या शेजारीच बसलेले पाहातात. केव्हढा मोठा देश आहे म्हणजे खरोखरच. आणि महाराष्ट्रीयन माणसाला म्हणजे देवच समजतात एव्हढी मोठी परंपरा तुमची. तुमचा इथे जन्म झाला तर केवहढे मोठे असणार तुम्ही असा याचा विचार आहे कशाने ? मला माहीत आहे तंबाखू । ते कॅन्सर होइना का । की कुठून ही अवदसा महाराष्ट्रांत आली. बिचा-या साधूसंतांनी, सगळयांनी सांगितलं की मादक पदार्थ घ्यायचे नाहीत. साईनाथांनी तर सगळे जाळून पिऊन टाकले. सारखे तरी सगळे तंबाखूवर बसलेले, कुठे गेले, तरी तंबाखू, तंबाखू । अहो, त्या विठ्ठलाला चालत नाही तंबाखू अगदी विशुध्दी च्क्रावर विठ्ठल बसलेले आहेत. आणि तुम्ही तंबाखू खाऊन त्यांच्याकडे कशाला जातां पाहिजे. त्याच्या मते म्हणजे महाराष्ट्र म्हणजे परत तोच प्रकार. आतां काल, सगळयांच्या विशुध्दया धरल्या. तंबाखू शिवाय आपल्या महाराष्ट्रांत चालायचंच नाही. मग . पण येरे माझ्या मागल्या. मला कळत नाही. त्या त्या विठ्ठलाकडे गेले तरी ?ै त्यांतलं गम्य असायला पाहिजे. सार घरलं मग सांगायचं माताजी, आम्ही एवढें देवाला मानतो, आतांच बायका सोगत होत्या. आम्ही देवीची एव्हढी पुजा करतो, आणखी काय बाकी ? काही नाही, आमच्या घरी, मालक थोडं पितात दारूबिरू’ असं की ? आणि तुमचे ? त्याचं काय नाही त्यांना थोडा पत्त्यांचा पोक आहे, ‘असं का ?’ पत्ते खेळतात आणि तिकडे देवीकडे जाऊन करतात आरती, ही अशुध्दता आपल्या समाजांत फार बाहली THEE आहे. हे सर्व देवीला चालतच नाही. या सर्व गोष्टी चालतच नाही देवीला, मग फटके बसतात. मग फटके बसले की म्हणायचं आमचं असं कसं झालं ? आम्ही एवढे देवभक्त, आम्ही एक्ढे शिवभक्त, आम्ही एब्हढे दत्तात्रेयाचे भक्त, आमचं असं कसं झालं ? म्हणून आधी संबंध करून घ्या त्याच्याशी. ाि दत्तात्रयाच्या भक्तांना हमखास पोटाला त्रास असलाच पाहिजे. मी खोटे बोलत नाही. कारण दत्तात्रय है आपल्या पोटाची जी जागा, धर्माची जागा ज्याला ‘ठहाइड म्हणतो, त्यांच्यात बसलेले आहेत. त्यांच्याशी संबंध न होतांना, दत्त दत्त करीत बसायचं तसंच साक्षात दत्त म्हणजे महंमदसाहेबच आहेत. तर मुसलमानांना पण पोटांत त्रास राहाणार. महंमद, महमद करून काय मुसलमानांना मिळणार नाही. संबंध व्हायला पाहिजे. त्यांनाही कधीकधी समजत नाही, आम्ही देवाला मानतो मग है असं करू आमच्यावर, संकट कशी ? ल्याला कारण महंमदसाहेबांनीतर सांगितलं आहे विशेष, अशी वैळ येईल ज्याला त्यानी “कियामा म्हूटलं आहे, ‘ सहजयोग सांगितला आहे सगळा, अशी व्यक्ति येइल, जी सगळ काही सांगेल. तेव्हां मुसलमान कांही कोणी दुसरे नाहीत, हिंदू कोणी दुसरे नाहीत. सगळे आपल्यातलेच आहेत फक्त मार्ग मिळाला नाही तर तसं दिसतं. आंधळयांना जसं हिरव आणि लाल कसं दिसत नाही. तसं त्यांना आपण सगळे एक आहोत असं दिवस नाही. त्याच्यामुळे ही भांडणं आणि तंटे आणि काय काय चालूं त्याला कांही अर्थ आहे ? भांडकुदळपणा महाराष्ट्रांत तर पांचविला पुजलेला आहे. पुनरूत्थान’ ‘विसरेक्शन वेइ्ल जेव्हा हात बोलतील. दुसरं म्हणजे भाऊबंदकी , जरासा कोणी पुढे आला मनुष्य की माझे कान लागले भरायला म्हटलं आतां भीच माझे कान बंद करून टाकते ना. मला सगळ समजतंय, हे कोणाला माहीतच नाही. यऊन मला सागितल हा मनुष्य असा आहे. भयकर राजकारणी आहे त्याच्यापासून बचाऊन राहा.

म्हटलं माहीती आहे. मला माहीत आहे सगळे, मग सांगते तुम्हांला. मग अगदी डोळे वेटारून हयाचें बघतील, कसं कळलं तुम्हाला ? कळतंना मला, मला सांगू नका तुम्ही, फालतूचे धंदे. ? बरं, या लोकामध्ये ही गोष्ट नाही त्याच्यावर, त्याचे त्याच्यावर म्हणजे सहजयोग वाहणार कसा हां. सहजयोगांत आले म्हणजे इतके नम आहेित, इतके नम आहेत की आम्हांला फार मोठं मिळालं. त्याची कल्पना नाही ना आम्हांला कधी भांडण नाही, तंटा नाही. एक दुस-याविरूध्द बोलणं नाही. कारण मला आवडत नाही ते. तौंडावर स्पष्ट बोला, पाठीमागे नाही, है लोक, ज्यांच्या मागे हा पाया नाही, संताची भूमिका नाही, ज्यांच्याकडे रामासारखे राजे झाले नाहीत, शिवाजीसारखे वीर झाले नाहीत ते लोक इतके वर आले, आणि आपण कुठे राहिलो ? यांनी एवढं मिळवलं मग आपण कां मिळवूं नये आपली पूर्वपिठिका किती मोठी ? अहो, आपण सिंहासनावर बसलेले लोक आहोत. कसे ? बेकारच्या लोकांना मिधे होतात आणि मिंधे होऊन सर्व सत्वच घालवलेलं आहे, या महाराष्ट्रांत करायला पाहिजे आणि ते होइल कारण महाराष्ट्रात जी संपदा आहे, ती कुठे सा-या जगांत नाही म्हणून मी एव्हढी मेहनत इथे करते, इथे जन्म घेतला. आणि बागतोय तेव्हां सगळयानी समजून घ्यावं की आपली जबाबदारी काय, महाराष्ट्राची जवाबदारी काय, महाराष्ट्राची जबाबदारी काय स्थिती आहे ती उच्च आहे. त्या स्थितीला प्राप्त व्हा. आणि सा-या जगाला दाख्वायला पाहिजे की | तुम्ही जरी खेडयांत रहात असला. अशिक्षित असला, तरी आंतली जी ग। या महाराष्ट्रातला साधा शेतकरीसुध्दां किती उच्च प्रतीचा मनुष्य आहे. तोंडाने बोलायला सगळे आहे, पढतमुखीसारखे महात्म्य बाचत बसतील. वाचून का काही होणार आहे ? पारायणावर पारायणं सप्ताहवर सप्ताह । त्याने कोणाला काही मिळालं आहे कां ? कोणच्याही गांवात जा, माताजी, इथे सप्ताह चाललाय । काय त्या सप्ताहाचे भलं होतंय तुमच्या ? तेव्हां, जागूत व्हायला पाहीजे आणि जागृत होऊन समजलं पाहिजे, की आपली ही दुर्दशा कां ? आपण या त्रासांत का आलो ? आणि है जागृत होणं कांही कठीण नाही, तुमच्यांतच ती संपदा आहे. शक्ती आहे. ‘तुझं आहे तुजपाशी’ ते तुमचंच तुम्हांला द्यायचं आहे माझे त्यांचा काही देणंघेणं लागत नाही. माझे कांही उपकार नाही. तुम्ही मानला म्हणून माना. आईचे काही उपकार असतात कां ? आई आपल्या आनंदासांठी सारं कांही करते. आतां या शहराची विशेषता, या जागेची अशी * आहे, शे-याला आम्ही जमीन घेतली ती या जागेचं चैतन्य बघून. आणि मग ही जागा मिळाली, आतां इथे येवून राहाणार आहेत, तेव्हां तुमच्या सा-यांच्या बतीनं मी त्यांना सांगितलेलं आहे. तर हे सर्व भक्त आहेत देवीचे त्यांना संभाळलं पाहीजे. देवीचं इथे स्थानसुध्दां आहे. आणि त्यांच्यासमोर हे दाखविलं पाहीजे की तुम्ही किती गहन आहांत. सर्व त-हेने आपली उन्नती होऊ शकते, फक्त तुम्ही गहनांत उतरून घ्या आधी. नाही तर उन्नति झाली की दारू प्यायला जाल, नाही तर काही घाणेरडं काम करायला जाल. सर्वींत आधी पाहिजे की आपली आंतली शक्ति जागृत झाली पाहिजे. বा।

आज तुम्ही पुजेला आलांत, पुजेमधे चैतन्य वाहातं सहसा आम्ही, जो सहजयोगी नाही, त्याला येऊं देत नाही. ज्याला चैतन्य मिळालं नाही, अशा माणसाला पुजेला येऊं देत नाही कारण त्याला जमत नाही ते. पण जर तुम्ही नमपणे बसाल तर सगळयांना या पुजेचा लाभ होइल. आणि बरं बाटेल, तर नमपणे बसायचं, आपल्याला काहीतरी मिळवायच आहे असं लक्षांत आणयचं जी तुमची संपदा आहे आंतमध्ये त्यानेच हे कार्य होणार आहे. मग त्यानंतर वेऊन मला सांगा तुम्ही की माताजी आम्ही है देण्यासांठी सर्व खेडयापांडयातून मी फिरत असते. वीस वर्षापासून आतंदाच्या सागरात पोहत आहोत. ही मे हनत चालू आहे, आतां बघायचं महाराष्ट्रांत कसं कार्य होतं. तसं दिल्लीला, दिल्लीच्या पलिकडे खेडयापाड्यात पुष्कळ कार्य चाललं आहे. तसं इकडे ब्हायला पाहिजे. कारण ही तुमची भूमि आहे आणि संतांचा वारसा आहे. संतांना तृप्त करायला पाहिजे त्यांना असं बाटलं पाहिजे की आम्ही दिलं ते याना मिळालं आहे. नुसती चर्पटपंजरी नको आणि टाळ कुटणं नको. त्या टाळेच्या मागे जे निनाद आहेत, ते तुमच्यामधून उमटले पाहिजेत.