Public Program, Adhyatma mhanje atmyala prapt karne Shrirampur (India)

Sarvajanik Karyakram Date 9th December 1990: Place Shrirampur Public Program Type एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की सत्य आहे ते आहे. ते आपण बदलू शकत नाही. त्याची व्यवस्था करू शकत नाही किंवा त्यावर आपलं प्रभुत्व असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की ह्या मानवी चेतनेत आपण ते जाणू शकत नाही. आज ‘ग्यानबा तुकाराम’ च भजन ऐकलं, तेव्हा फार आनंद वाटला, की अजून त्यांचं स्मरण लोकांना आहे आणि त्यांचं नाव घेत आहेत. त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी परमेश्वर मिळवला पाहिजे आणि त्यासाठी देवाची आठवण ठेवली पाहिजे. कारण त्यांनी जर एक गोष्ट सांगितली नसती, तर आपण एवढ्या भक्तीच्या मार्गात राहिलो नसतो. कधीच आपली वाट लागली असती. स्वातंत्र्य मिळालं आहे, इतके दिवस झाले, तरीसुद्धा अजून आपण धर्मात उभे आहोत. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. धर्म म्हणजे पैशाचा खेळ नव्हे. धर्मासाठी एवढं जाणलं पाहिजे, की आपल्या अंगात बाणलेलं एक काहीतरी विशेष परमेश्वराने दिलेलं एक महान गुणांचं, एक भांडार आहे. पण ते झाल्यावरसुद्धा आपल्याला धर्म समजत नाही. समजा आपण हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिस्ती असो, कोणत्याही धर्माचे असो, तरी मनुष्य कोणतेही पाप करू शकतो. म्हणजे आश्चर्य वाटतं , की हा मनुष्य स्वत:ला जागृत धार्मिक म्हणवतो, देवळात जातो, घंटा वाजवतो, देवासमोर बसून इतकी प्रवचनं ऐकतो, सगळं काही आहे, आणि तरीसुद्धा हा मनुष्य असे पापकर्म तरी कसे करतो ? म्हणून शंका येते आणि मग लोक म्हणू लागतात, की देवधर्म वगैरे सर्व खोटे आहे आणि ती गोष्ट खरी आहे. पण हे अशास्त्रीय बोलणं झालं. तुम्ही आधी ओळखा, परमेश्वर आहे की नाही. त्याचा आधी पत्ता लावला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पत्ता लावत नाही, तोपर्यंत असं म्हणू शकता की, ‘परमेश्वर आहे की Read More …