Public Program (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . परमेश्वर सत्य आहे असे म्हंटलेले आहे . तसेच परमेश्वर हा प्रेमाचा स्रोत आहे असेही म्हंटले आहे . तेव्हा सत्य आणि प्रेम हे दोन्ही एकीकडे एकवटलेलं आहे . अशी शक्ती परमेश्वराची कोणती आहे ?. आपण रोजच कितीतरी जिवंत क्रिया पहात असतो . हि फुल आपण बघतो एका लहान बिजा पोटी इतकी सुंदर फुल येतात . एक लहानसं बीज त्याला इतकी सुंदर फुल कशी लागतात ?,आपण कधी विचार सुद्धा करत नाही फक्त समजून घेतो कि आहे हि जिवंत क्रिया आहे . आणि ती आपल्याला जाणण्याची काही गरज नाही . पण हि जिवंत क्रिया घडते कशी ?,कोण घडवत ?,तसच प्रत्येक मनुष्याची उंची एका मर्यादेत असते . एखाद्या झाडाची सुध्दा उंची त्याला सुध्दा एक मर्यादा असते . नारळाच्या झाडाला एक मर्यादा असते . प्रत्येक ऋतू मध्ये वेगवेगळे शेतीचे कार्य होतात . हि सगळी वेगळी कार्य करण्याची कोणती शक्ती आहे ?जी हि संबंध कार्याला घडवून आणते . आपण त्या बद्दल विचारही करत नाही . आणि त्यामुळे आपला जो काही प्रगतीचा मार्ग आहे तो फार एकांगी झालेला आहे . एकतर्फा झालेला आहे . जेव्हा आपण विज्ञानाच्या गोष्टी करतो तेव्हा विज्ञान हे फारच एकतर्फी आहे . आणि त्याच्याच मुळे आपल्याला आश्चर्य वाटेल कि परदेशा मध्ये आपण समजतो कि भौतिकता खूप वाढलेली आहे ,ती सगळी वाढ आहे ती तोलायची क्षमता त्यांच्यात नाही . ते ते तोलू शकत नाहीत . कारण त्यांचा पाया अध्यात्माचा नाही . तो पाया आपल्या देशात ,विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अत्यंत भक्कम असा संत लोकांनी मांडलेला आहे . हे संतसाधु महाराष्ट्रात आले ,त्यांनी किती गहन कार्य केलय ,त्याची आपल्याला कल्पना सुध्दा आहे . आणि त्या Read More …

Public Program (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . एक गोष्ट आपण जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे . ते आपण बनवू शकत नाही आणि ते आपण बदलू पण शकत नाही . जे आहे ते होत आणि राहील . एक आणखीन दोष आहे तो असा कि मानव चेतने मध्ये तुम्ही सत्य जाणू शकत नाही . त्या साठी एक सूक्ष्म चेतना हवी . आताच आपल्या समोर प्राध्यापकांनी सांगितलं कि परदेशामध्ये असंतुलन वाढलं आहे . त्याची कल्पना आपल्याला इथे येऊ शकत नाही . आम्ही ह्या देशात फिरलेलो आहोत . आम्ही ह्या देशांना जाणलेलं आहे .वास्तव्य बरेच वर्ष तिथे झाल्या मुळे ह्याची दुर्दशा म्हणजे शब्दात सुध्दा सांगता येणार नाही . भौतिकतेत ते वाढले असणार . विज्ञानात वाढलेत कबूल . पण विज्ञान हे एकांगी आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे . त्यांनी मनुष्य एकांगी होतो हे तुम्ही जर बाहेर जाऊन पाहिलं तर लक्षात येईल . वाट्टेल तशी नैतिकता वापरल्या मुळे अनेक तऱ्हेचे रोग त्यांना झालेले आहेत . अशे रोग झालेले आहेत कि त्या रोगाचं निदान सुध्दा त्यांना लागु शकत नाही . ते ठीक होऊ शकत नाहीत . ६५टक्के लोक अमेरिके मध्ये अशा रोगांनी ग्रस्त आहेत आणि बाकीचे सुध्दा सगळे ग्रस्त होतील अशी त्यांना भीती वाटू लागली आहे . रोगाचं सोडा पण हिंसाचार इतका भयंकर आहे कि न्यूयॉर्क ला तुम्ही गेलात तर गळ्यात मंगळसूत्र सुध्दा घालून तुम्ही जाऊ शकत नाही ,कुणी तुमचं ओढून घेईल . इतका हिंसाचार ह्या देशामध्ये ,मी म्हंटल हि  डेमोक्रॉसी  आहे कि डेव्हनाक्रोसि आहे . आपण अजून इथे बसलेलो आहोत आपल्याला काही कल्पना नाही . आपण जर त्यांच्या सारखे केस केले ,त्यांच्या सारखा वेष केला तरी आपल्याला त्यांची कल्पना येणार नाही कि आतून ते किती पोखरले गेले आहेत. त्याला कारण Read More …