Day: 1990/12/11 (मंगळवार)
Archives: 2Sarvajanik Karyakram Shrirampur (India)
1990 -12-11Public Program, Shrirampur सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना माझा नमस्कार .सत्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सत्य हे आहे तिथे आहे. आपण ते बदलु शकत नाही. ते आपल्या काबूत घेऊ शकत नाही. आणि काहीतरी त्याच्यातनं सांगून ते सत्य आहे असं पटवून देऊ शकत नाही. आणि जे लोक असं करतात ते वास्तविकतेपासनं फार दूर आहेत. आणि स्वतःचं नुकसान करून घेणं , समाजाचं नुकसान करून घेणं आणि उलट्या गतीनी ते आपल्या नाशाला प्राप्त होतात . याला कारण असं आहे की सत्य एक आहे ते म्हणजे तुम्ही हे शरीर , मन , बुद्धी , अहंकार या उपाधी नसून शुद्ध स्वरूप आत्मा आहात . दुसरं सत्य असं आहे की सर्व चराचरामध्ये परमेश्वराची प्रेम शक्ती जिला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो ती कार्यान्वित आहे . तेव्हा ह्या ब्रह्मशक्तीला प्राप्त होणं हा योग आहे. आणि सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा ह्या योगाचा जन्मसिद्ध अधिकार तुमच्यामध्ये आहे. पण हे सगळं , मी सांगत असताना आपण माझ्यावर अंधश्रद्धा ठेऊ नये. उलट एखाद्या वैज्ञानिकासारखं, सायंटिस्टसारखं आपलं मन उघडं ठेवलं पाहिजे . डोकं उघडं ठेवलं पाहिजे. जर आपलं डोकं उघडं नसलं तर आपण वैज्ञानिक होऊच शकत नाही आणि मी जे सांगते ते जर अनुभवास आलं तर इमानदारी मध्ये ते मानलं पाहिजे आणि त्यात उतरलं पाहिजे. कारण हा एक कल्याणाचा मार्ग आहे. तो तुमच्याच कल्याणाचाच नव्हे तुमचा मुलाबाळांचा , तुमच्या सर्व समाजाचा, भारताचा आणि सर्व जगाचा हा कल्याणाचा मार्ग आहे. उत्क्रातींमध्ये आपण आता मानव स्तिथीला आलो . या स्थितीतच आपण मान्यता केली की फार उत्तम स्थिती आहे तर हे कायिक बरोबर होणार नाही. या स्थिती मध्येच अनेक Read More …