Puja

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Devi Puja Date 12th December 1990: Place Shrirampur Puja Type

मी यांना जे सांगत होते कि आपण हे म्हणतो कि परमेश्वर सर्व शक्तिमान हे. असं आपण म्हणतो म्हणजे आपलयाला माहित आहे लहानपणा पासून. आणि त्याशी आपण भक्तीही करतो पूजाही करतो सगळं काही करतो . पण तो किती शक्तिमान हे त्याची झर आपलयाला यत्किंचिन्तही, यत्किंचिन्तही  झर कल्पना आली तर आपलयाला कधी हि काही हि गोष्टीच भय वाटणार नाही . हे सारा विश्व तो एका बोट्टावर फिरवतो हे . असा सर्व शक्तिमान परमेश्वराचा साम्राज्यात आपण उतरल्या वर कोण आपलयाला त्रास देऊ शकणार हे. कोणाची अशी हिम्मत हे जो अपलयाला त्रास देऊ शकतो. नुसते तुम्ही त्या माणसाला त्या जीवनाला कोणालाही तुम्ही बंधन द्या अगदी एक बंधनात तोच मनुष्य ठिकाणी  नाही लागला तर तुम्ही मला कळवा कि माताजी आम्ही बंधन दिलो. पण तुमचा मध्ये स्थ्यरं असायला पाहिजे कारण झर मोडकं तोडकं  झर यंत्र असलतर ते फिरवून काय कामाचं किव्हा रडकं असेलतर त्याहून बत्तर. तर ते हिम्मतवाला झर तुमचं यंत्र असेल पूर्णपणे तर कोणाची हिम्मत नाही तुमचा केसाला सुद्धा हात लावणाची. हे लक्ष्यात ठेवलं पाहिजे. आपलयाला असं वाट ता के परमेश्वर म्हणजे कुठे तरी बसलेलं आहे तसं नाही. 

सहजयोगा मध्ये आता तो कृतयुगात उठरलेलं आहे कृतयुग म्हणजे ब्रह्मचैतन्य हे कार्यानवीत झालं आहे म्हणूनच आम्ही के कार्य एव्हडाच सहज करू शकतो. काल आपण पाहिलं कि पांच मिन्टात सगळे लोक पार झाले ज्यांनी कधी माझा नाव सुद्धा ऐकलं न्हवते ते. हे कस झालं. मिळवणुकी सहज सगळे लोक आले कुठे’तरी आपले बसले आणि सगळेच सगळे पार झाले. हे कसा शक्य हे. पण पार झाल्यावरती त्याच्यात गेहणात उतरण्याची आपली क्षमता असायला पाहिजे. तसेच आपला देशा मध्ये अतयंत कुसंस्कार आणि आपण घाणझुण गेलो हे धर्माचा बाबतीत गुरूच्या बाबतीत इकडे तिकडे फार त्रास झालेले हे. तेव्हा आपलं यंत्र धुररुस्थ करण्या साटी सर्व प्रथम आपण या सर्व गोष्टींकडे नजर केली पाहिजे. आणि जसा ज्ञानेश्वरने म्हंटले आहे निरंजन पाहणे म्हणजे बघायचं फक्त साक्षि स्वरूप होऊन. हे सगळं बघायचं. असं का. हि तुम्ही केलेही ते तुम्ही केलेही का . मग तुमचा लक्षात येईल क्या नसतावाघूळबुआपणे आपण डोक्यात ठेवले आहे. तुम्ही करून बघा तुम्हाचा काय इचछा असेल ना एकदा तुम्ही ते म्हटलं ते होणार.

एक गृहस्थ शुक्ला म्हणून मद्रासला माझा जवळ आले वर्षभरच.जास्त नाही आणि मग ते मुंबईला आले. मोठा पथावर आहेत ते. त्यांना अशी तार आली कि त्यांची आई फार आझारी आहे कॅन्सर नि मारणार हे. तर ते लगेच आपल्या आई कडे रोहतक ला गेले. डॉक्टर नि सांगिलते कि तीन दिवसात हि बाई मारणार. तिचा गल्लोपिंग कॅन्सर झालेला आहे. आता काय करायचं हॉस्पिटल मध्ये काही करता येत नाही. तर घरी येऊन म्हणे माताजी मी फक्त तुमचा फोटो समोर बसून मी प्रार्थना केली माताजी माझा आईला बर करा. पण त्या माणसाची गेहराई काय. तीन दिवसात मरणाची ऐवजी ती बाई एक्दम खाड्कन बरी झाली. तिला घेऊन ते मुंबईला आले. मुंबई ला तिला कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवलंतर म्हणे तिला कुटला कॅन्सर हे. तिला कॅन्सर नाही काय नाही. मग मी भेटले त्यांना. पण ती गेहराही तुमच्यात असला शिवाय त्या गहाणतेत तुम्ही असल्या शिवाय हे कार्य होणार नाही. झर अर्धवटपणा असला तर मग रामदास स्वामी ने सांगितले आहे अल्पाधारिष्ट पाय बर चला तुमचा झालं चला. 

बुद्धिचापरले धाकवण्याची गरज नाही. परमेश्वराचा आशीर्वाद असा फार मोठा आहे. पण तो देणाराही पाहिजे आणि घेणारेही पाहिजे नुसतं देणारांनी काय होणार. तत्क्षण काम होता. तत्क्षण गोष्टी घडतात म्हणून अपलाल्या माहिती आहे कि माझा जवळ कोणी सेक्रेटरी नाही हे माझा काय अर्गनाइसेशन नाही हे मला काही कशाचं माहित नाही हे. हे लोक पैशे काय घेतात त्याची व्यावास्ता काय मला काही माहित नाही. पण सगळी काम होतंच हे. आणि प्रत्येक जे गोष्ट होते त्या गोष्टीला एक नाटक समझलं पाहिजे. त्या नाटकामध्ये काहीतरी बर निघतं. त्याच्यात काहींना काहीतरी फळ मिळणार हे. काही न काही कारणांनी ते का होते हे तुम्हाला नंतर लक्षात येईल.

पण ध्यान धारणेंनी समर्पित होऊन जो पर्यंत तुम्ही आपल्या ते गहाणतेला शिवत नाही किव्हा त्याच्यात उतरत नाही तो पर्यंत आमचं म्हणजे बोलणं सुद्धा बोलांचीबाबत बोलाचीचकट. आणि हा रिकामटेकडे डोक्याला नसते विचार असतात ते सोडून निरविचारितेत तुम्ही उतरता आलं पाहिजे कारण आपले जे अध्यात्मिक प्रगती होते ती फक्त निर्विचारतेतच होत. हे लक्षात टवेल पाहिजे. विचाराचा पलीकडे गेल्या शिवाय आधयात्मा बसू शकत नाही. म्हणून ध्यानामध्ये जो पर्यंत निर्विचरिता येत नाही तो पर्यंत आम्हाला काही ध्यान झालेलं नाही जे लक्षात घेतला पाहिजे आणि त्या ध्याना मध्ये आपण प्रगती केली पाहिजे 

मी अनेकदा सांगितले आहे हि महाराष्ट्र हा आध्यात्माचा पाया आहे सर्व जगाचा विश्वाचा. आणि सर्व जगाला आध्यात्मची पुरवणी या महाराष्ट्रातनं होणार हे. या लोकांना मी किती म्हंटलं कि तिकडे जाऊया इकडे जाऊया तिकडे होईल व्यवस्था. नाही नाही म्हणे आम्हाला महाराष्ट्रातच जायचे. विशेषता या महाराष्ट्राची दुर्दशा दिवसांनी दिवस खराबच होत चालली हे. मला त्याची लाज वाट ते. पण त्यांना महाराष्टाच्या आवडतं. आम्हाला महाराष्ट्रालाच जायचे. दुसरं कुटलास प्रोग्रॅम बनवत नाही.

त्याला कारण यांना चैतन्य दिसतय. माहित आहे कुठे चैतन्य. आणि आपलयाला अजून दिसतच नाही. आपला सगळं वारसा असून आपण या इतक्या मोट्या विश्वाचा कुंडलिनी ज्या देशात आहेत अशा देशात आपलं जन्म झालेलंय हा महाराष्ट्र आपली सुद्धा आपलयाला जाणीव नाही मग परमेश्वराचा जाणीव काय होणार. मी काय उघिचंच सांगत नाही तुमहाला आणि महाराष्ट्राची जे संस्कृती आहे ते असे म्हणू शकता कि भट्टजीलोकाने काही खराब केलं असेल आणि धर्म अधर्म जाती पाती हे नंतर बनवल्या , या झरी मूर्खपणा झालेला असला तरी सुद्धा जे मूल्यता हा जे अपली संस्कृती आहे त्यातलेच जे विचार आहे ते इचछा सर्व जगाला बचावु  शकता . या लोकांचा संस्कृती मध्ये नैतिक मूल्य नाहीत आणि नैतिक मूल्ये झरही आपल्या नॉर्थ  इंडिया मध्ये असली तरीही मुसलमानांचा मूर्खपणा मुले त्या लोकांची नैतिक मूल्य वेगळी आहेत (२९.५६).

पण अजुन  महाराष्ट्रात मी म्हणेन Shri शिवाजी महाराजांना त्या बद्धल धंयवाद दिले पाहिजे . आणि आता याचा पुढे तुम्ही सर्व झर लक्षात घेतलं कि आमचा जवळ जी ही संपदा आहे तिचा फायदा सर्व जगाला होणारे. तर आपली जवाबदारी किती मोठी हे . आपण कसे वागतो हे महत्वाचं नाही, आमचा आत मध्ये किती गहनता आली आहे आणि आमची कुंडलिनी कुठवर आली आहे तसेच आमचा मध्ये चैतन्य किती वहाहताय या वर अवलुम होणार . तशे  मराठी लोक तोडे पट्टकल्च आहे स्वाभावित , तोडे पट्ट्कळ असतात , काय हरकत नाही . बोलताना तोडा पट्ट्कळपणा असतो. अजीजी नसते तशी हिंदी भाषेत असेल आणि परखळपणे बोलण्याची पण इथे व्यवस्था आहे आणि लोक ते पसंद करतात. त्यात काय हरकत नाही.पण हरकत जी येते अपली ती इथे कि आम्हाला जे साधू संताने एवढे मोठे सांगितले आहे ते नजाणुन घेता आम्ही सहजयोगात सुद्धा व्रत वैकल्य, उपाशी मरणं , केस बाधरुन घेणं , काय काय प्रकारआहेत. याचा व्रत त्याचा व्रत म्हणजे पुष्कळ इथल्या पुरुषांचं असं म्हणणें आहे कि आमचा बायका अजून तेच करतात. सोळा सोमवार कराची, आहो तुमचा आई ने केली आणि त्यांचा आईने केली तर काय मिळवलं त्यांनी. हे कुणी सांगितलं कि तुम्ही उपाशी मारा आणि पैशे आम्हाला ध्या हे अशातला प्रकारलंत हे तो. आणि उपवास करण्याचा इतकं शौक आहे महाराष्ट्रात तर देवाने सांगितलं बर तुम्हाला उपास करायचं ते असाच उपास करा चला. घ्या गरीबी कारण तुमचा शौकच आहे उपासचा तर मग ठीकहे . उपास करायला पाहिजे ना मग मरा उपाशी. देवानें सांगितले बरं घ्या तुम्हाला उपाश्च पाहिजे कशाला, आम्ही तुम्हाला देतंस नाही तर उपास होणारच, मग फारच पुण्य लाभेल नाही का. म्हणजे जे उपाशी पोटी हे त्यांना काहीतरी विशेष पुण्य लाभतं अशी झर तुमची कल्पना असेल, फार चुकीचं हे. 

जो पर्यंत मनुष्याचं लक्ष्मी तत्त्व जागृत होत नाही पूर्णपणे, किव्हा तृप्त होत नाही, तो पर्यंत महालक्ष्मी तत्त्व जागृत होत नाही. ते म्हणजे काय. के ज्यांनी माणसाला असा वाटतं कि पुढे काय ते बघितले पाहिजे. आणि लक्षमी तत्त्वातला एक भाग हे पोट भर जेवणे. उपाशी मरणे नाही. म्हणजे हे जे अप्लायला उपासमारीचे डोळल्या लागलेलंत ते कृपा करून तुम्हा बायकांनी विशेष करून संपवलं पाहिजे. बर झर एकादा मुलगा आपला आईवर रुसला तो जेवत नाही. आईला झर त्रास ध्याच असलं तर उपाशी मरायचं . तेव्हा तुम्ही सहजयोगात कशे येणार, त्यात वाढणार कशे. परत पुरुषाचं असाहे कि आम्हाला तंबाखुची सवई हे आता काय करता माताजी आम्हाला तंबाखुची सवई हे. 

तंबाखु शिवा पुरुषांचा चालू शकत नाही तोंडाला किती घाण आली, दात पडले तुम्हाला कॅन्सर झरी झाला तरी ती तंबाखु काही  सुटणार नाही, मरेचं तो , तो म्हणेल माझा, मेल्या वर माझा ऊंझळीत थोडी ठेवूनच द्या . नाही तर कुठे थोडीशी जाग बीग आली तर तेव्हडं त्रास व्हायचं मला तंबाखु शिवाय. आणि राक्षशीण हे. पण ती सोडायची कशी, हे लोग जेव्हा एवढे घाणरड्या व्यसनातून सुटले तर तुम्ही का सोडू शकत नाही . इत्तर बाबतींत मात्र फार जबरदस्त होतो आपण , झात म्हंटली कि वाह तलवार घेऊन उभे. पण बायकांवर ओरडायचं असलं तर वाह दूरूनच कळत कि आहे कोणी बोलतो मराठा तिकडे. पण जेव्हा तंबाखूची गोष्ट असली तर मग कलेक्टर साहेब असला तरी तो आपल्या छपराशीच थोड तंबाखु असली तर द्या इकडे . त्याला हि काही आपली काय इज्जत है तीच लक्षात राहत नाही. हे तंबाखू म्हणजे आपल्यावरचा एक मोटा भारी श्राप हे. तर बायकांनी सुद्धा तो घाणेरडा प्रकार दातांनी लावायच आणि पुरुषांनी हे तंबाखू खाणाईच प्रकार एक्दम बंध केला पाहिजे, कमितकमी. दुसरा आपण आता विश्वधर्मी झालोत . आपल्या झात पात काही नाही . झात म्हंटल जे देवी ने म्हंटले कि या देवी सर्व भूतेषु झाती रूपेणन सौनस्थिता. सगळ्यांचा मध्ये जी त्यांची एक प्रवत्तरी है जे ऍप्टिट्यूड है ती झात . 

नाहीतर एकदा ब्राम्हण जाऊन राज्य करतील आणि मराठी जाऊन भांडी घासतील अशातली स्तिथी आलेली है. कारण त्यांना जे त्यांची झाती आहे ते ओळख येते म्हणजे ब्राह्मण राज्य करतात ते खरं  क्षत्रिय हे पण स्वतः ला ब्राम्हण म्हणतात. हा सगळा जो घोटाळा हे तो लक्षात तेव्हा तुमचा येईल जेव्हा तुम्ही झानाळ कि तुम्ही विश्वधर्मी आहात . विश्वधर्मा मध्ये एकच झात है म्हणजे सहजयोगी . सहजयोग्यानी सहजयोगातच लग्न करायचं . पण अजुन हे महाराष्ट्रात पुष्कळशे लोक अशे आहेत जे सहजयोगात लग्न करत नाही  बाहेर लग्न करतात . मग झाल्यावर माताजी फार त्रास देतात तो कशाचा, उंड्याचा. कशाला केलं तुम्ही तिकडे लग्न , आम्ही सांगितले होते का  (३६.५६)

मग आणखिन कशाचा , मारतात म्हणे. असं का. आणि मारून त्यांना पटवलं घरी, मुलीना , तरी परत लग्न करायचं असलं तर झातीचच पाहिजे . तुम्ही विषवधर्मी झालात आणि विश्वधर्मा मध्ये न्याय हे अन्याय नाही . कोणी कोणावरती अन्याय करायचं नाही हा विश्वधर्म आहे . सगळ्यांचा वरती प्रेम झालं पाहिजे ,सीला वैधव्य आलं तर ती एव्हडी दुखी होते आणि पुरुषला मात्र १३वा दिवस असं कधी येतो असं वाट ते आणि १४वा  दिवशी त्यांचा निमंत्रण ठरलं असतं लग्नाचं. त्यांना वैधव्य येत नाही. हे सगळं केलंय कोणी, काय परमेश्वराने असं  केलं असेल? सहजयोगात आपण वैधव्य मानत नाही आणि कोणा ही बाई नि डोक्याला झर असा विचार ठेवला असं डोक्यात कि मी विधवा आहे तर ती सहजयोगिनी नाही . कपाळाला व्यवस्तीत कुंकू लावून यायला पाहिजे. आम्ही वैधव्य मानत नाही. आणि विधवांचं विवाह करणे हे आम्ही आमचा परम कर्तव्य आम्हीं समझतो. 

नंतर झाली अंध श्रद्धा. आपलाच धर्मात अंध श्रद्धा असे पण ख्रिश्चन लोका मध्ये भयंकर अंध श्रद्धा आहे . आणि मुसलमानात ला काही विचारायलाच नको. धर्मान्धता त्याचा अगदी अवतार हे. पण ते समोर दिसतात. हे ख्रिश्चन लोक दिसणार नाही, ते गुप्तपणा नि येतात. फारचं गुप्तपणानी हे लोक धर्मांधा आहे . आपल्याला दिसत नाही. आणि आपण जे आपल्या भारतीय म्हणतो त्यांची जे काही धर्मान्धता जे परागकोटीचं आहे त्याला काही हि उत्तरच नाही माझा कडे 

पण सगळयात जास्त आपण झर दक्षिणात गेलो तर दिसेल कि काय प्रकार चाललें आहे तिथे देवाचं नावांनी. अरे काय करता तुम्ही देवाचा नावा. कशाला हे डोंग करता. बाई चे केस कापायचे , तिला म्हणायचं तू लोळलं घे संबन्ध एव्हडा आमचाचर पाणी उतर चालायचं. बघवत नाही मला काय काय प्रकार देवाचा नावावर आपण केलॆलॆच. देवदासी घ्यायचा, तरुण मुलींना आणून ठेवायचं लग्न करून दह्याचं नाही त्यांना वापराईचं, अजून सर्राचालू हे तिथे प्रकार, देवांचा नावावर गुरूंचा नावावर ज्या माणसाला इतकी विषय भावना आहे’ किव्हा इतकी पैशाचं हाव है तो मनुष्य कशा तुमचा गुरु होऊशकतो. सहजयोगात येऊन सुद्धा काही लोक अशे आहेत कि अजुन हि अशे बेकार लोकांचा माघे धावतात. आणि त्याचे त्रास होतात मग आम्ही ते स्वच्छ करत बसायचं. परत गडबड झाली म्हणजे परत स्वच्छ होऊन घे . अता जन्म भर आम्हाला हे धंधे लागलेलंय. 

आपण विश्वधर्मी झालो, आपल्या यांनी पुष्कळ शिकलेलंय पण यांचे आपण तोडासा शिकायला पाहिजे. यांची शिस्त आत्म्याधारकपणा आणि सगळं सोडून उभे झाले ते साहजयोगात, सगळं सोडून. मागल सगळं सोडलं त्यांनी आणि सहजयोगात उभे झालेत. इथकत न्हवे पण सहजयायोगाचा साटी जे काय आवश्यक असेल ते वाचन, इथे अशे अशे लोक आहे जे कुराणा वरती, बायबल वर भाषे लिह्ल्येत. सहजयोगधून. त्यांची मला इतकी मद्दत हे जशी माझा सात आहे माझंच डोळे आहेत , अगदी माझच झालं सगळं काय त्यांचं . काय म्हंटल कि हाजर. हे कसा करायचं ते हाजर, ते म्हटलं तर ते हाजर. कमालीचे लोक आहेत ते. बर यांना गणपतीचा ग ही माहित नाही . तर हे कुठे तरी फार मोठे लोक त्यात देशात जन्माला आले कि काय, किव्हा यांना हे कार्य असेल कि त्या देशांचा उद्धार करायचा म्हणून त्या देशात जन्माला आलेत कि काय किव्हा आपल्या देशातले काहि मानुभव तिकडे जन्माला आले कि काय, अशी मला शंका होते. फार विधवानहेत फार शिकलेलेत फार मोट्या त्याच्यात राहतात . यांचा तुम्ही घर जाऊन बघा, मोटोरही आहेत सगळे ऐषोआराम हे. इथे वाटते तिथे झोपायला तय्यार हे. तेव्हा यांचा पासनं आपण शिकायला पाहिजे. त्यांनी आपला पासून पुष्कळ शिकलेले आहे ते दिस्तई  मोर पण आपण त्यांचा पासनं काय शिकलेलंहोतं ते लक्षात घेतलं पाहिजे. 

आता बघा तुम्हाला गर्मी होत होती तर थंड हवा आला . सगळी व्यवस्था आहे फक्त हे जाणलं पाहिजे कि आज कृतयुग सुरू झालेली आहे आणि आपण सहजयोगी आहोत विशेष. तर सगळा मागचा गोष्टी विसरून जायचा. ते सगळे कू-संस्कार हे आणि आता जे सहजयोगाचे संस्कार हे, ते पांघरायची , त्यांनी सौंदर्य वाडेल अध्यात्माचं. अजून ७ पूजा आहेत माझा, प्रत्येक दुसरा दिवशी पूजा हे. पूजेचा मला थोड त्रासच होतो कारण तुम्ही लोक तितकं ओडून घेत नाही चैतन्य. 

तेव्हा आजचा पूजेला एवढे मी सांगितले ते लक्षात ठेवा सुरुवात आता आहे इकतरेंहि  कि सहजयोगी होण्या साठी जे काही भोजे आपण डोक्यावर घेतले ते सोडून टाकायचं . आपली मुलं बाळं वाघेरे सर्व काही देवांचा हवाली करायचं . सगळं काम सुंदर होणार. आणि या सगळ्या जे कल्पना आपल्या डोक्क्यात हे, किती वर्षा पासून लोक झगडत राहिले कि जायला पाहिजे पण जातच नाही . ते आता सहजयोगातला प्रकाश बए सिद्ध   घून आपण सगळं विसरलं पाहिजे. आणि जे या लोकांना आपला बद्धल वाटतं ते सिद्ध केलं पाहिजे. वाटलं पाहिजे त्यांना . त्यांना अजून माहितीच नाही कि आपला दुसरा श्राप म्हणजे भाऊबंदकी. त्यांना भाषा समझत नाही,हे त्यांना माहितच नाही कि एक दुसरंच गळे घोटाळला आपण फार उशार लोक आहोत. स्वतः ची प्रगती नाही झाली तरी चालेल पण दुसऱ्या पुढे गेला तर त्याला खेचुन काडा. हे यांना माहित नाही हा . त्यांना असा वाटतं कि अगदी आपण संत साधू आहोत. फार चांगले लोक कधी आपापसात भांडण करत नाही. अशी याना आप्ल्या बद्धल कल्पना. तर मी सांगायचं तरी त्यांना काय? पण सारखं आपाप्सा मध्ये खलबत हेच चालू केली कि दुसऱ्याला कसा खेचून घ्याच. त्याचा काय फायदा होणार हे. हि सगळी घाण आहे  राजकरणात राहू देत आपला सहजयोगात नकोत.

नेहमी मी भाऊबंदकी बद्धल बोलत असते पण पुष्कळदा हि गोष्ट डोक्या वरून जाते लोकांना समझत नाही कि आम्ही सहजयोगाचा शक्त्याच मिळवू शकत नाही झर आम्ही भाऊबंदकी केली तर. हे मी दिक्षून सांगते, नेहमी जे वेळात तुम्ही दुसराचा चर्चा करता तुम्ही असा विचार करा कि मी त्यांचं जागेत असतं तर काय केलं असतं. मी असा नाही मी विचार करते . कि मी असा झर म्हंटल तर कि आम्ही कशाला मरायचे या लोका साठी , आम्हाला काय सहजयोगाची गरज आहे का? नाही 

मी असा विचार करते कि या लोकांची काय गरज हे , याना काय पाहिजे, यांना काय ध्याचे आहे मला . मला काय पाहिजे तो कधी डोक्यात विचारत येत नाही मला. म्हणजे माझं डोकंच वेगळं आहे मला वाटतं . कि मला हे पाहिजे कि आज पर्यंत मी कधी माझा यजमानाला सुद्धा मम्हंटल नाही कि तुम्ही हे वस्तू आणुन द्या ते सुद्धा अगदी म्हणतात कि तुझा सारखी बायको मी पाहिलेली नाही. पण मला काही नकोच तुम्हाला काय पाहिजे ते मी नेहमी विचार करते. तुम्ही ह्या परिस्तिथी वर कशा वाघाल हे मला समझत आणि म्हणूनच मला तुमचा वर प्रेम हे. कि या परिस्तितीत आणखीन काय करणार बर तो मानवच हे. तसंच तुम्ही सुद्धा विचार ठेवलं पाहिजे एकदुस्रा बद्धल. आणि प्रेम वाढवला पाहिजे. आपापसात प्रेम वाढवला पाहिजे. तर या मंडळी ला बघा किती देशातले वेगळे वेगळे आलेत आणि तुमच्यावर त्यांचा किती निस्सीम प्रेम हे. काल सगळे त्या खेड्यातला लोकांना कशे ते उंग्गल कपडे घातले होते, गळ्यात गळे घालून मिट्या मारत बसले होते. त्यांना म्हंटले कि तुम्ही जा तरी हि तिथे मिट्या मारत बसले सगळे.

याना एव्हडा प्रेमाचा समझते पण आपलयाला आपाप्सा येणार नाही तर काय होणार. मुलांना सुद्धा हे शिक्षा घ्याची एक दुसरंच वर शेरिंग झालं पाहिजे. एक दुसरांना आपला प्रेम दिलं पाहिजे मुलांचा पास्न. ही भाऊबंदकी सहजयोगांनी संपलीच पाहिजे महाराष्ट्रात.आपण सर्व एक आहोत आणि एकाएकीच आपण संतान आहोत . आणि आई ला यांचा पलीकडे आणखीन काय पाहिजे कि माझा मुले सगळे सौख्य आणि अनंतात नांदत हे . दुसरा काहीही नको . तर आपला सर्वाना माझा अनंत आशीर्वाद

.