Public Program Sangamner (India)

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्या बद्दल सांगायचं म्हणजे सत्य आहे तिथे आहे . ते आपण बदलू शकत नाही आणि त्याला आकार देऊ शकत नाही . जे लोक सत्याला न शोधता अनेक कार्य करतात त्या कार्यं मध्ये अनेक दोष असतात . सत्याला जाणण्या साठी मानव चेतना अपुरी आहे . आणि म्हणूनच ह्या मानव चेतनेच्या पलीकडे ह्या मानवी बुध्दीचे प्रांगण ओलांडून आपल्याला नव्या प्रांगणात उतरले पाहिजे . ते उतरल्या शिवाय आपल्या मध्ये नीरक्षीर विवेक येऊ शकत नाही . केवळ सत्य मिळू शकत नाही . आज काल नवीन नवीन गोष्टी लोकांनी सुरु केल्या आहेत . काहीतरी नवीन टुम काढायची आणि तरुण मुलांची दिशाभूल करून त्यांना आरडाओरडा करायला लावायचा ,त्यांच्या बुध्दीवर झापड घालायची असे अनेक प्रकार मी बघते आहे . आमच्या सहजयोगा मध्ये हि जी फॉरेन ची मंडळी अली आहेत हि फार विद्वान,शिकलेली ,फार उच्च शिक्षणानी अलंकृत अशी आहेत . आणि यांच्याही देशामध्ये पुष्कळशा अशा गोष्टी होत्या ज्यानी ते भांबावून गेले होते . आणि त्यांना समजत नव्हतं कि ह्या सर्व गोष्टी आपल्या देशामध्ये का होतात . सगळे सुशीक्षीत असताना इतकं तिथे विज्ञानाचं स्वरूप पसरलेलं असताना सुध्दा अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती कि अमेरिके सारख्या देशामध्ये सुध्दा भूतविद्या आहेत ,अनेक विद्या आहेत ,आणि त्यांना स्वातंत्र्य असल्या मुळे वाट्टेल त्या प्रकारचे ते लोक कार्य करतात . तसच विज्ञान सुध्दा हा एकांगी विषय आहे . ज्या देशा मध्ये विज्ञान वाढलेल आहे ,आपल्याला माहित आहे कि मी सर्व देशां मध्ये फिरलेली आहे आणि बरीच वर्ष मी परदेशात घालवली आहेत .  आणि माझ्या एकंदर तिथल्या परीस्तीतीला बघून अशा कल्पना झाल्या आहेत कि नुसतं विज्ञान करून मनुष्याची सर्वांगीण उन्नती होऊ शकत नाही . आणि म्हणूनच हे लोक आता रसातळाला चालले आहेत . त्या देशांना तुम्ही बाहेरून बघता कुपमंडूका सारखं जस Read More …