Public Program

Satara (India)

1990-12-15 Public Program, Marathi Satara India DP-RAW, 80'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्य म्हणजे काय आणि आपण ते का शोधतो हे समजून घेतलं पाहिजे . सत्य म्हणजे जे संत साधूंनी आणि अवतारणा मध्ये सांगितलं आहे . तुम्ही हे शरीर ,मन ,अहंकार ,बुध्दी या उपाधी नसून शुध्द आत्मा आहात . हे सत्य आहे . आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सर्व सृष्टी मध्ये व्यापलेली अशी अत्यंत सूक्ष्म शक्ती जिला आपण परमचैतन्य अस म्हणतो . हे दोन सत्य आपण शोधून काढले पाहिजेत . आणि ते का आपण शोधतो कारण आजच्या काळात या कलियुगात विशेषतः आपण बघतोआहे कि प्रत्येक तऱ्हेनी आपल्याला त्रास होत आहे . जर माणसा जवळ पैसा असला तरी  तो बेकार जातो आणि नसला तरी तो त्रासात असतो . ज्या देशानं मध्ये अत्यंत विपुल असा पैसा आहे त्या देशातले लोक आज इथे आपल्या कडे आलेले आहेत . त्यांच्या जवळ मोटारी ,गाड्या सगळं काही ,श्रीमंत लोक आहेत . ते ह्या महाराष्ट्रात एव्हड्या साठी आलेत कारण पैशाच्या धुंदीत तसच विज्ञानाच्या घमेंडीत त्या फुशारकीत एकाकी जीवन झालं आहे . त्या एकाकी जीवनाला ते कंटाळले कारण त्यामुळे अनेक त्रास झाले आहेत . अमेरिके सारख्या देशामध्ये आज तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ६५ टक्के लोक घाणेरड्या रोगाने पीडित आहेत आणि लवकरच ते ७० टक्के होतील अस भाकीत आहे . त्यातून त्यांना सुटका नाही . तरतऱ्हेचे रोग त्यांना झाले आहेत . रोगाचं नव्हे तर तिथे हिंसाचार फार बोकाळला आहे . तुम्ही कोणत्याही गावात ,खेडेगावात अस बसू शकत नाही . किंवा रात्रीच्या वेळेस एकट कुठ जाऊ शकत नाही . न्यूयार्क ला जायचं म्हंटल तर आपले दागिने ,मंगळसूत्र सगळं काढावं लागत नाहीतर लपवाव लागत . तिथं कुणी तुम्हाला सोडणार नाही . इतकी तिथे हिंसाचाराची वृत्ती वाढली आहे . तेव्हा हि जी आपण मोठी भारी रचना केली आणि अस वाटलं कि काय जे भव्य अस आपण काहीतरी मानवाच्या हितासाठी केलेलं आहे ते कोलमडून पडत आहे . आपण ह्या अतीत गावात राहता तेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टींची कल्पना नाही . आम्ही ५६ देशातून फिरलेले आहोत ,त्या पेक्षा असं समजल पाहिजे कि काही काही गोष्टी आपल्यात आलेल्या नाहीत . ज्या गोष्टी त्यांच्यात आल्या त्या त्यांना कशा नीट करायच्या ते समजत नाही . त्याचा काही मार्ग त्यांना मिळत नाही . 

गरिबी हि सुध्दा आपल्या देशाला लागलेली कीड आहे . तसच जातपात ,धर्म अधर्म अशा अनेक प्रकारच्या किडा आपल्या देशात आहेत . त्यातल्या त्यात लोक नवीन नवीन टुम काढतात आणि नवीन नवीन मंच तयार करतात . आता एक  नवीन टुम मी पहिली त्याच नाव आहे अंधश्रद्धा निर्मूलन . त्या बद्दल मला सांगितलंच पाहिजे ,कारण अशीच टुम एकदा इंग्लॅन्ड मध्ये निघाली आणि ती संबंध पाश्चिमात्य देशात पसरली . आणि त्यांनी सांगितलं आम्ही अँटीकल्चर म्हणजे जेव्हडी संस्कृती त्याच्या विरोधात आम्ही सगळे उभे आहोत . तेव्हा कॉलेज ची मुल शाळा सोडून कॉलेज सोडून बाहेर निघाली . सगळ्यांनी भलते सलते कपडे घालायला सुरवात केली . स्वतः ला हिप्पी म्हंटल . डोक्यात राख घालून ,फाटके कपडे घालून गावोगाव फिरले . आणि अशा रीतीने त्यांचं फार नुकसान झालं कारण त्याच्या नंतर ते ड्रग्ज घेऊ लागले ,दारू पिऊ लागले . आणि फार वाईट परिस्तितीत गेले . आणि शेवटी मरणासन्न आज ते प्रत्येक देशात आहेत . अशा तऱ्हेने आता अंधश्रद्धा निर्मूलनाची टुम लोकांनी काढली आहे . त्यांनी तुमच्या मुलांना ,हे रिकामटेकडे लोक आहेत काहीतरी आपला एक मंच तयार करायचा म्हणून यांनी आपला एक मंच बनवला आहे . तेव्हा ज्ञानेश्वर तरी होते किंवा नाही , किंवा ज्ञानेश्वरांवरच यांनी झोड उठवली आहे . मग तुकाराम ,एकनाथ वैगेरे हे सगळे लोक खोटे होते कि काय ?तर अंधश्रद्धा जाणण्याच कार्य फक्त डोळस श्रध्दा असणाऱ्या अशा संतानाच होत . आणि त्यांनी कितीतरी अशी कार्य केली आहेत . कि ज्याच्या मुळे आपल्या अंधश्रध्दा दूर झाल्या आहेत . एकनाथ महाराज महाराच्या घरी जाऊ जेवले ,महारांशी संबंध ठेवला . त्याच्यावर पुष्कळांनी झोड उठवली ,पण ते सुध्दा सर्व मग नष्ट झाले . त्यानंतर तुकारामांना सुध्दा किती लोकांनी त्रास दिला कारण त्यांनी सांगितलं कि “झाला महार पंढरीनाथ “. जातीपातीवर अंधश्रध्देवर कितीतरी गोष्टी ह्या लोकांनी लिहिल्या ,सांगितलं ,उघडपणे ,परखडपणे त्यावर भाष्य केल . विशेतः रामदास स्वामींनी तर फारच अशे खोटे गुरु ,अशा लोकं वरती फारच झोड उठवली आहे . त्याच्या नंतर आपल्याकडे आणखीन दासगणु हे स्वतः ब्राम्हण होते ,तसेच नृसिह  सरस्वती हे फार मोठे विद्वान तसेच ब्राम्हण जातीचे होते . त्यांनी असं म्हंटलंय कि “आम्हांसी म्हणती ब्राम्हण ,आम्ही जाणिले नाही ब्रम्ह ,आम्ही कसले ब्राम्हण “. इतक्या प्रांजळ पणाने त्यांनी या गोष्टी मांडल्या आणि सांगितलं त्याला कारण आहे ते साधुसंत होते ,त्यांची जात विश्वजात होती . आणि धर्म त्यांचा विश्वधर्म होता . त्या उच्च स्तितीला पोहोचल्यावरच ते पाहू शकले हा भेद अभेद हे सगळ अज्ञाना मुळे माणसात येत . आणि ते अज्ञान गेलं पाहिजे . ते फक्त हे लोकच बघु शकत होते कारण त्यांनाच फक्त माहित होत कि कोणची गोष्ट अंधश्रध्दा आहे आणि कोणची नाही . कोण साधुसंत आहे आणि कोण असंत आहे याची ओळख फक्त त्यांनाच होती . 

एकदा नामदेव गोरा कुंभाराला भेटायला गेले ,नामदेव शिंपी गेले तर गोरा कुंभार तिकडे पायाने मातीला तुडवीत होते . तेव्हा त्यांना बघून नामदेव स्तंभित झाले ,तेव्हा नामदेव त्यांना म्हणतात ,”निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी “,मी निर्गुणाला भेटायला आलो होतो पण इथे मला सगुण रूप दिसलं .हे  कस शक्य आहे ,कोणीही मनुष्य अशा रीतीने दुसऱ्या बद्दल बोलू शकत नाही . जो पर्यंत तो स्वतः आत्मसाक्षात्कारी नाही . जो मनुष्य आत्मसाक्षात्कारी आहे तोच दुसऱ्यातले गुण बघू शकतो . आणि जाणू  शकतो कि हा माणूस आत्मसाक्षात्कारी आहे . 

आता आपल्याला जी श्रध्दा असते त्याच्यात चार प्रकार असतात . एक प्रकार असा कि ज्याला आपण तामसिक श्रद्धा म्हणू . म्हणजे कुणी भामटा आला त्याच्या कडे जायचं ,कुणी बसला खोट बोलला त्याला ओळखायचं नाही . आंधळ्या सारकी श्रध्दा ठेवायची . त्याच्या मागे धावायचं ,त्याला गुरु मानायचं ,त्याला पैसे द्यायचे . हि तामसिक झाली . आता राजस श्रध्दा ज्याला आपण म्हणतो त्यात पुष्कळशे राजकीय कार्यकर्ते ,आता माहित आहे दिल्लीला सगळे तांत्रिक येऊन बसलेत त्यांच्या चरणाशी बसलेत . हि राजस श्रध्दा म्हणूया . आणि सात्विक श्रध्दा ती कि ज्या माणसा मध्ये चरित्र आहे ज्या माणसाने उज्वल कार्य केलेलं आहे ,जो खरोखरी फार मोठा मनुष्य आहे ,त्याच्या बद्दल श्रध्दा ठेवणे हि सात्विक श्रध्दा आहे . आपली संतांच्या बद्दल ची जी श्रध्दा आहे ती सात्विक श्रध्दा आहे . कारण त्यांचं चरित्र बघा ते दारू पीत नव्हते ,कुणाला मारत नव्हते ,ओरडत नव्हते ,त्यांनी कधी कुणाला त्रास दिला नाही . “जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती “,साऱ्या जगाच कल्याण त्यांनी आपल्या मना मध्ये घेतलं होत . त्यामुळे त्यांना आपण एव्हडा मान देतो आणि आपण त्यांना मानतो . त्यांनी जे सांगितलं आहे  कारण ते  इतके उच्च प्रतीचं होते . आजकाल चे लोक काय आहेत ,कोणी तुम्ही मनुष्य बघा सर्व तऱ्हेचे धंदे करायचे आणि वरून दांभीक पणा करायचा . म्हणायचं आमचा देवावर विश्वास आहे ,तिकडं पंढरपूरला जाऊन बसायचं . अशे अनेक प्रकार लोक करतात . हा दांभिकपणा ,खोटेपणा ,भोंदूपणा त्यांच्यात नव्हता . जे असेल ते अतिशय परखड पणे ,न भिता ,निर्भयतेने ते सांगत असत . आणि त्यांनी सर्वाना समजावून सांगितलं प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा त्यांचा संबंध समाजाशी आला त्यांनी उघड पणे त्यांना सांगितलं कि तुम्ही या अंधतेत राहू नका प्रकाश मिळवा ,प्रकाश मिळवा ,तो प्रकाश काय ,तो प्रकाश म्हणजे आत्म्याचा प्रकाश . तो आपल्याला मिळाला पाहिजे . जर आपल्याला आत्म्याचा प्रकाश मिळाला तर त्या प्रकाशात आपण बघू शकतो कि कुठं आपण अंधता केली आणि कुठे नाही . समजा इथे अंधार असता आणि हातात एक साप आहे कुणाच्यातरी ,त्याला जर सांगितलं तुझ्या हातात साप आहे तो फेक ,तो हट्ट करेल कि नाही हा दोरखंडच आहे कारण तो अज्ञानात बसला आहे अंधारात बसला आहे . पण जसा थोडासा प्रकाश तिथे येईल तसा तो आपोआप तो साप सोडून देईल . तसच आपल्या सहजयोगाचं आहे .  

ज्ञानेश्वरांनी एक फार मोठी कामगिरी केली कि ,नाथ पंथीयां मध्ये अशी परंपरा होती कि एका गुरूला एकच शिष्य . त्याच्या पलीकडे जायच नाही . आणि हे जे काय कुंडलिनीच ज्ञान होत ते कोणालाही सांगायचं नाही . अशी परंपरा होती . पण ज्ञानेश्वरांनी निवृत्ती नाथांना म्हंटल कि कमीतकमी मला एव्हडी परवानगी द्या कृपा करून  आपण कि मी हे उघड करून सांगतो ,नुसत सांगतो ,लिहितो . मी काही करणार नाही मी कुणाची कुंडलिनी जागृत करणार नाही . पण एव्हडी मला तुम्ही कमीतकमी परवानगी द्या . आणि त्या परवानगीचा कसतरी ,हट्ट करून असेल त्यांनी त्याची मान्यता मिळवली . त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलिनीच पूर्ण वर्णन त्यांनी केल आहे सुंदर रित्या . आणि त्या वर्णन ना प्रमाणे जरा लोकांनी लक्ष दिल असत तर केव्हाच कुंडलिनीच जागरण आपल्या देशात झालं असत . पण तो सहावा अध्याय निषिध्द आहे अस धर्म मार्तंडांनी सांगितलं . कारण त्यातलं त्यांना गम्यच नव्हतं ,म्हणजे असच म्हणायचं कि हा निषिध्द आहे . मग कुंडलिनी म्हणजे कशाशी खातात हे हि आपल्याला माहित नव्हतं . 

आता या युगा मध्ये आमची थोडीशी मेहनत आहे ,अस नाही म्हणत कि मी मेहनत नाही केलेली .कि  प्रत्येक माणसा मध्ये काय दोष आहे ,कस काय असत ,का त्याची जागृती होऊ शकत नाही असा मी बराच सूक्ष्मतेने एक चित्ती म्हणून ,आपल्या चित्ता मध्ये जेव्हा ती सूक्ष्म होते तेव्हा तिला चित्ती म्हणतात ,त्यांनी मी जाणून घेतलं आणि तेव्हा मला कळल कि माणसा मध्ये काय त्रास आहेत आणि कस आपण सामूहिक रित्या लोकांची जागृती करू शकतो . आणि तेच कार्य हे सुरु केलं १९७० साली एका बाई पासून सुरु केलं हळू हळू आणि आज आपल्याला माहित आहे खरोखरच ५६ देशांन मध्ये आम्ही कार्य करत आहोत . रशिया मध्ये तर फार जोरात हे कार्य सुरु आहे ,रशिया मध्ये जवळ जवळ ४०० डाँक्टर्स सहजयोग करत आहेत . २०० मोठं मोठाले साइण्टिस्ट सहजयोग करत आहेत . एकंदरीत तिथलं वातावरणच गार्बोचेव्ह हा आत्मसाक्षात्कारी मनुष्य असल्या मुळे फार बदललेल आहे . आपल्या देशामध्ये लालबहादूर शास्त्री हे साक्षात्कारी मनुष्य होते . अगदी ते निरिच्छ माणूस होते ,आणि ते जर जगले असते तर आपल्या देशाची दशाच दुसरी झाली असती . त्यांना सत्ता लोलुपता नव्हती ,पैशाची लोलुपता नव्हती . पण आपलं दुर्दैव फार वाईट आहे कि असा मोठा माणूस आपल्यातून निघून गेला . त्यामुळे या देशाच विशेष भल होऊ शकल नाही . तेव्हा पासून जस मी बघते आहे या महाराष्ट्राची स्तिती आहे किंवा त्याहून हि बत्तर किंवा अगदी निम्न स्तितीची . 

आता हिंदुस्तानात इतका घाणेरडा प्रकार कुठेच नाही . इतका भ्रष्टाचार कुठेच नाही ,जितका भ्रष्टाचार आज महाराष्ट्रात आहे तेव्हडा कुठेच नाही . इतके वाईट रस्ते तर कुठेच नाहीत . अगदी काहीही गोष्ट करायची म्हंटली कि ,हा माणूस पैसा खातो ,तो माणूस पैसा खातो ,तो माणूस पैसे खातो ,पैसा खाण्या शिवाय ते जेवतात कि नाही कि नुसते सगळे जण पैसेच खातात . अशी भयंकर परिस्तिथी आलेली आहे . त्यामुळे गरिबी कशी जाणार ,गरिबी जाण शक्य नाही ,गरिबी जाण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आत्म्याला प्राप्त करून घेणे . आता पुष्कळांच असं मत आहे कि तुम्ही अध्यात्माच्या मागे लागला तर तुमच्यात गरिबी राहते . अशी मुळीच गोष्ट नाही . जर श्रीमंती तुम्हाला अध्यात्मा शिवाय आली  तर तुम्ही वाम मार्गाला जाल . कोणत्याही माणसाला तुम्ही १०० रुपये दिले तर लगेच तो चालला गुत्यावर . पण जर तो साधुसंत माणूस असेल तर तो त्या १०० रुपयाचं काहीतरी सत्कर्म करेल . चागलं कार्य करेल . म्हणून अध्यात्माचा पाया आपल्यात जर नाही आला तर आपण कधीही देशाची काय आपली स्वतः ची सुध्दा सर्वांगीण उन्नती नाही करू शकणार ,थोडी बहोत करू शकू . आणि हि सर्वांगीण उन्नती करण्यासाठी आवश्यक आहे कि पहिल्यांदा आपल्या मध्ये अध्यात्म आला पाहिजे . 

आता हि कुंडलिनी जेव्हा  आपल्या मध्ये जागृत होते तेव्हा ती आपल्या सूक्ष्म अशा चक्रातून निघते आणि त्यातून निघाल्यावर ती संबंध आपल्या शरीरा मध्ये शक्ती प्रदान करते . शक्ती चा अर्थ असा नाही कि आपल्याला ती काहीतरी हिंसाचारी बनवते . पण शक्तीचा अर्थ असा आहे कि त्याच्या मुळे आपल्या मध्ये संतुलन येत . इतकच नव्हे पण आपला जो आत्मा आहे त्याच्या प्रकाशाने आपली बुध्दी तीक्ष्ण होते . त्या प्रगल्भतेत आपण जाणू शकतो कि केवळ सत्य काय आहे . ते सत्य जाणल्या बरोबर आपण वाम मार्गाला ,चुकीच्या मार्गाला जात नाही . जस मी सापाचं उदाहरण सांगितलं .तसच घडून येत .  आता आपल्या इथेच बघा एक आहेत ,आपल्याला माहिती आहेत ,आलेले आहेत ते मोरेश्वर म्हणून . हे म्हणजे एका कोळीणीचे पुत्र . आणि हे सहजयोगात आले ,लगेचच त्यांच्यात एव्हडी सर्जन कला आली  कि त्याला आर्टस् कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाल . त्याच्या नंतर तो आर्टस् चा ग्रॅज्युएट झाला . अशा रीतीने आपली जेव्हा बुध्दी तल्लख होत जाते ,आणि त्या बुध्दी मध्ये संतुलन येत असं नाही कि ती तल्लख झाली तर त्यामध्ये आपण वाईट काम करू . उलट त्यातून कशा नवी नवीन गोष्टी करण्याच्या ,नवनवीन शोध लावायचे हे सगळं समजू लागत . कारण आपण बुध्दीचा फारच थोडासा भाग वापरतो ,त्यात प्रकाश आल्या बरोबर आपण सुबुद्धीनी सर्व कार्य करतो . कोणाचा नाश करत नाही ,कोणाला दुखवत नाही ,पण आपल्या मध्ये अत्यन्त शक्ती असते . त्यामुळे आपण कितीही कसही ,आता बघा मी सकाळ पासून कामातच आहे त्यात आमच्या गाडीची गडबड झाली तरी इतका उशीर झाला तर माझ ६८ वर्षाचं वय आहे आणि इतका प्रवास करून मी पुण्याहून आले तरी जशीच्या तशी मला काही वाटतच नाही . कारण शक्ती सारखी वहात असते . तेव्हा हि कुंडलिनी जेव्हा आपली जागृत होते तेव्हा जस ह्याचा संबंध म्हणजे माईकचा संबंध मेन शी झाला आहे तसाच आपला संबंध ह्या सर्वव्यापी शक्तीशी होतो . हि सर्वव्यापी शक्ती हि सगळी जिवंत कार्य करत असते . आपण कधी विचार पण करत नाही कि हि फुल एका बी पासून कशी अली . त्या बी ला काही रंग नाही रूप नाही आणि त्यातून एव्हडी सुंदर फुल कशी तयार झाली . हे सर्व कार्य हि शक्ती जिला आपण ब्रम्ह शक्ती म्हणतो ती करत असते . एकदा ती हाती लागली कि म्हणजे आपल्याला केव्हड मोठं स्वरूप मिळत . 

आता आपल्या देशात गरिबी असण्याचं कारण असं आहे कारण आता भ्रष्टाचार हे मुख्य आहे . गरिबी कशाला हटवतील ते ,जर पाच रुपया मध्ये कुर्ते तुमचे मत घेऊ शकतात तर तुम्हाला कशाला गरिबीतून काढतील. गरीब ठेवलंच पाहिजे ना नाहीतर त्यांना मत कशी मिळणार ?पाच रुपये देऊन मत मिळवलं पाहिजे ना . म्हणून गरिबी ठेवणारच ते लोक . पण तरी सुध्दा सहजयोगात त्याच्या साठी एक मार्ग आहे तो असा कि सहजयोगात आल्या बरोबर मी सांगितलं तुम्हाला कि आपली बुध्दी प्रगल्भ होते ,आणि आपल्याला नवनवीन कल्पना येतात . आपण नवीन गोष्टी करू लागतो ,त्यामुळे आपलं कार्य चांगल होत आपला कारभार चांगला चालू लागतो . आपल्याला समजत कि आणखीन प्रगती कशी करायची . पण हि नुसती झाली बुध्दीची गोष्ट , पण हातातून वाहणार चैतन्य जे आहे त्याने आपली आपण शेती सुधारू शकतो . आम्ही शेतीवर पुष्कळ प्रयोग केलेत ,इथे एक फार मोठे डॉक्टर आलेले आहेत ते आस्ट्रेलिया चे आहेत ,त्यांनी शेतीवर फार प्रयोग करून दाखवले आहेत ,कि नुसतं चैतन्याने जे नॉन ऍग्री सीड जे असत ते इतकं उत्पन्न देत ,आणि त्यातले समजा जर गहू असला ,तांदूळ असले तर त्याला इतकं स्वादिष्ट बनवता येत त्याला . त्या नंतर पशुपालना मध्ये पण मदत होऊ शकते . अनेक तऱ्हेने मदत होते . पुष्कळसे संगीतकार फारच सर्वसाधारण होते ते ते एकदम आज फार नामांकित संगीतकार झाले . पुष्कळसे असे कलाकार ज्यांना कला विशेष येत नसे ते फार मोठे कलाकार झाले .  

तर हि प्रगल्भता आपल्या मध्ये आल्या मुळे आपण एकदम एका नव्या स्तरा मध्ये उतरतो . आणि ते प्रत्येकाने मिळवल पाहिजे . कारण आटा आपण मानव स्तिथीत आलो आहोत ,ह्याच्या पलीकडची एकच पायरी आहे ती म्हणजे आत्मस्वरूप होणे . आणि हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे ,आणि ते आपण मिळवलं पाहिजे . आणि अशी कुंडलिनी शक्ती आपल्या मध्ये असताना आपण ती का जागृत करून घेऊ नये ? . दिल्लीला तीन डॉक्टरांना एम डी ची पदवी मिळाली एम बी बी एस नंतर म्हणजे त्यांनी काहीतरी मेडिकली दाखवल्या शिवाय मिळेल का सहजयोगा वरती . पण तरीसुध्दा भांडखोर लोक आहेत त्यांना असं वाटत कि आता माताजी म्हणतात कि तुमचे आजार नुसते कुंडलिनी जागृतीने ठीक होतात तर त्यांच्या पोटावर पाय येणार कारण आजकाल सगळे डॉक्टर लोक लुबाडून राहिले सगळ्यांना . असं काही नाही कारण सगळे लोक कुठे सहजयोगात आहेत ,सगळे कुठे पार होतात ,असे बरेच लोक आहेत कि जे अजून अर्धवट आहेत . कि जे सहजयोगात येत नाहीत ,पण जे आले त्यांना मात्र डॉक्टर सुटले . याच्या नंतर डॉक्टर बघायला नको काही त्रास बघायला नको शारीरिक त्रास नको . त्याशिवाय फार भयंकर रोग जे आहेत कॅन्सर सारखे हे सुध्दा सहजयोगाने ठीक होतात . तेव्हा सहजयोगात यावं आणि आपली शक्ती पूर्ण पणे आत्मसात करावी , हे आहे “तुझं आहे तुझं पाशी “ते तुम्ही मिळवल पाहिजे सगळ्यांनी . पण    सहजयोगात आल्यावरती एकदा जागृती झाली तरी हे जस काही कोंब फुटल्या सारखं आहे ,हि एक जिवंत क्रिया आहे . पण त्याच्या नंतर मात्र तुम्हाला थोडी मेहनत करून आपला वृक्ष तयार केला पाहिजे . त्याच्या नंतर बघा या अतीत गावातच किती कार्य होऊ शकत . मला असं वाटत कि अजून आपण आपल्याला ओळखलेलं नाही . ज्या वेळी आपण आपल्याला ओळखू तेव्हा कळेल कि आपण काही अशे तशे नाही आहोत . एकतर या महाराष्ट्र देशात जन्माला येन हीच फार मोठी गोष्ट आहे . हे लोक तर असं समजतात कि पूर्वजन्मी आपण बहुपुण्य केले म्हणून या महाराष्ट्रात जन्माला आले . तुमच्या बद्दल यांच्या कल्पना फार उच्च आहेत . आज त्यांना असं वाटत कि तुम्ही संतसाधुंच्या फार जवळचे कुणीतरी असाल म्हणून इथे जन्माला आले . नाहीतर त्या नष्ट कुष्ट देशात आम्ही कशाला जन्माला आलो असतो . असं यांचं म्हणणं आहे . तेव्हा हे जाणलं पाहिजे कि हे जे म्हणतात त्यात खोट काही नाही . आपल्या जवळ एक फार मोठी संपदा आहे आणि ती आहे ती अध्यात्माची . हि संपदा आपण वाढवली पाहिजे आणि त्यातूनच आता भौतिकता वैगेरे सर्व गोष्टी मिळणार आहेत . पण या संपदे शिवाय जी भौतिकता मिळेल त्यामुळे देशाचा सर्वनाश होऊन जाईल . तेव्हा कृपा करून ती वेळ यायच्या आधीच आपण आपली संपदा मिळवून घ्यावी . आपली शक्ती आपण मिळवून घ्यावी . आणि आपल्या मुलांना जर ते अशा भलत्या मार्गाला जात असतील तर त्यांना समजावून सांगायचं कि अशा लोकांच्या नादाला लागू नये . आणि बहुतेक मंडळी जी मी पहिली ती दारू पिऊन आली होती . म्हणजे जे स्वतः दारू पितात ,बायका ठेवतात अशा लोकांनी लीडरशिप करायची आणि आपण त्यांच्या चरणावर जायचं याला काही अर्थ आहे का ?. आपण फक्त संतांच्या चरणावर गेलेली लोक आहोत . ह्या महाराष्ट्राची विशेषतः हि आहे कि आपण फक्त संतांना मानलं आहे . आणि जे लोक उच्च चरित्रांचे आहेत ,ज्यांनी मोठं कार्य केलं त्यांना आपण मानलं आहे . महात्मा फुले त्यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्या माणसाने देशकार्य केलेलं आहे . ज्या माणसाने काही देशकार्य केलेलं नाही आणि नुसतं लुटून ठेवलेलं आहे अशा माणसाच्या समोर जायचं कारण त्याच्या जवळ आज त्यांनी कमावलेले वाईट पैसे आहेत किंवा वाईट रीतीने मिळवलेली सत्ता त्याच्या जवळ आहे . हे चुकीचं आहे . आपण लक्षात घेतलं पाहिजे कि हि एक शिवाजी महाराजांनी जशी लढत घेतली तशी एक लढत आहे . आपल्याला सुध्दा सत्याच्या दमावर हि लढत घेतली पाहिजे . आणि कुणाला भ्यायची  गरज नाही ,कुणाला भ्यायचं नाही . सहजयोगात तुम्ही अगदी निर्भय होता . आणि जे सत्य आहे त्याला धरून चालायचं . सत्य जो बोलेल त्याला पकडायचं . जो माणूस चांगला आहे ,ज्याच्या मध्ये भलेपण आहे ,जो प्रेमळ आहे ,जो देशासाठी कार्य करतो ,जो निरीच्छ आहे . अशा च माणसाचे पाय धरले पाहिजेत . तेव्हडा जर आपण एकदा कयास मनामध्ये घेतला तर आपल्या लक्षात येईल कि थोड्या वेळचा नफातोटा न बघताना आपल्या मुलाबाळांच काय होईल ,उद्या आपल्या देशा मध्ये जर अशी चुकीची लोक अली तर काय होईल ,आपल्या मुलांचं सगळं नुकसान होऊन जाईल . म्हणून हे जनजागृतीचं कार्य आहे . त्यात खेडेगावातून ,प्रत्येक गावातून जागृती झाली पाहिजे . आणि हि जागृती जर झाली तर मात्र आपले दिवस पालटतील . एकदम एक नवीन युग सुरु होईल त्याबद्दल शंका नाही . तेव्हा कृपा करून मी जे काय म्हंटलेले आहे त्यावरती विचार करावा . सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे . 

आता सगळ्यांची अशी इच्छा आहे कि मी सगळ्यांना जागृती द्यावी . तेव्हा सगळे जण बसून घ्या . दुसरं असं कि हे जबरदस्ती करून देता येत नाही . हे मागावं लागत . तेव्हा आम्हाला हे हवं आहे अशी मना मध्ये धारणा ठेवायची . तरच हे घटित होईल . कारण तुम्ही महाराष्ट्रात जन्मले आहेत ,तुमची पूर्व पुण्याई पुष्कळ आहे ,तुम्ही संतसाधुंचे आशीर्वादित लोक आहात . तेव्हा त्याचा फायदा आता पूर्णपणे घेतला पाहिजे . लक्ष एकाग्र करा ,इकडे ठेवा . मला काय विशेष करावं लागत नाही महाराष्ट्रात फार लवकर पार होतात हे लोक . फक्त एव्हढाच कि मागच सगळं विसरून जायचं . भूत काळातलं सगळं विसरून जायचं . स्वतः ला क्षमा करायची ,पुष्कळ लोक तुम्हाला सांगतात कि तुम्ही पापी आहात ,अमुक आहे तमुक आहे हे सगळे पैसे कमवण्याचे धंदे आहेत ,कि तुम्ही पापी आहात तुम्ही इतके रुपये द्या आम्ही असं करू . नंतर म्हणतील कि तुमची आई मेली तिच्यासाठी तुम्ही गाय द्या ,तिला आम्ही दूध पाठवू . जस काही यांचं नवीनच कोणतरी पोस्टमन आहे देवाकडे जाणारा . अशा रीतीने सगळे मूर्ख पणाचे गोष्टी सांगत असतात . आणि आपण त्यांच्यावर अगदी धर्मभोळे पणाने विश्वास ठेवतो . ते दिवस आता गेले मला वाटत ,  निदान तेव्हडी  तरी बुध्दी आता लोकांना अली आहे कि अशा महामूर्खानच काही ऐकायचं नाही . पण तरी सुध्दा हे लक्षात घेतलं पाहिजे जे संतांनी सांगितलं ते खोट नाही . जे देवान  बद्दल सांगितलं ते खोट नाही . देव हा आहे आणि हे सिध्द फक्त सहजयोगाने होऊ शकत . आपण सिध्द करू शकतो कि देव हा आहे . जे म्हणतात देव नाही त्यांनी समजलं पाहिजे कि ते अशास्त्रीय लोक आहेत . ते आहे किंवा नाही याचा पत्ता लावा . पत्ता लागला नाही तुम्हाला तर फक्त असं म्हणू शकतो कि आम्हाला काही कळलं नाही . आहे किंवा नाही हे आम्ही सांगू शकत नाही . 

तर आता पहिल्यांदा मी सांगितलं कि भूतकाळ सगळा विसरून जायचा ,आपल्या बद्दल काहीही मी हे चुकलो ते चुकलो ,आता जर समजा मी हे म्हंटल दारू पिण वैगेरे तर जरी पीत असला तरी हरकत नाही ,पूर्वी प्याला असला तरी हरकत नाही ,काहीही केलेलं असलं तरी हरकत नाही ,आत्ता या क्षणाला सगळं विसरून जायचं . आई समोर काय असत कि आईला सगळीच मुल एकसारखी वाटतात . काही असलं तरी ती सर्व गोष्टींची ती क्षमा करते . तस काही मनात ठेवायचं नाही . आणि हि जी शक्ती आहे ती आनंदाचा सागर आहे ,ज्ञानाचा सागर आहे . पण सगळ्यात जास्त हा क्षमेचा सागर आहे . आणि म्हणून आपण काही चुकलो वैगेरे असं काही डोक्यात न काढून टाकायचं . दुसरी गोष्ट अशी आहे कि सगळ्यांना एकसाथ क्षमा करून टाका . एकसाथ म्हणजे यांनी मला त्रास दिला त्याने मला त्रास दिला असं काही मनात आणायचं नाही . सगळ्यांना क्षमा करायची कारण तुम्ही क्षमा करा अथवा नका करू तुम्ही काही करत नाही . खार म्हणजे तुम्ही क्षमा केली नाही मात्र तर अशा जे लोक तुम्हाला त्रास देऊ इच्छितात त्यांच्या हातात तुम्ही खेळता . म्हणून एकसाथ सगळ्यांना तुम्ही क्षमा करून टाका . तुम्हाला एकदम हलकं वाटेल . तिसरी गोष्ट अशी कि मला आत्मसाक्षात्कार मिळेलच ,मला मिळणारच आहे ,मला आत्मसाक्षात्कार झालाच पाहिजे असा पूर्ण आत्मविश्वास ठेवायचा . मला कसा होईल ,मी असा तसा असा विचार करायचा नाही . 

कृपा करून सगळ्यांनी टोप्या काढून घ्यायच्या . मी आई आहे तुमची आई समोर टोप्या नाही घातल्या तरी चालतात . आपल्याला हे टाळू भागातील ब्रम्हरंध्र उघडून घ्यायचं आहे . ते झाल्यावर त्याच्यापुढे काय करायचं तर त्यासाठी इथे आपलं एक सेंटर आहे चांगल आणि इथे फार चांगले सहजयोगी आहेत . तर त्यांच्या कडे यायचं आणि त्यांना विचारायचं याच्या पुढे काय करायचं म्हणून . हे सगळं फुकट आहे याला पैसे पडणार नाहीत . कुणी देवाच्या नावाने पैसे मागितले त्यांना एकही पैसा द्यायचा नाही . कारण देवाला पैसा नाही समजत . हि जिवंत क्रिया आहे ,या पृथ्वीला आपण काय देतो ? ती आपल्याला एव्हडं सगळं देते . आपण काही देत नाही . तिला पैसे समजत नाही ,तसच परमेश्वराचं आहे त्यासाठी पैसे द्यायचे नाहीत काही नाही ,फक्त शिकून घेतलं पाहिजे कि हे आहे काय . हे हात मध्ये आल आमच्या थंड हे काय आहे . आणि ह्या बोटानं मधून तुम्हाला चक्र समजतील काय आहे ,त्या शिवाय कशी जागृती करायची ,आणि जागृती करून आपलं भल करून घ्यायचं . त्यानंतर तुम्ही यात वाढलात कि मग कस लोकांचं भल करायचं . ते जाणून घेतलं पाहिजे . आणि ह्या मुळे सगळी व्यसन सुटतील ,सगळं काही सुटून जाईल ,आणि मनुष्य एकदम फार उच्च प्रतीचा असा मानव होऊन जाईल . हे कार्य आपल्याला महाराष्ट्रात करायचं आहे तर आपला महाराष्ट्र देश कितीतरी मोठया स्तीतीला जाईल ,आणि सर्व देशातून लोक इथे येतील पण तुमच्या भेटी गाठी घ्यायला . आज थोडी गडबड झाली म्हणून उशीर झाला तरी आपण  मला क्षमा करावी . माझी अशी विनंती आहे कि ह्या लोकांना एक गाण म्हणायला सांगते मी भजनाच ते ऐकून घ्या तुम्ही . आणि त्याच्या नंतर आपण जाऊयात . तुकारामांचं भजन आहे ,

‘”आम्ही बि घडलो तुम्ही बी घडाना “अनंत आशीर्वाद सर्वाना .