Public Program, Bhartatil Bhrashtachar (India)

Bhartatil Bhrashtachar 16th December 1990 Date: Place Wai Public Program Type त्या देशामध्ये किती हिंसाचार वाढलेला आहे, ह्याची अगदी आपल्याला कल्पना नसेल. आता न्युयॉर्कला जायचं असलं तर तुम्ही हातात काही घालून जाऊ शकत नाही, गळ्यात मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही. ते लपवून न्यावं लागतं. आपल्याला त्याची कल्पना नाही. इथे जे हिंदुस्थानी लोक आहेत ते अलिप्तच राहतात, नको रे बाबा! मला काही लोकांनी पत्र पाठवलं की, ‘माताजी, तुम्ही हिंदुस्थानात जर चांगली शाळा काढली तर आम्ही आमच्या मुलांना तिथे पाठवू.’ काही लोक आपली मुलं इथे घेऊन येतात. कारण ती इतकी उद्धट झाली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इंग्लंडसारख्या शहरामध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये फक्त लंडन या एकाच सिटीमध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. ही दशा तुम्हाला इथे आणायची आहे की का? सर्वांगीण प्रगतीसाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्मात उतरले, तुम्ही जर एखाद्या दारूङ्याला किंवा कोणालाही शंभर रूपये दिले तर तो कुठेतरी वाया घालवणार. पण जर तुम्ही एखाद्या संताला पैसे दिले तर तो सत्कारणीच लागणार. तो सत्कर्मातच जाणार. आता जसे हे लोक आहेत, तर मी पैसे काढले, ‘आम्ही एखाद्या शाळेला देणगी देऊ माताजी.’ सत्कर्मासाठी. काही वाईट कर्मासाठी नाही. पण आपल्याकडे ते सत्कर्मसुद्धा कठीण झालेले आहे. आम्ही आमचे लंडनला घर विकल्यावर विचार केला की कोणत्यातरी संस्थेला पैसे द्यायचे, तर एक संस्था अशी मिळाली नाही की जिथे खोटेपणा नाही. सर्व संस्थांमध्ये खोटेपणा, म्हणजे करायचे तरी काय? मग आम्ही शेवटी एक वास्तू बांधली. म्हटलं कमीत कमी एक वास्तू तर बांधू देत. मग पुढचं काय ते बघता येईल. अशा रीतीची ही परिस्थिती आपल्या देशात आलेली आहे आणि हा भ्रष्टाचार आणि आपल्या मुलांचं उद्या काय होणार आहे याचा Read More …