Public Program, Bhartatil Bhrashtachar

(India)

1990-12-16 Public Program, Marathi Wai India DP-RAW, 97'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Bhartatil Bhrashtachar 16th December 1990 Date: Place Wai Public Program Type

त्या देशामध्ये किती हिंसाचार वाढलेला आहे, ह्याची अगदी आपल्याला कल्पना नसेल. आता न्युयॉर्कला जायचं असलं तर तुम्ही हातात काही घालून जाऊ शकत नाही, गळ्यात मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही. ते लपवून न्यावं लागतं. आपल्याला त्याची कल्पना नाही. इथे जे हिंदुस्थानी लोक आहेत ते अलिप्तच राहतात, नको रे बाबा! मला काही लोकांनी पत्र पाठवलं की, ‘माताजी, तुम्ही हिंदुस्थानात जर चांगली शाळा काढली तर आम्ही आमच्या मुलांना तिथे पाठवू.’ काही लोक आपली मुलं इथे घेऊन येतात. कारण ती इतकी उद्धट झाली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इंग्लंडसारख्या शहरामध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये फक्त लंडन या एकाच सिटीमध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. ही दशा तुम्हाला इथे आणायची आहे की का? सर्वांगीण प्रगतीसाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्मात उतरले, तुम्ही जर एखाद्या दारूङ्याला किंवा कोणालाही शंभर रूपये दिले तर तो कुठेतरी वाया घालवणार. पण जर तुम्ही एखाद्या संताला पैसे दिले तर तो सत्कारणीच लागणार. तो सत्कर्मातच जाणार. आता जसे हे लोक आहेत, तर मी पैसे काढले, ‘आम्ही एखाद्या शाळेला देणगी देऊ माताजी.’ सत्कर्मासाठी. काही वाईट कर्मासाठी नाही. पण आपल्याकडे ते सत्कर्मसुद्धा कठीण झालेले आहे. आम्ही आमचे लंडनला घर विकल्यावर विचार केला की कोणत्यातरी संस्थेला पैसे द्यायचे, तर एक संस्था अशी मिळाली नाही की जिथे खोटेपणा नाही. सर्व संस्थांमध्ये खोटेपणा, म्हणजे करायचे तरी काय? मग आम्ही शेवटी एक वास्तू बांधली. म्हटलं कमीत कमी एक वास्तू तर बांधू देत. मग पुढचं काय ते बघता येईल. अशा रीतीची ही परिस्थिती आपल्या देशात आलेली आहे आणि हा भ्रष्टाचार आणि आपल्या मुलांचं उद्या काय होणार आहे याचा विचार करा. इतका भ्रष्टाचार कुठेही जगात नाही जितका महाराष्ट्रात आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. हिंदुस्थानातसुद्धा इतका भ्रष्टाचार नाही, इतका या महाराष्ट्रात आहे. मी कारण सबंध हिंदुस्थानात फिरलेली आहे. त्याच्याकडे लक्ष नाही आपले आणि अशी टूरम कुठेही निघालेली नाही, ही निर्मुलनाची. निर्मूलन करण्याची लायकी असायला पाहिजे. आता आमच्याकडे मानव म्हणून एक गृहस्थ आले. ते माझ्याकडे दोन लाख रूपये घेऊन आले. म्हटलं मी चार लाख रूपये देते पण दोन लाख देऊ नका. पण तुम्हाला निर्मूलन करण्याची लायकी नाही. लायकी असायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही संत असायला पाहिजे. निदान तुम्ही संत असायला पाहिजे. आता ही मंडळी जी बाहेरून आली , तुम्हाला काय वाटतं परदेशामध्ये अंधश्रद्धा नाही. भयंकर अंधश्रद्धा आहे. सगळे त्यातून निघून बाहेर पडले आणि आज इथे स्वच्छ होऊन आलेले आहेत. तुम्हाला जर अंधश्रद्धा घालवायची असली, तर तुम्हीसुद्धा आत्मसाक्षात्कार घ्या. आत्मसाक्षात्कार घेतल्याशिवाय तुमची अंधश्रद्धा जाणार नाही. जात, पात, धर्म, अधर्म ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे, असं सर्वांनी सांगितलं आहे. पण एकनाथांना, ते महाराकडे जाऊन जेवले म्हणून लोकांनी त्रास दिला. ‘काय ढोंगी आहे.’ त्याच्यानंतर तुकारामांना छळून छळून मारून टाकलं. आपल्याला सगळे माहितीच आहे, त्या ज्ञानदेवांची, पायात वहाणा नव्हत्या ন

त्यांच्या, पालखीत मिरवणूक काढली. आता आम्ही येतांना रस्त्यात आम्हाला आडवलं. म्हणे, ‘माताजी, जेवायला या.’ म्हटलं, ‘कशाला? ‘ म्हणे, ‘आम्ही पालखी घेऊन आलो.’ काय म्हणावं ! ज्या माणसाच्या पायात वहाणा नव्हत्या. सगळ्या भावांना घेऊन, बहिणीला घेऊन अशा उन्हातान्हात फिरणारे ते. त्यांच्या आता कुठेतरी पादुका ठेवायच्या. त्यांच्या दमावर जेऊन बसायचे. ह्याला काय म्हणायचे! ते नाही बंद करता येणार तुम्हाला. पण पुष्कळसे असे आहेत ज्यांनी असे प्रकार केले. राहुरीला असे लोक होते जागृतीसाठी, सोडलं त्यांनी की काय मूर्खपणा आहे. असल्या तऱ्हेचे भयंकर प्रकार आपल्या देशात आहेत. ते काढण्यासाठी जागृती शिवाय काहीही मार्ग नाही. आधी जागृती होऊ द्या. माझ्याविरूद्ध लोक कशासाठी उठले आहेत, हेच मला समजत नाही. मी एकही पैसा घेत नाही. देवकृपेने श्रीमंत घराण्यातली मी आहे. इतकंच नव्हे पण श्रीमंत घराण्यात माझं सबंध आयुष्य गेलं आहे. इतकंच नव्हे पण माझे यजमान फार मोठे आहेत. आपल्याला माहीत नाही, की इंग्लंडच्या राणीने त्यांना सर्वोच्च नाइटहड पदवी दिली. सर्वोच्च. अशी हिंदुस्थानात आजपर्यंत कोणाला मिळाली नाही. आणि ३२ देशाने त्यांना सर्वोच्च अशी नाइटहूड, उच्च पदव्या दिलेल्या आहेत. असे माझे यजमान आहेत. मला काय गरज आहे अशा प्रसिद्धीची आणि गावात मिळून भटकत फिरण्याची काय गरज आहे. तुम्ही लक्षात घ्या, की अशा तऱ्हेने कोणालाही बदनाम करणे आणि अशा तऱ्हेने कोणाचेही कार्य अडवून ठेवणे, जे की समाजकल्याणाचे कार्य आहे. त्यानेच कल्याण होणार आहे. आज हे जे लोक इथे आले आहेत, त्यात मोठमोठाले डॉक्टर्स आहेत. आर्किटेक्ट्स आहेत. फार मोठाले लोक आहेत. हे काही सर्वसाधारण लोक नाहीत. त्यांच्याशी बोलणार कोण? तर म्हणे एक एमबीबीएस झालेला. पण त्याच्याशी बोलणार तरी काय? त्याला पॅरासिंपथॅटिक नव्व्हस सिस्टीमच समजत नाही. त्याच्याशी मी बोलणार तरी काय? आणि म्हणे आमचं आवाहन घ्या. कसलं आवाहन! त्याला काही अर्थ आहे ? आपली लायकी ओळखायला पाहिजे. विज्ञानावर जर बोलायचं असलं तर एखादा वैज्ञानिक मनुष्य पाहिजे. इथे किती तरी ज्ञानी लोक आले आहेत. तीन लोकांना पीएचडीच्या डिगया मिळाल्या आहेत, फ्रांसमध्ये, इंग्लंडमध्ये आणि तीन डॉक्टरांना एमडीच्या पदव्या मिळाल्या आहेत, आपल्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या. ज्यांना ज्यांना एमडीच्या पदव्या मिळाल्या ते कुठे पोहोचले असतील, तुम्ही सांगा बरं! त्यावर असं म्हणायचं, की ह्यांनी वैद्यकिय किंवा मेडिकलच्या परिमाणाशिवाय सगळे केलेलं आहे. आता काय म्हणावं ! अहो, कोणाला एमडीची पदवी मिळेल का? एवढी तरी अक्कल नाही त्यांना की एमडीची पदवी मिळू शकते का कोणाला, मेडिकलच्या परिमाणाशिवाय? तेव्हा लहान तोंडी मोठा घास घ्यायचा तरी किती? ते तरी समजलं पाहिजे. पण संतांना आम्ही मानतो. कारण त्यांचं चरित्र बघा. त्यांची जी वागणूक आहे, तसे आहेत का कोणी आजकाल? दिसतात का तुम्हाला कुठे? असे संत – साधू दिसतात, जे ‘जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती’ असे दिसतात का तुम्हाला कुठे? हे सगळे भामटे लोक आहेत आणि हा भामटेपणा करून तुमच्या मुलांची दिशाभूल करतात. तेव्हा कृपा करून मुलांना ह्याच्यात घालू नका. दगड मारायला शिकवतात, आरडा-ओरड करायला. अरे काय तुमच्या मुलांची ही लायकी आहे की नुसतं आरडा-ओरड करत फिरायचं! दिल्लीला अशा पुष्कळशा इन्स्टिट्युट आहेत, पुष्कळ अशा संस्था आहेत, तिथे आरडा-ओरड करण्यासाठी खेडेगावातून लोक आणलेले आहेत. पण त्यांच्यात वेगळ्यावेगळ्या टोप्या, वेगवेगळ्या कार्डबोडवर लिहिलेल्या अशा पुष्कळशा, प्रत्येक

पाटीसाठी काय लिहायचे ते त्याच्यात लिहिलेले असते. त्यांच्याजवळ कार्डबोर्डचे मोठमोठाले तक्ते आहेत. ते सगळ्यांना दिलेले आहेत. शास्त्रीजींबरोबर माझे यजमान महासचिव होते आणि मुख्य सचिव होते. आणि शास्त्रीजी मला सांगायला आले, की आजकाल एक नवीन संस्था निघाली आहे. म्हटलं, ‘कोणती?’ तर म्हणे, की नारे लगाने वाली. म्हटलं, ‘त्याच्यात काय असतं?’ ते नेहमी कोणी आले की जाऊन भेटायचे त्यांना आणि मग हसत यायचे. म्हटलं, झालं काय? तर म्हणे, ‘आज नारे लगानेवाली पार्टी आली आणि त्यांनी हातामध्ये तक्ते धरले आहेत.’ आणि त्या तक्त्यांमध्ये काय होतं ? तर म्हणे, की ‘दूसऱ्याच पार्टीचं लिहिलेलं. टोप्याही दुसऱ्याच पार्टीच्या. तर मी त्यांना सांगितलं, की अरे हे तर तुम्ही सकाळी लावून आला होतात, तेच आज संध्याकाळी पार्टीचं कशाला घेऊन आलात? तुमची पार्टी तर दूसरी असं तुम्ही म्हणता.’ म्हणजे त्यांना पैसे देतात. आज ह्या काम, उद्या त्या पार्टीचं काम, म्हणजे हा त्यांचा बिझनेस झाला आहे. तशी तुमची मुलं आरडाओरडा करण्यासाठी त्यांनी उभी केलेली आहेत . त्या मुलांची लायकी ती नाही. महाराष्ट्राच्या भूमीवर जन्मलेली ही मुलं आहेत. समजून घ्या.. आपल्या मुलांची अशी कवडी किंमत करू नका. ह्या मुलांना साक्षात्कार देऊन, ही अभिनव, ही आपल्यामध्ये जी शक्ती आहे ती जागृत करा. ह्या सर्व शक्त्या आपल्यामध्ये आहेत. जी मुलं वर्गात फार ढ होती. राहरी शाळेमध्ये तुम्ही जाऊन विचारलंत तर सगळी मुलं फर्सट क्लासमध्ये आहेत. आणखीन इतकेच नव्हे तर स्कॉलरशीपमध्ये सगळे पटाईत आहेत. कारण इथले प्रिन्सिपलचमुळी रियलायझेशनला आले होते. त्यांनी रियलायझेशन घेतलं होतं आणि सगळ्यांना त्यांनी आत्मसाक्षात्कार दिला. ही इतकी अभिनव एक क्रिया आहे. अर्थात मी असं म्हणेन , की पूर्वी संत – साधू सगळ्यांना देत असत. पण आजच्या ह्या कलीयुगामध्ये एकच गोष्ट आम्ही केली, की जसं ज्ञानेश्वरांनी सामूहिकतेला हे उघडून सांगितलं आहे, तसं सगळ्यांना सामूहिकतेमध्ये जागृती देण्याचं कार्य आम्ही करतो. त्यात वाईट काय करतो आहे ? हे जगाच्या कल्याणासाठी आहे किंवा नाही? किंवा ह्या कार्याने कोणाचे वाईट होणार आहे? जोपर्यंत तुमच्यामध्ये अध्यात्माचा पाया येणार नाही, तुम्ही कोणतीही भौतिक प्रगती करून बघा, ती नाशवंतच होणार. नाशवंत होणार. कारण त्याला संतुलन राहणार नाही. दारू तरी पितील, आता पितातच आहेत. सगळीकडे लोक दारू प्यायला लागले आहेत. महाराष्ट्रात, मी जन्मात दारू पाहिली नव्हती. मला माहिती नाही दारू काय असते ते. ह्या महाराष्ट्रात जो दिसला तो दारूच पित असतो. नाहीतर आणखीन सगळे धंदे सुरू झाले आहेत. आपल्या वारणा जिल्ह्यात मी गेले होते. तिथले मुख्य ज्यांनी हे सगळं कार्य केलं, ते माझ्या पायावर येऊन रडले. मला म्हणाले, ‘माताजी, कशाला मी ही भौतिक प्रगती केली असं झालं मला . मला फार वाईट वाटतं. मी एवढं उगीचच कार्य केलं.’ ‘अहो,’ म्हटलं ‘असं काय करता ?’ ‘अहो, मी गांधीवादी आणि हे कार्य मूर्ख लोकं मी तयार केले आहेत.’ म्हटलं, ‘झालंय काय?’ ‘अहो दारू काय पितात. बायका ठेवल्या आहेत. मुलांना घरातून काढून टाकलं आहे. सगळा स्वैराचार चालू आहे. आणि मला तर असं झालंय की कधी मी मरतो आणि कधी नाही.’ इतके माझ्या पायावर येऊन रडले ते आणि त्यांनी सांगितलं, ‘ही भौतिक प्रगती आहे.’ आणि भौतिक प्रगतीपासून जे त्रास आहेत ते सांभाळण्यासाठी आधी अध्यात्माचा पाया ठीक करा. नशीबाने सहजयोग आज उद्भवला आहे. त्याने सगळ्यांची जागृती होऊ शकते. कुंडलिनी जागृती होऊ शकते. आणि तुमच्यामध्ये जी

अंधश्रद्धा आहे ती समूळ नष्ट होऊ शकते. आम्ही जात-पात मानत नाही. आम्ही विश्वधर्म मानतो. हुंडा, हे, ते , असे लग्नातले सगळे घाणेरडे प्रकार. आमच्याकडे ७५ लग्न मागच्यावेळेला झाली, पण एवढेसुद्धा भांडण झालं नाही. परवा एक बाई मला भेटायला आली. त्यांचं डोकं फिरलं होतं . ‘अहो, झालं काय ?’ ‘अहो, एका लग्नाला जाऊन आले.’ ‘झालं काय?’ ‘अहो, तिथे रूसवा – रूसवी, फुगवा-फुगवी, हे, ते.’ ‘अहो,’ म्हटलं, ‘आमची ७५ लग्न होतात काही भांडण नाही.’ इंटरनॅशनल मॅरेजेस होतात. अशा बायका ज्यांना नवऱ्याने टाकलं आहे, ज्यांच्याजवळ पैसा नाही, अशासुद्धा बायकांची लग्न होतात. विधवांचे विवाह होतात. हे समाजकार्य आहे. त्याशिवाय तुमचे जे कृषीविभाग आहेत, त्याच्यासाठीसुद्धा पुष्कळ आम्ही प्रयोग केलेले आहेत. इथे एक फार मोठे डॉक्टर आलेले आहेत. तेसुद्धा बसलेले आहेत. आता अशा लोकांवर तुम्ही दगड फेकता म्हणजे काय म्हणायचं. त्यांनी जाऊन आपल्या देशात काय सांगितलं असेल. सीबीआयसुद्धा तुमच्या या अंधश्रद्धेच्या मागे लागलेले आहे. असं बाहेरच्या लोकांना त्रास देण्याचं काय कारण होतं. अशी कोणती अंधश्रद्धा हे करीत होते. ह्यांचं आयुष्य बदललं म्हणून हे आले सहजयोगामध्ये. ह्यांचं परिवर्तन झालं म्हणून आलेत. अध्यात्माशिवाय जे एकांगी जीवन होतं म्हणून हे सहजयोगात आले. आम्ही काही पैसे घेत नाही किंवा काही करीत नाही. तेव्हा तिथून इथे, महाराष्ट्रात हे का आले? कारण त्यांचं असं मत आहे, की महाराष्ट्रात इतकं चैतन्य आहे. आहेच. कबूल आहे. कारण संत आहेत इथे. अहो, त्या रामालासुद्धा पायाच्या वहाणा काढून यावे लागले. इतका महाराष्ट्र पवित्र आहे आपला. आणि ह्या महाराष्ट्रात ही घाणेरड्या गोष्टींची अशी टूम काढून, दुसरं म्हणजे भाऊबंदकी ! भयंकर, त्याच्यावरच हे लोक काम करतात. कुठेही सहजयोग झाला की पहिल्यांदा भाऊबंदकी करायची. आपापसात भांडणं लावून द्यायची. हे काय? हे निर्मूलनाचं कार्य आहे ? तेव्हा ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे. मी म्हणते आहे. बरं! मग, शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही बघितलं पाहिजे, डोळे उघडे ठेवले पाहिजे. डोकं नीट ठेवलं पाहिजे. ही आहे किंवा नाही! ती जागृत होते किंवा नाही! त्याचा आपल्याला लाभ होतो की नाही. ते सोडून उगीचच नाही म्हणून तुम्ही भांडायचं, देव नाही. कशावरून ? कशावरून देव नाही? हे किती अशास्त्रीय आहे. देव नाही असं म्हणतात. जोपर्यंत तुम्ही त्याचा पत्ता नाही लावला तोपर्यंत असं म्हणायचं की आहे किंवा नाही आम्हाला माहीत नाही. ही शास्त्रीय दृष्टी झाली. शास्त्रीय दृष्टी म्हणजे हे नाहीच असं धरून चाललं तर तो मनुष्य अगदी अत्यंत अशास्त्रीय आहे. म्हणूनच परदेशामध्ये कार्य फार होत आहे. आणि कुठेतरी गव्हर्नमेंटने आम्हाला पुष्कळ मदत केलेली आहे. कॅनडा गव्हर्नमेंटने फार मदत केलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नमेंटने मदत केलेली आहे. त्याशिवाय अमेरिकेमध्ये विश्व निर्मल धर्म हा रजिस्टर झाला आहे. इथे जातीयता आहे. जातीयतेवर सगळे इलेक्शन होणार तुमचे. काहीतरी आपल्या देशामध्ये कुजलेले आहे. इतकं संतांनी कार्य केलं ते सगळं वाया जाणार आहे. मी सगळीकडे बघते. त्यांच्या लिहिलेल्या गोष्टी. फार आनंद होतो. पण त्या मुलांना वाटत असेल हे काय उगीचच इथे लिहिलंय ‘मनुष्य ही कर्तृत्वाची लहान मूर्ती.’ हे बनवायला पाहिजे तुम्ही. नुसतं भाषण देऊन नाही चालत. आहे, ही कर्तृत्वाची मूर्ती आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. ते जसं, हे एक आयुध आहे. पण जोपर्यंत ह्या इन्स्ट्रमेंटचं कनेक्शन मेनशी

होत नाही, ह्याला काही अर्थ नाही. तसेच आपलासुद्धा त्या परम चैतन्याशी जर संबंध आला नाही, तर आपल्याला काही अर्थ नाही. आपण असेच इकडे तिकडे डुलत राहणार. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा विशेष सहा चक्रांतून निघते. सहा चक्रांतून निघून चह्कडे हे जे चैतन्य पसरलेले आहे, जी चैतन्य सृष्टी आहे, जिने हे सर्व जीवंत कार्य होतं , आपल्या पॅरासिम्पर्थॅटिक नव्व्हस सिस्टीमला ही शक्ती चालवते, ती आपल्या हाती लागते. म्हणजे आपल्याला थंड थंड असं हातामध्ये वाटू लागतं. त्याच्याबद्दल किती लोकांनी सांगितलं आहे, थंड थंड लहरी येतात. विशेषतः आदी शंकराचार्यांनी एवढं वर्णन केलेले आहे आणि त्यांनी सांगितलं आहे, ‘सलिलं, सलिलं’. पण त्यांच्याशीसुद्धा वादाला एक शर्मा म्हणून आला. शेवटी ते कंटाळले. त्यांनी सांगितलं की सगळं हे कार्य आईचं आहे. आईचंच वर्णन त्यांनी सौंदर्य लहरीमध्ये करून टाकलं. म्हणजे तेव्हापासून हा मूर्खपणा चालू आहे. पण आता हा मूर्खपणा थांबवूया. कारण आता या परमेश्वराला सिद्ध करण्याची, तसंच त्या परम चैतन्याला सिद्ध करण्याची शक्ती आलेली आहे या जगात आणि आता कलियुग जाऊन कृतयुग सुरू झालेले आहे. कलियुग संपलं. कृतयुगामध्ये हे ब्रह्मचैतन्यच कार्यान्वित झालं आहे. म्हणून ह्यांचं एवढं कार्य होतं. पण हे लोक रजनीशचे शिष्य. मी गुजरात समाचारमध्ये वाचलं. त्यांनी माझ्याबद्दल असं लिहिलं होतं की, ‘आम्ही माताजींना, अंगापूरला त्या निर्मूलन समितीच्या द्वारे एक फटका दिला. आणि आता जर दुसरा फटका आला तर तुम्ही आश्चर्य करू नये.’ त्या फटक्याच्या आधीच रजनीशची फटकावली. त्यांच्या आश्रमातून एका माणसाने हे छापले आहे. ह्या लायकीचे आहात का तुम्ही? तो रजनीश किती घाणेरडा मनुष्य होता त्याच्याबद्दल सांगायला नको. सर्व देशातून त्याला हाकलून लावलं. ते आपल्या डोक्यावर येऊन बसलेत आणि ह्यांचे ते गुरू आहेत. ज्या देशामध्ये ह्यांनी घाण केलेली आहे, त्या लोकांना जाऊन विचारा. एक त्यांची फिल्म आहे. ती पाहिलीत तर आठ दिवस तुम्ही जेवणार नाहीत. इतका घाणेरडा नरक उभा केला आहे त्यांनी. पण बुद्धीवादीला ते दिसतच नाही. तो चालाक होता. मी त्याला फार जवळून पाहिलं आहे. आणि मला आश्चर्य वाटलं, तो जेवायचा तरी बकासूरासारखा. एवढं मोठं ताट, त्याच्यामध्ये चोवीस त्याची पक्वान्न आणि बकासूरासारखं सगळे खाऊन टाकायचा. मी तर आश्चर्यचकित झाले की हा मनुष्य आहे की काय! असं सांगतात की आत्मसाक्षात्कारी माणसाचं शरीर हलकं असतं. मलासुद्धा चालतांना वगैरे त्रास होत नाही. वाच्यासारखं आहे माझं शरीर, पण तो मनुष्य, कुठे बसायचं म्हटलं तर त्याच्यासाठी एक स्पेशल आसन बनवायला लागायचं. या माणसाला मी फार जवळून पाहिलं आहे. बायकांना नागवं करून आणि वाट्टेल ते ह्याने धंदे केलेले आहेत बायकांच्या वर. असा मनुष्य आता तुमचा गुरू झाल्यावर मात्र ह्या देशाची काय दशा होणार आहे? हे सगळे भामटे आता जर ह्या राजकारणी लोकांचे गुरू झाले, तर तुम्ही लोकांनी उठायला पाहिजे ह्याच्याविरूद्ध, ही गोष्ट खरी आहे. त्यांचं तुम्ही बघाल, जोपर्यंत तुमच्यामध्ये सामाजिकरीत्या कुंडलिनीचे जागरण होत नाही तोपर्यंत त्यांचा तुम्ही नि:पात करू शकत नाही. जिथे तिथे, आता ती गुरूमाई म्हणून बाई आली. तिने लोकांना वेड लावलं. त्यांचे मार खाल्लेले इथे लोक येऊन बसलेले आहेत. तो एक मुक्तानंद. त्याने लाखो रूपये कमवले. करोडो रूपये कमवलेत. सहा करोड रूपयाचे त्याच्याजवळ डायमंड्स आहेत असं मला इन्कमटॅक्स कमिशनरनं स्वत: सांगितलं. तर जे लोक पैसे घेतात आणि तुम्हाला मूर्खात काढतात, त्यांच्याकडे हजारोंनी लोक.

जातात. पण जे सत्य सांगतात, सत्याला काही पैसे लागत नाही, तिथे मात्र तुम्ही येऊन विरोध करता. म्हणजे काय अकलेचे दिवे आहेत ते बघा. हे रिकामपणाचे धंदे म्हणावेत की मूर्खपणाचे दिवे म्हणावेत, काय म्हणावं मला सुचेना. हे असं आधीही झालं आहे की संतांच्या मागे हात धुवून लागायचं. पण आता असं करू नये हे बरं, कारण कृतयुग सुरू झालं आहे. तेव्हा त्यात जो त्रास होईल त्याबद्दल मी जबाबदार नाही. ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे, ही तुमची आहे, ‘तुज आहे तुजपाशी’ जे म्हटलेले आहे, ते सगळं सत्य होणार आहे. जे पसायदान लिहिलं त्यांनी, मागितलं ते पसायदानच आहे हे. कुंडलिनीचं जागरण आणि त्याने माणसाची इतकी उन्नती होते. सर्व तऱ्हेचे रोग ठीक होतात. कृषीमध्ये, पशुपालनात, प्रत्येक गोष्टीत इतकी समृद्धी येते! इंग्लंडमध्ये पुष्कळ लोक बेकार आहेत. लाखोंनी लोक बेकार आहेत. पण ते सहजयोगात आले की बेकारी गेली. कारण बुद्धी इतकी तल्लख होते. इतकी तल्लख बुद्धी होऊन जाते. आमचे साहेब तर म्हणतात की, ‘तुला सगळे देवदूत मिळाले.’ ते सगळे देवदूत नव्हते, झाले देवदूत. नव्हते. ते सगळे आता देवदूत झाले. ह्यांचं वागणं बघा, ह्यांचं बोलणं बघा, तोंडावरचं तेज बघा. कोणत्याही भुताच्या मागे लागायचं आणि त्यांना मोठ मानून घ्यायचं. ह्याला काही अर्थ आहे ? डोकं लावणं, ते आज पुढारी बनतात. आमच्याकडे एक धोबी होता. तो आला माझ्याकडे आणि म्हणाला, ‘माताजी, तुम्ही मला मत द्या.’ ‘अरे,’ म्हटलं, ‘तुला मत द्यायला मी काही वेडी आहे का?’ नाही म्हणे, ‘मी पुढारी आहे.’ ‘असं कां!’ ‘इथले म्हणे धोबी आहेत त्यांचा मी पुढारी.’ आणि एवढा मोठा शिकलेला मनुष्य त्याच्या विरूद्ध उभा होता. ‘अरे,’ म्हटलं, ‘मी काय वेडी आहे का तुला मत द्यायला ?’ ‘नाही,’ म्हणे, ‘मी पुढारी आहे.’ आणि तो निवडून आला. म्हणजे, अगदी इतका वाईट मनुष्य होता तो स्वभावाने ! दारूडा. सगळे काही त्याच्यामध्ये गुण होते. पण आमचा धोबी होता, कपड़े चोरायचा, हे करायचा. तो निवडून आला. काय हे लोक. जो मनुष्य सज्जन, सुशिक्षित, मला माहीत आहेत ते सुद्धा गृहस्थ. ते नाही निवडून आले, हा आला धोबी. हा काय प्रकार आहे! आपलं डोकं जागेवर ठेवायला पाहिजे. आज समाजात जेवढं आपण करतो आहे, ते सगळे व्यर्थ जाणार आहे. काहीही राहणार नाही. आता ही शाळा आहे. मला फार बरं वाटलं. शाळा म्हणजे पवित्र स्थान जिथे मुलांना शिक्षण दिलं जातं. आणि जे काही होईल, ते नेहमी आता हे लोक सुद्धा शाळेसाठी, ‘माताजी, काहीतरी द्या. ‘ प्रत्येक ठिकाणी आम्ही शाळेसाठी मदत करतो. पण मी काय बघते, त्यांच्यामध्येच भांडण सुरू. आता हे शाळेसाठीच भांडणं केली अंगापूरला सुरू की, ‘माताजी पैसे तुम्हालाच देतील, आम्हाला का नाही.’ अरे तुम्ही काही कार्य करा तर देऊ. ‘ फार देत नाही. माझ्याजवळ एवढे काही पैसे नाहीत. हे लोकच देतात. मी एकत्र करून दिले आहेत. मी काही दिलेले नाही. आणि त्याच्यावरती हे झालेलं आहे, की इथे येऊन खुसपट काढायचं, काहीतरी भांडण. अहो, आयुष्यभर तुम्ही भांडतच राहणार, तुमची मुलं भांडत राहणार. तुम्ही काही प्रगती करणार आहात का? निदान ह्या लोकांमध्ये भांडखोरपणा तरी नाही. इतके भांडखोर लोक आहेत आणि कुणाची इज्जत नाही. एकदुसऱ्याला खाली ओढायचं हा आपल्या महाराष्ट्राचा गुण आहे. हा फारच वाईट गुण आहे. कुंडलिनी जागरणानंतर हे सगळं संपून जाईल. मनुष्य शांत, समाधानी होईल. एकाचा पाय ओढ, दूसऱ्याचा पाय ओढ. कशी प्रगती होणार त्यांची. कोणाही बद्दल सात्त्विक श्रद्धा नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लंडनसारख्या शहरामध्ये माझ्या यजमानांनी काम केलं आहे. १३४ देशामधून ते निवडून आले होते आणि लंडनसारख्या देशात जिथे इंग्लिश लोक कोणाला घुसू देत

नाही, ‘सर्वोच्च’ साहेबांना दिलं. ती पदवी आणि कुणाला नाही. ही त्यांची जी ओळख, ज्यांनी काम केलं, ज्यांनी मेहनत केली, जो सच्चा मनुष्य आहे, त्याची ओळख होती. हे आपल्या देशात कधी येणार आहे! परवा मी गेले. मला पोलिसवाल्यांचंसुद्धा इतकं वाईट वाटलं. रस्त्याने जात होते. उभे होते बिचारे. म्हटलं ‘आता तुमचं हे कसं काय चाललं.’ ‘अहो, काही नाही माताजी, उभे आहोत ओळीने.’ ‘का?’ तर म्हणे, ‘इथून एक मिनिस्टर जाणार आहे.’ ‘अरे, जाणार तर त्यांना मारायला कोण येणार आहे ? कशाला उभे तुम्ही इथे ? चहा प्या. काहीतरी करा. मलाच त्यांची दया वाटली. परत मी आले ८-१० तासाने तरी पोलिस उभेच तिथे. ‘अरे,’ म्हटलं, ‘काही खाल्लं- प्यालं की नाही?’ काही नाही. बरं, शेजारपाजाऱ्यांनी तरी त्यांना काही चहापाणी द्यायचं. नाही. पोलिसवाले, म्हणजे गेले. अरे, ते तिथे उन्हातान्हात उभे किती वेळचे. माझाच जीव हळहळला. पण इतक्या लोकांसाठी कशी तिथे व्यवस्था करायची मला काही समजेना. ‘अरे,’ म्हटलं, ‘थोडं जाऊन, आळीपाळीने जाऊन जरा काही खाऊन या नां! असं काय करता इथे. आठ तास कशाला उभे.’ ‘आम्ही जाऊच शकत नाही,’ म्हणे. ही आपल्या इथे दुर्दशा. म्हणजे जे प्रेमाचं स्थान, जो प्रेमाचा सागर, असा हा महाराष्ट्र होता. तिथे केवढी घाण आलेली आहे. प्रेम सोडून भाऊबंदकी वर आली आहे. अहो, थोडी होती पूर्वी. आजकाल इतकी भाऊबंदकी झालेली आहे ! कोणाबद्दल काही प्रेम नाही. सहजयोग म्हणजे काय? हे जे प्रेमाचा सागर , क्षमेचा सागर , दयेचा सागर अशी जी परमचैतन्याची शक्ती ती आपल्यात वाहू लागल्याबरोबर मनुष्याला इतकं प्रेम येतं आणि इतका आनंद वाटतो! ‘आनंदाच्या डोही’ जे वर्णन केलेले आहे ते समोर आहे. तेव्हा ही कुंडलिनी आपली जागृत करून घ्या आणि अशा बेकार लोकांच्या नादी लागू नका. अगदी बेकार लोक आहेत. काही त्यांना अर्थ नाही. जे गृहस्थ आले होते, मानव, त्यांच्यावरून, ‘शितावरून भाताची परीक्षा,’ त्याला अध्यात्म माहीत नाही. त्याचा काही व्यासंग नाही. त्याला काही मेडिकल माहीत नाही, की काही माहीत नाही. आता त्याच्याशी बोलायचं तरी काय, कप्पाळ! मग शेवटी मी त्याला एक टेप करून दिली, की बाबा, हे पहा, जरी मी मेडिकल शिकलेले असले, तरी मराठी भाषेचा माझा फार अभ्यास आहे. मी वाचलंय. काय मराठी भाषा आहे ! तुम्हाला माहीत नाही, भाषेसारखी भाषा नाही. आणि महाराष्ट्रात तर ही विशेष आहे. एक तर देशभक्ती आणि दुसरं देवाकडे लक्ष. हे दोन्ही ठेवलं आहे. जसे शिवाजी महाराज आत्मसाक्षात्कारी होते. त्यांनी हे नाही म्हटलं , की हा धर्म जागवा, मराठी ‘स्व धर्म जागवावा.’ स्व धर्म, ‘स्व’ म्हणजे आत्म्याचा धर्म, त्यांनी आपली स्वयंचालित संस्था जाणतात, त्याला जागवलं पाहिजे. आणि म्हणून आत्ताच आपण कुंडलिनी जागृतीचे कार्य करतो. याबाबतीत उहापोह करता येत नाही. कारण ज्याला डोळे नाही, त्याला कसं सांगायचं की हा रंग कोणता आहे. आधी डोळे येऊ द्या, मग बघू. नसते वाद-विवाद करून, तीन तास त्या मानवशी बोलून, मी म्हटलं, ‘नमस्कार तुमच्या अज्ञानाला! एवढा अज्ञानी मनुष्य मी आजपर्यंत पाहिला नाही. आणि तुम्ही पुढारी कसे झालात.’ मग नंतर, कोणी तरी सांगितलं ते वध्ध्याला जेलमध्ये होते आणि म्हणायला लागले की, ‘मला इथले जेवण आवडत नाही.’ कशा कारणाने गेले माहीत नाही. त्यांनी सांगितलं की, ‘इथलं जेवण खावं लागेल.’ ‘नाही, नाही म्हणे इथलं नको.’ मग त्याच्यावरती एक बाई होत्या त्यांनी मला सांगितलं की, ‘माताजी, शेवटी ह्याने सांगितलं, मी तुमच्या पाया पडतो, मागतो, लिहन देतो, मला घरी जाऊ द्या. मी घरचं जेवण जेवेन.’ अशी माणसं तुमचे लीडर. असे विद्वान लोक क्षमा.

तुमचे लीडर आहेत. तेव्हा ह्याला तर्क करता येत नाही. तक्काच्या पलीकडे आहे. विज्ञानाच्या पलीकडे अध्यात्म आहे. पण हे ‘आधी कळस, मग पाया,’ आधी अध्यात्म मिळवायचे, मग करा वाट्टेल तेवढी प्रगती. आणि प्रगती होणारच. कारण तुमच्यावर आशीर्वाद आहे, परमेश्वराचा. परमेश्वराच्या आशीर्वादानेच सगळं कार्य होतं. तेव्हा तो आशीर्वाद आपण घ्यावा आणि ह्या महाराष्ट्र देशाला भूषवावं, अशी माझी सर्वांना विनंती आहे. आता आपण आधी जागृतीचा कार्यक्रम करू या. हे लोक सगळे विदेशी आहेत. एखाद्या इंग्लिश माणसाला नुसतं असं सांगायचं असलं, की दरवाजा बंद कर . तर त्याला खोलता येत नसे. त्याला सांगायचं इंग्लिशमध्ये ‘देअर वॉज अ बँकर.’ मग तो ते म्हणायचा. त्याला एक अक्षर शिकवणं कठीण. आणि पुढे तो मराठीत बोलायला लागला, तर माझ्या आजीबाई म्हणायच्या, की कोणती भाषा बोलतोय हो. अहो, म्हटलं मराठीत बोलतो आहे. ‘असं का! मला वाटलं कोणती, इंग्लिश नाही, मराठी नाही, आहे कोणती भाषा. ‘ आता तुम्ही ह्यांचं ऐकून घ्या. पोवाडा गातात सगळे काही. हे कुठून आलं. ते म्हणतात, आपलं संगीत हे ॐकार स्वरूप आहे. हे सिद्ध होतं. ह्यांना कुठून आलं हे सगळे काही. ताला-सुरात, आपल्याहीपेक्षा छान म्हणतात. तेव्हा ह्यांच्या प्रगतीकडे बघून आपणही आपली प्रगती करून घ्यायची आणि आपल्याकडे लक्ष द्यायचं. आपण काही साधारण लोक नाही. ह्या महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. पण त्याला पाहिजे जातीचे. ‘येऱ्यागबाळ्याचे काम नोहे.’ तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे, आपला गौरव, आपली शक्ती ही आपल्यात असताना आपण ती का सोडायची? ती का वापरायची नाही! तेव्हा कृपा करून आपलं थोडसं, एक दहा मिनिटाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला जागृती होईल. ज्यांना होईल त्यांना होईल. नाही होणार त्यांना नाही होणार. याच्यात जबरदस्ती करता येणार नाही. उद्यापासून तुमची इच्छा असेल तरच, जर तुम्ही त्याच्या विरोधात असलात तर कधीही जागृती होणार नाही. आता हे हिटलर लोक सगळे दगड घेऊन निघालेले आहेत. ते म्हणतात आम्हाला जागृती करा. जन्मात होणार नाही त्यांची जागृती. होणं शक्यच नाही. ज्यांच्या मनामध्ये जरासुद्धा सात्त्विकता नाही, अशा तामसी लोकांची कोण जागृती करणार? शक्यच नाही. कारण त्यांची लायकी नाही. जागृतीची लायकी तर पाहिजे. दोन लाख मोजा नाहीतर शंभर लाख मोजा. ह्यांची जागृती मला काय, कोणालाच जमणार नाही. ब्रह्मदेवालासुद्धा जमणार नाही. तेव्हा ते शक्य नाही. फक्त ज्या माणसामध्ये असे सात्त्विक विचार असतील, की माझी जागृती झाली पाहिजे. मग तुम्ही काहीही केलं तरी हरकत नाही. या क्षणाला. हे ज्यांच्या मनामध्ये असेल, की माझी जागृती झाली पाहिजे. मला शक्ती मिळाली पाहिजे. त्यांचं आम्ही कार्य करू शकतो आणि ते होऊ शकतं. त्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. दडपशाही करू शकत नाही, काही नाही. तर सगळ्यांनी आता आपली जागृती करून घ्यावी. एका अर्थाने ऊन असलेलं बरं ! म्हणजे जे थंड-थंड डोक्यातून येतं किंवा हातातून येतं, ते लगेचच कळतं. ऊन नसलं तर जरा त्रास होतो कधी कधी. एअरकंडिशन असेल तर लोकांना शंका येतात, की हे एअरकंडिशनच चालू आहे. आता आपण जागृतीचं कार्य करू. अहो, तुम्हा लोकांची जागृती पाच मिनिटात होते आणि ह्या लोकांवर माझे मी हात मोडले, वर्षानुवर्ष मेहनत

केली तुम्हाल माहीत नाही, पण झाले मात्र हे एकदा. मिळाल्यावर मात्र जमले खूप जोरात. तुम्ही जमत नाही. जसं आपलं स्वातंत्र्य लवकर मिळालं, तर बसले त्याचे धिंडवडे काढत. तसाच प्रकार आहे हा. सहजयोगामध्ये लोक जमत नाही. माझ्या प्रोग्रॅमला येतील. पार होतील. पण सत्कारणी नाही लागत. सत्कारणी लागत नाही. तसं करू नका. कृपा करून आज जागृती घेतल्यानंतर सत्कारणी लावा. फार मोठे कार्य होणार आहे तुमच्या हातून, तुम्ही फार शक्तिशाली आहात. त्या शक्तीला प्राप्त करा. ती शक्ती जर तुम्हाला मिळाली आणि त्यात जर तुम्ही वृक्षासारखे वाढले तर तुम्हीच तुमचे गुरू होता आणि इतकं तुम्ही कार्य करू शकता की त्याला काही अंतर नाही. तेव्हा कृपा करून सहजयोगाला प्राप्त व्हा. सहज, सह म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला. हा योगाचा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो तुम्ही प्राप्त करून घ्यावा. घ्यावं. काल काही लोक बसले नाही, झाले नाही पार. काय होतं माहीत नाही. या सगळ्यांनी बसून पृथ्वीचाच असेल काही तरी अधिकार! बसले नव्हते ते पारच नाही झाले. वर लटकतच राहिले. असं नाही की जमिनीवरच बसलं पाहिजे. कुठेही बसले असले तरी ठीक आहे. पण जोडे, वहाणा नको. वहाणा काढून टाका. बरं दुसरं असं की, मी आई आहे. माझ्यासमोर टोप्या घालायला नको. कारण मी आई आहे आणि आईला काही आपण टोप्या घालून भेटत नाही. तेव्हा मी मिनिस्टर किंवा गुरू नाही. तेव्हा कृपा करून टोप्या उतरवून घ्यायच्या. कारण हे ब्रह्मरंध्र छेदायचे आहे नां! टोपी काढलेली बरी ! विल यू प्लीज टेक आऊट यूवर कॅप ? आता फक्त दोन्ही हात माझ्याकडे असे करायचे. नुसते असे. साधे दोन्ही हात असे माझ्याकडे करा. काहीही करायला नको तुम्हा लोकांना. नुसते असे हात करायचे. पाय थोडे वेगळे ठेवा. एकावर एक पाय नको. बसलेल्यांचं नाही म्हणत, पण जे वरती आहेत, असे वर बसलेले, त्यांनी पाय थोडे वेगळे ठेवलेले बरे! जमिनीवर बसलं म्हणजे झालं. त्यांचं तर कल्याण होणार! बरं, आता नुसते डोळे मिटायचे. नुसते डोळे मिटा. काही करायचं नाही दसरं. डोळे मिटा. आणखीन चष्मा असेल तर तो उतरवून घ्या. चष्मा उतरलेला बरा. डोळ्याची दृष्टी पुष्कळदा बरी होते. फक्त डोळे मिटायचे. आणि मनामध्ये अशी इच्छा धरायची, ‘आई, आमची कुंडलिनी जागृत झाली पाहिजे.’ ही तुमची आई आहे. कुंडलिनी तुमची आई आहे. प्रत्येकाची वेगळी, वैयक्तिक आई आहे. तुमचं जसं सगळे टेपरेकॉर्डमध्ये असतं तसं तिच्याजवळ सगळे काही आहे. तिला माहिती आहे, की तुम्ही कोण, कसे आहेत. आता डोळे मिटले. डोळे उघड़ू नका. कृपा करून मी सांगितलं नाही तोपर्यंत डोळे उघडू नका. कारण चित्त आतपर्यंत ओढलं जातं. कुंडलिनी जेव्हा वर येते तेव्हा चित्त आतपर्यंत ओढलं जातं. तेव्हा डोळे बंद ठेवलेले बरे. हे काही मेस्मरिझम नाही. तुमचे डोळे उघडे ठेऊन, लोक डोळ्यात डोळे घालून करतात ते. हे देवाचं कार्य जिवंत कार्य आहे. आता डोळे मिटल्यावर फक्त पाच मिनिटाची गोष्ट आहे अजून. ( माताजींनी माईकमध्ये फुंकर मारली) आता हळूहळू डोळे उघड. आता डावा हात माझ्याकडे करा. फक्त डावा हात माझ्याकडे ठेवा आणि उजवा हात असा. परत उजवा हात. थोडसं संतुलन द्यावं लागतं आधी. मान वाकवून घ्यायची. आणि डाव्या हाताने, उजवा हात असाच. डाव्या हाताने जी टाळू आहे त्याच्यावर अधांतरी असा डावा हात धरायचा. अधांतरी. हा मराठीतला शब्द ‘अधांतरी’ कुठे नाही. अध्ांतरी धरायचे. डोक्यातून गार यायला पाहिजे किंवा गरमही वाटू शकतं. जर तुम्ही क्षमा नसेल केली सगळ्यांना, तर क्षमा केली पाहिजे. सगळ्यांना क्षमा करून टाका. स्वत:लाही

क्षमा करा. ‘माझं हे चुकलं, माझं ते चुकलं ,’ काही नाही. तुम्ही मानव आहात. मानवच चुका करतात. परमेश्वर थोडी करतो. तेव्हा ‘माझे हे चुकलं, माझं ते चुकलं,’ असं काही म्हणायचं नाही. आत्मविश्वास ठेवला पाहिजे. अजून तुम्ही आपल्याला जाणलं नाही. आता डावा हात माझ्याकडे करायचा. जेव्हा तुम्ही स्वत:ला जाणलं नाही, तेव्हा तुम्ही काय स्वत:मध्ये असा वाईट विचार करता. मान खाली घाला. वाकवून घ्यायची खाली. परत उजव्या हाताने करा. असा विचार ठेवायचा नाही, की मी हे पाप केलं, ते पाप केलं, हे चुकलं, ते चुकलं, काही नाही. ह्यावेळेला काही नाही. आणि असे जे लोक तुम्हाला सांगतात नां, ते स्वत: पापी आहेत. सगळ्यांना क्षमा करा एकसाथ. कोणाला क्षमा करायचे ठेवायचे नाही. सगळ्यांना एकसाथ क्षमा करा. आता उजवा हात परत माझ्याकडे. एकसाथ क्षमा करा सगळ्यांना. क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही करता तरी काय? काहीच करत नाही. फक्त आपल्याला त्रास करून घेता. सगळ्यांना एकसाथ क्षमा. आता दोन्ही हात डोक्यावर. असे घेऊन मान मागे घ्यायची आणि एक प्रश्न विचारायचा मनामध्ये तीनदा, ‘श्रीमाताजी, परमचैतन्य आहे का?’ असा प्रश्न तीनदा विचारायचा. ‘माताजी, हे परमचैतन्य आहे का?’ किंवा ‘श्रीमाताजी, ही परमेश्वरी प्रेमाची शक्ती आहे का?’ असा प्रश्न तीनदा, कोणताही विचारा तुम्ही. तीनदा, मान वर करून. काही घाबरायचं वगैरे काही नाही. आता हात खाली करा. दोन्ही हात माझ्याकडे करा आणि माझ्याकडे न विचार करता बघा. न विचार करता. ही निर्विचार समाधी. ही निर्विचार समाधी आहे. आता ज्या लोकांच्या हातामध्ये, बोटांमध्ये किंवा टाळूमध्ये थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील. त्यांनी दोन्ही हात वर करायचे. वर, वरपर्यंत. वा, वा! ही खरी पायरी आहे. लहानपणी ‘पळसाला पाने तीन’ शिर्षकाचा एक लेख वाचनात आला. त्यात एक मुलगा वाईवरून पुण्याला निघाला होता. त्याचं वर्णन होतं. मला पुष्कळदा वाटायचं की वाईला यायचं. कारण वाई काहीतरी एक तीर्थस्थान असेल, असं मला नेहमी वाटायचं. आज ते कळलं. आता तुम्ही वाईमध्ये आहात तेव्हा, ह्या स्थानाचं महात्म्य ठेवलं पाहिजे आणि धर्मात उतरलं पाहिजे. आता खरा धर्म तुमच्यात जागृत झाला . तुम्ही कोणत्याही धर्माचे असले, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, तरीसुद्धा वाट्टेल ते पाप करू शकता, म्हणजे तो धर्म तुम्हाला रोखत नाही. पण आता तुमचा हाच आत्मधर्म झाल्यामुळे तो तुमचा आत्माच तुम्हाला सांभाळेल. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे!