
Public Program, Bhautik Pragati Adhyatmikte shiway hot nahi (India)
भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही ब्रह्मपुरी, १८ डिसेंबर १९९० सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसर्याला मेळ बसत नाही. मुख्य कारण असे आहे की केवळ सत्य जाणण्यासाठी आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे, ज्याला आपण अध्यात्म असे म्हणतो. आता डॉ.प्रभुणेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. पण ती अशी समजून घेतली पाहिजे की विज्ञान हे एकांगी आहे आणि एकांगी असल्यामुळे मनुष्याची सर्वांगीण उन्नती त्या विज्ञानामुळे होऊ शकत नाही. विज्ञानामध्ये कला नाही, प्रेम नाही, आनंद नाही. शुष्क आहे. जे समोर दिसते आहे त्यालाच आविष्कारीत करून मनुष्याने आपल्या भौतिक प्रगतीकरता हे विज्ञान वापरलेले आहे. पण जी भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही तिचा त्रास हा महाराष्ट्रात राहून कळणार नाही. आता आमचं म्हणजे काहीतरी असं नशीब आहे की सारखे आम्ही फिरत असतो आणि अनेक देशांत प्रवास केला. आणि अनेक देशात वास्तव्य झालं. इथे माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती अशी की ह्या लोकांना या एकांगी विज्ञानामुळे अनेक त्रास झाले. मुख्य म्हणजे ह्यांची सामाजिक व्यवस्था अगदी तुटून गेली. मुलांना काहीही वळण नसल्यामुळे मुलं तिथे ड्रग घेतात, दारू पितात, वाट्टेल तसे वागतात. पुष्कळ मुलांनी तर शाळा-कॉलेजला जाणं सोडलं. ते जरी असलं तरी अमेरीकेसारख्या देशामध्ये ६५% लोक, मग ते मोठे असोत, लहान असोत, मुलं असोत ह्यांनी Read More …