Public Program Satara (India)

पब्लिक प्रोग्रॅम सातारा .  मानवी कल्पनेनी ते आपण आकलन करू शकत नाही . ते मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे . मानव चेतनेत ते आपण जाणू शकत नाही . जर हि गोष्ट आपण लक्षात घेतली तर अध्यात्म म्हणजे काय ते आपल्या लक्षात येईल . अध्यात्म म्हणजे आत्म्याचं ज्ञान . ते झाल्या शिवाय कोणतीही अंधश्रद्धा ठेऊन ,कोणतीही धारणा धरून हे कार्य होत नाही . त्याला कुंडलिनीच जागरण हेच एक विधान सांगितलं आहे . ज्ञानेश्वर हे नाथ पंथीय आहेत . नाथ पंथियां मधली परंपरा अशी कि एका गुरूला एकच शिष्य असे . आणि त्या गुरुनी एकाच शिष्याला जागृती द्यायची आणि हे सगळं ज्ञान सांगायचं , पण ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात एक मोठी कामगिरी केली त्यांचे गुरु होते त्याचे जेष्ठ बंधू निवृत्तीनाथ त्यांना परवानगी मागितली ,कृपा करून एव्हडी परवानगी द्या कि मी जे काही कुंडलिनी बद्दल जाणतो ते मी स्पष्ट रूपाने लोकांना सांगू शकतो . नुसतं सांगायची मला परवानगी द्या . मी कुणालाही शिष्य करणार नाही पण मला फक्त सांगायची तुम्ही परवानगी दिलीत तर मला सार्थक वाटेल . त्यांनी हि परवानगी ज्ञानेश्वरांना दिली . आणि त्यामुळे बाराव्या शतकात च  ज्ञानेश्वरी लिहिताना सहाव्या अध्यायात त्यांनी कुंडलिनीच वर्णन करून ठेवलं आहे . पण धर्म मार्तंडाना यातलं काही गम्य नव्हतं म्हणून त्यांनी सहावा अध्याय निषिध्द आहे म्हणून सांगितलं . त्यामुळे लोकांना कुंडलिनी बद्दल ज्ञान झालं नाही . पण त्या नंतर रामदास स्वामींनी कुंडलिनी बद्दल बरच सांगितलं आहे . हि रामदासांची कृपा ,केव्हडी पवित्र असली पाहिजे . त्यांनी स्पष्ट पणे सांगितलं कुंडलिनीच जागरण हे आवश्यक आहे . त्या शिवाय आत्म्याचं ज्ञान मिळत नाही . अध्यात्म बनत नाही . त्यांना कुणी विचारलं किती वेळ लागतो कुंडलिनीच जागरण व्हायला ,त्यांनी सांगितलं तत्क्षण ,पण देणारा  तसा पाहिजे  आणि घेणाराही तसा Read More …

Public Program (India)

Sarvajanik Karyakram 18th December 1990 Date: Karad Place Public Program Type सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसऱ्याला मेळ बसत नाही. मुख्य कारण असे आहे की केवळ सत्य जाणण्यासाठी आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे, ज्याला आपण अध्यात्म असे म्हणतो. आता डॉ.प्रभुणेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. पण ती अशी समजून घेतली पाहिजे की विज्ञान हे एकांगी आहे आणि एकांगी असल्यामुळे मनुष्याची सर्वांगीण उन्नती त्या विज्ञानामुळे होऊ शकत नाही. विज्ञानामध्ये कला नाही, प्रेम नाही, आनंद नाही. शुष्क आहे. जे समोर दिसते आहे त्यालाच आविष्कारीत करून मनुष्याने आपल्या भौतिक प्रगतीकरता हे विज्ञान वापरलेले आहे. पण जी भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही तिचा त्रास हा महाराष्ट्रात राहून कळणार नाही. आता आमचं म्हणजे काहीतरी असं नशीब आहे की सारखे आम्ही फिरत असतो आणि अनेक देशांत प्रवास केला। आणि अनेक देशात वास्तव्य झालं. इथे माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती अशी की ह्या लोकांना या एकांगी विज्ञानामुळे अनेक त्रास झाले. मुख्य म्हणजे ह्यांची सामाजिक व्यवस्था अगदी तुटून गेली. मुलांना काहीही वळण नसल्यामुळे मुलं तिथे ड्रग घेतात, दारू पितात , वाट्टेल तसे वागतात. पुष्कळ मुलांनी तर शाळा-कॉलेजला जाणं सोडलं. ते जरी असलं तरी अमेरीकेसारख्या देशामध्ये ६५% लोक, मग ते मोठे असोत, लहान असोत, Read More …