Public Program

Kolhapur (India)

1990-12-19 Public Program, Marathi Kolhapur India DP-RAW, 109'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

1990-1219 PUBLIC PROGRAM, KOLHAPUR, INDIA

 शोधणाऱ्या आपण सर्व सहजयोग्यांना, तसेच अजून जे सहजयोगी झाले नाहीत अशा सर्वांना आमचा प्रणाम नमस्कार!

       आशा ठेवली पाहिजे की सत्य आहे तिथे आहे आणि आपण त्याची कल्पना करू शकत नाही, त्याच्यावर कोणचंच आरोप पण करू शकत नाही, किंवा आपण ते बदलूही शकत नाही. हे सत्य काय आहे? हे सत्य आहे की आपण मन, बुद्धी, अहंकार या उपाधी नसून आपण आत्मा आहोत, आणि दुसरं सत्य असं आहे की, चराचरामध्ये एक सूक्ष्म शक्ती जिला वेदामध्ये ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. तसंच शास्त्रामध्ये तिला परमचैतन्य असं म्हटलेलं आहे. बायबलमध्ये त्याला ‘कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट’ म्हटलेलं आहे. आदिशंकरानी तिला ‘सलिलं सलिलं’ म्हणून पराशक्तीचे वर्णन केलेले आहे. ही अशी शक्ती जी सर्व जिवंत कार्य करते ती जिवंत कार्य करणारी ही शक्ती आहे आणि तिला जाणणे तिचा बोध होणे हे अत्यंत आवश्यक आहे. मानवी चेतनेपर्यंत आपण आपल्यावर उत्क्रांतीमध्ये आलोत. एवोलूशन मध्ये आलो आहोत, पण अजून मानवी चेतनेत आपल्याला अजून केवल ज्ञान किंवा केवल सत्य मिळालेलं नाही. त्याचा अर्थ असा की प्रत्येकजण एकच गोष्टीला एक आहे असं म्हणत नाही. म्हणजे आता आपल्याला डोळ्यांनी दिसतंय मी आपल्यासमोर उभी आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता की माताजी आमच्यासमोर उभ्या आहेत. पण विचारांच्या बाबतीत तसं नाही. प्रत्येकाचा विचार वेगळा वेगळा बनतो, त्यामुळे धारणा वेगळ्या आहेत, प्रणाल्या वेगळ्या आहेत. कुणाला कम्युनियम पाहिजे, तर कुणाला डेमोक्रेसी पाहिजे, कुणाला एक राजा असलेला तो चालेल, अशारीतीने अनेक तऱ्हेचे राजकारणातसुद्धा, समाजात प्रत्येक ठिकाणी एक-एक वेगळा विचार करतात.

         लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की आपण आधी स्वातंत्र्य घेतलं पाहिजे आणि आगरकरांचं असं म्हणणं होतं की नाही आधी समाजाची व्यवस्था ठीक केली पाहिजे. दोन्ही गोष्टी ठीक होत्या, असूनसुद्धा त्यांच्या विचारांमध्ये फरक होता. पण कधी कधी असेही विचार असतात की ज्याच्यामध्ये लोकहित किंवा लोक कल्याणाचा विचारच नसतो. त्या विचारांमध्ये मला असे म्हणता येईल, की कोणच्याही प्रकारची धर्मांधता ही कधीही लोक कल्याणाला सार्थक होऊ शकत नाही. आता आपण सद्दामचं पाहिलंच आहे की त्याच्यात धर्मांधता दिसली आणि त्याने किती लोकांना त्रास दिला. किंवा कोणत्याही कल्पनेबद्दल, कोणत्याही विचाराबद्दल तीच खरी आहे, एका (अस्पष्ट) असा विचार करून दुसरे जे आहेत ते खोटे आहेत आम्हीच तेवढे खरे अशे म्हणणारे लोक सुद्धा अत्यंत समाजाला घातक आहेत. तेव्हा ते केवल सत्य मिळालं पाहिजे. त्यालाच आपण कैवल्य असं म्हणतो. जेव्हा सर्व लोक एकच गोष्ट बोलतात, आणि एकच गोष्ट सांगतात, आता ही महाराष्ट्राची भूमी अत्यंत पावन भूमी आहे. अत्यंत पावन आहे ते ह्या लोकांना विचारावं. सगळीकडे त्यांना आमंत्रण आहे. प्रत्येक अं.. प्रत्येक शहरातून, प्रत्येक तिथलं आमंत्रण असलं किंवा दुसऱ्या प्रांतातून फार आमंत्रणं आहेत आणि तिथे पुष्कळ सहजयोगी आहेत. हजारोंनी आहेत. पण ह्यांचं म्हणणं आम्ही महाराष्ट्रातून फिरणार कारण का त्यांचं म्हणणं आहे ही संतांची भूमी आहे, आणि इथलं चैतन्य फार शुद्धीकरणाला मदत करतं. ह्या गोष्टीसुद्धा आत्मसाक्षात्कारानंतरच लोकांच्या लक्षात येऊ शकतात, नाही तर येऊ शकत नाही. 

        हे लोक जे बोलतात, ते आपल्या लक्षात येणारच नाही, कारण ह्यांचं जे बोलणं आहे ते एका पातळीवर आहे. तर वैचारिक पातळीतसुद्धा कोणी उंच असतं कोणी कमी असतं. कोणी शेतकरी असतो, कोणी अशिक्षित असतो, कोणी शिंपी तर कोणी आपल्याला माहिती आहे, आपल्या देशामध्ये संत प्रत्येक जातीमध्ये झाले आहेत. पण ह्या संतांचं एकच मत होतं, त्यांच्यात कधीही भांडणं झाली नाहीत. त्यांच्यात कधीही वाद-विवाद झाले नाहीत, फक्त हे धर्ममार्तंडानी मात्र त्यांना खूप त्रास दिला. एकनाथांनी महाराच्या घरी जेवले. तुकारामांनी म्हटलं ‘झाला महार पंढरीनाथ’ श्रीकृष्ण सुद्धा दासीपुत्र विधुराच्या घरी जेवायला गेले होते आणि रामानेसुद्धा शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती. इतकंच नव्हे श्रीकृष्णाचं आयुष्य लिहिणारे किंवा त्यांच्याबद्दल लिहिणारे जे गीतेचे फार मोठे पंडित आपण मानतो, व्यासमुनी, ते कुणाचे पुत्र होते? एका कोळीणीचे आणि ते ही (अस्पष्ट) रामाचे लिहिणारे तर वाल्मिकी. वाल्मिकी कोळ्याची गोष्ट सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी वाचलीच आहे. त्यांनी कुणी धर्ममार्तंड का शोधून नाही काढला. त्यांनी अशे सर्व साधारणच लोक का शोधून काढले? आणि वाल्मिकी सारखा एक कोळी, कमालीची गोष्ट आहे बघा, की संस्कृतामध्ये इतकं सुंदर रामायण त्यांनी कसं लिहिलं? काहीतरी त्याच्यात किमया झाली असेल, पण एक असं विचार करायचा की ह्या संतांचं कधी आपापसांत भांडण झालं एक गोष्ट आहे, पण त्याशिवाय ह्यांचं आयुष्य किती निर्मळ, किती अल्हाददायी किती उज्ज्वल आणि जगाच्या कल्याणात संतांच्या (अस्पष्ट) ते आजकालच्या काळात तुम्ही असा एक मनुष्य दाखवा की ज्याला आपण म्हणू शकू की हा खरोखर निर्मळ मनुष्य आहे.

       कोणत्याही प्रांगणात, फारच कमी लोकं अशी आहेत, की जे निर्मळ आहेत आणि आहेत ते साक्षात्कारी आहेत. रशियाचा (अस्पष्ट) आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे म्हणून त्याने आम्हांला पाचारण केलं. आमचं एवढं कार्य यशाला चालू आहे. साक्षात्कारी पुरुष होते लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी होते. ह्या लोकांनी जे कार्य केले आहे ते इतकं निर्मळ, स्वच्छ, पण दुसऱ्यांची दुःख बघून कोणी पैशे-बियशे, लाच- लुचपत वगैरे ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यातसुद्धा येत नव्हत्या. आमचे वडीलसुद्धा आत्मसाक्षात्कारी, कधी मला ते मेयरसुद्धा होते नागपूरचे. नंतर मग कॉन्स्टिटूटचे मेम्बर होते, आणि त्यांची आंबेडकरांची फार मैत्री. आंबेडकर सुद्धा अगदी निःस्पृह मनुष्य होते, अत्यंत विद्वान आणि निःस्पृह. त्यांना मी फार जवळून जाणते. आमच्या घरी त्यांचं येणं- जाणं असे. त्यांची वैचारिक पातळी फार उच्च असली (अस्पष्ट) फरक होता (अस्पष्ट) फार मोठया मोठया लोकांशी बोलण्याचा त्यांच्याबरोबर राहण्याचा (अस्पष्ट) आणि बेचाळीस सालात सुद्धा पुष्कळ कार्य करावं लागलं. त्यात पुष्कळदा मारहाण झाली, पुष्कळ त्रास झाला, सगळं काही झालं, पण आपला देश मात्र स्वतंत्र झाला. तर अशे निर्भय लोक संत होते. त्यात अगदी धडाकून बोलत असत, निर्भय. दासबोध हे ब्राह्मण होते, त्यांनी काय म्हटलं, ‘अहो, आम्हासी म्हणती ब्राम्हण, आम्ही जाणिले नाही ब्रम्ह, आम्ही कसले ब्राम्हण’. दुसरे सरस्वती होते दुसरे तेही ब्राम्हण होते. ते रस्त्याने चालले असता एखादया माणसाने पहिले एखादा शेंदूर-बिंदूर फासून ते काहीतरी दगड बसवलाय त्याला लाथेने उडवून टाकायचे, त्या माणसाला ठोकून काढायचे. नंतर रामदासस्वामींबद्दल बोलायलाच नको. साक्षात हनुमानाचे अवतरण होते, त्यांनी तर अशा लोकांना जे अगुरु आहे लोकांना फसवत होते. त्यावर शिव्या घातलेल्या आहेत. त्यांना शिव्याबिव्या येत नव्हत्या, पण काहीतरी आपल्या मनाने शिव्या (अस्पष्ट) असं काहीतरी लिहिलेलं आहे. एक फक्त सांगता येईल, की सगळ्यांना जात-पात, अंधकार, अज्ञान ही अंधश्रद्धा त्याच्याविरुद्ध अत्यंत चीड होती. मग आता ज्ञानेश्वरांनी, सांगावं काय त्यांच्याबद्दल, तेविसाव्या वर्षांत अमृतानुभवासारखा इतका सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. तो ग्रंथ जर तुम्ही त्याच्या दोन ओळी रोज वाचल्या, सारा दिवस अगदी आनंदात जाईल. अहो तेवीस वर्षामध्ये त्या मुलाने, लहानसा मुलगाच होता तो, त्यांच्यासारख्या दोन ओळी कोण लिहून दाखवेल? तर मी म्हणेन की काहीतरी यांच्या बोलण्यात अर्थ आहे. नाहीतर म्हणे की त्यांच्या समाधीला उकळायला चालले होते. त्यांची हाडं बघायला. काय लहान तोंडी मोठा घास घेतात लोक, काही अक्कल नाही. अश्या गोष्टी बोलणं महापाप आहे. संतांच्या बद्दल असल्या गोष्टी बोलायचं, म्हणजे लोकांना काही ती भीतीच नाही. लावली जीभ ती टाळूला आणि वाट्टेल ते बोलायला सुरुवात केली. किती आदरानं त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. अहो, पंचवीस वर्षांपूर्वी अशी आपल्या देशात स्थिती नव्हती, सांगते, आपल्याला संतांच्या बद्दल एवढा आदर होता. आम्ही सगळं शाळेत वगैरे मराठीत शिकलो तर आम्ही मला तर वाटतं ७० ते ७५ टक्के संबंध वाङ्मयच मुळी संतांच्या वर भारावलेलं होतं. त्यांच्याच वाणीत, आणि ते सगळं असतानासुद्धा आज अशी ही स्थिती आली आहे की कोणीतरी उठावं आणि काहीतरी बोलावं आणि लोकांनी त्यांनी त्यांचा जयघोष करावा.

         त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्या. ख्रिस्ताने सांगितलं ‘नो दायसेल्फ’, मोहम्मद साहेबांनी सांगितलंय, तुम्हांला आश्चर्य वाटेल की, मोहम्मद साहेब हे दत्तात्रयाचेच एक अवतरण होते, आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की जेव्हा यामा येईल रेझरेक्शन म्हणजे तुमची उत्क्रांती होईल जेव्हा रेझरेक्शन येईल त्यावेळेला तुमचे हात बोलतील, म्हणजे सहजयोगावर स्पष्टच सांगितलं त्यांनी आणि खरोखर हात बोलतात सहजयोगात. कारण ह्या ज्या (हाताच्या तळव्यावर दाखवून) पाच आणि सहा आणि सात चक्रं आहेत ती तुमच्या हातावर आहेत, त्यांची जाणीव बोधविद होते. आता ज्ञानेश्वरांनी एक मोठी कामगिरी केली. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी. कुंडलिनीबद्दल इतक्या पुस्तकांत लिहिलंय तर त्याची सूची तुम्हांला दिली तर तुम्हांला आश्चर्य वाटेल. मार्केंडेय पुराणापासून संबंध जेवढं आयुर्वेद आहे. त्याच्यातसुद्धा कुंडलिनीवर वर्णन आहे. मन, आत्मा संबंध आयुर्वेदात आहे, त्याशिवाय इतकी पुस्तके आहेत कुंडलिनीवर. ज्यांना संस्कृत येत नाही, त्यांनी काय करायचं. पूर्वी काळी नागपंथीयांमध्ये अशी परंपरा होती की एका गुरूने एकच शिष्य करायचा. मच्छिंद्रनाथला गोरखनाथ आणि निवृत्तीनाथाना ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरांची कामगिरी ही की त्यांनी निवृत्तीनाथांना म्हटलं, विनंती केली, की मला हे जे आहे गुप्त ज्ञान कुंडलिनीचं ते उघड करून फक्त सांगू दया, मी कुणाची जागृती करत नाही. फक्त सांगू दया मला. कारण ह्या जनसमाजाला हे माहित असलं पाहिजे. लोकांना माहित असलं पाहिजे की, कुंडलिनी काय आहे, आणि त्यांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये कुंडलिनीचं फार सुंदर वर्णन केलं. पण परत धर्ममार्तंड, ज्यांनी एकनाथांना छळलं, ज्यांनी तुकारामांना छळलं, सगळ्यांना छळलेलं आहे. हे धर्ममार्तंड, ह्यांनी सांगितलं की हा सहावा अध्याय निषिद्ध आहे. हा वाचायचा नाही, सगळं पारायण होईल पण त्यात सहावा अध्याय वाचायचा नाही. कारण त्यातलं काही गम्य नव्हतं त्यांना. कोणीच आत्मसाक्षात्कारी नव्हते. म्हणून हा अध्याय वाचायचा नाही, असं सांगितलं. कुणी हे का नाही विचारलं का हो का नाही वाचायचा, तसं कुणी विचारलं नाही त्यांना, मुकाटयाने. तर मराठी भाषेत किंवा मला म्हणायचं आहे, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी आपली ही जी रोजची मराठी भाषा आहे, त्या भाषेत हे ज्ञान जे आलं ते श्री ज्ञानेश्वराच्या मुळे. बाकी संस्कृतामध्ये अनेक त्याच्यावर कुंडलिनीबद्दल लिहिलेलं आहे. अनेक तर तऱ्हेच्या गोष्टी लिहिल्या आहेत. मी काही नवीन सांगत नाही. ही तुमच्यामध्ये शक्ती आहे कुंडलिनी आणि ती जागृत होते. आता कुणी म्हणेल की मेडिकल सायन्समध्ये कुंडलिनीचं काही मेन्शन नाही. अहो, ते इंग्लिश लोक आहेत त्यांना काय समजतं का काही. इंग्लिश भाषा तुमच्या लक्षात येणार आहे कारण मी तिकडे राहिली आहे ना, बघा आत्म्याला स्पिरिट, भूताला स्पिरिट आणि दारूला स्पिरिट एकच शब्द. या महामुर्खाना कसलं कुंडलिनीबद्दल माहिती असणार. पण ख्रिस्ताने सांगितलंय (अस्पष्ट) तुमच्यामध्ये पण ख्रिस्ताला विचारतं कोण? त्याचे गुरु म्हणजे फ्राईड नाहीतर रजनीश, त्यामुळे जे एवढं मोठं आपल्याजवळ होतं. एवढी मोठी संपदा ती ह्यांच्या डोक्यात कुठून राहणार? पण आता तुम्हांला आश्चर्य वाटेल, की तीन डॉक्टरांना सहजयोगामध्ये कुंडलिनीवर एम.बी.बी.एस. डॉक्टरांना एम.डी. ची पदवी मिळाली. जगजाहीर आहे, आणि परवा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पाचशे डॉक्टरांच्यासमोर ही गोष्ट त्यांनी सांगोपांग सगळी समजावली. इतकंसं कुंडलिनीच्या जागरणाने प्यारासिम्पेथेटिक नरवस सिसटिम आम्ही मनेज करतो. पण काही लोक इतके खोटारडे आहेत या देशात, त्यांच्या खोटेपणाची तरी कमाल आहे. हे सगळं काही झालं असतानासुद्धा खोटे लिहिलं की त्यांनी सांगितले की परिमाण. त्याच्याशिवाय काय कुणी एम. डी. होऊ शकतं काय? ते हे जे इकडे डॉक्टर आहेत एम.बी.बी.एस. रिकामटेकडे त्यांना काही धंदा नाही, म्हणून हे धंदे करत फिरतात. त्यांच्याशी बोलायचं तरी काय? आता अंधश्रद्धेवर सांगते आपल्याला. व्यवस्थित ऐकून घ्यावं. अंधश्रद्धा फक्त संतांनीच जाणली आहे आणि त्यांची डोळस श्रद्धा आहे. आत्मसाक्षात्कारी लोकं आहेत. श्रद्धा चार प्रकारच्या असतात. पहिला प्रकार तामसी श्रद्धा ती अगदी आंधळी असते. कोणी आला जेलमधून कशीही वस्त्रे घालून आला की लागले त्याच्या पायावर पैशे द्यायला, लागले त्याने काय धटिंग केलं की लागले त्याच्यामागे. सांगायचं म्हणजे आमच्या शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये चेयरमन होते त्यावेळेला एक आमच्याकडे गृहस्थ होते, आता नाव मी सांगत नाही त्यांचा मुलगा तो फारच वात्रट होता. सुरुवातीपासूनच तर वडिलांनी सांगितलं की शिपवर पाठवून दया. तिकडे ठीक होईल. तिथं त्यानं स्मगलिंग सुरु केलं तर आमच्या यजमानांनी त्यांना सांगितलं की तू काय आता जाऊ नकोस तुझी नोकरी सुटली. त्याची नोकरी सुटल्यावर तो आपला घरी बसला पण वडिलांना शेवटी हार्टअटेक आला आणि ते वारले. वारल्यावर मी लंडनला निघून गेले होते. तिथून आल्यावर त्यांच्या आई आणि सून आणि हे सगळे येऊन मला सांगायला लागले की माताजी ह्याचं काय झालं काय समजत नाही. आमचे सगळे दागिने घेऊन गेला, आपल्या सासूचे दागिने नेले आणि आमचं जे घर होतं ते गहाण ठेवलं, तेव्हा काही समजत नाही हा मनुष्य करतोय काय. आम्हांला सांगितलं मी अं हे करतेय, मी बिझनेस करतोय म्हणून आता दोन वर्षे झाले हे घर विकायला आला. आता आम्ही करायचं तर काय? मी म्हटलं कमाल आहे या माणसाची. इतका तो असेल विक्षिप्त हे मला माहिती नव्हतं. नाही म्हटलं साहेबांना भितो, पण साहेबांच्या हाती तर लागू दया. शेवटी मग दोन वर्षांनी मी आले तर त्यांनी सांगितलं सगळे पैसे घेऊन आला, त्याला देऊन टाकलं मागल्यावर्षी. सगळं काही ठीकठाक झालं. तर बरं झालं तुमचं बरं झालं, त्याच्यात वाईट काय वाटून घ्यायचं. तर त्यांनी नंतर मला एका वर्षांनी सांगितलं अहो हा तर गुलाबबाबा झालाय. असं का? हा गुलाबबाबा बनून सारे पैशे कमावतोय. मग आम्हांला नको म्हणे अशे घाणेरडे पैशे, आता जाऊ दया तुमचे मिळाले तेवढे मिळालेत. नाही नाही आम्हांला नकोत हे पैशे. तो गुलाबबाबा आमच्या नागपूरला गेला तिथे त्याने काय केले की लोकांना सांगितलं की, इथे मी तलवार मारतो. तलवार मारल्याबरोबर इथून पाणी निघेल आणि तसंच झालं. तर लोक लागले त्याला पैशे द्यायला, त्याच्याच मागे,  बायकांनी कुणी बांगड्या काढून दिल्या, हे दे, ते दे. मग त्यांनी माती उकरून पहिली तर तिथे नळ होता. त्या नळाला जस्त लावून तिथे कसंतरी जोडलं होतं. जोराने तलवारीचा घाव मारला तर पडतं बाहेर पाणी. नागपूरला आता त्या भागातले लोक आहेत त्यांनी सांगितलं, याला मारून टाकला पाहिजे, मग तो निघाला पळून गेला पण इकडे जा, धुळ्याला जा. मी एकदा नागपूरला गेले तर परत आलाच नाही. मी असं नाही म्हणणार की हे सगळे घेऊन सुद्धा तो पशार झालेला आहे.

      आता काल आपण वाघ म्हणून गृहस्थांनी कितीतरी पैशे एकत्र करून ते प्रणवानंदजी ना दिलेत. मी आधीच सांगितलं होतं हा भामटा आहे प्रणवानंद पण त्यावेळेला कोणाच्या डोक्यात आलं नाही पण तो कुणाला असं म्हणत नव्हता की हे करू नका, ते करू नका. काही केलं तरी चालेल. बायका ठेवल्या तरी चालतील, दारू प्यायला तरी चालेल. आम्हांला पैशे दिले म्हणजे झाले. तशातला हा गुरु, त्यांचे जर कोणी गुरु आहेत, कोणाचे कोणचे गुरु आहेत. मी एक आई आहे मी म्हणेन तुझी तब्येत कशी काय खराब झाली गुरु आहेत का? आणि १९७० साली ह्या सर्व गुरूंच्या बद्दल मी अगदी सांगोपांग सगळं वर्णन केलेलं होतं. पण आजपर्यंत कुणाची हिम्मत नाही झाली की माझ्याविरुद्ध काही केस करतील, कोणाचीही नाही. मग त्याच्यानंतर अंधश्रद्धेबद्दल दुसरं सांगायचं म्हणजे राजकीय, राजस श्रद्धा, म्हणजे कुणीही दिसला नमस्कार! नमस्कार! नमस्कार! कोणीही राजा आला नमस्कार नमस्कार नमस्कार! पण तो किती भ्रष्टाचारी आहे की तो किती वाईट वागतो, त्याने किती बायका ठेवल्या की दारू पितो की काय नमस्कार नमस्कार नमस्कार! त्याच्यात स्वार्थी ह्याला नमस्कार केला तर आम्हांला काही मिळेल, पैशे मिळतील, म्हणजे शाळेतून सुद्धा  पुष्कळशा विध्यार्थ्यांना आता आज मिनिस्टर येणार त्यांना उभं केलं, उन्हात उभी पोरं बिचारी काहीतरी देणग्या देतील आपल्याला. कशाला मिनिस्टरसाहेब आलेच नाहीत. ते आपले हातात काठ्या घेऊन उभे आहेत. परवा मी रस्त्याने येताना पोलीसवाले दिसले, म्हणजे हे बिचारे पोलीसवाले मला ह्यांची एवढी दया वाटली. तिथे उभे होते उन्हात. मी परतून आले तिकडनं. आणखी जवळ जवळ आठ- नऊ तास मी तिथे होते, आठ- नऊ तास. विचारलं काय हो काय चाललंय तुमचं, अहो बसलोय, आमचे मिनिस्टर, असे का कुठले सेन्ट्रलचे मिनिस्टर येतात अहो, त्यांना कोण मारायला येतं, कशाला येतं तुम्ही जाऊन चहा पिऊन या, मी म्हटलं. ते म्हणाले, माताजी असं कसं करता येईल? म्हटलं करा ते केव्हापासून उपाशी तापाशी मरतात. इथं लोकांना काही सुचत नाही. तुम्हांला चहा-पाणी वगैरे काही दयायला पाहिजे की नाही? तर म्हणे लोकांचं आमच्याविरुद्ध मत झालं आहे काय करायचं काय? त्यांना कायदा वगैरे काही माहीतच नाही. कारण कुणीच कायदा पाळत नाही, तो आम्हालाच मारतील उलट, म्हणजे हा काय प्रकार आहे? ऐकावं तेवढं थोडं, हे पंचवीस वर्षांत झालं. पंचवीस वर्षांत एवढी घाण आपल्या देशात आली, त्याला कारण काय त्याला कारण एक, अध्यात्म आपण सोडलं आहे. पुष्कळसे लोक म्हणतात देवंच नाही म्हणजे देव नाही म्हणजे कोनाड्यात देव ठेवला मग वाट्टेल तसं वागायचं. देवच नाही पण हे अशास्त्रीय आहे. देव आहे किंवा नाही हे शोधल्याशिवाय तुम्ही असं म्हणणं अशास्त्रीय आहे. आधी तुम्ही देव शोधून काढा आणि नाही म्हणायला असं म्हणायचं की आहे किंवा नाही. हे शास्त्रीय पद्धतीनं झालं. पण सहजयोगात तुम्हांला देव मिळतो. देवाची अनुभूती येते. या परमचैतन्याची अनुभूती येते. तेव्हा एक समजलं पाहिजे की जी ही राजकीय किंवा राजसी श्रद्धा आहे त्याचात काही राम नाही. आपल्याकडे आयाराम गयाराम आहेत, आणि फार मोठं, दुसरं, एक मिनिस्टर आहेत. ते आले की इतकी गर्दी लोकांची. पण ते जेव्हा खुर्चीतून उतरले, तर तिथे बसायला तिथे खुर्चीसुद्धा कुणी विचारली नाही एअर पोर्टला, कोणी विचारायला सुद्धा हा कोण आला आणि गेला उलट लोकांनी सांगितलं हा फार भ्रष्टाचारी होता. त्याच्या पाठीमागे सर्व बोलायला सुरुवात केली. कोणी त्यांची स्तुती केली नाही. बरं सांगायचं म्हणजे असं की किती लोकांनी वाईटपणा केला तरी चांगुलपणाचा एक आदर आपल्या मानवात आहेच. तुम्ही कुठं ऐकलंय का? की हा मनुष्य फार मोठा दारुडा होता म्हणून त्याला माळ घातलेली आहे किंवा त्याचे पुतळे उभारलेले असतील किंवा हा महान दारुडा होता किंवा एखादया माणसाने बायका- बियका ठेवल्या, ह्याने इतक्या बायका ठेवल्या होत्या. अहो परदेशात हे होत नाही. म्हणजे आतून चांगुलपणा मोठेपणा हे आपण मानतो. त्याच्या प्रति आपल्याला श्रद्धा आहे. आणि ही सात्विक श्रद्धा आहे. म्हणजे या माणसाचं आयुष्य देवकार्यात गेलं, देशकार्यात गेलं. आता आपले फुले साहेब आहेत. मला आंबेडकरांबद्दल फार श्रद्धा आहे. यशवंतराव चव्हानांबद्दल मला फार श्रद्धा आहे, कारण ते माझ्या वडिलांचे फार मित्र होते आणि आमच्या यजमानांचे पण फार मित्र होते. तसंच नाईकसाहेब त्यांनी सुद्धा पुष्कळ चांगलं काम केलं. म्हणजे ते देवकार्यात नव्हते, पण चांगली मंडळी होती. भले लोक होते. आपले दादा, वसंतदादा पाटील हा सुद्धा भला मनुष्य होता. हे भले लोक आहेत, चांगले लोक आहेत. ह्यांनी कधी वाईटपणा नाही केलेला. पण त्याच्याच पलीकडे हे संत. संतांच्या बद्दल श्रद्धा असणे ही सात्विक श्रद्धा आहे; आणि ही सात्विक श्रद्धा का वाढवायची. 

       लोक म्हणतील सात्विक श्रद्धेचा फायदा आहे. त्याने मनुष्य सखोल होतो, गहनता येते. त्याच्यामध्ये सहजयोगामध्ये जे लोक आले जसे अंधश्रद्धेत आले असेल तर मुश्किल होतं. परत आजकालच्या नव्या नव्या टूम काढतात लोकं. आता हीच की आम्ही अंधश्रद्धेबद्दल १९७० सालापासनं इतकी मेहनत घेतलीय, १९७० सालापासनं, आता इथं मंडळी बसली आहेत परदेशातली. तुम्हांला काय वाटतं तिथं अंधश्रद्धा नाही? अंधश्रद्धा तिथे इतक्या आहेत, की त्या आपल्या देशात इतक्या नाहीत. असं कधीतरी मला वाटतं. तिथे विचक्राफ्ट, हे ते, सटायनिक, देवी सगळं प्रकार चालतात. पण हे कितीतरी वर्षांपासून चालू आहे. मला आश्चर्य वाटतं की इंग्लंडला इतिहासात आहे की अशे प्रकार तिथे होत असत. चेटकी अमकं-तमकं सगळं इंग्लंडला आपण समजतो की फार पुढारलेला देश आहे. तसं काही नाही, तिथे सगळे प्रकार होत होते, आणि आज ही होतात आणि हे जे अगुरु आहेत म्हणजे रजनीश सारखे लोक, हे सुद्धा काय करतात संमोहन. सगळ्यांना संमोहन शिकवतात आणि संमोहन करून लोकांच्याकडून पैशे उकळतात. पहिली गोष्ट जो मनुष्य आपल्याला परमात्मा किंवा भगवान म्हणतो (अस्पष्ट) देवाला काय पैसा-बियसा समजतो का? काही समजत नाही. त्याने ५८ रोग (अस्पष्ट) त्याने कवडीमोल शेवटी मेला तो आणि हे तुम्हांला जे अंधश्रद्धेवाले आले आहेत ह्यांनी त्याच्यापासून दीक्षा घेतलेली आहे. तुम्हांला आश्चर्य वाटेल. त्यांनी सर्व गणपतीची ह्याची- त्याची थट्टा केली आणि त्याचा आमच्याजवळ पूर्ण पुरावा आहे. समाचार पत्र ह्यांचं ‘गुजरात समाचार’ मध्ये असं छापून आलं होतं. ह्या रजनीशच्या लोकांनी छापलं होतं काय की आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तर्फे माताजीना एक फटका दिलाय. त्यावेळेला  त्यांनी आम्हांला दगड मारले होते तिथे हे दाभोळकर स्वतः हातात दगड घेऊन होते. सगळ्यांनी पाहिलं त्यांना. हे डॉक्टर आहेत की दगडमारू आहेत आणि जेव्हा त्यांच्यावर टोर्च फेकली तेव्हा त्यांचा असा हात उभा अशे स्तंभित. अठरा ह्या फोरेनच्या लोकांना जखमा झाल्यात तर सी.बी.आय. धावत आली. तिथल्या लोकांना मारू शकत नाहीत. तसंच इचलकरंजीला हे लोक वर चढत असताना हॉकी स्टिकने मारले. सगळे दारुडे आणि त्यांची सगळ्यांची नावं आम्हांला मिळाली नशिबाने. मग मी कमिशनराना जाऊन सांगितल्यावर कमिशनरानी चांगलीच तंबी दिली होती. हे धंदे करायचे अंधश्रद्धा निर्मूलन आहे का याला अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतात. लहान- लहान मुलांना, पाच वर्षाच्या मुलांच्या हातून दगड मारलेत आणि म्हणे संघर्ष कसला संघर्ष. झाला संघर्ष आता अंग्रेजांच्याबरोबर. आता कामाला लागा. मुलांना अभ्यासात घाला. अभ्यास केला पाहिजे. तर ही जी अंधश्रद्धेची फार मोठी जबाबदारी आहे ती माझ्या मते फक्त जनजागृतीने होऊ शकते. पण आपला मुख्य प्रश्न हा नाहीय आपला मुख्य प्रश्न आहे भ्रष्टाचार, हे तुम्ही मानलेच पाहिजे. विशेष करून या महाराष्ट्रात तर एवढा भ्रष्टाचार आहे की मी कुठे जगात पहिला नाही अहो, याच्यापेक्षा यू.पी. बरं. इथं भ्रष्टाचार एवढा नाही मारामाऱ्या आहेत, हे आहेत, ते आहेत पण भ्रष्टाचार एवढा नाही. उठल्या- सुटल्या पुण्याला मी आले, माताजी अहो तो पैसे खातो, अरे असं का? तो पैशे खातो, तो पैशे खातो, तो पैशे खातो, अरे मग जेवतो-बिवतो का नाही? जर हे लोक रिकामटेकडे आहेत, तर भ्रष्टाचाराच्या मागे लागा ना? तो खरा त्रास आहे आपल्याला. अंधश्रद्धा आपल्याकडे हजारो वर्षांनी आहे. त्याने एवढं नुकसान होत नाही, जे भ्रष्टाचारानं आज होतं. 

       तेव्हा अध्यात्म का हवं ते समजलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे आत्म्याचं ज्ञान. त्याचं असं आहे की विज्ञान हे एकांगी आहे, समजलं पाहिजे, रुक्ष आहे जसं एखादया चिपाडासारखं, सगळा रस त्यातला काढला त्याच्यात काव्य नाही, प्रेम नाही, त्याच्यात आनंद नाही अगदी चिपाडासारखं शुष्क आहे. त्याच्यात समाजव्यवस्था नाही कशाचाच विचार नाही कशाचा, राजकारणाचा विचार नाही. कशाचाच विचार त्याच्यात नाही. पण अध्यात्म किंवा त्याला आपण तत्वज्ञान म्हणू हे फिलोसोफी. तर ह्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. पण जिथे अध्यात्म नाही जसं आता परदेशामध्ये एकांगी विचार करून लोकांनी जी प्रगती करून घेतली ती त्यांच्यावरच उलटलेली आहे. याला बूमरानगिंग म्हणतात. म्हणजे कसं झालं की आता अमेरिकेला पासष्ट टक्के लोक हे पासष्ट टक्के लोक ह्यांना फार घाणेरडे घाणेरडे रोग झालेले आहेत, आणि सत्तर टक्क्यांना एक दोन वर्षांत होतील असं त्यांचं भाकित आहे, ही केवढी मोठी त्यांच्यावरती विपत्ति येऊन राहिली आहे. एवढा मोठा त्यांना त्रास होतोय पण हेच नाही हिंसाचार इतका वाढलेला आहे, तिथे जर तुम्ही अमेरिकेला गेलात तर मंगळसूत्र सुद्धा लपवावं लागतं म्हणजे मुष्किलीचं. इतके श्रीमंत लोक आहेत ते मग मंगळसूत्र कशाला हिसकवतात. एका रस्त्याने जाताना आमच्याकडे ते कोठेवाडी वैज्ञानिक होते, ते म्हणे माताजी दार बरोबर लावून मान खाली घालून बसा. म्हटलं काय झालं, या रस्त्यावर अकरा लोकांना मागील आठवडयात मारलं लोकांना का उगीचंच (अस्पष्ट) अहो, चांगला शहरातला रस्ता. भरल्या रस्त्यात ठा ठा ठा अकरा माणसं मारली. एका नंतर एक, एकानं मारली तर दुसऱ्यानंही सांगितलं, त्यांनीच का मारली मी ही मारतो. अशे हिंसाचार परदेशात चालले आहेत, आणि हे लोक जे इथं आलेत त्याला कारण हे की त्या  एकांगी जीवनाला कंटाळून ती उपभोगिता आणि त्या सर्व गोष्टींना कंटाळून, त्याच्यात काही सुख नाही हे जाणून इथं आलेत. तसं एकॉनोमिक्स आपल्याला माहित आहे. लॉ हे इन जेनेरल म्हणजे काय एक आज तुम्हांला इच्छा झाली तुम्ही एक (अस्पष्ट) मग आपण दुसऱ्या इच्छेवरती म्हणजे काय की मला एक मोटर पाहिजे मग हे पाहिजे ते पाहिजे. बरं, ते मिळवण्यासाठी एवढं धडपडायचं ते मिळाल्यावर त्याचा काही आनंद नाही, दुसरं काही करायच्या मागे, म्हणून या शुद्ध इच्छा नाहीत. आता कुंडलिनी ही शुद्ध इच्छा आहे. ही शुद्ध इच्छा आपल्याला माहित नाही. तिच्याबद्दल पुष्कळांना माहित ही नसेल पण ती आपल्या त्रिकोणाकार अस्थींमध्ये याला सेक्रम असं म्हणतात, तिथं बसलेली असते. आता बघा सेक्रम शब्द म्हणजे काय सिक्रेट. आपल्याला ग्रीक भाषा माहित असेल तर त्याच्यामध्ये सेक्रम म्हणजे सिक्रेट म्हणजे हे सेक्रमचे जे त्रिकोणाकार अस्थी आहे. गंडाच्या खाली हे अस्थी सेक्रम आहे, सिक्रेट आहे. हे ग्रीक लोकांना कसं कळलं. मी ग्रीकला पुष्कळ गेले आहे तर मी तिथल्या तत्वज्ञाशी बोलले ते म्हणाले की आमचा व्यवहार हिंदुस्थानाशी पुष्कळ वर्षांपूर्वी अलेक्सझांडरच्या आधी होत असे. त्यावेळेला आमचा असा विश्वास होता की एकच देवी आहे. ‘आथिला’ ‘आथिला’ ‘अथ’ म्हणजे पायमोरिडीयल. अथिला संस्कृत शब्द आहे. ‘अथ’ म्हणजे ‘इति’. आपल्याकडे थोडसं संस्कृत ‘अथ’ आणि ‘इति’ त्याच्यापासून ‘अथिला’ शब्द झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हांला मग हिंदुस्थानात गेल्यावर असे सांगितलेय की त्याच्यात तीन शक्त्या आहेत आणि तिथे खरोखर जर अथिलाचं तुम्ही देऊळ पाहिलं जिथे गणपती बसवला आहे. साक्षात गणपती बसवला आहे. आमच्याकडे फोटो आहे त्याचे. This is child God. असं म्हणून सांगितलं. तुम्ही जर चायना गेले चायनाला तर Mother of mercy म्हणून देवी आहे तिच्या तिथे सुद्धा एक लहानसा मुलगा बसवलेला आहे आणि चिलीटी म्हणून क्रिशटयानिटीमध्ये सुद्धा मानतात. God the father, god the son आणि मदर म्हणत नाहीत. मदरला थोडी चाट मारली त्यांनी. मदरला त्यांनी होली घोस्ट म्हणून सांगितले आहे. तीच कुंडलिनी आहे. बरं, आता आम्ही जे काय म्हणतोय आहे, समजा जे साधूसंतांनी म्हटलंय ते सिद्ध करण्याचं सामर्थ्य सहजयोगात आहे. पण भलत्या भरकटकलेल्या लोकांची कुंडलिनी कशी जागृत होईल. आम्ही आता आव्हान देतो, तुम्ही आता कुंडलिनी जागृत करून दया. तुम्ही कोण आव्हान देणारे? कुंडलिनीला आवाहन द्यावं लागतं. रामदास स्वामींना विचारलं की कुंडलिनीचं जागरण व्हायला किती वेळ लागतो? त्यांनी शब्द वापरला ‘तत्क्षण’. ‘तत्क्षण’ शब्द वापरला. पण देणाराही पाहिजे आणि घेणाराही पाहिजे. जर घेणारा हिटलर आला तर त्याला काय मी जागृती देणार आहे का? आणि कशाला अशा लोकांचं आव्हान घ्यायचं. सगळ्यांना आव्हान द्यायला लायकीसुद्धा पाहिजे. आपला एम.बी.बी.एस. चा अभ्यास केला असेल जसा-कसा रडत-कढत. काय त्यांची प्रक्टिस झाली तर मला पत्रं आलीत, त्यांची बायको खूप पैसे लुटते आणि हा रिकामटेकडे धंदे करतोय. ते जरी असलं रिकामटेकड्यांना असतात धंदे कबूल आहे. पण या मुलाच्या नादी लागू नका. ह्या मुलांना सत्यानाश करू नका. उद्याची ही भावी पिढी आहे. मुलांना आरडाओरडा करायला घेऊन गेले. दगड मारायला घेऊन गेले. परवा आली होती बरीचशी मुलं, पण शालीन होती. मी त्यांना म्हटलं तुम्ही आलात बरोबर आहे पण तुमची लायकी काय ते आधी समजून घ्या. तुमचं धोरण काय? धोरण काय आहे? धोरण काहीच नाही. मग ते जे सांगतात सगळं. अहो, म्हटलं तुम्हांला काही व्यक्तित्व आहे की नाही? ते सांगतील तर दगड मारा तर दगड मारतात. ते म्हणतात नारे लावा, तर नारे लावायचे. तुमची ही लायकी आहे. तुमची ही प्रतिष्ठा आहे. अरे या महाराष्ट्रात जन्माला आला आहात, तुम्ही आता सहजयोग घ्या आणि कुठल्याकुठे तुम्ही जाऊ शकता. आमच्या सहजयोगातली सर्व मुले सगळे फर्स्टक्लास मध्ये पास होतात. सगळ्यांना स्कॉलरशिप मिळते. मी दाव्याने सांगू शकते. कधीही फेल होत नाहीत आणि आईवडिलांना इतकं आश्चर्य वाटतं की ही मुलं ढ होती कशी अशी झाली. जर तुम्हांला खरोखरच मुलांना कर्तृत्ववान बनवायचं असलं तर त्यांना सहजयोगात आणलं पाहिजे. कारण ही जी शक्ती जी आहे ना ती बुद्धीला एकदम तल्लख करून टाकते. पण असं, मनुष्य आततायी होत नाही. आततायी मुळीच होत नाही. शक्तिशाली असून तो अत्यंत प्रेमळ आणि अत्यंत गोड होतात. हे लोक बघा आता तुम्ही, हे लोक ज्यांना एक शब्द म्हणजे हिंदी मराठीचा शिकवता येत नाही ते तुमच्यासमोर तुमच्याहीपेक्षा चांगलं म्हणताहेत की नाही संस्कृत सगळं कुठून एवढं संस्कृत. आम्हांला आई सांगायची की पाहा सुपारी-बिपारी खाऊ नका हं, नाहीतर तुम्हांला संस्कृत बोलता येणार नाही कारण माझी आई आणि वडिल दोघे फार मोठे संस्कृत आणि मथेमटिक्सचे फार मोठे हे होते. तर हे समजलं पाहिजे की कोणतंही कार्य मनुष्य करतो तो काय आणि ते करताना त्याच्या मागे काय आहे ते समजलं पाहिजे. म्हणजे आता आमचं कार्य समजा आपल्याला माहितीच आहे की माझे यजमान फार मोठया पदवीवर होते आणि अजूनसुद्धा त्यांना चाळीस हजार रुपये इन्कमटक्स आणि पेनशन मिळते आहे आणि मी श्रीमंत घराण्यातली आहे. शालीवाहनांची वंशज आहे पण मला हे वेड लागलंय, सगळ्यांना द्यायचं आणि आता त्यांना परवा महाराणीने इंग्लंडच्या महाराणीने सर्वोच्च असं पदक मिळालं. अजूनपर्यंत कोणच्याही नेत्याला मिळालं नाही. बाहेरचा तो एक (अस्पष्ट) ला मिळालं आणि एक साहेबांना मिळालं, अशे त्यांना एकतीस सर्वोच्च पदक मिळाले. पण आमचे साहेब परवा त्यांचा सत्कार झाला. तेव्हा म्हणाले की हे सगळं श्रेय मी माझ्या बायकोला देतो. कारण तिच्या सहाय्याने हे सर्व कार्य झालं. तिच्या शक्तीने हे सर्व कार्य झालं ती अत्यंत आदर्शवादी आहे तिच्या आदर्शांवरच राहिल्यामुळेच हे सगळं मला मिळालेलं आहे. नाही तर तुम्ही विचार करा मला एवढं मिळायची काय गरज होती, मला मलाच का सगळं मिळालं? त्यांना १३४ देशांनी निवडून दिलं चारदा निवडून दिलं. १६ वर्ष मी इंग्लंडला होते चारदा निवडून दिले. आणि शेवटी त्यांना राजीनामा दयावा लागला आणि मग ते पुण्याला आले. पुण्याला आल्याबरोबर त्यांना सर्व आश्चर्य वाटतंय की हे काय पुणे, पुणे शहर आहे का वेडे शहर आहे? इथे सुद्धा सुधारणा व्हायला पाहिजेत आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा सुधारणा व्हायला पाहिजेत. संताच्या वाणीवर चालायला पाहिजे. आता ‘बोले तैसा चाले’ असं त्यांनी म्हटलं म्हणजे होतं का? काहीही होत नाही. नुसत्या म्हणायच्या गोष्टी. ‘बोले तैसा चाले’ अहो त्यांनी सांगितलं जेवढे काही मनाचे श्लोक म्हटले आहेत. कुणी करू शकत, कुणी करू शकत नाही. तुम्ही मुसलमान असा, हिंदू असा, ख्रिश्चन असा, कुणीही असा, कोणचंही पाप करायला तुम्ही धजू शकता, तुमच्यावर काही बंधनं आहेत का? पण जागृती झाल्यावर मात्र आत्म्याचा जो एक प्रकाश येतो ना त्या प्रकाशात तुम्ही एक दुसरेच होऊन जाल, म्हणजे असं आहे त्याचं उदाहरण, की समजा तुमच्या हातात एक साप आहे आणि सगळीकडे अंधकार आहे, तुमचे डोळे मिटलेले आहेत, त्यावेळेला तुम्हांला मी सांगितलं की अहो तुमच्या हातात साप आहे सोडून टाका. तो चावल्याशिवाय तुम्ही सोडणार नाही. हट्ट कराल नाही आमच्या हातात साप कसा असणार, आम्ही धरून बसू पण जर का थोडासा प्रकाश आल्यावर चटकन स्वतः सोडून दयाल तोच आहे, आजचा हा सहजयोग. आधी कळस मग पाया. कुंडलिनी ही चढते चढून त्याच्यामुळे ब्रह्मरंध्र हे छेदलं जातं आणि तुम्हांला अनुभव येतो आणि तुमच्या हातातून थंड- थंड अशा लहरी वाहू लागतात. आता यातली मंडळी आहेत अत्यंत श्रीमंत लोकं आहेत हे त्या रजनीशसारखे भिकारी लोक नाहीत. अत्यंत श्रीमंत आहेत आणि ते स्वतःच पैशे आणतात. मला पैशाचं समजत नाही. आधीच तुम्हांला सांगितलंय ते सर्व व्यवस्था ट्रस्ट तर्फे वगैरे सगळं व्यवस्थित होतं. कोणचेही बेकायदेशीर काम मी जन्मात केलं नाही आणि साहेबांनी केलं नाही, म्हणून त्यांना पद्मविभूषणची पदवी मिळाली. आणि आता हे कुठले रस्त्यावरचे लोक काहीही ही भरकटतात आणि न्यूज पेपरवाल्यांना सुद्धा काही वैचारिक पातळी नाही. काहीही लिहितात. जशे काही त्यांचे गुलामच आहेत. मला वाटतं हे सर्व भाडोत्री लोक आहेत. पैशासाठी सगळं करतात, आणि त्यासाठी हे कार्य सुरु केलेलं आहे. मला प्रसिद्धी घेऊन काय करायचं आहे. माझं नाव तर (अस्पष्ट) बुकमध्ये सुद्धा आहे. तसंच मेडिकल जर्नलमध्ये सुद्धा माझं नाव आलेलं आहे. इंटरनशनल मेडिकल जर्नल मध्ये सहजयोगाचं आणि कुंडलिनीचं नाव आलेलं आहे. जे काही शोधलं जातं ते सगळं मेडिकल जर्नल मध्ये छापलं जातं. ह्या लोकांना कुंडलिनीची माहिती नव्हती. आज सहजयोगात आल्यावर सुद्धा किंवा बोस्टन, (अस्पष्ट) अमेरिकेमध्ये सुद्धा याच्यावर पेपर्स वाचले गेले आणि आश्चर्यचकित झाले की अशी शक्ती आपल्यात आहे. आणि ती तुम्ही डोळ्यांनी बघू शकता. काही काही लोकांमध्ये जेव्हा ती स्पंदित होते तेव्हा आम्ही फोटोसुद्धा काढलेत. तर मी कुणाला बरं करते वगैरे असं म्हणत नाही कारण डोकेदुखी आहे. रीघ लागायची लोकांची. परवा पाचशे डॉक्टर होते तिथे आणि(अस्पष्ट) असं त्याचं म्हणणं आहे. मी अंजायना ठीक केला म्हणतात पाच मिनिटात. त्यांची कुंडलिनी जागृत झाली म्हणून त्यांनी सर्व नावं सांगितली. राहुल बजाज आता तुम्हांला राहुल बजाज माहित असेल. राहुल बजाज ला फार मोठा हार्ट अटेक आला होता. त्याचा हार्ट अटेक ठीक झाला हे सांगितलं खुले आम, मी त्याला ओरडतच होते बोलू नकोस, बोलू नकोस. त्याने आणखीन तिथे लोकांची नावे सांगायला सुरुवात केली. माताजी मला हे सांगू नकोस माझ्याजवळ वेळ नाही या गोष्टीसाठी. मला फक्त कुंडलिनी जागृती करायची आहे. हे अशी चार- पाचच श्रीमंत लोकांची आहेत. हे डोक्याला लागलेत म्हणून हे काम केलेलंय. मला गोर-गरिबांसाठी काम करायचं आहे. पण ह्याला पैशे लागत नाहीत. याला पैशे नको, प्रसिद्धी नको ते इकडे मारायला कशाला येतात. पण हे समजायला ‘त्याला पाहिजे जातीचे, येडया गबाळ्याचे काम नव्हे हे’. हे भाडोत्री लोक पैशे घेऊन काहीतरी काम करणारे इतक्या आपल्या देशाची अहो दुर्दशा केलीय. आम्ही काय पाहिलं आणि काय आहे. कसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नुसता स्वैराचार. आता परत जनजागृती झाली पाहिजे. लोकांनी समर्थ व्हायला पाहिजे. तुमच्यात सुद्धा तुमची प्रतिष्ठा आपली स्वतःची प्रतिष्ठा जाणली पाहिजे. आम्ही काय आहोत आणि आम्ही काय होऊ शकतो. तुमच्यातनंच पण मोठ-मोठाले लोक निघणार आहेत. आपलं आयुष्य असं फालतू लोकांच्या नादी लागून आणि शाळामधून सुद्धा सुरु करणार. म्हणजे अशा शाळेत मुलांना पाठवू नका. त्या रजनीश ने सुद्धा एक युनिव्हर्सिटी काढली आहे. बघा जर रजनीशच्या युनिवर्सिटीचा तुम्हांला जर एड्स झाला तर कोण ठीक करणार आहे? त्यांनीच ह्या लोकांना पैशे पुरवले आहेत. पण आता गेला तो. आता यांच्या हालाखीची स्थिती येणार. कारण मी या सगळ्यांच्या विरुद्ध उरले आहे. १९७० सालापासून बोलतेय हे लोक अशे आहेत. हे अगुरु आहेत, आणखी दुसरंही मी सांगितलं आहे, की कुंडलिनी जागरणानंतर तुम्हांला सगळं कळेल की माणसाला कोणच्या कोणच्या त्रासाने कोणच्या कोणच्या गोष्टीमुळे त्रास होतो. आता भूतं नाहीत म्हटलं तर भूतं नाहीत आहेत काय म्हणजे काय आहे. इंग्लिशमध्ये त्यांना प्रोटीन फिफ्टी टू, फिफ्टी फोर, फिफ्टी एट  तो म्हणजे आपली जी संबंध भूतकाळातलं आयुष्य आणि जेव्हापासून आपली निर्मिती झाली तेव्हापासनं त्याच्यातनं जी आपल्यावर अटेक होतो त्याला ते प्रोटीन म्हणतात. डॉक्टर लोक त्याला प्रोटीन म्हणतात. तर स्वयंचलित संस्थेला औटोनोमस नर्वस सिस्टिम म्हणतात. त्यांच्या भाषेत बरोबरच आहे. प्रोटीन नाव दिलेलं आहे आणि आपण त्याला भूतं म्हणतो. पण असं सशरीर नसतात. जर ह्या प्रोटीनचा अटेक झाला तरच कॅन्सर होतो. ह्या प्रोटीनच्या त्याने ट्रिगर होतो. बरं ह्या कुपमंडूकांना हे ही माहित नाही की आज मेडिकल कुठं पोचलं आहे. मी जेव्हा मेडीसीन शिकले त्याच्यापासनं हा कुठल्या कुठं पोचला आहे. पण मला व्यासंग आहे त्याचा. मी वाचत असते. लहानपणापासून व्यासंग आहे. वाचनाची फार सवय असल्यामुळे सर्व भाषेत माझं वचन असतं. विशेषतः मेडिकल कडे माझं फार लक्ष आहे. मेडिकल कुठल्या कुठं पोचलं आहे. जेनेटिक्स कोठे पोचलंय आणि ते अगदी जवळ सहजयोगाच्या आहे. आणि आयुर्वेद तर आहेच आणि आयुर्वेदातच जर कुंडलिनी सांगितली आहे ती मेडिकल मध्ये नाही म्हणून ती वाईट असं कसं म्हणायचं म्हणजे आयुर्वेद वाईट म्हणजे आपल्या देशातलं सगळं वाईट आणि बाहेरच्या देशातलं सगळं चांगलं असं आपण डोक्यात घेऊन बसलो. अशा माणसाला काय समजावून सांगायचं. इथे ज्ञानाचा सागर आहे. सागर ज्ञानाचा, सागर या देशात आहे. पण सगळं काही झाकून टाकलंय आणि हे इंग्रजी वेड डोक्यात शिरलेलं आहे, की आम्ही आता साहेब झालो बस! साहेबासारखे कपडे घालायचे फिरायचे मग झालं वा वा वा! कोणचा शोध लावलाय तुम्ही. हिंदुस्थानात एक सी.वी. रमण नंतर कुठं एवढासा लेंप काढला कुठे कायतरी काढलेय. चाललेलं आहे. कुठे जग गेलंय शोधामध्ये. सगळ्यात जास्त पराकोटीला रशियावाले आणि रशियात हे वैज्ञानिक आहेत ते म्हणतात माताजी आता विज्ञान सांगू नका, आता कंटाळलो. तुम्ही आम्हांला आत्मसाक्षात्कार दया (अस्पष्ट). तो सुद्धा तुम्ही वाटलं तर पत्र लिहून विचारा आणि चारशे डॉक्टर आहेत आता आणि आपल्या देशात उलटी बोंब आहे. आता आम्हांला दगडाने मारलं, आम्हांला हॉकीस्टिकने मारलं, या मुलांना सगळ्यांना. ह्यांना बघा, ह्यांनी तुमची संस्कृती घेतली आहे, आणि काय संस्कृतीचे प्रदर्शन झालेलं आहे. किती हे लोक करायला बघतात, शाळा बनवून देऊ हे करून देऊ इतके मी आधी रिझर्व बँकेला विचारून येते काय करायचं ते. कितीतरी शाळाचं आम्ही हे केलेलं आहे बनवायला.            आता ह्यांना आपल्या संस्कृतीबद्दल आदर आहे. आपल्याला नाही, पण ह्यांना आहे, इथल्या कलेबद्दल आदर आहे आणि आता परवा आणखीन खोटारडेपणा म्हणजे असा की रजनीशला म्हणाले, पुलिसवाले होते ते, रजनीशचे शिष्य आहेत, ते म्हणे माताजी हे तर देवभक्त लोक आहेत. म्हटलं हो, हे तर देवदूत आहेत, पण रजनीशची लोकं आहेत का? अरे, म्हणे यांना एड्सचा रोग होतो. एकाही माणसाला सहजयोगात एड्स होत नाही, पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की ह्यांना हे ही माहिती नाही की बाहेरून इतके लोक येतात आता या रजनीशमुळेच प्रत्येकाची छान-बीन झाल्याशिवाय त्याला विझा मिळत नाही. कधीही सहजयोग्याला कुठेही कोणच्याही अम्बासीमध्ये रोक टोक नाही. पण रजनीशच्या मुळे येत असला की लगेच त्याला रोक-टोक होते. आणि पुण्याला आता बोकाळलेलाच आहे एड्स. फिरतात सगळेजण रस्त्याने. दोघेजण आले माझ्या प्रोग्रामला, तर त्यांचे संन्याशी कपडे घालून. माताजीना हे आवडणार नाही, हे त्यांना संन्यास-बिन्यास ढोंग चालत नाही, ते म्हणे एवढंच राहिलंय हे आता (अस्पष्ट) बाकी सगळं घेतलं त्यांनी आमचं. सगळ्यांना लुबाडून खाल्लं, अशे अनेक गुरु आहेत. आपल्या प्रत्येक ठिकाणी बसले आहेत. पण कुणाला सांगून होणार नाही. तर सांगायचंच तर ह्या संतांनी किती केलेलं आहे. कोणी ऐकलं का त्यांचं? फक्त जनजागृतीनंतर संबंध आतून आमूलाग्र जे काही आपल्याला दिसतं, आपल्यात जे काही परिवर्तन झालेलं आहे, तो मनुष्य आपोआपच ह्या सर्व गोष्टींना सत्याचा प्रकाश मिळाल्यावर, आत्म्याचा प्रकाश मिळाल्यावर मनुष्य आपोआपच सगळं सोडून उभा राहतो. त्याचं वागणं कसं काय, आता हे कुठेतरी साडी विकत घ्यायला गेले होते. तिथे साडीवाले सांगत होते, अहो माताजी त्या मुलीने आम्हाला राख्या बांधल्या आणखी आम्हांला एक-एक चॉकलेट खायला दिलं. आम्ही तिच्या ओळखीचे नाही, काही नाही. इतकं प्रेमाने म्हणे, आम्हांला इतकं कुणी प्रेमाने केलंच नाही. आजपर्यंत दुकानात येऊन हे अशी ही मंडळी आहेत. त्यांना अनादर करायचा आणि ह्यांना तुमचंच वेड आहे महाराष्ट्रातच जायचं. महाराष्ट्रातच जायचं. आता कुंडलिनीचं जागरण ह्याच्या नंतर आपण करूया. त्याच्यावरुन पुष्कळ काही लिहिलेलं आहे. आपल्याला पुस्तकं मिळतील. आपण वाचून घ्यावं आणि ते मनन करून स्वीकारावं. हे कार्य सामूहिक आहे. सामूहिक म्हणजे असं की जर एक नख तुटलं की ते वाढत जाईल, तसंच सामूहिकतेत आमचे जे सेन्टर्स आहेत, इथे आमचे पुष्कळ सेन्टर्स आहेत, कोल्हापूरात. तिथे आपण जावं आणि आपली वाढ करून घ्यावी. आणि मग मला आपण सांगावं काय झालं आम्ही तुम्हांला कॅन्सर बरा केला की नाही त्याच्यासाठी आम्ही मुंबईला परिषद भरवली. हे चार पेपर आलेच नाहीत. त्यांना ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ने लिहून दिलं. ‘इंडियन एक्स्प्रेस’ ने लिहून दिलं, ‘लोकसत्ते’ ने लिहून दिलं पण हे आले नाहीत. आता कुणाचा बरा केला त्यांचीसुद्धा आमच्याजवळ म्हणजे नावं तरी इतकी आहेत तुम्हांला वाटतं. आजच सकाळी एका मुलाला मी बरं केलं आहे पण याची जास्ती प्रसिद्धी अशी करायची नाही. मला बरं करा, मला बरं करा असं नाही, त्यांची कुंडलिनीची जागृती होऊन दया, आणि सामूहिकतेत ते बरं होतं, जसं आता आपण बसला आहात. आज अगदी सगळ्यांना आत्मसाक्षात्कार मिळेल. महाराष्ट्रातले तुम्ही, हे महाराष्ट्र आहे जाणलं पाहिजे. हा देश काय आणि भाषा आपली मराठी म्हणजे काय आहे. काय भाषा आहे ती, तेव्हा इतकं तुम्ही हे असून जाणत असून आणि ते तुम्हांला जर नाही मिळालं तर कुणाला मिळणार आहे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी नम्रपणे, जिज्ञासूपणे हे स्वीकारावं. ह्याचा सगळ्यांना लाभ होईल आणि सगळ्यात मुख्य लाभ होईल म्हणजे शारिरिकच नाही, मानसिकच नाही, बौद्धिकच नाही, तर सगळंच म्हणजे आनंदाच्या डोही आत्म्याचा आनंद आतमधून वाहू लागतो. वयाचंसुद्धा भान राहत नाही. आता मी अडुसष्ट वर्षांची बाई आहे अडुसष्ट वर्षांची. रोजचा माझा प्रवास चालू आहे. रोजची माझी मेहनत चालू आहे. रोजचे भाषणं चालू आहे. वयाचंसुद्धा भान राहत नाही. शरीर म्हणजे कसं आतून कितीही चालले तरी मला काही वाटत नाही. हलकंच वाटतं, वाऱ्यासारखं, त्याशिवाय सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या चैतन्यामध्ये आपण ज्याला म्हणतो चेतनता conscious  mind त्याच्यामध्ये एक नया, नवीन आयाम ज्याला आपण म्हणू नवीन dimension प्रादुर्भाव होतो त्याचा. म्हणजे आपल्याला सामूहिकता जाणवते. आपल्यामध्ये सामूहिक चेतना येते. आपल्या बोटांमध्ये म्हणजे अशे हात केले तर आपल्याला कळतं की आपली कोणची चक्रं खराब आहेत व दुसऱ्यांची कोणची खराब आहेत. ही पाच, सहा आणि सात चक्रं आहेत. तसंच ही ठीक कशी करायची हे एवढं शिकून घ्यावं. तुमच्या हातून कुंडलिनी जागृत होणार आता मी काही जागृती करणार तुमच्या हातून होणार. तुम्ही हे कार्य करणार आणि ह्या सामूहिक चेतनेत एकदा तुम्ही रमले म्हणजे मग सहजयोग सोडता येत नाही. ‘सहज’ ‘सह’ म्हणजे तुमच्याबरोबर ‘ज’ म्हणजे जन्मलेला हा योगाचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ह्यांनी आमच्या डॉक्टरच नाही तर तीन वैज्ञानिकांना तीन पदव्या मिळालेल्या आहेत. तीन वैज्ञानिकांना. जे कुणी बघतच नाही. बघायला तयारच होत नाही. बरं, या न्यूज पेपरला लिहून दिलं तर पोचसुद्धा दयायला तयार नाहीत. छापतच नाहीत. आम्ही पैशे-बियशे कुणाला देणार नाही. ती गोष्ट खरी आहे. तर ते छापायलाही तयार नाहीत. ते या भाडोत्री अशे पेपर्स घेऊच नका तुम्ही. याला काय अर्थ आहे आता या कुंडलिनीच्या जागरणाने मनुष्य अत्यंत शांत चित्त होतो. त्याच्या सगळ्या चिंता, ‘कुठे चिंता कुठे दु:खे क्षणी सारी लयास जाती’ आणि आपोआप जसं मुक्त होतं. आपोआप मी कोणालाही काही सांगत नाही. याच्यातले काही लोक ड्रगमध्ये पडले होते, इतके खिचपत पडले होते, आणलं ते बेशुद्धावस्थेतून अर्धवट होते. पण जेव्हा ते जागृती झाली, दुसऱ्या दिवशी असे संबंध ड्रग्ज सुटले त्यांचे. व्यसनमुक्ती हे लोक काय करणार. व्यसनमुक्तीला पाहिजेत लोक त्यांच्यात स्वतः काही व्यसनाधीन, दारू पिणं, हे करणार आणि म्हणणार आम्ही व्यसनमुक्ती करणार. करा ना, पुष्कळ आहेत असे, कोण दारू पित नाही? परवा बाळ ठाकरे म्हणाले की तुम्ही तर (हास्य) ते परखडपणे कधी बोलतात तर त्यांनी म्हटलं की तुम्ही सगळेजण दारू सोडा तरच तुम्ही ड्रग समितीवर येऊ शकता. तर म्हणे सगळ्यांच्या आवळलेल्या मुठ्या म्हणे अशा ढिल्या पडल्या. (हास्य) परखडपणे चांगलं बोलतात कधी कधी पण जरा एकाकी आहेत आणि एकीकडेच विचार करतात. मला म्हणतात तुमचं कार्य फार हळूहळू होणार आहे, म्हटलं आमचं सोलिड आहे. तुमच्यासारखं नाही, अर्धवट. सोलिड काम आहे मानतात ते. तसंच दादा मला मानत असत. सर्व लोक सर्व राजकारणातले लोक येतात. मला राजकारण समजत नाही. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. पण कुणी आलं माझ्याकडे तर मी त्याला नाही म्हणत नाही. मला काय करायचं आहे. ह्यांची मतं- मतांतरे, भांडण-बिंडण असतील पण माझ्याचकडे आले तर आई म्हणून आईला सगळे एकसारखे आहेत. सगळ्यांची ट्रीटमेंट करून सगळ्यांना बरं करून देते. पण हा भाडोत्रीपणा करणाऱ्या लोकांना मात्र कोणी ठीक करू शकत नाही. कुणी आंधळे असतील त्यांचे डोळे उघडता येत असतील, पण त्या डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळेपण आलेल्यांना कसं आम्ही ठीक करणार आणि उगीचंच आहे. मी विचार करते की ह्यांना माझ्याशी काय बिघडलेलं आहे. आज आमच्या बाई आहेत श्रीखंडे बाई त्यांनी सांगितलं, माताजी असं आहे तुम्ही १९७० सालापासनं हे कार्य करताय आणि आता आम्ही दोन- तीन वर्षांपासून हे कार्य सुरु केलं आहे त्यांना असं वाटतं की अंधश्रद्धेमध्ये आमच्यापेक्षा माताजी कोण आहेत? सगळ्या जगात काम करणाऱ्या म्हणून राग येतो. अरे बाबा मला तर इतका आनंद झाला ते मानव आले होते माझ्याकडे मी म्हटले वा वा! केवढी गोष्ट आहे हे अंधश्रद्धेचे कार्य करणार पण तो पक्का निर्बुद्ध मनुष्य, अहो, त्याला अध्यात्म माहिती नाही त्याला कसलं ज्ञान नाही, त्याच्याशी बोलायचं काय? मी असं का? बरं काही व्यासंग- बिसंग काहीच नाही तर काही करायचं. माताजी ते आम्हांला काही समजत नाही. माताजी तुम्ही आले कशाला. नाही म्हणे तुम्हांला आव्हान दयायला. असं का? आणि मेस्मिरीझम करतात आणि ही काळी विद्या आहे करायची नाही. मेस्मिरझम करायचं नाही म्हटलं तुम्हांला माहितीय का? मेस्मिरझम्सच्या बद्दल किती आक्षेप आज-काल घेतला आहे. सायन्समध्ये किती त्याच्यावर निघालेले आहे. किती कोरडे लोकांनी काढलेत. त्याच्यावर ओढले आहेत. किती पुस्तकं निघालीत. काही वाचलं का तुम्ही? मला वेळ नसतो मी आता हे कार्य करत असतो. तर त्याच्यामुळे मला वेळ नसतो. अहो, पण तुम्ही कोणच्या ह्याच्यावर केलं हे काम? आम्ही टेप मागविले टेप रेकॉर्डर दिला त्याच्यात टेप करून म्हटलं हे बघा, मला नमस्कार तुम्ही जा याची घरी स्टडी करा, आणि (अस्पष्ट) डोक्यावर ठेऊन घ्या. ज्या माणसाला काही ज्ञान नाही तो पुढारी कसा? इतके वरपांगी लोक, तेव्हा गेले म्हणा. पण त्यांच्या हातून एक फार मोठी चूक झाली होती. आमच्याकडे बारा हजार माणसे होती आणि आमचे एक गृहस्थ होते ते नुसते सहजयोग्यासाठी (अस्पष्ट) त्यांच्यावरती दहा- बारा मुलांना त्यांनी घातलं आणि त्या दहा- बारा मुलांनी त्यांना इतकं झोडपलं की ते मेले आठ दिवसांत म्हणजे खुनशीपणा आहे बघा तो आता त्या मुलांचा. बारा–चौदा हजार माणसांमध्ये कुठे काय झालं माहित नाही. आमच्याकडे काही पुरावा नव्हते. दगड मारले आम्हाला आणि म्हणे की आम्हालाच दगड मारले. त्यांना कशाला मारायला जाऊ आम्ही. म्हणजे इतका खोटारडेपणा इतका खोटेपणा करून शेवटी यांना मिळणार काय? कितीही म्हटलं की सहजयोग हा वाढणारच आणि हे सत्य आहे आणि याचा आनंद आणि याच्यातला फायदा जो होईल, अहो, ते मुलं आले होते ना अंधश्रद्धेचे तेही बसले नंतर आणि फार झाले. असंच होणार तेव्हा (अस्पष्ट) 

      ज्या शाळामध्ये हे धंदे चालतात त्यांना म्हणावं ही शाळा नको, मूर्खपणाचं लक्षण आहे. त्याच्यातला कुणी जर काही शोध लावला असेल तरी ह्यांना विज्ञान येतं. कशाचं काय, कुणीही उठावं आणि कधीही बोलावं. विशेषतः ज्ञानेश्वरांबद्दल बोललेलं मला मुळीच सहन होणार नाही. मुळीच सहन होणार नाही. त्या माणसाने इतके कष्ट उचलले, रानावनात, उन्हातान्हात नागव्या पायांनी फिरत होते. त्यांच्याकडे चपला नव्हत्या, तर त्यांच्या म्हणे पालख्या काढतात. काय सांगावं माणसांच, रस्त्यानं येत होतो तर अडवलं म्हणे माताजी तुम्ही (अस्पष्ट) आम्ही पालखी आणली आहे. सगळे जेवायला बसले आहेत. म्हटलं तुम्ही जेवा त्यांच्या पालख्या घेऊन, हे काही शोभतं का? आणि तेविसाव्या वर्षी कंटाळूनच त्यांनी समाधी घेतली असेल. कबीराने म्हटलंय ‘कैसे समझाऊ समझत नाही’ कबीर झाले काय, नामदेव झाले काय, गोरा कुंभार झाले काय? सगळे एकच बोलत असत. गोरा कुंभारांना एकदा भेटायला नामदेव गेले. नामदेव किती मोठे आहेत आपल्याला माहिती आहेत पण पंजाबात गेले त्यांना पाचारण झालं. नानकसाहेब त्यांच्या पायावर आले आणि म्हणे काय हे अहो, म्हणे कसं तरी करून पंजाबी शिका आणि पंजाबी भाषेत केवढा मोठा ग्रंथ आपल्या नामदेवांनी लिहिला आहे. ज्याला (अस्पष्ट) ग्रंथसाहेब आहे, मराठीत हे काय बोलतात मराठीमध्ये हे काय बोलतात           अहो, नामदेवांचे हे अभंग, जनाबाईचे अभंग त्यात ग्रंथसाहेबात घातलेले त्या नानकसाहेबांनी. आपल्याला नामदेव म्हणजे काय वाटतं शिंपी, ‘अतिशहाणे त्यांचे बैल रिकामे’. बरं! आपल्या मराठी भाषेत असे दोन-चार आहेत शब्द सांगायला, ते गेले गोरा कुंभाराकडे, गोरा कुंभार चिखल तुडवीत होते, आता बघा एक आत्मसाक्षात्कारी दुसऱ्याकडे कसं बघतो त्याच्यात काय (अस्पष्ट) होतो त्याला काव्य कसं सुचतं ते बघा. त्यांना बघून म्हणतात स्तंभित झाले आणि फारच सुंदर एक त्याचं काव्य आहे की, ‘निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी’ हे काय बोलणं झालं हे निर्गुण आणि सगुण सर्वसाधारण माणसाच्या डोक्यात येणं अशक्य आहे. काय त्यांचं ते बोलणं, ते प्रेम काय त्यांची ती समज आणि काव्य. अहो शिंप्याने काव्य केलेले ऐकलंय का तुम्ही? गोरा कुंभाराने काव्य केले. चोखामेळाने काव्य केले. हे कुठून आले? आता सहजयोगात सुद्धा तुम्हांला आश्चर्य वाटेल की जे चार्टड अकाऊंटट लोकं आहेत त्यांनी कधी मराठी शब्द जाणलेला नाही. मराठीत, उर्दूत हिंदीत काय काव्य करतात. आता इथे एक गृहस्थ आले ते उर्दूमध्ये एवढे सुंदर कुठे आलेत का? इतक्या सुंदर ते कविता लिहितात मराठीत. कुसुमाग्रजांनी त्यांना मानून घेतलं आहे, की तुमच्या वयामध्ये हे काव्य ही (अस्पष्ट)  मी कधीच ऐकली नाही काय कुसुमाग्रजांनी त्यांना मानून घेतलंय, म्हणजे हे सगळं तुमच्यातसुद्धा आहे. ह्या सर्व शक्त्या तुमच्या हातात आहेत. तुम्ही सगळ्यांनी शहाणपणा करून शक्ती घ्या. ‘तुज आहे तुजपाशीच’ जे आहे ते दयायला मी इथे आलेली आहे. उगीचंच फालतू लोकांच्या नादी लागून आपलं आयुष्य खराब करून घेऊ नका. जे काही तुमच्यात आहे ते फार मोठं भव्य महान आहे आणि तो स्वतःचा गौरव आपण सर्वांनी मिळवून घ्यावा अशी माझी विनंती आहे.  (टाळ्या) 

       पाहून गहिवरून येतं, वाटतं सारं वातावरण हे प्रेमाने भारावून गेलेलं आहे. त्याच्यानंतर गणपतीपुळ्याला ही सर्व मंडळी भेटतात. आपल्याला आश्चर्य वाटेल की रवींद्रनाथ टागोर हे फार मोठे द्रष्टा होते, त्यांनी संबंध वर्णन गणपतीपुळ्याचं केलेलं आहे. कशे लोक येतील, काय होईल सगळं काही त्यांनी वर्णन केलेलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांचे एक Universal Mother has awakened आणि इतकं वर्णन बारीक केलेलं आहे तसंच इंग्लंडला विलियम ब्लेक त्यांच्या कविता कदाचित आपण वाचल्या असतील कुणीतरी. त्यांनी संबंध सहजयोगावर वर्णन केलेलं आहे. माझं घर कुठं असेल? काय होईल सगळं वर्णन आहे. लुईस म्हणून आहे त्यांनी सांगितलं आहे म्हणजे अशे पुष्कळ द्रष्टे होऊन गेले. सत्ययुगात भृगू मुनींनी एक ग्रंथ नाडीग्रंथात लिहिला आहे. त्यात संबंध सहजयोगाचं वर्णन केलेलं आहे. आणि १९७० साली सहजयोग सुरु होईल असं त्या लोकांनी त्यांच्या शकावरून काढून १९७० साली लिहिलंय आणि कुंडलिनीचं सहज जागरण होईल असं भृगूमुनींनी चौदा हजार वर्षांपूर्वी लिहिलं आहे. पण वाचायला फुरसत कुठे? त्या घाणेरड्या रजनीशची पुस्तकं वाचत बसतात. तोच ह्यांचा गुरु. केवढा साठा आहे आपल्याकडे तर काही मुसलमान लोक सुद्धा इतके पोचलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं. परवा एक नबाबसाहेब आले ते म्हणाले की माताजी कुरणात एक लाख असे कितीतरी नबी सांगितलेले आहेत. पण आम्हांला तर थोडेशेच माहिती आहेत. ते कुठेत ते हिंदुस्थानात झाले असतील, कुठेतरी अर्थात आणि म्हणे इथले लोक किती सात्विक आहेत. आम्हाला सात्विकता आवडते. ते भांडणारं नको. तेव्हा जे आपण धर्मामध्ये आज डोळे मिटून करत होतो ते किती सत्य आहे, किती असत्य आहे ते सगळं जाणून घेतलं पाहिजे, आणि योग्य तो मार्ग निवडला पाहिजे. नीर-क्षीर विवेक आल्याशिवाय मनुष्य आंधळ्यासारखं लाठीनं मारत तर चालतो किंवा सगळ्यांच्या पायावर येतो. नीर-क्षीर विवेक यायला पाहिजे आणि त्याचसाठी तुम्ही एक दिव्य कॉम्पुटर आहात. फक्त त्याचं मेन्सला लागायला पाहिजे. जसं ह्या instrument ला             मेन्सला लागलं तसं तुमचं कॉम्पुटरला लागलं की तुम्हांला आश्चर्य वाटेल फार. मनुष्य खरं की खोटा असं वायब्रेशंसने कळेल. कोणाही विषयी मनुष्य जगातला मेलेला मनुष्य असो किंवा कुठे त्याला त्रास आहे, काय आहे असं तुमचं कॉम्पुटर सुरु होईल, म्हणूनच माझी ही विनंती आहे की उत्क्रांतीचं हे थोडसं अगदी साडेतीन फूट किंवा चार फूट तुम्हांला फक्त प्रवास आहे. तो अगदी शांतपणाने करावा आणि विचार आता करू नये. विचारांच्या पलिकडे ज्याला आपण म्हणतो निर्विचार समाधी ही पहिली स्थिती सहजयोगात येते. आणि हे आज येईल. आपल्या सगळ्यांना क्षणभर का होईना मग ती टिकवायची कशी ते पाहायला पाहिजे. बरं आता मी परत विनंती करते समोर येऊन बसावं. नाहीतर बसल्याशिवाय मी काही जागृती देऊ शकत नाही. उभ्या राहिलेल्या लोकांना. या  येऊन बसा शहाणपणा नको इकडे येऊन बसा शहाणपणा नको. इकडे येऊन बसा समोर जागा आहे. येऊन बसा. कोणालाही काहीही त्रास होणार नाही. बसून घ्या. तुमची तुमची शक्ती आहे. तेव्हा शहाणपणा करून ती प्राप्त करून घ्या. सगळे बसून घ्या. बसल्याशिवाय नाही उभे राहिलेले लोक कशे डोक्यात चढल्यासारखे वाटतात. कृपा करून बसून घ्या. ते बरोबर नाही. शिष्टता आहे. शिष्टतेच्या नाते सगळ्यांनी बसून घ्या. लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की आमच्या डोक्यावर उभे राहून बघतायत आम्हांला. खाली बसून घ्या. खाली बसून घ्या. कृपा करून बसून घ्या. काय झालं बसायला, थोडा वेळ बसून घ्या. थोडा वेळ बसून घ्या. आता दुसरी गोष्ट अशी आहे, की सहजयोगात कोणावर जबरदस्ती करता येत नाही. कोणावरही जबरदस्ती करता येत नाही. असंय की तुम्हांला परमेश्वराने स्वतंत्रता दिलीय. वाटलं, तर परमेश्वराकडे जा, नाहीतर संतांकडे जा. ती तुम्हांला परवानगी आहे. तर हे स्वातंत्र्य आम्ही काढून घेऊ शकत नाही. कारण तुम्हांला परम स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यात तुमच्यावर कोणाचीच सत्ता चालू शकणार नाही. कोणचीच सत्ता चालू शकत नाही. म्हणजे तुम्ही जसं तुमच्यावर व्यसन करू शकत नाही, तुम्हांला कोणी त्रास देऊ शकत नाही. तर अशी ही विशेष गोष्ट आहे. तेव्हा तुमचं स्वातंत्र्य जे आज आहे. ते राहिलंच पाहिजे. आणि त्याच्या पलीकडचं हे संबंध जे टोटलीटीमध्ये म्हणतात. ते संबंध स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे. त्यानंतर आपण सर्व सामूहिकतेच्यात आल्यावरती आपल्याला कळेल की आपली किती वाढ होतेय. पण नम्रपणे. काही लोकांची स्थिती फार उच्च असेल. काहींची थोडी कमी असेल पण जसे सगळे जसे काही एका शरीराचे अंग-प्रत्यंग झाला आहात. विराटाचे एक अंग-प्रत्यंग झालात एकमेकांना मदत करून. इथे काही फार मोठी मंडळी आली आहेत बाहेरून तेव्हा एक गृहस्थ आहेत इथे ते मिनिस्टर आहेत ते बसलेत बघा. तेव्हा आपण काळजीपूर्वक बसावं. आता फक्त आपल्याला काय करायचं, मी म्हटलं आपण महाराष्ट्रातले आहोत तेव्हा याच्यासाठी तीन अटी आहेत. पहिली अट अशी आहे, माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, मी असं वाईट, मी असं पापी हे प्रकार अगदी सोडून टाकायचे. अहो तुम्ही मानव आहात. तुम्ही नाही चुका करणार तर परमेश्वर करणार आहे का? म्हणून स्वतःला पण एक क्षमा करा. आणि स्वतःबद्दल आदर पाहिजे, प्रेम पाहिजे. तर परमेश्वराच्या साम्राज्यात निघालाय तर तुम्ही खरोखर दोषी असाल तर जेलमध्ये बसला असता. तेव्हा माझं असं चुकलं, तसं चुकलं असं म्हणायचं नाही. तुम्हांला आश्चर्य वाटेल असं म्हटलं तर हे लेफ्टचं हे धरतं चक्र विशुद्धी म्हणतात त्याला. आणि हे जर चक्र धरलं ना तर मनुष्याला अंजायनाचा रोग होतो किंवा स्पोंडालायसिस किंवा त्याच्यामुळे हाडं अशी हलतात आणि त्याच्यामुळे जो त्रास होतो आपल्या पाठीच्या कण्याला, म्हणून माझं काय चुकलं, अमुक आहे, तमुक आहे काही विचार करायचा नाही. लोक सांगतात तुम्ही पापी आहात, तेच पापी आहेत. मग ते असं म्हणतात. तुम्ही हे पाप केलं त्याचं मार्जन करण्यासाठी मला दहा रुपये दया, चांगलं ह्यांना लगावली पाहिजे दहा. मी सांगते तुम्हांला, आणि मी आई आहे, आईला सगळी मुले एकसारखी असतात. तेव्हा कृपा करून असा विचार माताजी हे चुकलं तर चुकलं मुळीच असं विचार करायचा नाही. ते सगळं प्रेमाचं कार्य आहे. परमेश्वराची प्रेमशक्ती आहे आणि प्रेम हेच सत्य आहे. सत्य हेच प्रेम आहे. दुसरी म्हणजे कोणावरही तुमचा राग असेल किंवा तुम्ही कोणाला क्षमा केली नसेल तर त्यांना एकसाथ क्षमा करून टाका. तुम्ही क्षमा करा किंवा करू नका काही करतच नाही. काहीच करत नाही खरं म्हणजे. पण जर क्षमा नाही केली म्हणजे डोक्याला त्रास करून घेता आणि तो मनुष्य मात्र खुशीत बसतो तेव्हा ह्याच्यामध्ये एक विचार घ्यायचा. कशाला आपण त्याची आठवण काढायची. प्रत्येक माणसाला वैयक्तिक आठवायचं नाही. सगळ्यांना एकसाथ क्षमा म्हणजे आज्ञाचक्र उघडतं, म्हणजे ती कुंडलिनी राहणार खाली. आज्ञाचक्र ते असं बनलंय आणि क्षमा केल्यावर ते एवढं तरी उघडेल नाहीतर कुंडलिनी कशी चढेल? आज्ञा वर थांबून राहणार. एकसाथ सगळ्यांना क्षमा करून टाका. झालं झाली बघा दुसरी आता तिसरी अशी की तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे की मला आत्मसाक्षात्कार होईलच का नाही होणार. शंका नाही करायची स्वतःबद्दल. शंका होईल का नाही होणार, होणारच तेवढं कराल ना? मग मी सुरु करते. बरं आता दुसरं असं की आपलं ब्रह्मरंध्र छेदायचं म्हणून टोपी काढायला पाहिजे. पण आई समोर आपण काही टोपी-बिपी घालत नाही, ती काही गुरु नाही, मिनिस्टर बिनीस्टर नाही तेव्हा टोप्या दया काढून. आईचा हात नेहमी डोक्यावर असतो. तुम्हांला आई माहितेय कशी आहे, ह्या लोकांना तरी काहीसुद्धा माहित नव्हती हो, त्यांना पार करायचं माझे हात तुटायचे. इथे चैतन्य आहे, तुमच्यासारखे लोक आहेत तर ते पार होत नाहीत ते येत नाहीत सहजयोगात. इथे चैतन्य नाही तर हे लोक एवढे धावतात.(अस्पष्ट) असो! बरं आता या कोल्हापूरमध्ये अशी मंडळी तयार व्हायला पाहिजेत. महालक्ष्मीच्या आशीर्वादाने. दोन्ही हात माझ्याकडे अशे करायचे आता हे का? ह्या हाताच्या बोटांवर सिम्पथेटिक नर्वस सिस्टमच्या नर्व्ज आहेत असं डॉक्टर्स सांगतात. एवढंपर्यंत पोचलंय. आता हे बघा आणि चष्मे काढून डोळे उघडा. जे लोक वर बसलेत त्यांनी चपला- बिपला घातल्या असतील तर काढून ठेवायच्या. आणि दोन्ही पाय वेगळे ठेवा. Please close your eyes and take out spectacles. Please put your hands forward towards me like this. Please close your eyes don’t open them till I don’t tell you. डोळे मिटून घ्या. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नका. फक्त एवढंच चष्मे काढलेले बरे तेवढे पाय वेगळे करून बसा. पायाला मोकळेपणा येतो आणखीन पृथ्वीतत्व, त्यात हिंदुस्थान आणि त्यात महाराष्ट्र त्यातल्या त्यात कोल्हापूर. फार मोठं स्थान आहे. त्याच्यावर तुम्ही बसलेले. हुं डोळे मिटून घ्यायचे. (माईकमधून फुंकर) आता हळूहळू डोळे उघडा. हळूहळू डोळे उघडायचे आणि दोन्ही हात अशे वर करा आणि माझ्याकडे विचार न करता बघा. ही निर्विचार स्थिती आहे. आणि आता उजवा हात माझ्याकडे करायचा असा, आणि मान खाली करायची. आणि डाव्या हाताने अधांतरी टाळूवर, टाळूवर ब्रह्मरंध्र आहे. इथून बघा, हातामध्ये काही गार-गार किंवा गरमही येईल क्षमा नसेल केली तर गरम येईल. असली तर बरं होईल. बघा येतंय का? आता डावा हात माझ्याकडे करायचा. विचार नाही करायचा. विचारांच्या पलीकडे परत मान खाली आता उजव्या हाताने बघा उजव्या हाताने बघा गार येतंय का? वाकून शांतपणे शांत होऊन. आता परत उजवा हात. मान खाली वाकून घ्यायची. परत बघा अधांतरी धरायचा. आता दोन्ही हात वर करायचे असे आकाशाकडे आणि एक प्रश्न विचारायचा मनामध्ये ‘श्री माताजी हे परमचैतन्य आहे का?’ असं मनामध्ये विचारायचं तीनदा किंवा ‘ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का?’ असा प्रश्न विचारायचा. कोणचाही एक प्रश्न तीनदा विचारा. आता हात खाली करा. ज्या-ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा टाळूतून थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील अशा सर्व लोकांनी दोन्ही हात वर करा. ह्या लोकांच्या हातामधून दोन्ही हातामध्ये किंवा हे आहे ना, कोल्हापूर बघा सगळ्यांना माझे अनंत आशीर्वाद! ज्या लोकांनी नाही आलेले त्यांनी काही वाईट वाटून घ्यायचं नाही. त्यांनी काहीतरी गुरुचं चुकलं असेल. कोणच्या तरी अगुरुकडे गेला असेल, काहीतरी झालं असेल ते बघितलं पाहिजे. तर वाईट नाही वाटून घ्यायचं. सगळ्यांना ह्याचा लाभ होणार आहे आणि झालाच पाहिजे. पण ह्याच्यापुढे ह्या आत्मसाक्षात्काराची सुद्धा पूर्ण इज्जत केली पाहिजे. ही केवढी मोठी गोष्ट आपल्याला मिळाली जी जन्मोजन्मांतर मिळालेली नाही.