Public Program Day 1 Kolhapur (India)

पब्लिक प्रोग्रॅम कोल्हापूर .  सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . आम्ही जेव्हा सत्याला शोधतो असं म्हणतो तेव्हा एक गोष्ट जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे ते तुम्ही बदलू शकत नाही . त्याची तुम्ही नुसती कल्पना करू शकत नाही . त्याची तुम्ही रूपरेषा बनवू शकत नाही . सर्वात मुख्य म्हणजे या मानवी जीवनात या मानवी चेतनेत तुम्ही त्याला जाणू शकत नाही . म्हणूनच सर्व शास्त्रां न मध्ये ,मग ते आपल्या भारतीय लोकांनी लिहिलेले असोत ,चायनीज नि लिहिलेले असोत ,कुराणात असोत किंवा कोणत्याही धर्मातले असोत सर्वानी एकमेव गोष्ट सांगितली कि तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे . तुमचा आत्म साक्षात्कार झाला पाहिजे . तुम्हाला आत्म बोध झाला पाहिजे . पण आत्मबोध म्हणजे नुसतं काहीतरी बुद्धीने जाणान्या सारखं नसत . पण ते बुद्धीच्या पलीकडचं असं आहे . आणि त्या साठी फक्त एक तऱ्हेची नम्रता मनुष्यात पाहिजे . कि अजून आम्ही ते जाणलेलं नाही . जर सत्य एकमेव आहे आणि जर आपण सत्याला जाणतो तर इतके वादविवाद ,इतकी भांडण ,इतका त्रास ह्या   कलियुगाचा हा जो काही ,कलह ब्रम्ह आहे . तो कसा उत्पन्न झाला असता ,झाला असता ?. हि गोष्ट खरी कि पंचावन्न देशातील हि मंडळी आहेत ,पण हि आत्म साक्षात्कारी आहेत . त्यामुळे यांच्यात कलह नाही ,भांडण नाही ,चुरस नाही नुसतं प्रेम . एकमेकांचा आनंद कसा घ्यायचा ते याना माहित आहे .  महाराष्ट्राची महती माहित आहे ,मी काय सांगणार . याच नाव महाराष्ट्र आहे म्हणजे काहीतरी विशेष असलंच पाहिजे असा निदान आपण विचार केला पाहिजे . आणि या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो तेव्हा आपणही काहीतरी विशेष असलं पाहिजे ,त्यातून कोल्हापुरात महालक्षीमीच्या परिसरात आपला जन्म झाला म्हणजे आणखीन काहीतरी विशेष असलं पाहिजे Read More …