Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Ganesha Puja 21st December 1991 Date : Kolhapur Place Type Puja Speech Language English, Hindi & Marathi आता मराठी भाषेबद्दल सांगायचे म्हणजे आध्यात्माला मराठी भाषेसारखी भाषा नाही. इतकी ओघवती भाषा आहे आणि जर मला मराठी भाषा आली नसती तर मी सहजयोगाचे वर्णनच करू शकले नसते. आपल्यावर या भाषेची इतकी कृपा आहे. तसेच आपल्या देशात केवढे संत, महासंत झाले. इतके संत हिंदुस्थानातील कोणत्याही भागात झाले नाहीत. जगातही कोठे झाले नाहीत इतके संत झाले. तर असा प्रश्न येतो, हे संत आले, त्यांनी एवढे कार्य केले, पण त्यांना आपण छळून छळून मारले. त्यांची काही कदर केली नाही. महाराष्ट्रात अष्टविनायक आहेत, स्वयंभू अष्टविनायक आहेत. त्याशिवाय इथे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या तीनही देवी आहेत. तुम्हाला हे माहितीच आहे. मला सांगायला नको. हे सगळे असतांना प्रत्येक ह्याच्यात आपल्याला जेजूरीचा खंडोबा आठवतो. नंतर रेणूका देवी वगैरे सगळे आपल्याला माहिती आहे. रोजच्या बोलण्यात, भाषणात सगळ्यांना सगळे माहिती आहे. कुठे कोणते आहे. कोणती जागा जागृत आहे. एवढं म्हणजे नुसतं मंदिरासारखे आहे महाराष्ट्राचे. कुठेही जा तिथे कोणतं तरी एखादे जागृत स्थान असेल. इथे वीर म्हणून एक जागा आहे, तिथे मी गेले होते. मला अगदी आश्चर्य वाटलं, काय तिथे अगदी कार्तिकेयाची छाप पडलेली दिसते. नंतर इकडे नीरा नदी आहे. नीरा नदीच्या काठी नरसिंहाचे अवतार म्हणून त्यांनी तिथे नरसिंहाची मूर्ती बसवलेली आहे. नरसिंगपूर म्हणून जागा आहे. ती मूर्ती नुसती वाळूची आहे. अजून जशीच्या तशी. आणि वरून कुठून तरी पाणी पडतं, ते कोणाला माहिती नाही. म्हणजे इथे परमेश्वरी चमत्कार फार आहेत. हे सगळे असतांनासुद्धा आजच्या काळात महाराष्ट्राची अस्मिता काय आहे, ते अजून मला समजलेले नाही. कारण इथे तुम्हाला सांगायला उपटसंभासारखे बुद्धिवादी आले Read More …