Shri Saraswati Puja

(India)

Feedback
Share

Shri Saraswati Puja 3rd February 1992 Date : Place Kolkata Type Puja

ह्या कलीयुगात आईला ओळखणे फार कठीण आहे. आपल्या स्वत:च्या आईला आपण जाणू शकत नाही, तर मग मला जाणणे हे त्याहून कठीण आहे. पण ह्या योगभूमीची गहनता तुमच्यामध्ये कार्यरत झाली आहे. ह्या भागातून येणारा कोणताही सहजयोगी अत्यंत गहनतेत जातो, हे मी पाहिले आहे. मला आश्चर्य वाटतं की, जिथे इतकी वर्षे मी घालवली, इतके कार्य केले, तेथील लोक इतके गहन नाहीत. इथल्यासारखी इतकी सुरेख सामूहिकता त्यांच्याकडे नाही. ह्या भूमीचा, विशेष म्हणजे इथलं प्रेम आणि सामूहिकता ही पूर्णत: नि:स्वार्थी आहे, हे बघून मला अत्यंत आनंद होतोय. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो. महासरस्वतीची इथे उपासना होणे फार महत्त्वाचे आहे. ह्या भूमीला तिने आशीर्वाद दिले आहेत. इथे सर्व काही हिरवेगार आहे, पण ही सरस्वतीची उपासना फार सीमित आहे. इथले कष्ट आणि दारिद्रय यांचे कारण हे आहे. आपल्या कलागुणांची वृद्धी करण्यासाठी किंवा विद्वान बनण्यासाठी इथे सरस्वतीची पूजा केली जाते. इथले लोक फार हुशार आणि अभिमानी आहेत, पण तरीही दारिद्रय कां? तुमच्याहून जास्त पैसा असणाऱ्या माणसाविषयी हेवा का? आपल्याकडे कोणत्या सूत्राची कमतरता आहे, जे आपल्याला मिळवायचे आहे, ते आपण जाणून घेतले पाहिजे. सरस्वतीचे कार्य उजव्या बाजूकडे आहे. ज्यावेळी ती स्वाधिष्ठानवर कार्य करते आणि ते डावीकडे जाते, त्यावेळी कलेची संवेदना वाढीस लागते. प्रत्येक कलेच्या क्षेत्रात बंगाल प्रसिद्ध आहे. संगीत, नाट्य, मूर्तिशास्त्र आणि साहित्य या कलाक्षेत्रातील अनेक ख्यातनाम लोक इथे आहेत. कला ही देवाचा प्रकाश आहे. तुम्ही पाहू शकत नाही, पण तिला व्हायब्रेशन्स असतात. जगभराच्या लोकांनी ज्याला दाद दिली आहे आणि जे फार सुरेखरीत्या निर्माण केलेले आहे ते सौंदर्यदृष्ट्या समृद्ध असतं, त्या कलाकृतीकडे तुम्ही हात केल्यास त्यामधून व्हायब्रेशन्सचा प्रवाह तुम्हाला जाणवेल. जर ती आत्मसाक्षात्कारी व्यक्तीने केली असली तर जास्तच. इथे राहणारे फार भक्तिवान आहेत व कलेचे विविध प्रकार ते सहजगत्या जाणतात. बंगालचे लोक प्रत्येक गोष्ट पूर्णत्वाला नेणारे आहेत. आपण स्वाधिष्ठानाची फक्त एक बाजू विकसित केली आहे. फक्त लिहिण्यावाचण्यासाठी आपण स्वाधिष्ठान वापरतो आणि या क्षेत्रात आपण उन्नती केली आहे, पण या पुढची एक पातळी आहे. ज्याविषयी आपण विचारच करीत नाही आणि त्यामुळेच असंतुलन होते. जेव्हा तुम्ही बरेचसे साहित्य कला वगैरे पहाता आणि लोक म्हणतात, लक्ष्मी व सरस्वतीचा मिलाप नाही त्याचा अर्थ, जे काही तुम्ही करीत आहात, त्याच्या खोलात गेल्यावर तुम्ही विचार करता, इथे लक्ष्मीची साथ का नाही? सहजयोगामध्ये दोघी आज्ञा चक्रावर भेटतात. तुम्ही काम करीत राहता, पण तुम्हाला हवा तो परिणाम मिळत नाही. जेव्हा तुम्ही आज्ञा चक्रावर येता, त्यावेळी तुम्हाला कळतं की, अनेक कलाकारांना गवसलेली ती स्थिती आपल्याला मिळाली नाही. आपण दारिद्रयात का राहत आहोत ? जोपर्यंत आपण ती स्थिती गाठत नाही, जिथे दोन्ही अंगे योग्य सापेक्ष प्रमाणात ০

आपण बघत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. कलेबरोबर लक्ष्मीची सांगड जुळण्यासाठी आपल्याला योग्य दृष्टी पाहिजे. आपला एक मोठा दुबळेपणा म्हणजे हट्टीपणा. जर त्यांनी हत्ती केला असेल तर ते हत्तीच बनवित बसतील. जर ते अमुक एका प्रकारे गात असतील तर ते त्याचप्रकारे गात राहतील. तुम्ही त्यांना काही बदल करायला सांगितला तर, तुमच्या लक्षात येईल. तेव्हा हा हट्टीपणा तुम्हाला आज्ञा चक्राबाहेर पडू देत नाही. आम्ही बंगाली आहोत. आमच्याकडे सर्वात महान कलाकार, बुद्धिमान लोक आहेत. आपल्यामध्ये हा अट्टाहास असतो की, आम्ही बंगालमधील लोक सर्वात महान आहोत. तुम्ही कलेचा विनाश करा असे मी म्हणत नाही, पण तुम्ही संतुलित दृष्टीने कलेचा विचार केला पाहिजे. मी तुम्हाला काहीतरी व्यवहार्य गोष्ट सांगत आहे ती अशी की, आपल्याकडे एक प्रकारचा आळशीपणा असतो ज्यामुळे सुद्धा आपण हट्टी बनू शकतो. नवनिर्मिती करायला मला श्रम करावे लागतील असं एखाद्या व्यक्तीला वाटते. नवं काही शिकण्यासाठी आपले मेंदू थोडेसे मंदच आहेत. या मंदबुद्धीमुळे ज्यायोगे आपण लक्ष्मीशी सांगड घालू शकू असं काही आपण शिकू शकत नाही. जसं काही कलाकारांना मोठ्या पर्सेस करू नका, साध्या तऱ्हेने करा असं म्हटलं तर ते म्हणतात, ‘ते शक्य नव्हतं आम्ही ज्या पद्धतीने त्यामध्ये रुळलो आहोत तसेच आम्ही करू. तुम्हाला हवं तसं नाही. काही समजून घेतले पाहिजे तर, मेंदू आत्मसात करू शकतो, पण जर तुम्ही हट्टी असाल आणि ‘मी जे काही करत आहे तेच बरोबर आहे’ असे म्हणाल तर त्याचा व्यक्तीच्या पूर्ण जीवनावर खुपच मोठा परिणाम होतो. बदल येतो तेव्हा तो फार सहजगत्या येतो आणि सहजगत्या तुम्ही लक्ष्मीशी मिलाप झालेला पहाता. कलाकार फार हट्टी असतात तुम्ही जर त्यांना म्हटलं, ‘कृपा करून हे थोडेसं बदला, तर ते लोक तसे करणार नाहीत. आज्ञा चक्राला व्यवस्थित ठेवण्यासाठी हा विचित्र अहंकार आपण आधी बरोबर केला पाहिजे. आपण जे करतो, ज्याप्रकारे करतो, ते बरोबर आहे किंवा दुसरी कोणतीही सूचना किंवा पद्धत चूक हेच तो म्हणत असतो. तुम्ही हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ब्राह्म समाजाचे वगैरे आहांत असे वाटणे याला काहीच आधार नाही. तुम्ही दुसरे काहीही नाही. फक्त माणूस आहांत, माणूस म्हणून तुम्ही जन्मला. तुम्ही कोणी तरी आहांत असा ठसा तुम्हीच तुमच्यावर लादून घेतला आहे. तुम्ही बंगाली किंवा मराठी नसून फक्त मानव आहांत. स्वत:वर असे ठसे मारून घेऊन तुम्ही आणखी प्रश्न निर्माण करता. हे छापच इतके महत्त्वाचे होतात की त्यापलीकडे तुम्हाला काही दिसत नाही. ही बाधा जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत हा आंधळेपणा जाणार नाही कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही अशाप्रकारे बघता की, की फक्त तुमचाच मार्ग बरोबर आहे. पाश्चात्य देशात तर हे जास्तच आहे. त्यांच्या मेंदुत काहीही घातलं आणि ते योग्य आहे असे त्यांना सांगितले, तर ते आंधळ्यासारखे त्याच्यामागे जातात. तिथले टीकाकारही प्रत्येक कलाकृतीवर इतकी टीका करतात. एका टीकाकाराचे मत दुसरा खोडून काढेल. तुमच्यामधून, तुमच्या मेंदूमधून काहीच येत नाही. इतरांनी जे काही डोक्यात भरले आहे, त्यांचाच स्वीकार केला जातो. प्रत्येकावर ठसा असतो. त्यामुळे त्याचा अहंकार वाढतो. ती स्वत: फार महान व्यक्ती आहे आणि इतरांहन वेगळी असामान्य व्यक्ती असे त्यांना वाटते. ती व्यक्ती वैयक्तिक होतो. सत्याचं मूळ तत्त्व आहे की, आपण सगळे एक आहोत. पूर्ण आहोत. सगळे एकत्र आहोत. त्याच्या तुम्ही

जेव्हा विरोधात जाता तेव्हा तुम्ही फक्त वैयक्तिक होता. अधिकाधिक वेगळे होत जाता. एक पान दुसऱ्यासारखं दिसत नाही, हे खरं आहे, पण ती सारी त्याच झाडावर असतात. विराटाचे ती अंग-प्रत्यंग असतात. ज्यावेळी आपण आपल्याला वेगळे करतो तेव्हा सरस्वती तत्त्व ज्याने महासरस्वती झाले पाहिजे ते होत नाही. जेव्हा तुम्ही महासरस्वती तत्त्वात असता तेव्हा तुमचं दैनंदिन जीवन तुम्हाला पूर्णत्वात दिसतं आणि आपण सगळे एक दिसतो. त्यामुळे कलाकार जेव्हा निर्मिती करतो, त्यावेळी तो अशा वस्तू करतो, ज्यांचा हृदयापासून स्वीकार होतो. आपण करतो त्या सर्व कलाकृती सरस्वती मातेला भक्तिभावाने समर्पित केल्या पाहिजेत. सर्व काव्य, संगीत वरगैरे. असं जर झालं तर त्या सर्व कलाकृती अमर होतील. गाणी, कलाकृती ज्या देवांच्या नावे केल्या गेल्या त्या अजून जिवंत आहेत. आजचं फिल्म संगीत येतं आणि नष्ट होतं पण कबीर, ज्ञानेश्वरांची गीतं अजून आठवणीत आहेत. आत्मसाक्षात्कारामुळे त्यांना महासरस्वती शक्ती मिळाली आणि त्यांनी जे काही लिहिलं निम्माण केलं त्याचा प्रकाश अद्वितीय होता. या निर्मितीनेच जगाला एकत्र आणलं. फक्त सरस्वती तत्त्वालाच जागृत करू नये कारण त्यामुळे तुम्ही मर्यादित रहाता, महासरस्वतीला तुम्ही जागृत केले पाहिजे. जर सरस्वती तत्त्व बीज असेल तर महासरस्वती वृक्ष आहे. जोपर्यंत या बीजाला तुम्ही महासरस्वतीमध्ये रूपांतरित करीत नाही तोपर्यंत महालक्ष्मीमध्ये तुम्ही विलीन होऊ शकत नाही. तुमचा आत्मसाक्षात्कार ही तुमच्यामध्ये महालक्ष्मीची देणगी आहे. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली आज्ञेमध्ये एकत्र भेटतात. फार सूक्ष्म रीतीने तिथे अहंकार येतो, त्यामुळे प्रत्येकाने अंतर्मुख होऊन परीक्षण केलं पाहिजे की, मी जर मर्यादित क्षेत्रात वाढलो आहे, तर पूर्ण जगाला कसं प्रकाशित करू शकेन ? कितीदा तरी मी सांगितले आहे, तुम्ही स्वत:कडे पहा. खूप लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, देवी म्हणून माझी ते पूजा करतात ते मला माहीत आहे, पण यात मला काय फायदा आहे? मी आहे तीच आहे. तुम्ही ते आहांत, ज्यांनी साध्य केलं आहे. तुम्ही सहजयोगात आलांत आणि सरस्वती त्त्वातून तुम्ही महासरस्वती तत्त्वाप्रत पोहोचला. तुम्हाला लाभ झाला आहे. मला नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही समाधान वाटून घेता कामा नये. तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि तुम्हाला वर उचलले पाहिजे. आता तुम्हाला सहजयोगाचे शास्त्र माहीत आहे. तुमची मेणबत्ती पेटवली गेली आहे. आता या मेणबत्तीने इतर हजारोंमध्ये ज्योत जागवली पाहिजे. माझ्यावर प्रेम करणे सुरेख आहे, पण याहून पुढची स्थिती आहे. आनंदापलीकडे दुसरी स्थिती आहे ‘निरानंद’. तुमच्या आईमध्ये ती निरानंदाची स्थिती तेव्हाच येईल जेव्हा तिची मुले तिच्याही पुढे गेलेली ती पाहील, पण आपल्याला चिकटलेल्या या लहान सहान क्षुद्र गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तर ते जास्तच आहे. क्षुद्र गोष्टीत आपण चिकटलो आहोत. मला वाटते, आपल्या पूर्वजन्मांचा तो अवगुण असावा. जर चांगली गुणवत्ता असती तर, ती व्यक्ती ताबडतोब स्वत:चे हृदय उघडून फुलासारखा सुगंध उत्सर्जित करू लागली असती. महासरस्वतीमध्ये प्रत्येकाने परिणामकारक व कार्यक्षम असले पाहिजे. महाकाली तत्त्वामध्ये तुम्ही आत्मसात करता, इच्छा करता, ‘मला हे करायचे, ते करायचे, मला हे आवडतं, ते आवडतं’ या इच्छा कार्यान्वित करणे हे महासरस्वतीचं काम आहे. सहजयोगाचा प्रसार व्हावा अशी काही लोकांची इच्छा असते, पण या विषयात प्रसारांसाठी तुम्ही काय केलं? किती जणांना तुम्ही आत्मसाक्षात्कार दिला ? किती जणांशी

सहजयोगाबाबत बोलता ? एका वृत्तपत्रकाराने मला सांगितले, तरुण मुलं-मुली इतक्या शांततेने आणि तन्मयतेने पोस्टर्स लावत होते, त्यामुळे त्याच्यावर छाप पडली. त्यांच्या बोलण्याने माझ्यावर प्रभाव पडला. तुमच्या इच्छा तुम्ही कृतीत आणल्या पाहिजेत. जे आपण करू शकतो, त्याची तुम्ही इच्छा केली पाहिजे कारण ज्या इच्छेची पूर्ती होऊ शकत नाही, ते संकट होते. इथे अनेक श्रीमंत लोक व अनेक गरीब लोक आहेत. श्रीमंत लोकांचे गरीब लोकांसारखे प्रश्न आहेत. त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. म्हणून आमचे कारखाने बंद झाले आहेत. पण कर्मचारी हा तुमचाच एक भाग आहे. अंग-प्रत्यंग आहे. हे श्रीमंतांनी लक्षांत ठेवले पाहिजे. त्यांच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला तर बोटही कसं हलवायचं ते माहीत नाही. तुम्ही नुसते खुर्चीमध्ये बसता. तुम्ही मजुरांसाठी काय केले आहे? सर्व प्रश्न पैशाने सुटू शकत नाहीत. ते झेंडा उभारतात, तुम्ही पैसे पुढे करता; मग ते परत झेंडा उभारतात आणि हे सगळे असंच चालू रहातं. त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही काही केलं आहे का ? प्रथम त्यांची संस्कृती शिका. मोठमोठे कारखानदार आहेत, ज्यांना त्यांची संस्कृती माहीत नाही. मजूर फार दिलदार आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी गर्विष्टपणे वागलांत तर ते तुमचे सर्वात मोठे शत्रू होऊ शकतात. त्यांच्याबरोबर रहा. त्यांना भेटा, त्यांना जाणून घ्या. त्यांना मी प्रकाशवंत उद्योजक म्हणते. त्यांच्या घरी जा. त्यांचे प्रश्न त्यांना विचारा, हे थोडसं त्यांच्यासाठी करा. जीवनभर ते तुमच्या पदरी राहतील. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पैसे देणं आवश्यक नाही. तुम्ही पैसे दिले की ते सरळ दारूच्या गुत्त्याचा रस्ता पकडतील किंवा बायका ठेवतील. तुमचाच एक अविभाज्य भाग त्यांचा विचार करा आणि त्यांचं हृदय जाणण्याचा प्रयत्न करा, मग तुमचे सर्व का ही ‘लेबर प्रॉब्लेम’ म्हणून सुटतील, इथले लोक फक्त सरस्वतीपुरते मर्यादित आहेत. महासरस्वती नाही. तुम्ही सहजयोगी आहांत आपणहन गोष्टी ठीक होतील, पण सहजयोगाच्या पद्धती तुम्ही वापरांत आणल्या पाहिजेत. तुमचे संकुचित दृष्टिकोन सोडून तुम्हाला पसरलं पाहिजे. आतून वर उठल्याखेरीज बाहेरून तुम्ही पसरू शकत नाही. सहजयोगामध्ये ध्यान फार महत्त्वाचं आहे. सकाळी ५ वाजता पाच मिनिटं ध्यान करा. रात्री दहा मिनिटं, यामुळे तुम्ही स्वच्छ होत जाल आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतील. तुम्हाला सतत मार्गदर्शन केलं जात आहे. तुम्ही सुद्धा आनंद उपभोगत वाढत आहात. अजून लोकांना आईवर प्रेम करणं हेच पुरेसं आहे असं वाटतं. तिची सेवा करणं, प्रार्थना करणं ते ठीक आहे. तुम्हाला फायदा मिळतो. आईच्या प्रेमामध्ये तुम्ही खूप वाढले असाल. ज्यांत कोणी पाणी भरत नाही अशा खोल भांड्याचा उपयोग काय? मी काय कार्य करावं असा जर तुम्ही विचार केला आणि तुम्ही निर्विचारांत गेलात तर तुम्हाला आंतून स्फूर्ती मिळेल. इथे गहनतेमधील अनेक लोक आहेत. पण आता ती गहनता आपण वाटून घ्यायला हवी. एखाद्या तळ्यात जशी काही कमळं उगवतात आणि किड्यांना त्याच्याबद्दल अभिमान वाटतो, पण अजून तुम्ही कीटकच आहांत तर त्याचा काय उपयोग आहे ? वेदांमध्ये म्हटलं आहे, तुमच्याकडे ‘विद’ नाही, जाणणे नाही तर वेदांचा उपयोग काय? त्यांनी

पंचमहाभूतांना जागृत करण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम म्हणून आपल्या देशाकडे शास्त्रे आली. इथे झालेले विज्ञानविषयक शोध आज होत असलेल्या शोधांपेक्षा फार जास्त मोठे होते. सहजयोगदेखील पंचमहाभूतांवर ताबा मिळवू शकतो, पण इथे अजून तुम्ही म्हणत आहांत, ‘माताजी, माझी आई , नाहीतर भाऊ, नाहीतर दुसरं कोणी आजारी आहे’ तुम्ही सहजयोगी आहांत. सारं काही आईने करावं असं तुम्हाला वाटतं. तुम्ही का नाही करत? नुसतं इतरांना द्या. मी सारखी तेच तेच, परत परत सांगत असते की काहीतरी करा. अर्थात् मी रोगमुक्त करेन, पण माझ्यापेक्षा तुम्ही चांगल्याप्रकारे रोगमुक्त करू शकता. जर तुम्ही करू शकला नाहीत, तर माझ्याकडे या. जेवढ्या तुमच्या शक्त्या वापराल, तेवढी तुमची वाढ होईल, पण स्वत:वर विश्वास ठेवा. श्रीमाताजी म्हणतात तर आपल्याकडे या शक्त्या असणार आणि त्या आपण वाढविल्या पाहिजेत. आता सहजयोगामध्ये गहनता आली आहे, पण दुसऱ्याला देणं काही जास्त नाही. आता तुम्हाला दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कार्यक्षम व्हाल व महासरस्वती चक्राची जागृती होईल, त्यावेळी हा देश कुठे पोहोचेल ते पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल पण हा आळशीपणाचा रोग पूर्ण भारतभर आहे. ते का करीत नाहीत यासाठी सहजयोगात लोक खूप कारणे दाखवितात. उदा. मला माझ्या कुटुंबाची, नाहीतर समाजाची भीती वाटते. सहजयोग भित्र्यांसाठी नाही. इथे इतके जादुटोणावाले आणि तांत्रिक आहेत आणि ते मी साफ करते आहे. जादुटोणा नष्ट करण्यासाठी तुम्हाला विशेष लक्ष घालून ते कार्यान्वित केलं पाहिजे. आजची पूजा पूर्ण भारतासाठी आहे कारण हा आळशीपणाचा रोग भारतभर आहे. आपण जराही कार्यक्षम नाही. आपल्या फार दृढ, जबरदस्त इच्छा आहेत, पण क्रिया काहीच नाही. तुम्ही एकत्र येऊन, ज्यामुळे सहजयोगाचा प्रसार कसा होईल याविषयी ठरवलं पाहिजे. वेगवेगळ्या कारणांसाठी आपण जमिनी घेतल्या, त्या सर्व तशाच पडून आहेत. मी भारतात येईपर्यंत त्यांना छोटा रस्ता सोडाच पण एक छोटी झोपडीदेखील बांधता येत नाही. इतके लोक आहेत, पण काहीच होत नाही, कसं ते मला समजत नाही. मी गेले की तुम्ही सगळे वेगवेगळे होता. आपापल्या मार्गाने जाता. फक्त दोन-तीन लोक कार्य करतात. सहजयोग सामूहिक कार्य आहे. फक्त दोघातिघांचं कार्य नव्हे. प्रत्येक सहजयोगी हा सहजयोगाचा भाग आहे हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. तुम्ही इतकी गहनता गाठली आहे आणि इतकं मिळवलं आहे की आता तुम्ही इतरांना दिलं पाहिजे. उद्या तुम्ही माझ्या जागेवर बसून माझे कार्य करू शकाल. जेव्हा असं होईल, तेव्हाच सहजयोग वाढेल. तुम्हाला आशीर्वाद देते की, या पूजेनंतर अनेक लोक बाहेर येतील जे सहजयोग पसरविण्याचं कार्य करतील.