Shri Mahalakshmi Puja, The Universal Love

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Shri Mahalaxmi Puja, The Universal Love, Kalwe, India (1992-1230)

[Shri Mataji speaks English]

आता मराठीत बोललं पाहिजे, कारण पुष्कळ लोकांना इंग्लिश भाषा समजत नाही. काही हरकत नाही, इंग्लिश भाषेत काही राम नाहीये. मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि परत आत्म्याचं ज्ञान घ्यायला मराठी भाषा आहे. आणि इतकं संतसाधूंनी इथे कार्य केलंय, नाथपंथीयांचंच आम्ही कार्य करतो आहे कुंडलिनीचं. पण सांगायचं असं कि मराठी भाषा जरी फार उच्च दशेला असली आणि महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी असूनसुद्धा महाराष्ट्रीयन लोकांचं डोकं मात्र आजकाल उलटं बसलेलं आहे ते कशाने ते मला माहित आहे. जे पोलिटिक्स मध्ये चाललेलं आहे तेच आपल्या आज घरोघर, सहजयोगामध्ये झालेलं आहे. ह्याचा पाय त्याने ओढायचा, त्याचा पाय त्याने ओढायचा, म्हणजे आहे तरी काय मला समजतच नाही. अहो जर तुमच्यामध्ये सामुहिकता आली नाही, समष्ठी आली नाही तर या वैष्टी स्वरूपासाठी का आम्ही इथे एवढे दिवस इथे मेहनत केली आणि संत साधूंनी हेच सांगितलं का? इथपर्यंत सांगितलं, ‘तेची सोयरिक होती’. अहो त्या ज्ञानेश्वरांनी एवढं कशाला सांगितलं? ते कोणासाठी सांगितलंय? मला समजत नाही. परदेशातल्या लोकांसाठी सांगितलेलं दिसतं. कारण इथं कोणावर परिणामच होत नाही त्याचा. तुमचे सोयरिक कोण? तेच सहजयोगी. पण ह्याचं हे चुकलं आणि त्याचं ते चुकलं आणि एवढी मोठमोठाली मला पत्र पाठवतात. मला हे ऐकून बरं वाटेल का? देवीला प्रसन्न केलं पाहिजे कि तिला अशा गोष्टी लिहून पाठवल्या पाहिजे? आता प्रत्येक वेळेला सांगायचं म्हणजे सुद्धा मला वाटतं कि मी कोणाशी बोलते. अहो तुम्ही संत, साधू, तुम्हाला साधू केलं मी, संत केलं, तुम्हाला इतक्या उच्च दशेला आणलं. धृवासारखं तुम्हाला नेऊन बसवलं त्या अढळ पदावर आणि तुम्ही आता कुठे इथे पडले आहात, मला समजतच नाही याला काय म्हणावं? मराठी भाषा इतकी सोज्वळ, इतकी प्रखर, आणि आत्मानुभूतीला अत्यंत उत्तम अशी भाषा असतानासुद्धा मराठी ऐकणाऱ्याना ते पाहिजे नं. त्याच्या जर डोक्यात नाही घुसलं तर सांगून तरी काय उपयोगाचं. दुसरीकडे अनंत प्रकार केले लोकांनी, कुंडलिनीचे.

[Shri Mataji speaks HINDI]

मराठीत आहे आपल्या मी अनेकदा हे उदाहरण सांगितलंय, परत सांगते कि नामदेवांनी एकदा गोरा कुंभाराला भेटायचं ठरवलं आणि जाऊन उभे राहिले. गोरा कुंभार आपली माती तुडवत होते. उभे राहिल्यावर एकदम ठाकले, काही हिंदीत ठाकलेला ट्रान्सलेशन नाही पण ठाकले. आणि काय म्हणाले? की “निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी” हि ओळख आहे सहजयोग्याची.

[Shri Mataji speaks English]