Easter Puja, Crucify Yourself

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Easter Puja – You Must Crucify Your Ego Date 14th April 1995: Place Kolkata Type Puja

[Marathi translation from English]

ईस्टर हा फार अर्थपूर्ण दिवस आहे; फक्त ख्रिस्तांसाठी नाही पण आपल्या सर्वासाठी. कारण सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे जेव्हा पुनरुत्थान होते. ख्रिस्तांचे पुनरुत्थान हा ख्रिस्तनीतीचा संदेश आहे. क्रॉसचा नव्हे. पुनरुत्थान शक्य आहे. आणि याच्याशिवाय आज्ञाचक्रांच्या पार होणे शक्य नव्हते. त्यांचे आयुष्य फारच कमी होते याबद्दल शंका नाही आणि एका अर्थाने ते साडेतीन वर्षच होते असं आपण म्हणू शकतो. ते भारतात आले आणि शालिवाहनांची आणि त्यांची भेट झाली. शालीवाहनाने त्यांचे नाव विचारल्यावर ते म्हणाले माझे नाव.”इसामशी” आणि पुढे म्हणाले “मी म्लेंच्छ लोकांच्या देशातून आलो, म्लेंच्छ (मल इच्छा) म्हणजे वाईट इच्छा. अशुद्ध व मलीन इच्छा. म्हणून त्या देशात कसं रहायचं ? आता हाच माझा देश” पण शालिवाहनाने त्याला परत स्वदेशात जाऊन तिथल्या लोकांना वाचवायला आणि त्यांना “परम निर्मल तत्त्व सांगायला सांगितले” मग तो परत आपल्या देशात गेला आणि अवघ्या साडेतीन वर्षात त्याला सुळावर जावे लागले. मरते समयी त्यांनी ‘क्षमे’ बद्दल खूप सुंदर गोष्टी सांगितल्या. पण सरतेशेवटी ते म्हणाले, ‘माता आली आहे पहा’. म्हणजे तुम्ही आईची वाट पहा. तसंच हयात असताना ते असेही म्हणाले , “मी तुमच्यासाठी होली घोस्ट पाठवणार आहे.जे तुम्हाला आराम देतील, उपदेश करतील आणि तुमचा उद्धार करतील म्हणजेच तुमचं पुनरुत्थान होईल. ते हे सर्व म्हणाले कारण त्यांना पुढं काय होणार आहे व कसं होणार आहे हे सर्व माहीत होते. ते असेही म्हणाले की, ‘माझ्याबद्दल तुम्ही काहीही बोललात किंवा माझ्या विरोधात काहीही केलत तरी चालेल पण होली घोस्टच्या विरोधात तुम्ही गेलात तर ते मी कदापि सहन करणार नाही. काय वाटेल ते झालं तरी ते चालू देणार नाही.’आणि हे खरंही आहे, होली घोस्टच्या विरोधात जाणं फारच धोकादायक आहे याबद्दल काही शंका नको. माझ्याकडून तशी भीती नाही, पण या देशात देवता मात्र तितक्याच रागिट आहेत. सहजयोगामध्ये तुमच्या शरीरासकट तुमचं पुनरुत्थान झालं आहे. यापूर्वी तुम्ही परमात्म्याच्या सर्वव्यापी शक्तीबरोबर जोडले गेला नव्हता आणि तुम्ही जे काही करत होता ते मनाने या भावनेने करत होता. तुम्ही तुमच्या भावना, इच्छा, कर्तव्य व अहंकार यामध्ये डुबून गेला होता.आत्मसाक्षात्कांनंतर तुम्ही किती स्वतंत्र, मुक्त आहात ते तुम्हालाच जाणवलं आहे.तुमचं सारं व्यक्तिमत्त्व उन्नत झालं आहे. ख्रिस्तांनी अनेक उदाहरणांतून हेच सांगितले आहे की तुम्ही ‘ स्वत:ला ओळखा’ तुम्ही स्वत:ला ओळखल्याशिवाय तुमचं पुनरुत्थान होणार नाही हे त्यांना माहीत होते. पण सहजयोग याच्या अगदी उलट आहे. तुमचे आधी पुनरुत्थान ओळखता ही साक्षात्कार होण्याची आगदी सहज व सुंदर क्रिया आहे. होते आणि मग तुम्ही स्वत:ला ख्रिस्तांच जीवन पाहिलं तर कळून येते की ते पुटपुटणार्या आत्म्यांबद्दल सांगत असायचे. सहजयोगातही तो सर्वासाठी खुला असल्यामुळे, अनेक प्रकारचे लोक आले आहेत. सहजयोगांतही काही उथळ वृत्तीचे लोक आले आहेत आणि ते सहजयोगाबद्दल बाष्कळ बडबड करून किंवा सहजयोगच्या कार्याबद्दल नसती बडक्बड करून

या उथळपणाचे प्रदर्शन करत असतात.त्याला इलाज नव्हता पण ख्रिस्त म्हणाले होते की या पुटपुटणार्या आत्म्यांबद्दल तुम्ही जागरुक राहिले पाहिजे.याच गोष्टीची आपण फार काळजी घेतली पाहिजे. तुम्ही सहजयोगात नवीन असता तेव्हा तुम्ही अशा लोकांच्या ताब्यात जाण्याची शक्यता असते. कारण ते एक प्रकारे असं म्हणू या, विरोधी शक्तीचे संदेशवाहक असतात. अशा लोकांना तुम्ही शोधून काढायचा प्रयत्न केला पाहिजे ते नेहमी कुरकुर करत असतात, उथळपणाच्या गप्पा मारत असतात आणि तुमच्या जेव्हा असले प्रकार नजरेस पडतात तेव्हा तुम्ही त्यांच्यापासून दूर राहिलेलच बरं. कारण नुसतं तुमचं पुनरुत्थान झाल्याने तुम्ही काही मिळवत नाही. पुनरुत्थान झाल्यावर, म्हणजे साक्षात्कार मिळाल्यावर तुम्हाला गहनतेत उतरुन प्रगल्भ व्हायचं आहे आणि ही गहनता मिळवण्यासाठी आपल्यावर अशा लोकांचा कसा प्रभाव पडतो, ज्यांना मला वाटतं कुचकामी म्हणावे, इकडे आपण फार लक्ष ठेवले पाहिजे. याच्यापासून पार पडून जे पुढे येतात ते जणू सुंदर देवदूत बनतात. याबद्दल कहीच शंका नाही, पण लक्षात ठेवायची मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला मिळालेल्या आत्मसाक्षात्काराचा तुम्ही आदर राखला पाहिजे.दुसरे लोक काय बोलतात काय म्हणतात कशाबद्दल टीका करतात वरगैरेची काळजी न करता तुम्ही स्वत:कडेच पहायची सवय करा आणि या गहनतेमधून स्वत:ची वाटचाल करत रहा. तुमचे पुनरुत्थान होण्याची फार महान संधी या जन्मात तुम्हाला मिळाली आहे आणि तुम्हाला माहीत आहे की हाच उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा आहे. आता तुम्ही मन बाजूला ठेवा कारण तुम्ही मनाच्या व्यापारातच रहाल तर तुम्ही मनाच्या पलीकडे जाऊ शकणार नाही.सहजयोगाची प्रगती ही विचार थांबल्यावरच होणार आहे. मगच तुम्ही स्वत:ला ओळखू शकाल कारण तुम्हाला आत्म्याचे ज्ञान झालेले असते. तुमची चक्रे तुम्ही जाणू शकता. दुसर्याची चक्रे पण जाणू शकता.हे सर्व ज्ञान तुमच्याजवळ उपलब्ध आहे. पण तुम्ही सतत सूक्ष्म सुक्ष्मत्तर व्हायला पाहिजे. जड मानव नव्हे. अशी सूक्ष्मता जशी अंगी बाणेल तसतशी तुमची अंगशक्ती वृध्दिंगत होईल आणि तिचा तऱ्हेतऱ्हेचा आविष्कार पाहिल्यावर तुम्ही थक्क व्हाल. सहजयोगात काही लोक महत्त्वाकांक्षी असल्याचे मी पाहिले आहे. ते म्हणू लागतात की श्रीमाताजी आम्हाला परमेश्वराचा साक्षात्कार हवा आहे. मला हे करायचे आहे. ते करायचे आहे. आम्ही त्यांना महायोगी म्हणतो. म्हणून तुम्ही आता लक्षातं ठेवायचे की आता शेवटचा निर्णय होणार आहे आणि फार मोठी गाळणी सुरू झाली आहे.निवड करण्याचे मोठे काम सुरु झाले आहे.जे गहन आणि सूक्ष्म आहेत ते अधिक अधिक गहनतेत उतरणार आहेत आणि जे उथळ, मूर्ख, विचित्र आणि जड आहेत ते बाहेर फेकले जात आहेत. अशी ही गाळण फार भराभर चालली आहे आणि ते चालू असतानाच आपण कुठे आहोत हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. आता हे कसे ओळखायचे? प्रथम म्हणजे तुमची करुणा ! तुमच्या करुणेमध्ये विवेक असावयास हवा. कधी कधी लोकांना अयोग्य (निगेटीव्ह) लोकांबद्दल चुकीची करुणा येते. सहजयोगात आल्यानंतर तुम्हाला कोणाबद्दल करुणा वाटायला हवी ते समजले पाहिजे. व्हायब्रेशनमधून हे समजणे अगदी सोपे आहे. समोरचा माणूस कसा आहे हे समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला चैतन्यलहरींची जाणीव हवी अशी जाणीव नसेल तर तुम्हाला खरे काय आणि खोटे काय ते समजणार नाही. म्हणून तुम्ही सर्वानी नियमितणे ध्यान केले पाहिजे.स्वत:ला दोष न देता तुम्ही नियमितपणे ध्यान करू शकता.हे फार महत्त्वाचे आहे. कोण ध्यान करतो आणि कोण करीत नाही ते

मला लगेचच समजते.अगदी क्षणभरात! जो नियमित ध्यान करतो तो अगदी देवदूतासारखा असतो; त्या व्यक्ती चे सर्व वागणे, बोलणे ,त्याच्या प्रतिक्रिया त्याचा दृष्टीकोण या सर्वामधून प्रगल्भ दिव्यत्व प्रत्ययाला येत असते आणि तुम्ही चकित होऊन जाता! “सहस्त्रारांतील महामाया” तुम्ही जाणतां. मला ओळखणं फार कठीण आहे. एखाद्या वेळी तुम्ही “मी कोण आहे हे कदाचित ओळखू शकाल पण क्षणभराताच ते विसराल. ही किमया आहे. कारण तुम्ही जर मला पूर्णपणे ओळखू शकला असता तर तुम्ही इथे बसणारच नाही; माझ्या जवळही यायला तुम्ही धजवणार नाही. म्हणून ही महामाया सदोदित कार्य करत असते, पण त्याच्यामुळेच लोकांच खर कळून येते. शेवटचा निर्णय ही काही सोपी गोष्ट नाही! हजार न्यायाधीश जरी एकत्र आले तरी ते असा स्वरुप निकाल देऊ शकणार नाहीत. काय खरं आहे हे तुम्ही सर्वकाही समजून घ्यायला हवं.काहीही झाले तरी मला सर्व काही कळत असते पण मी मला हे सर्व ठाऊक आहे असे कधीही दर्शवणार नाही. अशा तऱ्हेनी मी सारे काही करत असते आणि एखाद्या माणसाचे काय करायचे ते हळूहळू मला समजते. तुमच्या या पुनरुत्थानाला ख्रिस्तापेक्षाही फार मोठे आशीर्वाद मिळाले आहेत. ते एकटेच होते आणि लोक त्यांना ओळखू शकले नाहीत. त्यांच्या हातावर आणि पायावर ज्या ज्या ठिकाणी त्यांना खिळे मारले होते त्या खुणा त्यांना दाखवून द्यावयाच्या होत्या.पण आता तशी परिस्थिती नाही. एकच गोष्ट म्हणजे पहिले प्रथम तुम्ही मला ओळखायला हवे. बस मी कोण आहे हे समजण्याची जरुरी नाही. ती फार अवघड गोष्ट आहे. मला समजणे अवघड आहे पण मला ओळखले की सारे मिळाले! आणि हे सर्व तुमच्या संवेदनक्षमतेवर अवलंबून आहे. तुमचे पुनरुत्थान पूर्णपणे व्हायला हवे आणि सहजयोगांत तुम्ही प्रगल्भ व्हायला हवे. अशी प्रगल्भता तुम्ही मिळवली नाही तर मी म्हणेन तुम्ही सहजयोग सोडून द्या.काही काळ बाहेर रहा, मग तुम्हाला हे सर्व काय चाललंआहे ते उमजेल आणि तुम्ही परत याल. ख्रिस्तांनी आपल्या आयुष्याच समर्पण केलं तसं सहजयोग तुम्हाला तुमच्या आयुष्याचा त्याग करायला सांगत नाही. तुमच्या आईला पण तसं काही नको, पण तरीही तुम्हाला काही त्याग करायला हवा.महत्त्वाचा त्याग म्हणजे तुमच्यातील अहंकाराचा, या अहंकाराला सुळावर द्यायचे. या अहंकारामुळेच तुम्हाला नुसत्या कल्पना सुचतात.हा अहंकार जर अर्पण केला तर तुम्हाला खूप मदत होईल.पण नुसता त्याला अर्पण करण्याबद्दल विचार करत बसलात तर तुमची मनशक्तीच फक्त खर्च होत राहील. अशा तऱ्हेच्या सर्व गोष्टी तुमच्या मनाचेच खेळ असतात आणि त्यातूनच तुमच्यातील अहंकाराचा वापर होत रहातो. म्हणून सर्वात उत्तम उपाय म्हणजे ध्यान करणे, निर्विचारतेच्या जाणीवेमध्ये उत्तम उपाय म्हणजे ध्यान करणे, निर्विचारतेच्या जाणीवेमध्ये जाणे; त्यापासून आपोआप तुम्ही समर्पित बनू लागता. आतां मला तुमच्याकडून काय हवे आहे ? काहीच नाही.मला कशाचीही जरुरी नाही, मला स्वत:करता नाहीच नकोय, तुम्हीच मला हे देता, ते देता. मला त्या सर्व गोष्टीपासून दूर जावेसे वाटते. फक्त तुमच्या समाधानाकरता मी ते मान्य करते. मला स्वत:साठी सहजयोग करण्याची जरुरी नाही पण हे सर्व तुमच्या आईचे प्रेम आहे, तिला या पृथ्वीवरील जास्तीत जास्त माणसांना तारायचे आहे; त्यांचे पुनरुत्थान करावयाचे आहे. हा एक विशेष समय आहे आणि तुमच्याद्वारेच मला हे कार्य करायचं आहे. तुम्ही सगळीकडे जाऊन सहजयोगाचा प्रचार व प्रसार करायला लागा आणि त्या कामासाठी इतरांना पण तयार व्हायला मदत करा.

आजचा दिवस प्रतिज्ञा करण्याचा आहे, प्रतिज्ञा स्वत:लाच वचन देऊन करायची की आम्ही सहजयोगात उत्तरोत्तर वृध्दिंगत होऊ, जेणेकरुन सहजयोगाबद्दलच्या आमच्या भावना, ज्ञान आणि संवेदनशीलता गहन होतील; त्या समतेसाठी मी रोज ध्यान करेन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोक म्हणतात की इथले लोक फार कंजूष आहेत. ते हे करायला तयार नाहीत, ह्याला पैसे द्यायला, ते विकत घ्यायला तयार नसतात. मला वाटते की तुमचे प्रेम तुमच्या औदार्यामधून व्यक्त होत असते. तुम्ही मला काही तरी घ्याल , ते ठीक आहे, मला काही जरुर नाही, माझ्यासाठी मी स्वत:चे पैसे खर्च करते. पण उदारपणाची वृत्ती सगळ्यात चांगली आणि ह्या औदार्याला सहजयोगात फार फार महत्व आहे. कधी कधी लोक फार चिकित्सक व हिशोबी वृत्तीचे असलेले मला दिसते. ते मला त्यांच्यासाठी साड्या आणायला सांगतात. ह्या घ्या साड्या, चांगली कल्पना आहे, ठीक आहे. वर म्हणतील आम्हाला आवडल्या नाहीत, आम्ही विकत घेणार नाही. मी काय धंदा करत नाहीये, पण तुम्हाला पाहिजे होत्या म्हनून मी निवडून आणल्या. मग नको म्हणायला इथे काही धंदा चालला नाही किंवा बाजार मांडला नाही! असा प्रश्न आला की ते सहजयोगी आहेत का हे मला समजत नाही? त्यांना समजत का नाही की श्रीमाताजींनी स्वत:चे पैसे खर्च केले आहेत ? उलट असं असायला हवं की त्यांनी आपणहन म्हणावे, सहजयोगासाठी थोडे जास्त घ्या. ख्रिस्तांना तीस रुपयाला विकले गेले; कल्पना करा, फक्त तीस रुपये याचाच अर्थ हा की तुम्ही कार्यकर्त्याचे आर्थिक प्रश्न समजून घेत नाही, त्यांना मदत करत नाही. तुमच्यामधील ख्रिस्ताला तुम्ही विकायला निघाला आहातं. तुम्ही ख्रिस्तांना विकू शकत नाही, सहजयोग विकू शकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही फायद्यासाठी वापर कराल .म्हणून मला सांगायचे आहे की औदार्य असण्यात तुमचाच फायदा आहे की त्यातूनच तुमच लक्ष्मीतत्त्व जागृत होणार आहे. हा मुद्दा मला सांगावा लागत आहे कारण माझ्याकडे बऱ्याच तक्रारी आल्या आहेतकी लोक पैसे द्यायला काचकुच करतात. काही लोक आपणहून पुढे येतात ही गोष्ट कौतुकास्पद आहे पण प्रत्येकाने आर्थिक भार वाटून घ्यायला हवा. हे फार महत्वाचे आहे . कारण परमेश्वरी कार्य करत आहो.त्याचाच आनंद घ्या! सहजयोग्यांनी फलक लावलेले पाहन मला फार समाधान झालं, ह्या सर्व परिसरांत चैतन्य भरुन राहिल्याच तुम्हालाच जाणवेल. हे कस कार्यान्वित झाले आहे हे तुम्हाला समजेल. म्हणून प्रत्येकाने अगदी शर्थीने जे काही शक्य असेल ते करायला हवं. दुसर्या कशाची जरुर नाही, फक्त तुमचे ह्ृदय पूर्णपणे सहजयोगाला वाहून घ्यायला हवं.मग तुमची वाढ कशी व किती होत आहे हे तुम्हाला दिसेल. तुमच्या भविष्यासाठी जरुर असलेली सर्व शक्ती तुम्हाला तुमच्याच हृदयातून मिळेल. म्हणून हिशोब करत बसू नकां, तुमच हृदय उघडू दे. ह्या दिवशी खिस्त मृत्यूलोकातून परत आले आणि त्यांचे पुनरुत्थान झाले. तुम्ही तुमच्या देहातूनच त्यांच्यासारखे पुनरुत्थान मिळविले पाहिजे. मृत्यूनंतर नव्हे तर आत्ताच जिवंतपणीच. जिवंत असतांनाच तुमच पुनरुत्थान होते पण या उत्क्रान्तीची विशेषता तुम्ही समजून घेतली पाहिजे. पुनरुत्थानानंतर तुम्ही जास्त सूक्ष्म व्हायला हवं. सहजयोगामध्ये तुम्ही फक्त तुमच्या आध्यात्मिक उन्नतीचाच विचार करायचा असतो. दुसरे कसलेही विचार तुमच्या मनात यायला नकोत. आता प्रत्येकजण माताजींना विचारतो आहे की बंगालमध्ये अजून लक्ष्मीतत्त्व का नाही जागृत झाले ? याला

बऱ्याच ठिकाणी सहजयोग पसरला आहे. तुमच्याजवळ संगीताची चांगली कला आहे तर तुम्ही खेड्यापाड्यात जाऊन तिथल्या लोकांना तुमच्या कलेद्वारे आकर्षित करा आणि त्यांच्या उद्धाराकरता त्यांना मदत करा. असे केल्याने सगळीकडचे तांत्रिक पळून जातील . माझ नुसते नाव ऐकले तरी ते थर थर कापतील . तेव्हा तुम्ही जेव्हा माझी भजने म्हणाल तेव्हा तुम्ही काय मिळवू शकणार नाही? तुम्हाला तुमच्या आईकडून जे प्रेम मिळाल आहे ते वाटून घ्या. या प्रदेशात लोकांन प्रेमाचे किती आकर्षण आहे ते तुम्ही जाऊन पाहण्यासारख आहे आणि तुम्ही तिथे गेलात की लक्ष्मी पण तिकडे येईल. तुमच्या जाण्याने लोकांचे शारीरिक त्रास कमी होतील, त्यांची मानसिक स्थिती सुधारेल आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची आध्यात्मिक वाढ पण होईल. अशा तऱ्हेने आपल्याला आपल्या देशांतील लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि यासाठी तुम्ही सगळीकडे जाऊन कार्य करायला हवं. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि तो असा की ख्रिस्तांनी या दिवशी दाखवून दिले की मानवप्राणी स्वत:च उन्नत होऊ शकतो. पण त्यांनी ज्या अटी घातल्या होत्या त्या पाळणे आपल्याला शक्य नाही. त्यांनी सांगीतले की तुमच्या एका डोळ्याने पाप केल तर तुम्हीच तो डोळा काढून टाका, हाताने जर गैर काम केला तर तो हात कापून टाका. मी ख्रिश्चन लोकांबरोबर खूप वावरले आहे पण ज्याने एक डोळा काढ़ून टाकला आहे किंवा एक हात कापून टाकला आहे असा एकही माणूस खिश्चन समाजात मला दिसला नाही. म्हणजे त्यावेळेस त्यांनी ही अट गुंडाळून ठेवली. आता सहजयोगांत आल्यावर तुम्ही स्वत:बद्दलच शत्रुत्व करु नका. तुम्ही आत्मपरिक्षण केल पाहिजे आणि स्वत:चे दोष शोधून काढले पाहिजेत. तुम्हाला स्वत:बद्दल खर प्रेम असेल तर ते दोष काढून टाका. अस केल्याने तुम्ही पूर्णपणे उन्नत होऊशकाल. एकदा हे दोष काढून टाकले की तुम्हीच स्वत:ला आनंदी, शांत व शक्तिशाली झाल्याचे पाहून चकित व्हाल. तुमच्या शक्तीच्या प्रभावाच्या आड येणाऱ्या साऱ्या आडथळ्यांना काहीही किंमत मोजून दुर करण फार जरुरीच आहे. आपण आपल्या उध्दाराकडे लक्ष देत नाही म्हणून या गोष्टी आपल्या उन्नतीच्या आड येतात; आता पुनरुत्थान झाल्यामुळे आपण परमेश्वराच्या साम्राज्यात आलो आहोत, पण तिथे बसण्याआधी आपण स्वच्छ झाले पाहिजे. प्रथम तुम्ही स्वत:ला कमी लेखणं बंद करा आणि चुकीच्या मार्गाने न जाण्याविषयी स्वत:ला बजवा; नाही तर तुम्हाला शांतता कशी मिळणार? हे फार अवघड आहे. शांती मिळवणं मुळीच अवघड नाही पण त्यासाठी ध्यान करण आवश्यक आहे आणि सगळ काम हृदयापासून करा, मग काही आवघड नाही. सहजयोगामध्ये पुष्कळ लोक अशा स्तरावर आलेले मला दिसतात व त्यांचे प्रेम शक्तिशाली झाल्याच दिसते. आज मी अशाच एका माणसाचा उल्लेख करणार आहे. हा माणूस -आई-बद्दल अगदी एकनिष्ठ आहे. आम्ही स्टेशनपासून विमानतळाकडे जात होतो. आम्ही हॉलंडला जाणार होतो आणि एका सहजयोग्याने आम्हाला सांगितले की विमान ११ वाजता निघणार आहे. त्याप्रमाणे आम्ही तयार होतो. पण नंतर तो म्हणाला की विमान लवकर निघणर आहे आणि आम्हाला शक्यतो लवकर तिथे पोचले पाहिजे. हे कसे जमणार ? आम्हाला पोचायला १५ मि. उशीर झाला. म्हणून तेथील ऑस्ट्रियन एअर होस्टेसला खूप राग आला कारण ते विमान प्रथम ऑस्ट्रियाला जाणार होते. ती आमच्यावर ओरडायला लागली आणि म्हणाली – तुम्ही असेच आहात, कारण तिथे जादूटोणा करणारे खूप लोक आहेत. जिथे जिथे ही तंत्रिक मंडळी जातात तिथून लक्ष्मी दूर निघून जाते. तीच गोष्ट दारूबद्दल. काही काळ ठीक आहे पण नंतर दारुपासून लक्ष्मी दूर जाते. बंगालमध्ये तांत्रिक खूप आहेत याचे कारण मला अस दिसते की बंगालमधले लोक साधेभोळे व भावनाप्रधान आहेत व कुणीही येऊन सांगायला लागले की ते परमेश्वराचे दूत आहेत की त्यांचा लगेच विश्वास बसतो. काही विचार वगैरे न करताच हरे-राम म्हणणार्या लोकांनी बंगालमधूनच प्रचाराला सुरुवात केली. वेड लागल्यासारखे रस्त्या-रस्त्यातून त्यांच्याबरोबर यायला लागले, हरे राम हरे राम सुरु. काय फायदा मिळाला? गरिबी आणखीनच वाढली. बंगालमध्ये नवीन काही म्हणायला कुणीही सुरवात केली की लोक लागले त्याच्यामागे. त्यांच्याकडे तऱ्हेतऱ्हेची कर्मकांडे व व्रते असतात आणि अशा कर्मकांडामध्ये आपण हरवून जातो. पूर्णपणे स्वत:ला विसरतो. खरंतर या कर्मकांडामागचे रहस्य. अर्थ आपण शोधून काढला पाहिजे. सहजयोगामध्ये कसलेही कर्मकांड नाही, कशावरही टीका नाही, कुठल्या धर्मावरही टीका नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वबुधुत्वाची भावना प्रस्थापित होते आणि ती हृदयापासून सरू होते. ज्या दिवशी विश्वबंधुत्वाची भावना प्रस्थापित होते आणि ती हृदयापासून सुरु होते. ज्या दिवशी विस्रह्बंधुत्वाच्या भावनेची जाणीव होईल त्यावेळेस आपण तांत्रिक लोकांच्या जाळ्यातून मुक्त होऊ एक सहजयोगी तांत्रिक लोकांना घालवून द्यायला पुरेसा असतो. एवढी त्याची शक्ती असते. तुमचे आता पुनरुत्थान झाल आहे व तुम्ही स्वच्छ, सुंदर झाला आहांत आणि तुमच्यामधील शक्तीचा आता आविष्कार होत आहे. सहजयोग्यांनी स्वतःची स्वच्छता करू न शुद्ध झाले पाहिजे. त्याऐवजी ते भक्तीमध्ये आणि भावनोत्कटतेमध्ये दंग होतात हे चांगले असले तरी स्व मध्ये रममाण होणे फार चांगले. तुमच्या शक्ती वृध्दीगत करा. ज्या दिवशी तुमच्यातील शक्ती प्रभावशाली होतील त्यावेळेस हे तांत्रिक लोक बाडबिस्तरा घेऊन पसार होतील. म्हणून आजच्या या पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्ही शपथ घ्यायला हवी. तुम्ही स्वत:च परिवर्तन घडवून उच्च स्तरावर येण्याचा आणि एक प्रगल्भ सहजयोगी बनायचा प्रयत्न कराल आणि त्यासाठी आपण ध्यान करण जरुरीचे आहे. तीन तीन तास ध्यान करत बसायचे. अस नव्हे तर दहा मिनिटे बसा पण हृदयापासून ध्यान करा. ध्यानामध्ये हृदय पूर्णपणे ओतणे फार आवश्यक आहे. बंगालमधले लोक मोठ्या अंत:करणाचे आहेत व प्रेमळ आहेत पण तुम्ही -पात्र -आहात का? तुम्ही सहजयोगी असाल तर प्रथम स्वत:वर प्रेम करायला शिका मग तुम्हालाच समजेल की हेच दुसर्या लोकांकडे ही पसरत आहे. तुम्हाला राग येईल, तुम्हाला इच्छा, वासना वाढतील, तुमच्या सवयी असतील, तरीही तुम्ही या सर्वापासून जेव्हा स्वत:ला स्वच्छ कराल तरच तुमच पुनरुत्थान झाले अस म्हणता येईल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वातले हे सारे दोष जाऊन तुम्ही स्वच्छ व्हाल तेव्हा इथे कोणताही तांत्रिक शिल्लक राहणार नाही. कुणीही तांत्रिक इथे राह शकणार नाही! दुसरे म्हणजे तुमच्यात संगीताचे चांगले कलाकार आहेत, तेव्हा अशा पुरुष व महिला कलाकारांनी एकत्रितपणे बस किंवा ट्रक भाड्याने घेऊन खेडेगावात जावे आणि तिथे माताजींच्या भजनांचा कार्यक्रम होणार आहे असे जाहीर करावे. अशा तऱ्हेने तुम्ही तिथे एकत्र जाऊन गाणी- भजने म्हणा, थोड-फार बोला आणि माझ्या कॅसेटस लावा. उत्तर प्रदेश, बिहार ,हरियाणा इ. उत्तर भागात पुष्कळ जण उन्नत झाले आहेत आणि त्यामुळे

तुम्हाला वेळेची किंमत नाही. हे सारे. ऐकून तो माणूस फार शरमिंदा झाला कारण त्यानेच आम्हाला विमानाची वेळ सांगितली होती. आम्ही सर्व जण विमानात जाऊन बसलो. हा माणूस फारच भावनाप्रधान झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तो जर्मन होता आणि मागच्या सीटवर बसला होता. इतर सहजयोग्यांने त्याला रडणे थांबवण्यास सांगितले. मी फक्त त्याच्याकडे पाहिले आणि काही हरकत नाही, काळजी करु नकोस अस त्याला सांगितल. त्याचवेळी आम्हाला सांगण्यात आल की काही बिघाड झाल्यामुळे विमान निघणार नाही पण मी त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि क्षणभरात आकाशात सगळीकडे काळेकुट्ट ढग जमा झाले, साऱ्या सहजयोग्यांना आश्चर्य वाटल की एकाएकी हे ढग कुठून आले त्याच्या प्रेमाची शक्ती पहा. आम्हाला उतरुन पुन्हा विनामतळावर जायला सांगण्यात आले, कारण विमान निघणार नव्हते आम्ही विमानतळावर पोचताच जोराचा पाऊस पडायला लागला. दुसरव्कुठलही विमान निघणार नव्हते पण आमचं विमान पाच वाजता निघेल अस आम्हाला सांगण्यात आले. मग तो माणूस त्या एअर होस्टेसकडे गेला आणि म्हणाला आता तुमच्यामुळे आम्हाला उशीर होत आहे. तरी आम्ही पण तुमच्यासारखे तुमच्यावर ओरडायचे का? ती मॅनेजरकडे गेली आणी घडलेला सर्व प्रकार त्याला सागितला. आता त्या लोकांना वाटल की आम्ही कोणी विशेष शक्तिशाली लोक आहोत. नंतर आकाशांत एकही ढग शिल्लक नव्हता.मग त्यांनी आम्हाला बाहेर जायला आणि परत आमच्या सोयीने आत यायला परवानगी दिली. आमची सर्व काही व्यवस्था केली. आम्ही जेव्हा दुसऱ्या विमानकडे जायला निघालो तेव्हा एक महिला, जी आधीपासूनच हे सारे पहात होती, माझ्याजवळ आली आणि तिच्या हाताच दुखण बरे करायला विनंती करू लागली.मी तिला हाताने फक्त स्पर्श केला आणि तिने हात वर उचलून तो दुखायचा बंद झाला अस सांगितले. विमानतळावरचा मुख्य अधिकारी आमच्याकडे आला आणि आपल्या पाठीच्या दुखण्याबद्दल सांगू लागला आणि ते दुखणं बरे करण्याची त्याने विनंती केली. मी त्याला उशीर होत असल्याबद्दल सांगितले तरी तो म्हणाला की मी तुमच्यापुढे चालतो, तुम्ही पाठीमागून माझ्या पाठीवर तुमचा हात ठेवा. अशा तऱ्हेने आम्ही विमानापर्यत चालत गेलो. मग त्याने मागे वळून त्याच दुखण बर झाल्याचे सांगितले. आमच्या जवळ ही शक्ती आहे हे या लोकांना कसे समजले बघा. या माणसाचे प्रेम कस आहे ते बघा आणि त्या प्रेमामध्ये किती शक्ती आहे हे पहा ! तुमच तुमच्यावर प्रेम असेल तर तुम्ही स्व:तला सुधारल पाहिजे. तुम्ही स्वत:साठीही थोडा वेळ काढा.बंगालमध्ये सहजयोगी लोक कार्य करत आहेत. पण बंगालमधील परिस्थिती तेव्हाच सुधारेल जेव्हा सहजयोगी लोक खेड्यापाड्यात जाऊन कार्य करतील. तुम्हा सर्वाच पुनरुत्थान झाल आहे, म्हणून आज तुम्हाला माझ सांगण आहे की कलकत्त्यात बसून राह नका तर खेड्यात जा आणि काम करा. ही जी अनमोल देणगी तुम्हाला मिळाली आहे तिची वाढ इतरांना वाटल्यावरच पसरणार आहे आणि त्याचा साऱ्या बंगालला फायदा होणार आहे. आज पूजेला इतके सारे लोक आल्याचे पाहून फार आनंद झाला. पण मी आशा करते की मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा खेड्यातील जनता पण इथे आलेली असेल. तुमची उच्च संस्कृती आणि संगीत कला याचा उपयोग करा आणि साच्या बंगालमध्ये सहजयोगाचा प्रसार करा. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद.