After Concert Talk (India)

आज सर्व गोष्टींना उशीर झाला .कारण आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे पण सहजयोगात आपण घड्याळ बघत नाही आणि हा हि विचार ठेवत नाही कि काही गोष्टी टाईमशीर होतात .जे सहज घडून येईल तेच अत्यानंद देईल .आता जी गाणी झाली सुरवातीला ती इंग्लिश मध्ये किंवा  आपण असं म्हणू कि पाश्चिमात्य पद्धतीची झाली .आणि तुम्हा सर्वाना एव्हडी आवडली हे एक मोठं मला समाधान वाटलं .नाहीतर इथे सर्व संगीत तज्ञ बसलेले आहेत .आणि ते म्हणतील माताजी तुम्ही हे काय सुरु केलं .पण आपण सर्व प्रकारचे संगीत समजून घेतलं पाहिजे . अर्थात जे नुसतं काहीतरी आज काल  निघालेलं तेच म्हणत नाही मी पण सर्व तह्रेच ,मला  तर वेस्टर्न क्लासिकल संगीताचा फार नाद आहे .तसा साऊथ इंडियन संगीताचा पण म्लाफर नाद आहे .आणि आपला तर आहेच .तेव्हा आपली द्रीष्टी व्यापक करायला पाहिजे .आणि ते बघून मला फार आनंद वाटला कि तुम्ही सर्वानी जे फ्रेंच लोकांनी तुमच्या समोर प्रस्तुत केलं ती गाणी ,त्यातला जो पुरुष होता आफ्रिकेचा तो एक प्रसिद्ध गायक आहे .फार प्रसिद्ध आहे फ्रांस मध्ये .पण आता सहजयोगात आला आणि आता लहान मुलांना सुद्धा शिकवतो आणि आपल्या गाण्या मध्ये सगळे मंत्र म्हणतो .तेव्हा एक मोठी क्रांती झालेली आहे जगा मध्ये .गणपतीला सुद्धा ते मानतात आणि गणपतीची केव्हडी स्तुती करत होते .हि केव्हडी मोठी क्रांती आहे .कि ह्या लोकांना आपल्या देव देवतां न बद्दल इतकं वाटत ,इतकी त्यांची माहिती आहे .तस त्यानी नाटक केलं .हे म्हणजे काय उगीचच त्यांच्यावर मी लादलेलं नाही .मी त्याना कधीही सांगितलं नाही कि असे नाटक करा म्हणून .आधीच नाही मी त्यांच्या जवळ कधीच अशी जबरदस्ती केली नाही कि तुम्ही असल्या तऱ्हेची नाटक करा .पण Read More …