After Concert Talk

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

आज सर्व गोष्टींना उशीर झाला .कारण आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे पण सहजयोगात आपण घड्याळ बघत नाही आणि हा हि विचार ठेवत नाही कि काही गोष्टी टाईमशीर होतात .जे सहज घडून येईल तेच अत्यानंद देईल .आता जी गाणी झाली सुरवातीला ती इंग्लिश मध्ये किंवा  आपण असं म्हणू कि पाश्चिमात्य पद्धतीची झाली .आणि तुम्हा सर्वाना एव्हडी आवडली हे एक मोठं मला समाधान वाटलं .नाहीतर इथे सर्व संगीत तज्ञ बसलेले आहेत .आणि ते म्हणतील माताजी तुम्ही हे काय सुरु केलं .पण आपण सर्व प्रकारचे संगीत समजून घेतलं पाहिजे . अर्थात जे नुसतं काहीतरी आज काल  निघालेलं तेच म्हणत नाही मी पण सर्व तह्रेच ,मला  तर वेस्टर्न क्लासिकल संगीताचा फार नाद आहे .तसा साऊथ इंडियन संगीताचा पण म्लाफर नाद आहे .आणि आपला तर आहेच .तेव्हा आपली द्रीष्टी व्यापक करायला पाहिजे .आणि ते बघून मला फार आनंद वाटला कि तुम्ही सर्वानी जे फ्रेंच लोकांनी तुमच्या समोर प्रस्तुत केलं ती गाणी ,त्यातला जो पुरुष होता आफ्रिकेचा तो एक प्रसिद्ध गायक आहे .फार प्रसिद्ध आहे फ्रांस मध्ये .पण आता सहजयोगात आला आणि आता लहान मुलांना सुद्धा शिकवतो आणि आपल्या गाण्या मध्ये सगळे मंत्र म्हणतो .तेव्हा एक मोठी क्रांती झालेली आहे जगा मध्ये .गणपतीला सुद्धा ते मानतात आणि गणपतीची केव्हडी स्तुती करत होते .हि केव्हडी मोठी क्रांती आहे .कि ह्या लोकांना आपल्या देव देवतां न बद्दल इतकं वाटत ,इतकी त्यांची माहिती आहे .तस त्यानी नाटक केलं .हे म्हणजे काय उगीचच त्यांच्यावर मी लादलेलं नाही .मी त्याना कधीही सांगितलं नाही कि असे नाटक करा म्हणून .आधीच नाही मी त्यांच्या जवळ कधीच अशी जबरदस्ती केली नाही कि तुम्ही असल्या तऱ्हेची नाटक करा .पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव त्याचा अनुभव आहे आणि त्या प्रमाणे त्यांनी सर्व धर्माच्या जेव्हडे काही मोठमोठाले अवतरण झाले त्यांना धरून हे नाटक स्वतःच बसवलं .मलाच आश्चर्य वाटलं .कि किती बारीक त्यांनी त्याची मांडणी केली .म्हणजे कामालाच आहे .तेव्हा सहजयोग त्यांच्या रोजच्या विचारात वागण्यात आलेला आहे .ते लोक त्या दृष्टीने विचार करतात .कि सर्व धर्माना एक तऱ्हेने कस दाखवायचं .तेव्हा त्यांचं नाटक सुद्धा फार सुंदर झालं 

महाराष्ट्रीयन लोकांचं एक वैशीष्ट आहे कि एकदा जरका क्लासिकल संगीत सुरु झालं ,कुठेही मग ते खेडेगावात तुम्ही असला नाहीतर कुठंही असला झालं मग त्याच्या नंतर काही बोलायलाच नको .सगळे विरघळले .त्यांच्या बद्दल काही सांगण्या सारखं नाही .कारण एकदम संपलंच ते .तर अजित कडकडे साहेबांनी अनेकदा येऊन इतकं आमचं मनोरंजन केलेलं आहे .कि मी त्यांची ऋणी आहे .आणि सर्व सहजयोगी त्याचे ऋणी आहेत .ते कबेल्याला सुद्धा आले होते .त्यावेळी आम्ही गडबडीत सापडलो त्यामुळे काही त्यानं बोलावणं झालं नाही .पण प्रत्येक वर्षी त्यांना बोलावलंच पाहिजे असा प्रत्येकाचा अट्टाहास आहे .आता इतकी सुंदर त्यांची गाण्याची पद्धत आहे .ते गातात  क्लासिकलच ,क्लासिकलच गायला पाहिजे .पण त्याच्यामध्ये  ते जे रिदमिक पॅटर्न्स बनवतात मधे  मधे आणि कधी फास्ट कधी स्लो त्याने ज्याला समजत नसेल तो सुद्धा खिळून जाईल .त्याला असं वाटेल कि हे काहीतरी अभिनव आहे .पण आता तुम्ही जर अगदी सारखं कृष्णराव पंडित सारखं  गाणं सुरु केलं तर झालं पंधरा मिनिटात सगळे उठून जातील .तर या आज काल च्या धका धकी च्या जीवनात अशा  रीतीने जे आपण आलटून पालटून गायलं आहे ते फारच सगळ्यांनाच  मग ते कुठल्याही देशातले असेनात का फारच आवडलेलं आहे .सगळे अगदी स्तब्द बसले .सगळ्यांनी फार त्याचा आनंद घेतला .त्या बद्दल मी खरोखर आपली ऋणी आहे .कारण आम्ही इथे जंगलात येऊन बसलो आहोत .आणि जंगलातही अजित कडकडेंचं गाणं ऐकायचं म्हणजे ईटीज टू मच .मी म्हंटल सुद्धा त्यांना कि तुम्ही कशाला त्यांना त्रास दिलाय इथं आणायचा  मध्ये रस्त्यामध्ये सगळे  या वेळी आदळत आपटत आलो त्याच्या वरून मला कळलं आपण आलात म्हणजे झालं ,याना कशाला त्रास दिला  पण आपण ज्या आस्थेने आणि ज्या प्रेमाने गाणी सिलेक्ट केली आणि इतकी सुंदर म्हंटली ,सगळे मला सांगतात कि आम्ही अजित कडकडेंना माताजी तुमच्या समोर ऐकतो तर त्यानं च वेगळच रूप दिसत .आणि मग तस ऐकलं तर एव्हडं नाही वाटत .म्हंटल असं का .तर हे सांगायचं  म्हणजे असं कि  आपणही   एक फार धार्मिक व्यक्ती आहात .इतकच नव्हे कि आपलं पण रिअलायझेशन झालं आहे .आणि भक्तीचा पण खूप संचार आहे तुमच्यात .तेव्हा त्या समन्वया मुळे जी एक उत्कृष्ट कलासिद्धि आपल्याला साधलेली आहे ,त्याच्यामुळे हे आमचे सगळे सहजयोगी मग ते परदेशातले असो किंवा भारतातले असो नेहमी म्हणतात कि कमीतकमी एकतरी प्रोग्रँम त्यांचा तुम्ही फॉरेनला ठेवा .हि अगदी आग्रहाची विनंती असते .पण मागच्या वेळेला आम्ही जरा गडबडीत सापडलो त्यामुळे ते झालं नाही .प्रत्येक वेळेला आपण जी वेळ आपल्याला साध्य होईल म्हणजे जी पूजा आपल्याला साध्य होईल ती जर आपण कळवलं तर आम्हाला बर पडेल .म्हणजे आम्ही तयारीत राहू .पण आपण हि फार बिझी असता .तर आज सर्वांच्या तर्फे मी आपल अभिनंदन करते .मला तर फारच गाण्याचं आहे .म्हणजे मी कधी झोपतच नाही ,कधीही गाणं असलं कि मला झोप येतच नाही .मला समजत नाही लोक कसे झोपतात पण असं नाही कि मी गाण्या मध्ये काही ट्रेनिंग घेतलेलं नाही .काही नाही पण आमच्या घरात सगळे गाणारे आहेत .पण मी नुसतं ऐकून ऐकून .पण गाण सुरु झालं कि मला झोप येत नाही .आणि आपलं गाण असेल तर मुळीच झोप येत नाही .त्यामुळे मी इकडे तिकडे बघत होते तर सगळे तशेच अगदी तटस्त बसलेले .म्हणतात ना अगदी चित्रवत असे .तेव्हा इतकं मनोरंजन झालं आहे ,आजची दिवाळी म्हणजे तुम्ही साजरी केलेली आहे .आणि आम्हाला सगळ्यांना इतका आनंद दिला आहे .आता मी गाण्या  बद्दल काही म्हंटल का ,सगळे अगदी दुःखी होऊन बसले आहेत .तस दुःखाचं काही कारण नाही .कारण काही म्हंटल तरी मी त्र्याहत्तर वर्षाची आहे आणि तुम्ही सगळे किती लहान आहात .तेव्हा हा प्रश्नच उभा रहात नाही .  

तेव्हा आता दुसरी गोष्ट अशी आहे कि आता बरीच रात्र झाली आहे .पण ऊद्याला  हि मंडळी नागपूरहून आलेली आहेत .आणि यांचा प्रोग्रॅम आपण करणार आहोत .एक सांगायचं म्हणजे रुमानियाचे जे गाणारे आहेत ते काहीतरी पूर्व जन्मातले संगीत तज्ञ असले पाहिजेत .कारण कोणत्याही गुरुकडे न जाता  ,मला माहित आहे गुरु कडे किती मेहनत करावी लागते ते आणि गुरूंचा राग सगळा  उचलावा  लागतो ते .मी खूप पाहिलेलं आहे पण यांनी कधी कुठले गुरु पहिले नाहीत ,कुठल्या गुरुचे चरण धरले नाहीत .हे कुठून  आल मला समजत नाही .आणि एक दिवस सहजच म्हणे आम्ही स्टेज वरून गायचं का माताजी म्हंटल गा ,काय गाणार .मला वाटलं काहीतरी रुमानिय न गाण गातील .आणि त्यांनी सुरु केलं कव्वाली तर तऱ्हेच्या आणि  त्यात  तराणा .आपण आज जो ऐकला .आणि कुणाला वाटणारच नाही कि हे लोक रुमानियाचे आहेत .त्या दिवशी तर सगळे त्यांचेच कपडे घालून होते .मला अगदी असं वाटायलागलं कि हे  कोणीतरी पूर्व जन्मीचे  मोठे संगीत तज्ञ असतील .यांचा जन्म तिकडे  रुमानियाला झाला .तसे आपण बघताच कि पुष्कळशी लहान लहान मूल दहा दहा वर्षाची सुद्धा इतकं सुंदर गाण म्हणतात .तेव्हा हे सुद्धा कोणीतरी पूर्व जन्माचे असले पाहिजेत .गाणंच नाही वाजवतात सुद्धा हे ते त्यामुळे हे जे लोक आहेत त्यांचं मला समजतच नाही कि कस यांनी हे सगळं धरल आणि कस तालात स्वरात इतकाच नव्हे पण फार मनोरंजक आहे .आता दुसऱ्यांनी जी कविता केली होती ती स्वतः केली होती .उर्दू काही येत नाही त्यांना पारसी काही येत नाही .कविता कशी केली माहित नाही .तस हिंदी मधे स्विसझर्लंड च्या लोकांनी कविता केली .तर हे काही तरी उस्फुर्त आहे .आमच्या कडे अशी पद्धत आहे ना .काय माहीतच आहे कि प्रत्येक देशाला एक कुणीतरी सांभाळायचं .तर रुमानियाचे इनचार्ज हे फ्रेंच लोक .कसे झाले माहित नाही आणि या रूमानिया देशा मध्ये इतकी जागृती आहे कि पाच हजार सहजयोगी आहेत .अगदी व्यवस्तीत .आणि मला तिथे मी गेले तर तिथल्या युनिव्हर्सिटीने मला तिथे फार मोठी युनिव्हर्सिटी आहे त्या मध्ये मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे सगळं आहे .त्यानी आपलं नाव बदलून घेतलं आता ,तिथले चान्सलर साहेब आले मला ते रिसिव्ह करून आत मध्ये घेऊन गेले .सगळ्यांशी ओळख करून दिली .मला समजेना एव्हडं माझं महात्म्य कस करता आहेत रुमानियाचे लोक .मग म्हणे कि माताजी तुम्ही आम्हाला एक लेक्चर द्या .ऑन मेडिकल सायन्स .म्हंटल बर .मेटा सायन्स .तर मी एक स्वादिष्टन चक्रा वरती लेक्चर दिल .आता तुम्ही ते ऐकलंय .तर ते अगदी डोळे निघाले त्यांचे .सगळे डॉकटर्स बसले होते .बघाय लागले माझ्या कडे .त्याच्या नंतर बघितलं तर ते व्हाईस चान्सलर साहेब आहेत चान्सलर नाहीत म्हंटल गेले कुठे हे .रागावले कि काय .कारण म्हणजे थोडस मेडिकल ला चॅलेंन्ज च होत .तर थोड्या वेळाने एक कागद घेऊन आले .म्हंटल कसलं ऍवार्ड   नवीन कोणी देतात ,कुठे तरी  आता अमेरिकेला कुठेही आता ऍवार्ड देत असतात .आता रशियाला आम्हाला ऍवार्ड दिला आइन्स्टीन च्या बरोबर .म्हणजे कमालच आहे .पण ह्यांनी जो एक ऍवार्ड आणला त्याच्या मध्ये मला डॉक्टरेट दिली .व्यवस्तीत ,म्हणजे रिअल जशी काय युनिव्हर्सिटी तुन मिळते अगदी तशी डॉक्टरेट .आणि त्याचा सब्जेक्ट काय तर कॉग्निटिव्ह सायन्स .म्हणजे इसेन्स ऑफ ऑल द सायन्स .आणि अशा रीतीने त्यांनी माझा गौरव केल्या बरोबर मी आश्चर्य चकित झाले .यांना कशी अशी ओळख पटली .रूमानिया मध्ये काहीतरी अशी विशेषता  आहे .आपल्या रमण पासून शब्द असेल हा .रमण करणे म्हणजे ध्याना मध्ये आपण रमण करतो म्हणजे आनंदाच्या सागरात पोहत राहणे म्हणजे रमण करणे .तर यांचं काहीतरी दिसत असं मला .कारण यांनी इतक्या हेनी माझा मान केला .मला फार आश्यर्य वाटलं .दुसरी एक आणखीन गोष्ट सांगायची म्हणजे कारण आता आपला कशीतरी वार्षिक  च  म्हणा किंवा पंचवीस वर्षा नंतरची सेंटनरी आहे  .           कि यांनी फार माझा मान  केला .आणि इतका गौरव त्यांनी दिला मला .फार मला आश्यर्य वाटलं पण याला कारण एक गोष्ट मला कळली हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि रशिया आणि युक्रेन मध्ये ख्रिस्ताच्या तीन हजार वर्षा पूर्वी आदिशक्तीला पूजत होते .तिला अदिती म्हणत असत .आणि त्यांनी सगळी चक्र पेंट केली होती .विशेष करून मूलाधार चक्र त्यांनी चार पेटलं सकट पेंट केलं होत .ते कुंडलिनी शक्तीत विश्वास करत होते .मला आश्चर्य वाटलं .आणि त्यांनी मला दाखवली आदिशक्ती ,आदिती च्या पोटातील कुंडलिनी .