Diwali Puja, Sahajyog ke Suruvat (India)

Diwali Puja – Sahajayog Ki Shuruvat Date 29th October 1995 : Place Nargol Puja Type Speech [Marathi translation from Hindi] पंचवीस वर्षापूर्वी मी जेव्हा नारगोलला आले त्यावेळी सहस्त्रार उघडण्याचे माझ्या मनात नव्हते. माझा विचार होता, की अजून थोडे थांबावे आणि मानवाची स्थिती कशी आहे ते पहावे. त्यावेळेस आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे समजण्याइतकी त्याची स्थिती नव्हती. जरी पुष्कळ साधुसंतांनी आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितले होते तरीही; महाराष्ट्रात तर हे ज्ञान खूपच पसरले होते. कारण मध्यमार्ग सांगणान्या नाथपंथीयांनी स्वतःच्या उद्धाराचा एक मार्ग सांगितला तो म्हणजे स्वत:ला जाणणे. स्वत:ला ओळखल्याशिवाय तुम्ही काहीही मिळवू शकत नाही हे मला माहीत होते पण त्यावेळी माणसाची स्थिती फार विचित्र असलेली माझ्या पाहण्यात आले होते; खोटया लोकांच्या ते मागे लागले होते. त्या लोकांना नुसते पैसे मिळवायचे होते. सत्य ओळखण्याइतकी मानवाची स्तिती नसते तेव्हा त्याच्याशी सत्याबद्दल बोलणे अवघड होते. लोक माझं का ऐकणार? मला पुन्हा पुन्हा वाटायचे, की माणूस अजून वरच्या स्थितीला यायला हवा. पण मला हे ही दिसत होते, की या कलियुगात माणूस अगदी बेजार झाला आहे. गतजन्मीच्या पापकर्मांमुळे अडचणीत आलेले खूप लोक होते. काही लोक मागल्या जन्मात केलेल्या कर्मांमुळे राक्षस होऊन जन्माला आले आणि ते इतरांना त्रास देण्यांत, उपद्रव देण्यात मग्न होते. याचं त्यांना काही चुकतोयं असंही वाटत नव्हते. मी दोन प्रकारचे लोक पाहिले. एक दसऱ्यांना त्रास देणारे आणि दूसरे असमाधानी व त्रास भोगणारे. यापैकी कोणाकडे लक्ष द्यायचे याचा मी विचार करत होते. जे दूसर्यांना त्रास देत होते त्यांना आपण कोणी विशेष किंवा परिपूर्ण आहोत असे वाटत होते. आपल्याकडून दुसर्यांना त्रास होत आहे एवढेही त्यांना समजत नव्हते. ज्यांना त्रास होत होता ते असहाय असल्यासारखे तो सहन करीत होते. आपल्याला अधिकार Read More …