Diwali Puja, Sahajyog ke Suruvat

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Diwali Puja – Sahajayog Ki Shuruvat Date 29th October 1995 : Place Nargol Puja Type Speech

[Marathi translation from Hindi]

पंचवीस वर्षापूर्वी मी जेव्हा नारगोलला आले त्यावेळी सहस्त्रार उघडण्याचे माझ्या मनात नव्हते. माझा विचार होता, की अजून थोडे थांबावे आणि मानवाची स्थिती कशी आहे ते पहावे. त्यावेळेस आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे समजण्याइतकी त्याची स्थिती नव्हती. जरी पुष्कळ साधुसंतांनी आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितले होते तरीही; महाराष्ट्रात तर हे ज्ञान खूपच पसरले होते. कारण मध्यमार्ग सांगणान्या नाथपंथीयांनी स्वतःच्या उद्धाराचा एक मार्ग सांगितला तो म्हणजे स्वत:ला जाणणे. स्वत:ला ओळखल्याशिवाय तुम्ही काहीही मिळवू शकत नाही हे मला माहीत होते पण त्यावेळी माणसाची स्थिती फार विचित्र असलेली माझ्या पाहण्यात आले होते; खोटया लोकांच्या ते मागे लागले होते. त्या लोकांना नुसते पैसे मिळवायचे होते. सत्य ओळखण्याइतकी मानवाची स्तिती नसते तेव्हा त्याच्याशी सत्याबद्दल बोलणे अवघड होते. लोक माझं का ऐकणार? मला पुन्हा पुन्हा वाटायचे, की माणूस अजून वरच्या स्थितीला यायला हवा. पण मला हे ही दिसत होते, की या कलियुगात माणूस अगदी बेजार झाला आहे. गतजन्मीच्या पापकर्मांमुळे अडचणीत आलेले खूप लोक होते. काही लोक मागल्या जन्मात केलेल्या कर्मांमुळे राक्षस होऊन जन्माला आले आणि ते इतरांना त्रास देण्यांत, उपद्रव देण्यात मग्न होते. याचं त्यांना काही चुकतोयं असंही वाटत नव्हते. मी दोन प्रकारचे लोक पाहिले. एक दसऱ्यांना त्रास देणारे आणि दूसरे असमाधानी व त्रास भोगणारे. यापैकी कोणाकडे लक्ष द्यायचे याचा मी विचार करत होते. जे दूसर्यांना त्रास देत होते त्यांना आपण कोणी विशेष किंवा परिपूर्ण आहोत असे वाटत होते. आपल्याकडून दुसर्यांना त्रास होत आहे एवढेही त्यांना समजत नव्हते. ज्यांना त्रास होत होता ते असहाय असल्यासारखे तो सहन करीत होते. आपल्याला अधिकार गाजवून त्रास देणाऱ्या लोकांना विरोध करण्याचेही त्यांच्या मनात येत होते. मग मला वाटायचं, की आपण बदलले पाहिजे हे माणसाला कधी उमजणार? हा बदल आपल्याला घडवून आणलाच पाहिजे. काही लोक जास्त त्रास देतील, कमी देतील, काही जास्त सोसतील, काही कमी. त्यावेळी समाजाची ही तऱ्हा होती. मग ते सर्व देवाच्या नावाखाली, देशाच्या, सरकारच्या, आर्थिक सुधारणांच्या किंवा काटकसरीच्या इ.नांवाखाली. कोणी अगदी गरीब तर दूसरे अति-श्रीमंत अशा तऱ्हेने या देशात एक प्रकारची फसवणूक चालली होती. मला वाटायचे, की जोपर्यंत माणसामधे परिवर्तन होत नाही, तो स्वत:ला ओळखत नाही, त्याची खरी महानता व तेजस्विता त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो असाच वागणार. हे लहानपणापासून माझ्या मनांत होते आणि मला वाटले, की माणूस खऱ्या अर्थाने समजणे जरूरीचे आहे. प्रथम मी माणसांचा बराच अभ्यास केला. मी तटस्थ राहून साक्षीभावाने मानवी जन्म समजण्याचा प्रयत्न करीत असे; त्याचे प्रश्न काय आहेत, तो कुठे चुकतो, चुकीचे विचार का करतो इ . विचार केल्यावर मी अशा निर्णयाला आले, की हे सर्व माणसाचा अहंकार वा प्रति अहंकार (कंडिशनिंग) त्याला बाधतो. त्यामुळे तो संतुलनात असू शकत नाही. जोपर्यंत तो संतुलनात येत

नाही तोपर्यंत कुंडलिनी वर कधी येणार? हा सुद्धा एक कठीण प्रश्न आहे. मी नारगोलला आले, तेव्हा काही विशिष्ट योगामुळे इथे एका राक्षसाने मुक्काम ठोकला होता. त्याने मला पाठविण्याविषयी माझ्या पतीकडे विनंती केली. मला तो मुळीच आवडला नव्हता, पण फक्त पतीच्या आर्जवामुळे मी इथे आले आणि त्याच बंगल्यात राहिले. मी एका झाडाखाली बसून त्या राक्षसाचे खेळ व त्याचा कॅम्प पहात होते. मला आश्चर्य वाटले, की हा राक्षस प्रत्येकाला बोलवून संमोहित करीत होता. काही किंचाळत होते, काही कुत्र्यासारखे, काही सिंहासारखे ओरडत होते. मग माझ्या लक्षात आले, की तो सर्वांना पशू योनीमध्ये नेत होता. त्यांची सुप्त चेतना तो प्रभावित करीत होता. मला काळजी वाटू लागली. त्याआधी मी बरेच खोटे लोक पाहिले होते. मी इकडे-तिकडे फिरून ते लोक काय करतात ते पाहू लागले. त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असावी म्हणून, मी बघितले ते लोक खूप घाबरलेले होते. त्यांच्यात शस्त्रधारी सैनिक होते. ते जर ईश्वरी कार्य करीत होते तर या सर्वांची काय जरूर ? ते पैसा पण खूप खर्च करतात. लोकांना खोटेनाटे सांगून कोट्यावधी रूपये उधळतात. कलियुगाचे हेच महात्म्य आहे, की असे अनाचारी, दुष्ट लोक समृद्ध होतात. म्हणूनच या सर्वावर उपाय म्हणजे माणसाची जाणीव जागृत व प्रकाशित व्हायला हवी. त्याला सुज्ञता मिळावी म्हणजे काय चुकत आहे हे त्याला जाणीवपूर्वक समजेल. मी पाहिले, की माझ्या भोवतीच्या समाजामधे लोक मिनिटा-मिनिटाला दारू पिणे. पैशाच्या मागे लागणे अशा हानिकारक गोष्टींमध्ये गुंग आहेत. ते जेव्हा बोलतात ते नैसर्गिक नसायचे; जणूं नाटकांतल्यसारखे कृत्रिम वागायचे. माणसाला हे काय झाले आहे असे मला वाटायचे; तो असा गुलामासारखा का मख्ख झाला आहे. चुकीच्या गोष्टी का करीत आहे असं वाटायचे. पण हे मी कोणाला सांगणार? मी अगदी एकटी होते. त्यावेळी मी जेव्हा इथे आले तेव्हा याला काय करायचे हाच माझ्यापुढे मोठा प्रश्न होता . तिकडे तो राक्षस लोकांना संमोहित करत असल्याचे मी पहात होते. मग माझ्या लक्षात आले, की आता जर मी सहस्रार उघडले नाही तर देवाच्या शोधासाठी धडपडणारे प्रमाणिक साधक कुठे जाऊन पडतील ते तो परमेश्वरच जाणे. मग मी दुसऱ्या रात्री मी समुद्र किनाऱ्यावर रात्रभर बसून राहिले. मी एकटीच होते आणि प्रसन्न चित्त होते. ध्यानात गेले आणि स्वत:मधेच चित्त एकाग्र केले आणि मला वाटले की आता सहस्रार उघडावे. ज्या क्षणी ब्रह्मरंध्र उघडण्याची मला इच्छा झाली त्या क्षणींच स्वत:मधेच मला कुंडलिनी दिसली. एखाद्या दुर्बिणीसारखी खट् असा आवाज होऊन प्रत्येक चक्रातून ती वर येऊ लागली. तिचा रंग तऱ्हेतऱ्हेचा होता. जसं लोखंड भट्टीमध्ये तापवल्यानंतर त्याच्यामधून वेगवेगळ्या रंगाच्या ज्वाळा निघाल्यासारखे. मग कुंडलिनी वर आली आणि ब्रह्मरंध्राला छेद करून बाहेर आली. आता मला माझे कार्य सुरू करता येईल हे मला समजले. कारण आता सर्व प्रश्न संपले आणि काळजीपासून मी मुक्त झाले. आता काय होणार असं मला वाटले. कदाचित लोक विरोध करतील, हरकत घेतील किंवा माझ्याकडे हसतील? ह्याच्या पलीकडे फार तर मला ठार मारतील. तेव्हा पाहून आता त्याबद्दल काही काळजी करण्याचे कारण नव्हते. मला हे करायचेच आहे कारण त्याच कामासाठी मी पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतला आहे; मला सामूहिक चेतना जागृत करायची आहे. मला लक्षात आले होते, की जोपर्यंत लोकांना आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत ते स्वत:ला जाणणार नाहीत आणि त्याशिवाय हे कार्य

शक्य नाही. जगात त्यासाठी दूसरे काहीही करू शकलात तरी त्याचा उपयोग होणार नाही. मी जागृती दिली ती व्यक्ती एक म्हातारी महिला होती. तिचा माझ्यावर खूप विश्वास होता. मी तिला जागृती मिळावी म्हणून देवाचे आभार मानले. खरं तर या कलियुगामध्ये लोकांना जागृती देणे हे सोपे नाही. तिला जागृती मिळाल्यावर मला समजले, की दुसर्या पुष्कळ लोकांनाही असा साक्षात्कार मिळणे शक्य आहे. एखाद्याला व्हायब्रेशन्स देऊन जागृती देणे अगदी सोपे आहे. एखाद्याला आजारातून बरे करणे पण सोपे असते. एखाद्याला जर कसला त्रास असला, कसले दुखणे वा कसली बाधा असली तर त्या व्यक्तीला ठीक करण्यासाठी काय करायला हवे? एकाला एका प्रकारचा त्रास, दुसऱ्याला दुस्या प्रकारचा तर तिसर्याला आणखीन वेगळ्या प्रकारचा त्रास. जर आपल्याला सामूहिकतेमधे हे काम करायचे असेल तर एकाच वेळी सर्वांना हा साक्षात्काराचा अनुभव यायला पाहिजे. हे सामूहिक चेतनेचे आणि जागृतीचे कार्य अशा तऱ्हेने यशस्वी करण्यासाठी मला खूप ध्यान व चिंतन करावे लागले. माझी कुंडलिनी मला सगळीकडे वळवावी लागली. माझ्या कुंडलिनीची कृपा दुसर्यांवर केंद्रित करावी लागली आणि मी हे काय करीत आहे हे कोणालाच माहीत नव्हते. माझ्यापाशी काय काय शक्ती आहे, मी कोण आहे, हे कोणालाच, माझ्या कुटुंबातील पण कोणाला माहीत नव्हते. मी कोणाला ते सांगितले पण नाही कारण मानवी बुद्धीला त्याचे आकलन होणे अवघड होते. प्रत्येकजण स्वत:च्या अहंकारात अडकलेला होता. मग हे कोणाला सांगणार? कबीराने म्हटलेच आहे, ‘सर्व जग आंधळे असतांना त्यांना मी कसे सांगणार ?’ जग आंधळे नव्हे तर अज्ञानी आहे. मग हे सूक्ष्म ज्ञान मी लोकांना कसे देणार? पण त्या म्हाताऱ्या बाईची कुंडलिनी जागृत झाल्यावर तिच्यामधे एक सूक्ष्म शक्ती आल्याचे मला दिसले आणि त्या शक्तीद्वारे ती मला समजू लागली. त्याने तर आणखी बारा जणांना जागृती मिळाली. या साक्षात्कारानंतर त्यांचे डोळे चमकू लागले व ते सर्व काही पाहू लागले याचं मला आश्चर्य वाटले. त्यांच्यामध्ये असा एक अनुभव घटित झाला, की त्यातून ते समजू लागले. या पहिल्या बारा जणांच्या सर्व चक्रावर मी काम केले कारण हा पाया मजबूत बनायला हवा होता. मला हे करतांना खूप त्रास झाला कारण एकदा कुंडलिनीचे जागरण झाल्यावर ती योग्य तऱ्हेने वर येण्यासाठी ध्यान आणि चिंतन करणे जरूरीचे आहे. त्याशिवाय ती कार्यान्वित होत नाही. हे बारा लोक वेगवेगळ्या प्रवृत्तीचे होते आणि त्यांना एकत्र बसून आत्मप्रकाशात आणणे हे काम सुई-दोरा घेऊन त्यात एक-एक फूल घालून हार बनवण्यासारखे आहे. त्यांना सामूहिकपणे एकत्र कसे आणशयचे. या बारा जणांच्या भिन्न प्रकृती धर्मांना एका दोन्यामध्ये कसे एकत्र करायचे ? पण त्यांना साक्षात्कार मिळाल्यावर हा एकजिनसीपणा त्यांच्यात हळू-हळू निर्माण झाल्याचे मला दिसले. पण सामान्य माणसांच्या समूहाला हे सांगणे सोपे नव्हते. मग त्यांनी कोवासजी जहांगीर हॉलमध्ये एक कार्यक्रम जमवून आणला. त्यावेळी मी प्रत्येकाला या पृथ्वीवर राक्षस कसे जन्माला आले आहेत व ते काय करणार आहेत हे सांगितले. मग सर्वजण घाबरून गेले. ते म्हणू लागले, ‘माताजी, जर असे म्हणू लागल्या तर कोणीतरी त्यांना ठार मारेल.’ प्रत्येकजण म्हणाला, ‘हे सगळे उघडपणे सांगू नका, उगीच नको ते प्रश्न येतील.’ मी म्हणाले, ‘अजापर्यंत मला मारून टाकणारा कोणी जन्माला आला नाही, उगीच काळजी करू नका. मी त्यांना माझ्या कुंडलिनीवर ध्यान करा म्हणजे ताबडतोब निर्विचारिता येईल असे सांगितले. निर्विचार

अवस्थेत आल्यावरच ते माझ्या साक्षात स्वरूपाशी एकरूप होणार. हळूहळू ही निर्विचारिता वाढली आणि एका नव्या सामूहिकतेचा प्रकाश पडू लागला. कोवासजी जहांगीर हॉलमध्ये माझ्या लक्षात आले की भारतीय लोकांना त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्यकर्मांमुळेच भारतात जन्म मिळाला आहे. भारतात हे कार्य करायला मुळीच त्रास पडला नाही. ते लोक पटकन जागृत व्हायचे. सुरुवातीला थोडासा त्रास झाला, पण पाश्चात्य लोकांना जागृती देता देता माझे हात मोडून जायचे. एखाद्याची कुंडलिनी वर आणणे हे डोंगर उचलण्यासारखे असते , कारण ती परत परत खाली यायची. आणखी सामूहिकतेतून हे काम करणे जास्तच अवघड व्हायचे, ते विचित्र व मूर्खासारखे प्रश्न विचारत असत, त्यांची उत्तरे दिल्यावर या बाईला इतकं कसं ठाऊक ह्याचे त्यांना आश्चर्य वाटायचे. सारखी माझीच परीक्षा ते घ्यायचे. कारण त्यांना खूप अहंकार आहे. लंडनमध्ये पहिल्या वेळी सात सहजयोगी झाले. ते सातहीजण मादक औषधे पिणारे हिप्पी होते, पण नंतर सहजयोगी झाले. सहजयोगात आल्यावर त्यांची व्यसने सुटली म्हणून मला ते आधार मानू लागले. अशा व्यसनी लेकांना सरळ करणे सोपे नव्हते. एका परीने हे चांगलेच झाले कारण हे काम करतांना मला जे कष्ट पडले त्यातून मला हे समजून आले, की माणूस कितीही वाईट असला तरी त्याला जर शुद्ध इच्छा असेल तर हे शुद्ध ज्ञान मिळून पटकन जागृती मिळू शकते. अंत:करणापासून आत्मसाक्षात्कार मिळण्याची इच्छा ठेवा असे मी सगळ्यांना सांगत असे. तरच त्यांना जागृती मिळण्याची शक्यता असते. रशिया, उक्रेन, रुमानिया वरगैरे वेगवेगळ्या देशांमध्ये मला निरनिराळे अनुभव आले. या देशांचे आपल्या देशाबरोबर पूर्वी कधीतरी संबंध असले पाहिजेत. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वरगैरे नाथपंथी तिकडे गेले असावेत; कारण मला तिथे गेल्यावर समजले, की या लोकांना शंभरावर वर्षांपासून कुंडलिनीची माहिती आहे. मग मला ह्या लोकांना इतकी लवकर जागृती कशी मिळू शकते हैे समजून आले. नाथपंथीयांनी महाराष्ट्रातही खूप काम केले, मीसुद्धा करीत आहे, पण दुर्देवाची गोष्ट ही, की उत्तर भारतात मी जितके यश मिळवू शकले तितके महाराष्ट्रात मला मिळाले नाही. ह्या महाराष्ट्रीय लोकांना नाथपंथी लोक आणि त्यांचे कार्य चांगले माहीत आहे. साधुसंतांनी इथे खूपच काम केले आहे तरी असं का मला समजत नाही. उत्तर भारतासारखा या महाराष्ट्रात सहजयोग लवकर प्रस्थापित झाला नाही. याला काय कारण असावे? मला वाटते, की लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल आधीच सारे काही माहीत असले तर ते त्याबद्दल अनास्था दाखवतात. संस्कृतमध्ये एक म्हण अशी आहे, की तुम्ही एखाद्या ठिकाणी किंवा व्यक्तीकडे वरचेवर जाता तेव्हा तुमच्याबद्दल अनादर निर्माण होतो. मग तुम्हाला पहिल्यासारखा मान मिळत नाही. प्रयागमधले लोक त्रिवेणीमधे स्नान करण्याऐवजी आपापल्या घरात स्नान करतात, तर जगातले ठिकठिकाणचे लोक तिथे येऊन पूजा करून स्नान करतात. महाराष्ट्रात सहजयोगांतील लोक समर्पण म्हणजे सहजयोगी म्हणून आपल्याला जे मिळाले आहे त्या सहजयोग्याच्या स्थितीचा आपण कसा खूप कार्य करणारे आहेत, पण त्यांचे समर्पण कमी पडते. पुष्कळ उपयोग करणार? ते काय फक्त आपल्या स्वत:च्या कल्याणासाठी आणि आपल्या अडचणी दूर होण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहे, की सर्व जगासाठी ? सर्वप्रथम तुम्ही काय केले पाहिजे, तर ध्यानामधे गहनता मिळवली पाहिजे. गहनतेमध्येच तुम्हाला वाटू लागेल, की हा आनंद स्वत:साठीच न ठेवता दूसर्यांनाही पण वाटावा; त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दूसरे काही नाही. मग

इतर कशाचेही भान रहात नाही. हे झाल्यावरच सहजयोग वाढतो व बळावतो; रात्रंदिवस त्याच्याच ध्यास लागतो आणि त्याचा आनंद उपभोगतो. आजकाल महाराष्ट्रामधे पैशाला फार महत्त्व आले आहे. सकाळी चार वाजता उठून ध्यान वर्गैरे करतात, पण ते यांत्रिकपणे होते. खरं म्हणजे ते हृदयापासून व्हायला हवे आणि त्यात भक्ती हवी. या भक्तीभावनेचा प्रसार करा; महाराष्ट्रीयन लोकांनी हेच केले पाहिजे. मी हे सर्व माझ्या हयातीत पाहू शकेन असं मला वाटले नव्हते. हे सारे कुंडलिनीचे महात्म्य आणि परम चैतन्याचे कार्य झाले आहे. हे परम चैतन्य क्षणांत कसा चमत्कार करते याचे मलाच आश्चर्य वाटते. ही शक्ती माझ्याजवळ असली तरी हे परम चैतन्य माझी वेगवेगळी रूपे दाखवीत आहे. तऱ्हेतऱ्हेचे चमत्कार घडवीत आहे. जसे मेक्सिकोमधे, यूनोमधे नोकरी करणाऱ्या एका महिलेला जागृती मिळाली; तिचा मुलगा फार आजारी असल्याचे तिने मला पत्रातून कळविले; तिच्या घराण्यात मुलांना म्हातारपणाचे रोग/आजार व्हायचे. या मुलाला तोच आजार होता. तिने मला तीन पत्रे पाठवली आणि चौथ्या पत्रात तो स्वत:हुनच बरा झाल्याचे कळविले. हे परम चैतन्याचे कार्य आहे आणि त्या परम चैतन्याहून मोठा डॉक्टर कोणी नाही;B त्याचे कार्य म्हणजे कमालीचे आश्चर्य असते. पुष्कळ लोकांना असे बरेच चमत्काराचे अनुभव आले आहेत कारण हे परम चैतन्य आता कृपाशीर्वादाने भरलेले आहे. सगळीकडे हे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. ते तुम्हाला प्रेम, शांती देईल आणि तुमची सर्व प्रकारे काळजी घेईल. हे सगळीकडे होतेच पण आता त्याच्या हालचारलींमध्ये खूप वेग आला आहे. नुकताच अमेरिकेमध्ये एका मोठ्या हॉलमधे मोठा प्रोग्राम झाला तेव्हा लोकांना बसायला जागा नव्हती; पण पाच मिनिटांत सर्वांना जागृती मिळाली; ते सुद्धा लॉस एंजिलीससारख्या ठिकाणी. मी जिथे जिथे गेले, तिथे तिथे लोकांना पाच मिनिटात जागृती मिळाली. सर्व काही आश्चर्यजनकच. परम चैतन्याचे कार्य इतके वाढले आहे आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारे चालले आहे की ते सामान्य माणसाला समजणार नाही. एकाने माझा फोटो घेतला आणि त्याला इच्छा झाली, की देवीच्या रूपात तिच्या पायामध्ये चंद्र व डोक्यामधे सूर्य आहे असं सांगितल्याप्रमाणे हा फोटो यावा आणि खरोखरच तसाच फोटो आला. तुम्ही लोक जी इच्छा कराल ते होणार आहे. आणखी काय सांगायचे ? परम चैतन्याची ही शक्ती अगाध आहे आणि इतकी सक्षम आहे, की त्याला तुमचे तुम्ही आदिशक्तीची पूजा करता सारे प्रश्न, आजार इ. माहीत असतात व प्रेमाने व हळूवारपणे ती सर्व ठीक करते. त्याचक्षणी या परम चैतन्याची (रूह) पूजा करता. ही शक्ती आता इतकी कार्यरत आहे, की लोकांनी आता या जगामधे परिवर्तन घडविण्यास विलंब करू नये. जे पुढे येऊन हे कार्य करायला हातभार लावतील त्यांचा फायदा होणार आहे. ही शक्ती किती काय काय करते ? तिच्यामुळेच तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला आहे. तिचा तुम्ही उपयोग करू लागलात, की तुम्हाला अशक्य असं काही नाही. कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला बंधन द्या. जे काही काम तुम्हाला करायचं असेल त्यालाही बंधन द्या. बंधनात असल्यावर तुम्ही काय करता ? तुमच्याकडून जी शक्ती वाहत असते ती तुम्ही बांधून ठेवता आणि मग तुमचे जे काम असेल, जे प्रश्न असतील त्यांना बंधन देता. ही शक्ती आता तुमच्याजवळ आहे आणि तुम्ही शक्तिशाली झाला आहात. या शक्तीचा वापर करून तुम्ही कोठपर्यंत जाऊन पोहचू शकाल मलाच माहीत नाही. परमेश्वराचे तुम्हा सर्वांना अंनत आशीर्वाद!