Shri Kartikeya Puja, On Shri Gyaneshwara Mumbai (India)

Marathi Transcription of Shri Kartikeya Puja. Mumbai (India), 21 December 1996. कार्तिकेय पूजा वाशी २१/१२/१९९६ आज आपण सर्वांनी श्री महालक्ष्मीची पूजा करावी अशी लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे पण या महाराष्ट्रात महालक्ष्मीची पूजा तर सतत चालू आहे आणि स्वत: त्यांनी इथे प्रकटीकरण केले आहे, पण माझ्या मते इथे सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावे अशी आंतरिक इच्छा झाली कारण त्यांनी या महाराष्ट्रातच जन्म घेतला आणि ते म्हणजेच ज्ञानेश्वर होते. आजपर्यंत मी सांगितले नाही कारण महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही. स्वत: साक्षात कार्तिकेयाने या महाराष्ट्रात जन्म घेतला आणि इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आणि अमृतावनुभव असे दोन मोठे फारच महान असे ग्रन्थ लिहीले. हे जर तुम्ही व्हायब्रेशन्स वर बघू शकाल, तर एकदम महासागरात, आनंदाच्या लहरीत तुम्ही स्वत:ला शोधू शकाल. एवढी मोठी गोष्ट मी महाराष्ट्रात सांगितली नाही. त्याला कारण महाराष्ट्रीयन लोकांची प्रवृत्ती झाली आहे. कदाचित आपल्याकडे राजकारणी लोक पूर्वी इतके भयंकर झाले. त्यांचा भयंकरपणा व घाणेरडेपणा महाराष्ट्रात पसरला असेल आणि कार्तिकेय हे महाराष्ट्राचे. आम्ही कार्तिकेय असे समजणे म्हणजे अगदी व्यवस्थित साधं महाराष्ट्रीयन डोक आहे. आम्ही काहीतरी शिष्ट. आता यांनी सांगितली खरी गोष्ट आहे की चाळीस आय.ए.एस. ऑफिसर्स आले होते आणि मी येतांना बघितल तिथे पोलिसचे तीन घोडेस्वार उभे होते. म्हटलं ‘हे कोण आले होते ?’ तर म्हणे स्वत: चीफ सेक्रेटरी आले होते. तिथल्या गव्हर्नरनी सुद्धा मला पाचारण केले की, ‘माताजी, मी जर तुमचे पाचारण केले नाही तर लोक मला उचलून फेकतील.’ अशी तिथल्या लोकांची जागृती. तिथे ज्ञानेश्वरांनी जन्म घेतला नाही. फक्त या महाराष्ट्रात का जन्म घेतला ते आता मला लक्षात येतयं. तेवीस वर्षातच ‘नको रे बाबा हा महाराष्ट्र’ म्हणून त्यांनी समाधी घेतली. जितकं संतांना महाराष्ट्रात Read More …