New Year’s eve Puja (India)

New Year Puja – Indian Culture 31st December 1998 Date: Place Kalwe Type Puja Speech-Language English, Marathi & Hindi त्यांच्याकडे लहान मुलांना अत्यंत स्वातंत्र्य असते. कारण त्यांच्याकडे कायद्याने मुलांना काही करता येत नाही. जर एक टीचर मुलाला रागवली, तर त्या टीचरला ते नोकरीवरून काढू शकतात. इथपर्यंत तिथे स्वातंत्र्य आहे. मुलं वाह्यात असतात हे मी कबूल करते . कसेही वागतात, काहीही करतात. आणखीन, त्यांना कोणी थांबवणारे नसते. कोणी सांगणारे नसते. एकदा मी इंग्लंडमध्ये ट्रेनने चालले होते. मी फर्स्ट क्लासमध्ये होते. इतक्यात २५-३० मुलं हातामध्ये सुन्या आणि ब्लेड घेऊन माझ्या कंपार्टमेंटमध्ये आली. म्हटलं आता मला मारतात का? तर म्हणे, आम्ही तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही चुपचाप बसा. ‘तुम्ही काय करता ?’ तर म्हणे, ‘आम्ही ह्या ज्या उशा लावलेल्या आहेत त्या फाडून बघतोय काय आहे ते.’ म्हटलं, ‘त्यात भूसा असेल किंवा अजून काही तरी असेल.’ म्हणे, ‘नाही, नाही, तुम्ही राहू द्या. आम्हाला बघू देत.’ ते सगळं कापत सुटले. मी तर घाबरूनच गेले. पुढच्या स्टेशनवर स्टेशन मास्तरला बोलविले. ते आले. तर ती मूले चांगल्या शाळेत जात होती. त्यांची जी ३-४ हेड मूले होती, ती आली आणि त्यांनी त्यांना धपाधप मारले. त्यांना म्हणे, ‘तुम्ही असे का केले?’ ‘नाही, आम्ही बघत होतो ह्या खूच्च्यांमध्ये काय आहे?’ मला त्यांचे मारणे आवडले नाही. म्हटलं, ‘मारायचे कशाला ? आता झाले ते झाले. तर म्हणे, ‘तुम्ही असे बोलू नका.’ म्हटलं, ‘बरोबर सांगते आहे.’ त्या मुलांना मारल्यामुळे ती सगळी रडत होती. लहान असतील, जवळजवळ ७-८ वर्षांची. ते मला म्हणाले, ‘तुमच्या हिंदुस्थानात मुले असे करतात का? म्हटलं, ‘असे कधीच करणार नाही. शक्यच नाही. इतक्या चांगल्या शाळेत जाणारी मूलं असे कधीच करणार नाहीत. Read More …