New Year’s eve Puja

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

New Year Puja – Indian Culture 31st December 1998 Date: Place Kalwe Type Puja Speech-Language English, Marathi & Hindi

त्यांच्याकडे लहान मुलांना अत्यंत स्वातंत्र्य असते. कारण त्यांच्याकडे कायद्याने मुलांना काही करता येत नाही. जर एक टीचर मुलाला रागवली, तर त्या टीचरला ते नोकरीवरून काढू शकतात. इथपर्यंत तिथे स्वातंत्र्य आहे. मुलं वाह्यात असतात हे मी कबूल करते . कसेही वागतात, काहीही करतात. आणखीन, त्यांना कोणी थांबवणारे नसते. कोणी सांगणारे नसते. एकदा मी इंग्लंडमध्ये ट्रेनने चालले होते. मी फर्स्ट क्लासमध्ये होते. इतक्यात २५-३० मुलं हातामध्ये सुन्या आणि ब्लेड घेऊन माझ्या कंपार्टमेंटमध्ये आली. म्हटलं आता मला मारतात का? तर म्हणे, आम्ही तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही चुपचाप बसा. ‘तुम्ही काय करता ?’ तर म्हणे, ‘आम्ही ह्या ज्या उशा लावलेल्या आहेत त्या फाडून बघतोय काय आहे ते.’ म्हटलं, ‘त्यात भूसा असेल किंवा अजून काही तरी असेल.’ म्हणे, ‘नाही, नाही, तुम्ही राहू द्या. आम्हाला बघू देत.’ ते सगळं कापत सुटले. मी तर घाबरूनच गेले. पुढच्या स्टेशनवर स्टेशन मास्तरला बोलविले. ते आले. तर ती मूले चांगल्या शाळेत जात होती. त्यांची जी ३-४ हेड मूले होती, ती आली आणि त्यांनी त्यांना धपाधप मारले. त्यांना म्हणे, ‘तुम्ही असे का केले?’ ‘नाही, आम्ही बघत होतो ह्या खूच्च्यांमध्ये काय आहे?’ मला त्यांचे मारणे आवडले नाही. म्हटलं, ‘मारायचे कशाला ? आता झाले ते झाले. तर म्हणे, ‘तुम्ही असे बोलू नका.’ म्हटलं, ‘बरोबर सांगते आहे.’ त्या मुलांना मारल्यामुळे ती सगळी रडत होती. लहान असतील, जवळजवळ ७-८ वर्षांची. ते मला म्हणाले, ‘तुमच्या हिंदुस्थानात मुले असे करतात का? म्हटलं, ‘असे कधीच करणार नाही. शक्यच नाही. इतक्या चांगल्या शाळेत जाणारी मूलं असे कधीच करणार नाहीत. चूपचाप बसतील.’ घरीसुद्धा कोणी आले तर त्यांना सांगितले जाते, की बोलायचे नाही. शांत बसून रहायचे. कोणाच्या घरी गेले तर काही मागायचे नाही. मुलांना, कोणी काही दिले तर घ्यायचे की नाही घ्यायचे ? असा प्रश्न. घेतले तर काय ? घरी जाऊन धपाटा मिळेल की काय ? आईने किंवा वडीलांनी ‘हं’ म्हटल्यावर काही तरी घेतील. आपल्याकडे मुलांना इतके चांगले वळण असते. ते चांगलेही वाटते. ती चांगल्या रीतीने वागल्यावर बरे वाटते. पण आपण जरा जास्तच जबरदस्त आहोत. मुलांना फारच, इथे बस रे, तिथे बस रे. हे केलेस का? सकाळी असे केलेस का? आपण त्यांची फारच गळचेपी करतो असे मला वाटते. कारण आता मी ह्यांची मूले बघते. आधी आमच्या शाळेमध्ये आली. ती शाळा म्हणजे जंगलात. इतक्या उंचावर. कुठे पडतील का, कुठे धडपडतील का ह्याची काळजी. पण हळूहळू जमले. डोक्यात आले त्यांच्या. आता इतकी लहान लहान मुले घरे काय बांधतात, पेंटिंग्ज काय करतात! आमची मुलं कधी नाही करू शकत. त्यांच्यातला कर्तृत्वपणा जो आहे, तो आपल्याकडे मारला जातो सगळा. तो मारला नाही पाहिजे. धार्मिकता आली पाहिजे. पावित्र्य आले पाहिजे. इतकेच नव्हे तर मोठ्यांच्या प्रती आदर वगैरे असला पाहिजे. मारून मुटकून आलेला आदर काय कामाचा!

आता हे लोक मूले नाहीत, सगळी मोठी झालेली लोकं आहेत. ते आमच्या अॅकॅडमीमध्ये आले तर तीन – चार महिन्यात मालकंस राग वाजवतात. म्हटलं, बाप रे! त्या मालकंस रागाला वाजवायला आपल्याकडे लोक दहा दहा वर्षे तपश्चर्या करतात. त्यातून गुरू त्यांना सारखे झोडपतच असतात. त्या झोडपण्यातूनच मोठे संगीतकार व्हायचे. त्यांची तब्येत चांगलीच ठीक असते. मार खाऊन खाऊन ते विद्यार्थी तयार होतात. अहो, हे रविशंकर. त्यांनी आपल्या गुरूकडून इतका मार खाल्ला. तेच नाही, तर इतरही लोकांचे मी ऐकले आहे. ठोकून ठोकून काढतात. शेवटी मग काय दहा वर्ष, बारा वर्षे, चौदा वर्षे रगडल्यावर कुठे जाऊन त्यांना म्यूझिक येते. पण हे लोक तीन महिन्यात, चार महिन्यात कसे शिकले ? ज्यांना आपल्याबद्दल, आपल्या संगीताबद्दल, संस्कृतीबद्दल एवढीसुद्धा माहिती नाही आणि हे कसे शिकले! रागदारी शिकले, सगळे शिकले. तेव्हा माझ्या डोक्यात असा प्रकाश पडला, की आपण आपल्या मुलांना जास्तच, त्यांचे पंख कापूनच ठेवतो. मुलांना प्रेमाने वागवत नाही. तू असा का वागलास? इथे का बसलास? तिथे का बसलास? असे जा. तस जा. मी चालूच. कधी आपल्या मुलांना तसे केले नाही. पण इतरत्र मी बघते, असा प्रकार फार आहे. उठल्यासुटल्या मुलांना दुषणे द्यायची म्हणजे त्यांचा आत्मसन्मानच कमी होऊन जातो. हे असले प्रकार आपल्याकडे फार असल्याने मुलांचे काय होते की फार तर शिकतील, वाचन करतील, पण त्याच्यापुढे कला, कलात्मकता त्यांच्यामध्ये येत नाही. कलेचा प्रादूर्भाव कमी आहे. पण त्याच्यावरही धार्मिकता जी यायला पाहिजे ती स्वतंत्र बुद्धीत आली तर विशेष. जबरदस्तीचा राम राम करण्यात काय फायदा! ती एका स्वतंत्र मनाने यायला पाहिजे. पण सहजयोगात येऊन एवढे समजले पाहिजे, की तुमची मुलं बॉर्न रियलाइज्ड आहेत. जन्मत: च ती रियलाइज्ड मुले आहेत. तेव्हा त्यांचा मान ठेवायला पाहिजे. साधू-संत येतात तुमच्या घरी. त्यांचा मान ठेवायचा, त्यांचे ऐकायचे. त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकले पाहिजे. त्यांचे बोलणे ऐकले म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. कमालीचे डोके आहे त्यांचे. कमालीची समज. जे आपल्याला नाही जमणार ते त्यांना जमते. (अस्पष्ट) तर त्यांना एवढेच समजले, की माझी साडी आमच्या मोलकरणीने माझ्या नातीने.. जमिनीवर टाकली, तर ती जाऊन त्यांना चावली. म्हटलं, ‘चावलीस कशाला ? ‘ ‘कोणाची साडी आहे ती माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही साडी खाली जमिनीवर टाकता, उद्या मी तुम्हाला जमिनीवर टाकेन.’ तर ती घाबरली. ती म्हणे, ‘बरं बाबा, आता नाही करणार.’ तर त्यांचे जे आहे, त्यांचे जे वागणे आहे, त्यांचे जे प्रेम आहे, त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे दाखविले आहे, ते बघितले पाहिजे. कौतुक केले पाहिजे आणि बघितले पाहिजे, की ही मूलं काय सांगतात. त्यात आपले मोठेपण जाणार नाही (कमीपणा येणार नाही). आपल्याकडे आई -वडील मोठे होते. त्यांच्याहून आजी-आजोबा तर आणखीनच मोठे. एकवेळ आजी-आजोबा हो म्हणतील, पण आई-वडील हो नाही म्हणणार. तर ही जी आपल्याकडे मुलांबाबतीतची शिस्त आहे, ती कमी करायला पाहिजे. ह्याची काही गरज नाही. त्यातून हे पार झालेले लोक आहेत. जन्मत: च पार झालेले. पुष्कळसे लोक आता पार होत आहेत. तेव्हा त्यांचे वागणे बघावे. त्यांचा विचार बघावा. त्यांच्याशी गोष्टी कराव्यात. अशा मुलांशी बोलतांनासुद्धा फार आनंद होतो. अशा मजेदार मजेदार गोष्टी बोलतात. तेवढ्यात त्यांच्या थोबाडीत मारले जाते, ‘चूप रहा. असे बोलायचे.

नाही.’ म्हणजे डोक्यात असे आले, की ही परदेशातली मुले जी शाळेत जायची, तर त्यांच्या टिचरला छडी ठेवायचीसुद्धा परवानगी नाही. तिने जर काही म्हटले तर कायद्याने तिला जेलमध्ये पाठवू शकतात. अशी स्थिती आहे. पण त्या फ्रीडममधून आज जे निघाले ते हे. मग ते जर जन्मत: च सिद्ध आहेत. मग त्यांचा मान नको का ठेवायला! तुम्ही सहजयोगी नंतर झालात. हे जन्मलेलेच सिद्ध पुरुष आहेत. त्यांचा मान ठेवायला पाहिजे. त्यांची थट्टामस्करी करायची नाही. पण खरोखर त्यांना मानाने ठेवायचे. म्हणजे त्यांच्या मुकाबल्यात हे उभे राहतील, हे मला नक्की माहिती आहे. मुलं पार असली तरी त्यांना असे हाताळले तर त्याने मूले बेकार जाणार. त्यांचा मान ठेवायचा. त्यांना समजून घ्यायचे. त्यांना सहजयोगाचे पूर्णपणे शिक्षण दिले पाहिजे. हे जर आपल्यात आले, तर आपली मुलेसुद्धा कोणापेक्षा कमी होणार नाहीत. आणि आपल्या देशाची सर्वतऱ्हेने महती वाढणार आहे. म्हणजे ज्याला आपण आध्यात्म म्हणतो, स्पिरिच्यूअलिटी म्हणतो, तो आध्यात्म आपल्या देशात भरपूर आहे. आध्यात्माने लोकांना वाटतं, की लोक सगळे हरी हरी करीत बसतात. निष्क्रिय होतात. काही कामाचे होत नाहीत (कामातून जातात). काही नाही. बेकार बसलेत. सर्व शक्ती संचार झाल्यावर तुमचे असे दुमत होणारच नाही. त्या शक्तीचा परिणाम येणारच आणि त्याच्यात संलग्न होणार. त्याबद्दल शंका नाही. पण तुमच्या मुलांचे मला विशेष वाटते. कारण मी ह्या देशाचे भविष्य बघते आहे. हे कर्तबगार आता तुमच्या पोटी जन्माला आले. हे फार मोठे लोक आहेत. फार मोठे संत-साधू आहेत. ह्यांनी तुमच्याकडे अशासाठी जन्म घेतला, की तुम्ही पार आहात. तुम्ही रियलायज्ड सोल आहात. पण जर तुम्हीसुद्धा हे समजला नाहीत, तर हे एवढे मोठे संत-साधु वाया जाणार. म्हणून मुलांना मारणे, मुलांना शिक्षा देणे, त्यांच्यावर ओरडणे, रागावणे, तुम्ही सहजयोग्यांनी बिल्कुल बंद केले पाहिजे. आजपर्यंत मी कधी म्हटले नाही. पण आज मी हाच विचार केला, की लोकांना मी हेच समजवून सांगणार आहे आणि त्यांच्या ज्या आतून शक्त्या आहेत, त्याला आणखीन जागृत केले पाहिजे. इतकंच नव्हे तर जागृत करून त्या मुलांना बरोबर अशा ठिकाणी बसवले पाहिजे, जिथे त्यांची पूर्ण प्रगती होईल. त्यांची सबंध आयुष्याची रेखा बदलेल आणि ते समजतील की आम्ही काहीतरी आहोत. त्यामुळे होतं काय, की मुलं मिंधी होतात. भितात. त्यांचे व्यक्तित्व मारले जाते. तसं व्हायला नको. कारण ही मुलं जन्मलीच तेवढ्यासाठी आहेत. कोणत्या कोणत्या कार्यात ते उन्नत होतील ते सांगता येण्यासारखे नाही. त्याने आपल्या देशाची सर्वांगीण स्थिती ठीक होते. हा आपल्या देशासाठी सहजयोगाचा मोठा आशीर्वाद आहे, की तुमच्या दारी, तुमच्या घरी असे मोठमोठाले साधु-संत जन्माला येतील. त्या साधु-संतांचे इतके तुम्ही वर्णन ऐकले आहे, साक्षात् इथे असतांना तुम्ही ओळखत कसे नाहीत. त्यांना ओळखलं पाहिजे. त्यांना ओळखून त्यांची जर पूर्णपणे तुम्ही प्रतिष्ठा ठेवलीत तर ती मुलं तुम्हाला कुठल्या कुठे पोहोचवतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारताचे सौभाग्य ह्याच्यातच आहे. ते ह्या सहजयोगात पुष्कळशा गोष्टी ठीक होतात. तुमचे आजार ठीक होतात. बाधा ठीक होतात. तुम्हाला चांगली मुलं होतात. त्यांना मुलं होतात. मग पुढे काय? तर आपल्या देशाची पूर्ण आठवण ठेवायची, की आम्ही ह्या देशासाठी मुलं जन्माला घातली आहेत, आमच्यासाठी नाही. ह्याच्यात कार्यान्वित होण्यासाठी त्यांचे जे गुण.

आहेत ते पूर्णपणे प्रस्फूटित झाले पाहिजे. असला विचार आपल्या डोक्यात ठेवायचा. ही मुलं कधीही चुकीचे काम करणार नाहीत. कारण ते संत-साधु आहेत. पण त्यांना वाव दिला पाहिजे. हे मला आपलं स्वत:ला वाटतं. आज सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही संस्कृतीवर बोला. अहो, असेल मोठी भारी संस्कृती तुमची. पण संस्कृतीला काही अर्थ असला पाहिजे. मुलं अगदी आज्ञाधारक असली पाहिजेत. इकडून तिकडे त्यांनी वळलं नाही पाहिजे. हे सर्व करायला आई-वडील तरी कुठे असे मोठे शहाणे आहेत! त्या मुलांना जसे वागायचे असेल, तसे वागू द्यात. त्यांचे कौतुक करा. त्यांना समजून घ्या. तुमच्या लक्षात येईल, की ही मुलं म्हणजे गुणांच्या खाणीच्या खाणी. त्यांना तुम्ही काही सांगायची गरज नाही. एखाद- दोन बहकतीलसुद्धा. असे नाही म्हणत मी. पण बहतेक नाही. तेव्हा माझे असे म्हणणे आहे, की मला ते बघवत नाही. मुलांना रागवलेले वरगैरे मला मुळीच बघवत नाही आणि आवडतही नाही. त्यामुळे मी करतही नाही तसे. कधीच केले नाही. समजवून सांगा. काही गोष्ट असेल तर समजवून सांगितलं तर मुलं समजतात. हं, फारच चुकलं तर सांगायला पाहिजे. पण उगीचच आपलं दाखवायचं की आमची हुकूमत आहे मुलांवरती. तसं करू नका. ह्या मुलांचे साम्राज्य जेव्हा येईल, तेव्हा आपल्याला कळेल, की हा देश किती महान आहे! आज म्हटलं संस्कृतीवर बोलून बोलून तरी काय होणार आहे? पुराणाची वांगी पुराणातच. पण हे वास्तविक रोजच्या जीवनाला जे लागतं, ते समजलं पाहिजे. एवढे अगदी रिस्ट्रिक्टेड, एवढे अगदी जबरदस्त, मग म्हणायचे, ऐकत नाहीत. तुमचे ऐकायला तुम्ही कोण आहात ? तुम्ही कोणी साधु-संत आहात का? ह्याची फार गरज आहे. मी तुम्हाला सांगते फार गरज आहे. कारण कायद्याने आपल्यावरती काही बंधनं नाहीत. ह्या परदेशी लोकांवर आहेत. ते काही करू शकत नाहीत. मुलाला हात जरी लावला नां, तर गेले जेलमध्ये. ह्या लोकांच्या मते ह्यांच्या साम्राज्यात मुलं म्हणजे ही देशाची प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, तुमची नाही. मुलांना ओळखले पाहिजे, जर ते बॉर्न रियलायज्ड आहेत, जर त्यांच्यामध्ये ते गुण आहेतच. ते द्विगुणित करण्याऐवजी त्यांना जर तुम्ही दाबून काम करतील. ते ही नाही झाले तर बिघडतात. तुमच्या हातात कमळे द्यावीत आणि ती तुम्ही कुस्करून टाकावी. ठेवले तर ते तुमच्यापासून पळतील. पळाले नाही तर चुकीचे ह्याला काय म्हणायचे ! आता नवीन वर्ष आहे. नवीन वर्षात निश्चय करून टाकायचा, की आम्ही आमच्या मुलांवर कोणतेही रिस्ट्रिक्शन घालणार नाही.