Public Program Pune (India)

Velechi Hallk 25th March 1999 Date : Place Pune Public Program Type सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार! पूर्वी अनेकवेळा मी आपल्याला सत्याबद्दल सांगितलं होतं. सत्य काय आहे ? सत्य आणि असत्य यातला फरक कसा ओळखायचा याबद्दल मी आपल्याला बरंच समजावून सांगितलं होतं. आधी या पुण्यात या पुण्यपट्टणम मध्ये पण आपण सत्य का शोधतो ते बघितलं पाहिजे. आज या कलियुगात अनेक असे प्रकार दिसून येतात की मनुष्य घाबरून जातो. त्याला समजत नाही की हे सर्व काय चालले आहे आणि ही कलियुगाची विशेषता आहे की मनुष्याला भ्रांती पडते. त्याला भ्रांती होते आणि त्या भ्रांतीतून तो बावचळून जातो. घाबरून जातो. त्याला समजत नाही की सत्य काय आहे, मी कुठे चाललोय, जग कुठे चाललंय असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात डोकावतात. हे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे पण सर्व जगात आहे. सर्व जगाला या कलीच्या महिम्याची फार पूर्णपणे जाणीव झालेली आहे. सांगायचं म्हणजे नल आणि दमयंती यांचा जो विरह केला गेला तो कलीने केला आणि एकदा हा कली नलाच्या हाती सापडला. त्यांनी सांगितलं की मी तुझा सर्वनाश करून टाकतो म्हणजे कोणालाच तुझा उपद्रव व्हायला नको, काही त्रास व्हायला नको तर तेव्हा कलीने त्याला सांगितलं की हे बघ की माझं आधी तू माहात्म्य ऐक आणि ते ऐकल्यावर जर मला मारायचे असेल तर मारून टाक. तर त्यांनी (नलाने) सांगितलं तुझं काय महत्त्व आहे? काय महत्त्व आहे तुझें? तर त्यावर त्याने (कलीने) सांगितले की माझं हे महत्त्व आहे की जेव्हा माझं राज्य येईल म्हणजे जेव्हा कलियुग येईल तेव्हा लोक भ्रांतीत पडतील. हे खरं आहे. पण त्यामुळेच त्यांच्यामध्ये अशी उत्कट इच्छा होईल की आपण शोधून काढावं की मनुष्याचं Read More …