Talk, Paane ke baad dena chaahiye swagat samaroh New Delhi (India)

1999-12-05 Talk in Delhi: Paane ke baad dena chaahiye swagat samaroh [Marathi translation Hindi talk, (excerpt) scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्याच्या प्रकाशात आलेल्या सर्व सहजयोग्यांना नमस्कार, इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला इथे एकत्र जमलेले पाहून माझे हृदय खरोखरच भरून आले आहे. शिवाय माझ्या जीवितकालामध्ये एवढे सहजयोगी जगभर झाले याचेही मला मोठे समाधान आहे. सत्य जाणल्याशिवाय मानवी जीवन अर्थशून्य आहे; तो प्रकाश मिळत नाही तोपर्यंत मनुष्य आयुष्यभर भरकटतच राहतो. पण मी हा माणसाचा दोष समजत नाही. दोष असेल तर त्याला व्यापून राहिलेल्या अंधाराचा. म्हणूनच सहजयोगामधून प्रकाश मिळाला, तो सहजयोग आणखी खूप लोकांना द्या, तुम्हाला जे मिळाले आहे ते इतरांना वाटा म्हणजे सहजयोग आणखी पसरेल, त्याच्यातूनच या भूतलावर एक सुंदर शांतीचा स्वर्ग निर्माण होणार आहे. ही तुमचीच जबाबदारी आहे. भारतात आता है कार्य खूप जोराने चालले आहेच. तशी ही भारतभूमि योगभूमि आहे आणि इथे हे होणार हे खूप पूर्वीचं भाकित केले गेले आहे. भारत ही माझी मातृभूमि आहे आणि इथे येण्याचा आनंद शब्दांतून व्यक्त करणे अवघड आहे. तुम्हा सर्वाना भेटल्यावर तर हा आनंद द्विगुणित होतो. त्यातूनच इथे खन्या अर्थाने स्मरमय अर्थात आत्म्याचे राज्य प्रस्थापित होईल; स्व-तंत्राचा अर्थही तोच व हेच आता इथे घटित झाले आहे. म्हणूनच तुमच्यासारखे आणखी लोक सहजयोगात आणण्याचे कार्य तुम्हाला करायचे आहे. नुकतेच मला समजले की काही परदेशीय सहजयोगी इथे आले आणि सहजयोगाचे कार्य करण्यासाठी ओरिसात गेले; तिथे नऊ कंद्रे त्यांनी सुरू अलिकडे झालेल्या भीषण वादळात तेथील सहजयोग्याचे कसलेही नुकसान झाले नाही. तुर्कस्थानमध्येही (तिथे दोन हजार सहजयोगी आहेत) भूकप झाला तेव्हा तेथील सर्व सहजयोगी वाचले, कुणालाही कसलाही अपाय झाला नाही. तेव्हा सहजयोगात तुमचे पूर्ण संरक्षण होणार आहे हा मी Read More …